दौलतनगर
दि.23 :- हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख वंदनीय स्व.
बाळासाहेब ठाकरे यांचे ९4 व्या
जयंती दिनानिमित्त महाराष्ट्र राज्याचे गृह
(ग्रामीण),वित्त,नियोजन,राज्य उत्पादन शुल्क,कौशल्य विकास व उद्योजकता, पणन
राज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी सातारा जिल्हयाच्या ठिकाणी वंदनीय
स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन विन्रम अभिवादन केले.
सातारा याठिकाणी हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख स्व.बाळासाहेब
ठाकरे यांचे ९४ व्या
जयंती दिनानिमित्त शिवदौलत सहकारी बँकेमध्ये अभिवादन कार्यक्रम आयोजीत करण्यात आला होता.प्रारंभी
गृह
(ग्रामीण), वित्त, नियोजन,राज्य उत्पादन शुल्क,कौशल्य विकास व उद्योजकता,पणन
राज्यमंत्री ना.
शंभूराज देसाई यांच्या हस्ते स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या
प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन विन्रम अभिवादन करण्यात
आले याप्रसंगी मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रविराज देसाई, शिवदौलत सहकारी बँकेचे
संचालक अभिजीत पाटील, संजय देशमुख, नामदेवराव साळुंखे, प्रा.पी.पी.यादव या प्रमुख
पदाधिकारी यांच्यासह पाटण तालुका सातारा रहिवाशी मित्रमंडळातील प्रमुख
पदाधिकारी,कार्यकर्ते व शिवसैनिक यांची प्रमुख उपस्थिती होती.
याप्रसंगी बोलताना राज्यमंत्री ना.शंभूराज देसाई म्हणाले,हिंदुहृदय सम्राट शिवसेनाप्रमुख कै. बाळासाहेब ठाकरे यांचे
आणि पाटण विधानसभा मतदारसंघाचे
श्रध्दास्थान महाराष्ट्राचे पोलादी पुरुष लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे ऋणानुबंध
महाराष्ट्राला परिचीत आहेत.शिवसेना पक्षाच्या उभारणीत
लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे मोलाचे सहकार्य असल्याचे प्रतिपादन स्व. बाळासाहेब ठाकरे यांनी अनेकदा आपल्या वक्तव्यातून केले आहे.लोकनेते बाळासाहेब देसाई यांना अभिवादन करण्याकरीता स्व.बाळासाहेब ठाकरे हे कारखाना कार्यस्थळावर आले होते. त्यांच्याच
प्रमुख उपस्थितीत माझा शिवसेना पक्षात प्रवेश झाला त्यांच्या माध्यमातून मला सहकार
परिषदेचे अध्यक्षपद मिळाले ही पाटण विधानसभा मतदारसंघाच्या दृष्टीने अभिमानाची बाब आहे. सन १९९६ ला शिवसेनाप्रमुख हिंदूह्दयसम्राट
स्व.बाळासाहेब ठाकरे यांनी दौलतनगर येथे आदरणीय लोकनेते बाळासाहेब देसाईसाहेब
यांचे कर्मभूमि आणि जन्मभूमिमध्ये येवून मला सहकार परीषदेचे अध्यक्षपद देवून
राज्यमंत्रीपदाचा दर्जा बहाल करुन पाटण विधानसभा मतदारसंघाचा केलेला सन्मान हा
अविस्मरणीय आहे.सन १९९६ पासून मी शिवसेना पक्षात स्व.बाळासाहेब ठाकरे यांचा
शिवसैनिक म्हणून कार्यरत असून स्व.बाळासाहेब यांनी स्थापन केलेल्या शिवसेना
पक्षाच्या माध्यमातून मला तीनवेळा महाराष्ट्र विधानसभेमध्ये पाटण मतदारसंघाचा
आमदार म्हणून जाण्याची संधी मिळाली.स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या पश्चात पक्षाचे
पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री ना. उध्दवजी ठाकरे यांनी राज्य शासनातील
महत्वाच्या असणाऱ्या खात्यांच्या राज्यमंत्रीपदाची जबाबदारी माझेवर सोपविली आहे.हे पक्षातील
निष्ठेचे फळ आहे. स्व.बाळासाहेब ठाकरे यांचे
जाण्याने शिवसेनेत निर्माण झालेली पोकळी आजही कायम आहे. मुंबईत
राहणाऱ्या गावाकडील जनतेला दिलासा देण्याचे मोठे काम स्व.
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी केले. गावाकडचा माणूस मुंबईसारख्या मायानगरीत ताठ मानेने उभा होता आणि आजही आहे तो
स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळे.त्यांचे अनंत उपकार
महाराष्ट्रातील जनतेवर असून लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी उद्योग व शिक्षण
समुहाच्या तसेच पाटण विधानसभा मतदारसंघातील तसेच सातारा
जिल्हयातील तमाम शिवसैनिकांच्या
वतीने त्यांचे ९४ व्या
जयंतीनिमित्त मी त्यांना विनम्र अभिवादन करतो.
चौकट:- लोकनेते
बाळासाहेब देसाई सह.उद्योग,शिक्षण समुहाच्या वतीने दौलतनगरला शिवसेनाप्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी.
शिवसेनाप्रमुख वंदनीय स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे ९४ व्या जयंती दिनानिमित्त लोकनेते बाळासाहेब
देसाई सहकारी उद्योग,शिक्षण
समुहाच्या वतीने कारखाना कार्यस्थळावरही स्व.
बाळासाहेब ठाकरे यांना विन्रम अभिवादन करण्यात आले.याप्रसंगी
साखर कारखान्याचे चेअरमन अशोकराव पाटील,संचालक संपतराव सत्रे,राजाराम मोहिते या प्रमुख पदाधिकाऱ्यांसह
पाटण मतदारसंघातील शिवसेनेचे पदाधिकारी, शिवसैनिक, बाबासाहेब
आंबेडकर विचार मंच,जय मल्हार संघटनेचे सर्व पदाधिकारी, कोयना परिसर साखर कामगार संघटना,पाटण तालुका शंभूराज
युवा संघटना,लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कामगार सेवा सोसायटी आणि देसाई उद्योग व शिक्षण समुहातील अधिकारी, कर्मचारी यांची उपस्थिती होती.
No comments:
Post a Comment