दौलतनगर
दि.०४:- शिवसेना
पक्षप्रमुख व राज्याचे मुख्यमंत्री ना.उध्दवजी ठाकरे यांनी माझेवर राज्याचा
राज्यमंत्री म्हणून जबाबदारी दिली असून या जबाबदारी बरोबरच जिल्हयात व राज्यात
पक्षसंघटना मजबुत करण्याचीही जबाबदारी दिली आहे.संघटना आणि सरकार यामध्ये समन्वय
निर्माण करुन पक्षवाढीची सुरुवात ही आपल्या सातारा जिल्हयातूनच आपल्याला करावयाची
आहे.सातारा जिल्हयातील तळागाळातील शिवसैनिकांना मिळालेल्या सत्तेचा वापर करुन
देण्यामध्ये मी कुठेही कमी पडणार नाही अशी ग्वाही ना.शंभूराज देसाईंनी सातारा
जिल्हयातील शिवसेना पदाधिकारी यांना देवून सर्वांनी एकजुटीने आणि एकमुखाने शिवसेना
पक्ष जिल्हयामध्ये वाढविण्यासाठी प्रयत्न करुया असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
सातारा विश्रामगृह याठिकाणी ना.शंभूराज देसाई
यांच्या अध्यक्षतेखाली व कोरेगांवचे शिवसेना आमदार महेश शिंदे यांच्या प्रमुख
उपस्थितीत सातारा जिल्हयातील शिवसेना जिल्हाप्रमुख, उपजिल्हाप्रमुख, तालुकाप्रमुख
व शिवसेना पदाधिकारी यांची बैठक आयोजीत करण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते.
याप्रसंगी
बोलताना ना.शंभूराज देसाई म्हणाले,सातारा जिल्हयामध्ये माझेरुपाने राज्याचा
राज्यमंत्री म्हणून एक हक्काचा माणूस शिवसैनिकांना आपल्या सर्वांचे पक्षप्रमुख व
राज्याचे मुख्यमंत्री ना.उध्दवजी ठाकरे यांनी दिला आहे. याचा मला अभिमान
आहे.राज्याचे मुख्यमंत्री ना.उध्दवजी ठाकरे यांनी मला राज्याचा राज्यमंत्री करुन
सातारा जिल्हयामध्ये शिवसेना पक्षसंघटना मजबूत करण्याकरीता जबाबदारी दिली
आहे.पक्षप्रमुखांनी दिलेली जबाबदारी मी लिलया पेलणार असून सातारा जिल्हयातील
तळागाळातल्या शिवसैनिकांना न्याय मिळवून देणेकरीता तसेच आपल्याला मिळालेल्या
सत्तेचा वापर त्यांना करुन देणेकरीता मी कायम प्रयत्नशील राहणार आहे.राज्यमंत्री
म्हणून जबाबदारी पार पाडत असताना ज्या पक्षामुळे आणि पक्षाच्या
पदाधिकाऱ्यांच्यामुळे आपण ज्या पदापर्यंत पोहचलो आहोत त्या पदाचा वापर पक्षाकरीता
आणि पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकरीता करणे हेच माझे पहिले कर्तव्य मी मानतो. सातारा
जिल्हयातील शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिकांना अपेक्षित असेच काम माझे हातून होईल
अशी मला खात्री असून सातारा जिल्हयातील सर्व शिवसेना पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी
सातारा जिल्हयात त्यांना कोणतीही आणि कसलीही अडचण किंवा समस्या निर्माण झाल्यास
किंवा त्यांच्या त्यांच्या मतदारसंघातील विविध विकासकामांच्या संदर्भात निसंकोचपणे
माझेकडे यावे.सातारा जिल्हयातील सर्व शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्याकरीता
तुमच्या हक्काचा माणूस म्हणून उपलब्ध असणार आहे.सातारा जिल्हयातील शिवसेना
पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी नियोजनबध्द कामांचे नियोजन करावे.प्रत्येकांनी
आपल्या जिल्हाप्रमुख यांचेमार्फत आपल्याकडील समस्या,विविध विकासकामांच्या यादया
तयार कराव्यात सत्तेच्या माध्यमातून सर्वांना न्याय दिला जाईल.महिन्यातील एक दोन
दिवस जिल्हयाच्या दौऱ्यावर असताना
जिल्हयातील सर्व शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते यांचेकरीता वेळ राखीव ठेवून
त्यांच्याशी समन्वय साधूनच जिल्हयामध्ये काम करण्याचे नियोजन आपण सर्वांनी करुया
असे सांगून ना.शंभूराज देसाईंनी आपण सर्वांनी एकमुखाने शिवसेना पक्ष सातारा
जिल्हयात वाढीकरीता प्रयत्नशील राहूया. आपल्या समस्या सोडविण्याकरीता मी कुठेही
आणि कधीही कमी पडणार नसल्याची ग्वाही सर्व शिवसेना पदाधिकाऱ्यांनी दिली.
यावेळी
आमदार महेश शिंदे यांनी मनोगत व्यक्त करताना म्हणाले, ना.शंभूराज देसाई यांना
सर्वसामान्य जनतेविषयी कणव आहे. त्यांची आतापर्यंतची राजकीय कारकीर्द ही संघर्षातून
गेली आहे. एक हक्काचा मंत्री आपल्या सर्वांचे पक्षप्रमुख व राज्याचे मुख्यमंत्री
ना.उध्दवजी ठाकरे यांनी आपल्या सर्वांना दिला आहे. त्यांना प्रशासनातील दांडगा
अनुभव असून त्यांच्या अनुभवाचा उपयोग सातारा जिल्हयातील सर्व शिवसेनेच्या
पदाधिकारी व कार्यकर्ते यांना होईल यात तीळमात्र शंका नाही. ना.शंभूराज देसाईंनी
सातारा जिल्हयामध्ये शिवसेना पक्षवाढीचा जो विढा उचचला आहे त्याला आपण सर्वांनी
पाठबळ आणि ताकत देण्याची गरज आहे. आपण सर्वजण त्यांच्या पाठीशी ठाम राहून आपल्या
सर्वांचे पक्षप्रमुख ना.उध्दवजी ठाकरे यांचे हात बळकट करुया असे आवाहन त्यांनी
यावेळी बोलताना केले.बैठकीस जिल्हाप्रमुख जयवंतराव शेलार,यशवंत घाडगे, चंद्रकांत
जाधव,युवासेना प्रमुख रणजितसिंह भोसले,महिला जिल्हाप्रमुख श्रीमती शारदा जाधव, उपजिल्हाप्रमुख
रामभाऊ रैनाक यांच्यासह तालुकाप्रमुख,उपतालुकाप्रमुख,शहर प्रमुख व शिवसैनिक हे
उपस्थित होते.
जय महाराष्ट्र
ReplyDeleteJay maharashtra...Jay shivsena
ReplyDeleteJay Maharashtra
ReplyDeleteजय महाराष्ट्र
ReplyDelete