Wednesday 29 January 2020

लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी कारखान्याचे ०१ लाख ११ हजार १११ साखर पोत्यांचे गृहराज्यमंत्री नामदार शंभूराज देसाईं यांचे हस्ते पूजन.



            दौलतनगर दि.28 :- दौलतनगर,ता.पाटण येथील लोकनेते बाळासाहेब देसाई साखर कारखान्यांमध्ये सन २०20-२1 चे गळीत हंगामामध्ये उत्पादित  झालेल्या १ लाख ११ हजार १११ साखर पोत्याचे पूजन महाराष्ट्र राज्याचे गृह (ग्रामीण), वित्त, नियोजन,राज्य उत्पादन शुल्क,कौशल्य विकास व उद्योजकता,पणन राज्यमंत्री शंभूराज देसाई यांचे शुभहस्ते करण्यात आले.
        यावेळी नामदार शंभूराज देसाई म्हणाले, कारखान्यांने 61 दिवसांत 95855 मे.टनाचे गाळप करुन १ लाख 11 हजार १११ साखर पोती उत्पादित केली आहे. यावर्षी सरासरी साखर उतारा ११.६4 असून आजचा साखर उतारा १२.५2 इतका आहे.असे सांगून ते पुढे म्हणाले कारखान्याचे संचालक मंडळ,अधिकारी,कर्मचारी कारखान्यांला नियमितपणे ऊस पुरवठा होणेसाठी प्रयत्न करीत आहेत. कारखान्याचा चालू गळीत हंगाम अत्यंत चांगल्या प्रकारे चालला असून कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादक आपल्या ऊसाचा पुरवठा नियमितपणे सुरु आहे. याहीपुढे अशाच प्रकारे कारखान्यांस ऊस पुरवठा करुन  चालू गळीत हंगाम यशस्वीरित्या पार पाडणेसाठी सर्वानी सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.
     यावेळी युवा नेते यशराज देसाई, कारखान्याचे चेअरमन अशोकराव पाटील, व्हाईस चेअरमन राजाराम पाटील,संचालक पांडूरंग नलवडे,बबनराव भिसे,आनंदराव चव्हाण,संपतराव सत्रे,राजेंद्र गुरव,अशोकराव डिगे, विकास गिरी गोसावी,बाळासाहेब शेजवळ,वसंतराव कदम,माजी पंचायत समिती सदस्य प्रकाशराव जाधव, दिलीपराव जानुगडे, ॲड.बाबूराव नांगरे, राजाराम मोहिते, कारखान्याचे कार्यकारी संचालक सुहास देसाई,चीफ अकौंटट,चीफ केमिस्ट, चीफ इंजिनियर व कारखान्याचे सभासद, ऊस  उत्पादक, अधिकारी  व कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment