Monday 6 January 2020

माजी खासदार स्व.लक्ष्मणराव पाटील ( तात्या ) यांचे प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त ना.शंभूराज देसाईंकडून विनम्र अभिवादन.




दौलतनगर दि.०६:- सातारा जिल्हयाचे कणखर नेतृत्व सातारा लोकसभेचे माजी खासदार स्व.लक्ष्मणराव पाटील (तात्या) यांचे प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्ताने राज्याचे नवनिर्वाचीत गृह (ग्रामीण),वित्त,नियोजन,राज्य उत्पादन शुल्क,कौशल्य विकास व उद्योजकता,पणन राज्यमंत्री ना.श्री.शंभूराज देसाई यांनी दि.०५ रोजी बोपेगांव ता.वाई येथील स्व.तात्या यांच्या निवासस्थानी जावून विनम्र अभिवादन केले.
                माजी खासदार स्व.लक्ष्मणराव पाटील (तात्या) यांचा प्रथम स्मृतीदिन दि.०६ जानेवारी रोजी होत असताना राज्याचे नवनिर्वाचीत गृह(ग्रामीण),वित्त,नियोजन,राज्य उत्पादन शुल्क,कौशल्य विकास व उद्योजकता, पणन राज्यमंत्री ना.श्री.शंभूराज देसाई यांना राज्याचे मुख्यमंत्री ना.उध्दवजी ठाकरे यांची भेट घेणेकरीता दि.०५ रोजी तातडीने मुंबईला जावे लागल्यामुळे त्यांनी स्व.लक्ष्मणराव पाटील (तात्या) यांचे बोपेगांव ता.वाई येथील निवासस्थानी जावून विनम्र अभिवादन केले.यावेळी स्व.तात्या यांचे सुपुत्र वाई विधानसभा मतदारसंघाचे आमदार मकरंदआबा पाटील,मिलींददादा पाटील,नितीनकाका पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
                  यावेळी ना.शंभूराज देसाई म्हणाले, स्व.लक्ष्मणराव पाटील (तात्या) हे सातारा जिल्हयाचे कणखर नेतृत्व होते.कार्यकर्ते,नेतृत्व व विचारशीलता यांचा उत्तम समन्वय तात्यांच्या ठायी होता.त्यांनी बोपेगांवचे सरपंच पदापासून आपली राजकीय कारकीर्द सुरु केली.सातारा जिल्हयातील सहकाराला दिशा देण्याचे काम तात्यांनी केले.तालुका सहकारी खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष,वाई पंचायत समितीचे सभापती,सातारा जिल्हा परीषदेचे अध्यक्ष त्याचबरोबर सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष अशा विविध जिल्हयातील महत्वाच्या पदांची जबाबदारी तात्यांनी लिलया पेलली. सहा दशकाहून अधिक काळ त्यांनी सातारा जिल्हयाच्या राजकारणात, समाजकारणात आपला वेगळा असा ठसा उमटविला आहे. पक्षाकडून त्यांना पक्षसंघटनेतही महत्वाचे स्थान नेहमीच दिले होते. स्व. तात्या  माझेकरीता श्रध्दास्थान असून त्यांनी पक्ष गट तट न पाहता माझेवर पुत्रवत प्रेम केले. राज्याचा राज्यमंत्री या नात्याने मी त्यांच्या पवित्र स्मृतीस राज्यातील व सातारा जिल्हयातील तमाम जनतेच्या व राज्याचे मुख्यमंत्री ना.उध्दवजी ठाकरे यांचे वतीने विनम्र अभिवादन करतो.


No comments:

Post a Comment