दौलतनगर दि.०7:- राज्याचे
नवनिर्वाचीत गृह (ग्रामीण),वित्त,नियोजन,राज्य उत्पादन शुल्क,कौशल्य विकास व
उद्योजकता,पणन राज्यमंत्री ना.श्री.शंभूराज देसाई हे आज दि.०७ रोजी मंत्रीपदाचा
कार्यभार स्विकारणार असून मंत्रीपदाचा कार्यभार स्विकारण्यापुर्वी राज्यमंत्री ना.शंभूराज
देसाईंनी दादर येथील शिवतीर्थावरील हिंदूह्दयसम्राट स्व.बाळासाहेब ठाकरे यांचे समाधीस्थळ
व मॉसाहेब स्व.मीनाताई ठाकरे यांचे पुतळयास पुष्पहार अर्पण करुन दर्शन घेतले व
हिंदूह्दयसम्राट स्व.बाळासाहेब ठाकरे व मॉसाहेब स्व.मीनाताई ठाकरे यांना विनम्र
अभिवादन केले.
राज्याचे
नवनिर्वाचीत गृह(ग्रामीण),वित्त,नियोजन,राज्य उत्पादन शुल्क,कौशल्य विकास व
उद्योजकता, पणन राज्यमंत्री ना.श्री.शंभूराज देसाई हे आज दि.०७ जानेवारी रोजी
विधानभवनातील त्यांचे दालनात त्यांना राज्याचे मुख्यमंत्री ना.उध्दवजी ठाकरे यांनी
सोपविलेल्या गृह(ग्रामीण),वित्त,नियोजन,राज्य उत्पादन शुल्क,कौशल्य विकास व
उद्योजकता,पणन या पाचही खात्यांचा पदभार स्विकारुन मंत्रालयीन कामांस सुरुवात
करणार आहेत.मंत्रीपदाचा कार्यभार स्विकारण्यापुर्वी ना.शंभूराज देसाईंनी दादर
येथील शिवतीर्थावर जावून हिंदूह्दयसम्राट स्व.बाळासाहेब ठाकरे यांचे समाधीस्थळाचे
प्रथमत: पुष्पहार अर्पण करुन दर्शन घेतले व त्यानंतर मॉसाहेब स्व.मीनाताई ठाकरे
यांचे पुतळयासही पुष्पहार अर्पण करुन दर्शन घेत विनम्र अभिवादन केले आणि त्यानंतर
आपल्याला मिळालेल्या खात्यांचा पदभार स्विकारण्याकरीता त्यांनी विधानभवनातील
त्यांचे दालनात प्रवेश केला.
स्व.बाळासाहेब ठाकरे यांचे नेतृत्वाखाली सन १९९६
ला मी शिवसेना पक्षात प्रवेश केला २३ वर्षे स्व.बाळासाहेब ठाकरे यांचा शिवसैनिक
म्हणून या पक्षात कार्यरत आहे. आज पक्षाच्या माध्यमातून मला राज्याचा राज्यमंत्री
म्हणून काम करण्याची संधी पक्षाचे पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री ना.उध्दव
ठाकरे यांनी दिली आहे. ना.उध्दव ठाकरे यांनी मला दिलेल्या गृह(ग्रामीण),वित्त,नियोजन,राज्य
उत्पादन शुल्क,कौशल्य विकास व उद्योजकता,पणन या पाच खात्यांचा राज्यमंत्री म्हणून पदभार
स्विकारण्यापुर्वी स्व.बाळासाहेब ठाकरे व मॉसाहेब स्व.मीनाताई ठाकरे यांना विनम्र
अभिवादन करणे हे माझे कर्तव्य समजतो.ना.उध्दव ठाकरे यांनी माझेवर जी जबाबदारी
सोपविली आहे. माझेवर जो विश्वास दाखविला आहे तो विश्वास सार्थ करण्याचे व मला
मिळालेल्या गृह(ग्रामीण),वित्त,नियोजन,राज्य उत्पादन शुल्क,कौशल्य विकास व
उद्योजकता,पणन या पाच खात्यांच्या माध्यमातून राज्यातील जनतेला न्याय देण्याचे काम
मी करणार असल्याचे ना.शंभूराज देसाईंनी यावेळी बोलताना सांगितले
No comments:
Post a Comment