Monday 13 January 2020

गृहराज्यमंत्री म्हणून पदभार स्विकारल्यानंतर ना.शंभूराज देसाईंनी मतदारसंघात केला ग्रामीण, डोंगरी भागाचा दौरा. डोगंरी विभागातील तीन महत्वाच्या रस्त्यांच्या कामांचा केला प्रारंभ.




दौलतनगर दि.१३:- गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी  त्यांचेवर सोपविलेल्या  गृह (ग्रामीण),वित्त, नियोजन, राज्य उत्पादन शुल्क,कौशल्य विकास उद्योजकता,पणन या सहा खात्यांचा मुंबई येथे पदभार स्विकारलेनंतर प्रथमच पाटण विधानसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर आलेनंतर त्यांनी पाटण विधानसभा मतदारसंघातील ग्रामीण आणि डोंगरी भागात जाणे पसंत केले. मोरणा विभागातील डोंगरपठारावरील अनेक वर्षापासून प्रलंबीत असणारे तीन रस्ते त्यांनी २०१४ ते २०१९ या आमदारकीच्या कार्यकालात मंजुर केले होते त्या तीन रस्त्यांच्या कामांचा शुभारंभ ना.शंभूराज देसाईंच्या हस्ते मतदारसंघात पार पडला.गृहराज्यमंत्री पदाचा पदभार स्विकारल्यानंतर मोरणा विभागात आलेले ना.शंभूराज देसाईंचे विभागातील प्रत्येक गांवामध्ये जंगी स्वागत करण्यात आले. त्यांनी पदभार स्विकारले नंतर डोंगरी भागाचा दौरा केल्याने त्यांच्या या दौऱ्याचे मोठे कौतुक करण्यात आले.
                                राज्याचे गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे हस्ते मोरणा विभागातील डोंगरपठारावरील मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतंर्गत पाचगणी ते नागवाणटेक ०२ कोटी 32 लाख 66 हजार रक्कमेच्या 3.7० किमी अंतर असणाऱ्या तसेच धावडे ते शिद्रुकवाडी 99 लाख 45 हजार 1.27० किमी अंतर असलेल्या आणि आटोली ते भाकरमळी 01 कोटी 20 लाख रक्कमेच्या 1.400 किमी अंतर असणाऱ्या तीन पोहोच रस्त्यांच्या भूमिपुजनांचा कार्यक्रम आयोजीत करण्यात आला होता. यावेळी त्यांचेसोबत मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रविराज देसाई, युवा नेते यशराज देसाई, जयराज देसाई, जिल्हा परीषद सदस्या सौ.सुग्रा खोंदू यांच्यासह पाटण विधानसभा मतदारसंघातील सर्व शासकीय अधिकारी यांची प्रमुख उपस्थिती होती.
                                यावेळी ना.शंभूराज देसाई म्हणाले, राज्याचे मुख्यमंत्री ना.उध्दवजी ठाकरे यांनी माझेवर राज्याच्या गृह (ग्रामीण),वित्त,नियोजन,राज्य उत्पादन शुल्क,कौशल्य विकास उद्योजकता,पणन या सहा खात्यांचा राज्यमंत्री म्हणून कार्यभार दिला आहे त्यातच वाशिम जिल्हयाचा पालकमंत्री म्हणूनही जबाबदारी दिली आहे. पाटण विधानसभा मतदारसंघातील जनतेने मला मोठया मताधिक्कयाने विधानसभेत आमदार म्हणून जाण्याची पुन्हा संधी दिली यामुळेच मला राज्याच्या राज्यमंत्री पदी विराजमान होता आले.पाटण विधानसभा मतदारसंघातील मतदारांचे माझेवर हे ऋृण असून ते कधीही फेडता येणारे आहे.आज माझेवर राज्याच्या सहा खात्यांची तसेच वाशिमच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी असली तरी माझे लक्ष आपल्या पाटण विधानसभा मतदारसंघावरच राहणार आहे. मराठीमध्ये एक म्हण आहे घार हिंडे आकाशी,चित्त तिचे पिलापाशी त्याप्रमाणे मी संपुर्ण महाराष्ट्रभर राज्याचा राज्यमंत्री म्हणून जरी मला फिरावे लागले तरी माझे सगळे लक्ष हे आपल्या पाटण मतदारसंघातील जनतेपाशीच राहणार आहे. ज्या मतदारांच्या आशिर्वादाने आपण राज्यमंत्री झालो त्या जनतेच्या प्रश्नांना पहिले प्राधान्य देणेकरीता माझे प्रयत्न राहणार आहेत. मिळालेल्या मंत्रीपदाच्या माध्यमातून आपल्या मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करणेकरीता मी कटीबध्द आहे अशी ग्वाही देत ना.शंभूराज देसाई म्हणाले, आज राज्याच्या सहा खात्यांचा मुंबई येथे पदभार स्विकारुन पाटण मतदारसंघात येत असताना माझा पहिला दौरा पाटण मतदारसंघातील डोंगरी आणि दुर्गम भागात होत आहे याचा मला अत्यानंद आहे.मोरणा विभागातील डोंगरपठारावरील जनतेची अनेक वर्षांची असणारी या रस्त्यांची मागणी आपण २०१४ ते २०१९ या कार्यकालात आमदार असतानाच  मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतंर्गत निधी मंजुर करुन पुर्ण केली होती. आज या कामांचा शुभारंभ झाला येत्या दोन महिन्यात डोंगरपठारावरील जनतेला या रस्त्यांची सोय होईल.ठेकेदाराने उद्यापासूनच या कामांला सुरुवात करावी अशा सुचना देत  आता पहिल्यासारखे चालणार नाही आज भूमिपुजन झाले आणि कामाला विलंब झाला ज्यादिवशी कामांची भूमिपुजने झाली त्याच्या दुसऱ्या दिवसापासूनच विकासकामांना सुरुवात झाली पाहिजे याची दखल अधिकारी आणि ठेकेदारांनी घ्यावी असेही त्यांनी यावेळी सांगितले. उपस्थितांचे स्वागत माजी जिल्हा परीषद सदस्य बशीर खोंदू  यांनी केले आभार माजी पंचायत समिती सदस्य नथूराम कुंभार यांनी मानले.
चौकट:- अधिकाऱ्यांचा ताफा आणि गावोगांवी ना.शंभूराज देसाईंचे जंगी स्वागत.
             ना.शंभूराज देसाई हे राज्याचे सहा खात्यांचे राज्यमंत्री म्हणून कार्यभार स्विकारुन पाटण मतदारसंघात प्रथमत: येणार असल्याने त्यांचेसोबत पाटण विधानसभा मतदारसंघातील सर्व शासकीय यंत्रणेचे अधिकारी त्यांच्या गाडयांचा ताफा होता. गांवोगावी मोठया प्रमाणात आतिषबाजी करीत गावकऱ्यांनी ना.शंभूराज देसाईंचे मोठया उत्साहाने जंगी स्वागत शालेय साहित्य देवून सत्कार केला.


No comments:

Post a Comment