Tuesday 7 January 2020

ना.शंभूराज देसाईंनी स्विकारला मंत्रीपदाचा कार्यभार. आजपासून मंत्रालयीन कामांस केला प्रारंभ.




दौलतनगर दि.०७:- महाराष्ट्राचे पोलादी पुरुष, माजी गृहमंत्री लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे नातू आणि राजकीय वारसदार,शिवसेना पक्षाची मुलुखमैदानी तोफ म्हणून ओळख असणारे राज्याचे नवनिर्वाचीत गृह (ग्रामीण),वित्त, नियोजन,राज्य उत्पादन शुल्क,कौशल्य विकास व उद्योजकता,पणन राज्यमंत्री ना.श्री.शंभूराज देसाई यांनी आज दि.०७ रोजी विधानभवन येथे महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्रींमत छत्रपती शिवाजी महाराज यांचे पुतळयाला पुष्पहार अर्पण करुन आर्शिवाद घेत विधानभवनातील त्यांचे दालनात गृह (ग्रामीण),वित्त,नियोजन,राज्य उत्पादन शुल्क, कौशल्य विकास व उद्योजकता,पणन राज्यमंत्री म्हणून मंत्रीपदाचा कार्यभार स्विकारला.आजपासून त्यांनी प्रत्यक्षात राज्यमंत्री म्हणून त्यांना सोपविलेल्या सर्व खात्यांच्या कामांचा प्रारंभ केला.त्यांना शुभेच्छा देणेकरीता सातारा विधानसभेचे आमदार श्रींमत शिवेंद्रसिंहराजे भोसले हे आर्वजुन याठिकाणी उपस्थित होते.
                          शिवसेना पक्षाचे पक्षप्रमुख उध्दवजी ठाकरे यांचे नेतृत्वावर महाराष्ट्र राज्यातील जनतेने विश्वास व्यक्त करुन त्यांचे नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचे सरकार राज्यामध्ये सत्तेवर आले आहे. या सरकारमध्ये राज्याचे मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे यांनी शिवसेना पक्षाची भूमिका विधानसभेत समर्थपणे मांडणारे, शिवसेना पक्षाचा अभ्यासू चेहरा म्हणून ज्यांचा उल्लेख केला जातो असे पश्चिम महाराष्ट्रातील सातारा जिल्हयातील पाटण विधानसभा मतदारसंघाचे आमदार शंभूराज देसाई यांची राज्याच्या राज्यमंत्रीपदी निवड केली व त्यांचेवर राज्याच्या गृह(ग्रामीण), वित्त,नियोजन,राज्य उत्पादन शुल्क,कौशल्य विकास व उद्योजकता,पणन या वजनदार आणि महत्वाच्या खात्यांची जबाबदारी दिली आहे.राज्य शासनातील महत्वाच्या असणाऱ्या खात्यांच्या राज्यमंत्रीपदाची जबाबदारी ना.शंभूराज देसाईंवर देवून मुख्यमंत्री ना.उध्दव ठाकरे यांनी शंभूराज देसाई यांच्या नेतृत्वगुणाला वाव मिळवून देत त्यांचा यथोचित असा सन्मान केला आहे.राज्याचे नवनिर्वाचीत गृह(ग्रामीण),वित्त,नियोजन,राज्य उत्पादन शुल्क,कौशल्य विकास व उद्योजकता,पणन राज्यमंत्री ना.श्री.शंभूराज देसाई यांनी आज दि.०७ जानेवारी रोजी विधानभवनातील त्यांचे दालनात त्यांचेवर सोपविलेल्या गृह (ग्रामीण),वित्त,नियोजन,राज्य उत्पादन शुल्क,कौशल्य विकास व उद्योजकता,पणन या पाचही खात्यांचा पदभार स्विकारुन मंत्रालयीन कामांस सुरुवात देखील केली.
              राज्यमंत्री म्हणून पदभार स्विकारल्यानंतर ना.शंभूराज देसाई यांनी पहिली प्रतिक्रिया देताना म्हणाले,राज्याचे मुख्यमंत्री ना.उध्दव ठाकरे यांनी मला त्यांचे नेतृत्वाखालील महाविकास आघाडीच्या व मित्रपक्षाच्या सरकारमध्ये राज्यमंत्री म्हणून निवड करुन पश्चिम महाराष्ट्राचा यथोचित असा सन्मान केला आहे. सन १९९६ ला शिवसेनाप्रमुख हिंदूह्दयसम्राट स्व.बाळासाहेब ठाकरे यांनी आमचे दौलतनगर येथे आदरणीय लोकनेते बाळासाहेब देसाईसाहेब यांचे कर्मभूमि आणि जन्मभूमिमध्ये येवून मला सहकार परीषदेचे अध्यक्षपद देवून राज्यमंत्रीपदाचा दर्जा बहाल केला होता. शिवसेनाप्रमुख हिंदूह्दयसम्राट स्व.बाळासाहेब ठाकरे व महाराष्ट्राचे पोलादी पुरुष माजी गृहमंत्री लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे ऋृणानुबंध संपुर्ण महाराष्ट्राला ज्ञात आहेत. लोकनेते बाळासाहेब देसाईसाहेब यांचेनंतर पाटण विधानसभा मतदारसंघाला आमचे नेते मुख्यमंत्री ना.उध्दव ठाकरे यांनी गृह राज्यमंत्री म्हणून मला दिलेले पद हे लाखमोलाचे आहे.गृह(ग्रामीण) राज्यमंत्री पदाबरोबरच मुख्यमंत्री ना.उध्दव ठाकरे यांनी माझेवर वित्त,नियोजन,राज्य उत्पादन शुल्क,कौशल्य विकास व उद्योजकता,पणन या राज्यातील महत्वाच्या खात्यांची जबाबदारी सोपविली आहे. मुख्यमंत्री ना.उध्दव ठाकरे यांना आणि राज्यातील जनतेला अपेक्षित असणारे काम या पाच खात्यांच्या माध्यमातून करण्याचा माझा प्रयत्न राहणार आहे. राज्याचा राज्यमंत्री म्हणून मला जे अधिकार या महाविकास आघाडीच्या आणि मित्रपक्षाच्या सरकारमध्ये देण्यात आले आहेत त्या अधिकारांतून राज्यातील जनतेच्या हिताच्या दृष्टीने धोरणात्मक निर्णय घेवून राज्यातील जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी मी कायम कटीबध्द राहणार आहे.आज महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांचे दर्शन घेवून त्यांचा आदर्श डोळयासमोर ठेवून प्रत्यक्षात मी मला दिलेल्या पाच खात्यांच्या कामांला मंत्रीपदाचा कार्यभार स्विकारुन सुरुवात केली आहे. ना.उध्दव ठाकरे यांनी माझेवर जी जबाबदारी सोपविली आहे. माझेवर जो विश्वास दाखविला आहे तो विश्वास सार्थ करण्याचे काम मी करणार असून ना.उध्दवजी ठाकरे व मला या पदापर्यंत पोहचविणारे माझे पाटण विधानसभा मतदारसंघातील मतदार यांचे मी शतश: ऋृण व्यक्त करतो व त्यांचे जाहीर आभारही मानतो असे ना.शंभूराज देसाई यावेळी बोलताना म्हणाले.
चौकट:- करारी गृहमंत्र्यांचे नातू राज्याच्या गृहराज्यमंत्रीपदावर विराजमान.
             महाराष्ट्राचे पोलादी पुरुष लोकनेते बाळासाहेब देसाई यांची ओळख राज्याचे करारी गृहमंत्री म्हणून असून राज्याचे गृहमंत्री म्हणून लोकनेते बाळासाहेब देसाई यांनी केलेल्या विविध कार्याचे दाखले आजही महाराष्ट्र सरकारमध्ये दिले जातात.त्यांचेच नातू ना.शंभूराज देसाई हे राज्याच्या गृहराज्यमंत्रीपदावर विराजमान झाले आहेत याचा पाटण विधानसभा मतदारसंघातील व संपुर्ण सातारा जिल्हयातील जनतेला सार्थ अभिमान वाटत आहे.


No comments:

Post a Comment