Friday 29 October 2021

महाविकास आघाडीचे सरकार देसाई कारखान्याच्या पाठीशी ठाम-गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई लोकनेते बाळासाहेब देसाई सह.साखर कारखान्याचा 48 वा गळीत हंगामाचा शुभारंभ कार्यक्रम संपन्न.

 



दौलतनगर दि.9(जनसंपर्क कक्ष,राज्यमंत्री कार्यालय):- राज्यातील  साखर उद्योगाची परिस्थिती  सध्या अडचणीत असून ही लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी कारखाना हा सभासद शेतकऱ्यांच्या हितासाठीच सदैव प्रयत्नशील आहे.त्यामुळे या पुढे ही देसाई कारखान्याने पारदर्शक कारभार करून  आपले उद्दिष्ट पार करून पुढे जाण्यासाठी प्रयत्नशील राहिले पाहिजे त्यासाठी महाविकास आघाडीचे सरकार देसाई कारखान्याच्या पाठीशी ठामपणे उभे राहील,अशी ग्वाही राज्याचे गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई यांनी दिली.दरम्यान कारखाना कार्यक्षेत्रातील बाहेर जाणाऱ्या ऊसाची गंभीर पणे दखल घेऊन त्यासाठी कारखान्याने गोपनीय यंत्रणा उभी करावी,अशा सूचनाही गृहराज्यमंत्री देसाई यांनी दिला.

       ते दौलतनगर, ता.पाटण येथील लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचा सन २०२१-२२ मधील 8 व्या गळीत हंगामाचा शुभारंभ कार्यक्रमप्रसंगी बोलत होते. प्रतिवर्षाप्रमाणे कारखान्याचे ज्येष्ठ ११ सभासद श्री.निवृत्ती बाळकू कर्पे करपेवाडी, श्री. सदाशिव पांडूरंग चव्हाण विहे, श्री. यशवंत रामचंद्र तोळसणकर सळवे, श्री. विष्णू शंकर पानस्कर मंद्रुळहवेली, श्री. बापूराव दगडू शिवदास माजगाव,श्री.शशिकांत महादेवशिंदे कोरिवळे,श्री.सर्जेराव यशवंत चव्हाण आवर्डे,श्री.रंगराव बाळू जाधव मेंढोशी,श्री.लक्ष्मण आबा जामदार नावडी, श्री.भाऊसो पांडूरंग सुर्वे वाडीकोतावडे, श्री. तुकाराम धोंडीबा डफळे येराड या ज्येष्ठ 11 सभासदांचे शुभहस्ते संपन्न झाला.यावेळी मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रविराज देसाई व युवा नेते यशराज देसाई,चि.आदित्यराज देसाई,चेअरमन अशोकराव पाटील, व्हा.चेअरमन राजाराम पाटील,माजी चेअरमन डॉ.दिलीपराव चव्हाण,ॲङमिलिंद पाटील,शिवसेना जिल्हा प्रमुख जयवंतराव शेलार,संचालक पांडूरंग नलवडे,सोमनाथ खामकर,गजानन जाधव,शशिकांत निकम,अशोकराव डिगे, विजय जंबुरे देशमुख,बबनराव भिसे,विकास गिरी,जिल्हा परिषद सदस्य विजय पवार,दादा जाधव,सुरेश पानस्कर, पंजाबराव देसाई,भरत साळूंखे,अभिजित पाटील,सर्व संचालक मंडळ,पदाधिकारी व कार्यकर्ते,कारखाना अधिकारी व कर्मचारी यांची प्रमुख उपस्थिती होती.

       ना.शंभूराज देसाई पुढे म्हणाले,राज्यातीला सहकारी साखर उद्योग सध्या अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत चालला असून सहकारी साखर कारखाने शंभर टक्के शासनाच्या नियमाचे पालन करूनच  कारखाने चालवावे लागतात    लोकनेते बाळासाहेब देसाई कारखान्याचे कार्यक्षेत्र पाहिल्यानंतर निम्माहून अधिेक क्षेत्र हे डोंगंरी भागात आहे. कोयनानदीकाठी अल्प प्रमाणात ऊसाचे कार्यक्षेत्र आहे. संपुर्ण पाटण तालुक्यातील ऊसाची लागवड पाहिली तर तीन ते साडेतीन लाख मे.टनाच्या वर जात नाही. ही वस्तूस्थिती असताना देखील आपले कारखान्याने कारखान्याच्या सभासंदाना व ऊस उत्पादक शेतक-यांना इतर मोठया कारखान्यांच्या बरोबरीने प्रतिवर्षी दर दिला आहे.

    मात्र पाणी,बियाणे,चोवीस तास वीज यासाठी मदत कारखान्याची आणि शासनाची घेऊन  जाणीवपूर्वेक बाहेरच्या काऱखान्याला ऊस घालणार्याची मानसिकता बदलली पाहिजे. बाहेर जाणार ऊस थांबवण्यासाठी संचालक मंडळाने दिवाळी पूर्वी बैठक घेऊन बाहेर जाणाऱ्या ऊसा संदर्भात गांभीर्यपूर्वक नियोजन करावे.त्यासाठी कारखान्याने गोपनीय यंत्रणा उभी करून विशेष मोहीम आखली पाहिजे तरच त्याचे योग्य परिणाम दिसतील अशा सूचना ही त्यांनी यावेळी कारखान्याच्या प्रशासन यंत्रणा आणि संचालक मंडळाला देऊन हा गळीत हंगाम यशस्वी करण्यासाठी सर्वांनी सर्वोत्परी सहकार्य करावे असे आवाहनही त्यांनी शेवटी केले.

चौकट: 'मरळी साखरेला परदेशात मागणी'

लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याच्या पारदर्शक कारभार आणि उत्कृष्ट नियोजन यामुळे आजही जागतिक बाजारात 'मरळी साखरे'चा दर्जा उत्कृष्ठ असून परदेशी बाजारपेठेत  'मरळी साखरेला चांगली मागणी असल्याचे सांगून हा दर्जा असाच टिकवून ठेवावा अशी अपेक्षा गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई यांनी या कार्यक्रमात व्यक्त केली.

 चौकट: केंद्र सरकारकडून सकारात्मक भूमिका..!

          केंद्र सरकारने साखर कारखान्यांनी दिलेल्या जादा ऊस दरावर कारखान्याचा नफा लावण्यात आलेल्या  इन्कम टॅक्स मूळे  आज पर्यंत राज्यातील कारखान्यांच्या डोक्यावर  कोट्यवधी रुपयांचा इन्कम टॅक्स ची तलवार लटकत होती.यासंर्भात नागपूर येथे अधिवेशनादरम्यान केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना आम्ही राज्यातील सर्वपक्षीय शिष्टमंडळ भेटून राज्यातील तमाम कारखान्याच्या डोक्यावरील इन्कम टॅक्स ची टांगती तलवार कमी करण्याची मागणी केली होती.त्याची दखल घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्या दृष्टीने वाटचाल सुरू असल्याचे दिसत असून यामुळे राज्यातील कारखान्यांना  निश्चितच 'इन्कम टॅक्स' पासून दिलासा मिळेल असे मत  व्यक्त करून केंद्र सरकारकडून सकारात्मक भूमिका घेतली असल्याचे त्यांनी सांगीतले.

No comments:

Post a Comment