Friday 29 April 2022

गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी घेतल्या कार्यकर्त्यांच्या भेटी. निगडे गावचे ज्येष्ठ कार्यकर्ते दत्तात्रय पाटील व मुळगावंचे हंबीरराव देसाई यांच्या तब्ब्येची केली विचारपूस.

                                  

दौलतनगर दि.29(जनसंपर्क कक्ष,राज्यमंत्री कार्यालय):- निगडे गावातील ज्येष्ठ कार्यकर्ते दत्तात्रय पाटील हे वयोवृध्द कार्यकर्ते ना.शंभूराज देसाई यांच्या भेटीचा आग्रह धरला होता.तर मुळगाव येथील हंबीरराव देसाई हे त्यांच्या आजारपणामुळे अंथरुणावर असल्याने त्यांनीही ना.शंभूराज देसाई यांनी घरी भेट देण्यासाठी कार्यकर्त्यांकडे निरोप दिला होता. ज्येष्ठ व प्रामाणिक कार्यकर्त्यांच्या इच्छाखातर महाराष्ट्र राज्याचे गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी मंगळवार व बुधवारी पाटण तालुक्यातील निगडे गावचे ज्येष्‍ठ कार्यकर्ते श्री.दत्तात्रय पाटील व मुळगावचे कार्यकर्ते हंबीरराव देसाई यांच्या घरी जाऊन त्यांच्या तब्ब्येची विचारपूस केली. कार्यकर्त्यांच्या घरी भेट दिली.ना.शंभूराज देसाई यांनी अचानक दिलेल्या या घर भेटीमुळे निगडे येथील पाटील व मुळगावचे देसाई कुटुंबिय भारावुन गेले.

           लोकनेते बाळासाहेब देसाई यांचेपासून विश्वासू कार्यकर्ते म्हणून काम केलेले निगडे येथील दत्तात्रय पाटील म्हणून ढेबेवाडी विभागामध्ये परिचित आहेत.गेली दोन वर्ष कोविडच्या काळामध्ये ना.शंभूराज देसाई राज्यमंत्री होऊनही भेट घेता आली नव्हती.त्यामुळे दत्तात्रय पाटील यांनी गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई यांच्या भेटीसाठी कार्यकर्त्यांकडे आग्रह धरला होता.दत्तात्रय पाटील हे ज्येष्ठ व वयोवृध्द असल्याने ना.शंभूराज देसाई यांनी त्यांचा आग्रह मान्य करत त्यांची निगडे येथील राहत्या भेट देऊन त्यांच्या तब्ब्येची विचारपूस केली. गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी वेळवर जेवण करता का ? औषधं गोळया वेळेवर घेता का? अशी आस्थेवाईकपणे त्यांची विचारपूस करत सारखी आठवण काढत असल्याने तुम्हाला भेटण्यासाठी निगडे या ठिकाणी आलो असल्याचे सांगत वेळेवर जेवण करुन औषध गोळया घेऊन स्वत:ची काळजी घ्या असे सांगीतले.यावेळी दत्तात्रय पाटील यांनी लोकनेते बाळासाहेब देसाई यांची आवर्जुन आठवण काढत या तालुक्यासाठी लोकनेते बाळासाहेब देसाई यांनी मोठया खस्ता खाल्याचे दत्तात्रय पाटील यांनी यावेळी सांगीतले.तर मुळगाव येथील हंबीरराव देसाई हे अर्धांगवायूमुळे आजारी असल्याने त्यांना बाहेर जात येत नसल्याने त्यांनी ना.शंभूराज देसाई यांना भेटण्याचा आग्रह केला होता.देसाई यांच्या आग्रहाखातर ना.शंभूराज देसाई यांनी मुळगाव येथे त्यांच्या घरी भेट देऊन त्यांच्या तब्ब्येची विचारपूस करत वेळेवर औषधं घेऊन तब्येतीची काळजी घेण्यास सांगीतले.

चौकट :ज्येष्ठ कार्यकर्त्याच्या इच्छेखातर लगेच केला सरकारी औषधोपचार.

गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी निगडे येथील दत्तात्रय पाटील यांना वेळेवर औषधे गोळया घेता का असा प्रश्न विचारल्यानंतर पाटील यांनी  सरकारी दवाखान्यातील औषधोपचार पाहिजे अशी इच्छा ना.शंभूराज देसाई यांचेकडे व्यक्त केली. यावेळी ना.शंभूराज देसाई यांनी दत्तात्रय पाटील यांना आपण घरीच सरकारी डॉक्टर बोलवून उपचार करुन तुम्ही काळजी करु नका असे सांगत या अगोदर दत्तात्रय पाटील यांनी मोफत सरकारी औषधोपचार करण्याची इच्छा एकदा ना.शंभूराज देसाई यांचेकडे व्यक्त केली होती.ज्येष्ठ कार्यकर्त्याने केलेल्या इच्छेखातर त्यांनी तातडीने ढेबेवाडी ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांना औषधोपचार करण्याच्या सूचना केल्यानंतर ढेबेवाडी ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांची टिम तातडीने निगडे येथील दत्तात्रय पाटील यांच्या घरी जाऊन त्यांची वैद्यकीय तपासणी करुन आवश्यक ते औषधोपचार करण्यात आले.आपल्या जेष्ठ कार्यकर्त्याच्या इच्छेखातर ना.देसाई यांनी  लगेचच सरकारी औषधोपचार करत त्यांची इच्छा पुर्ण केल्याने पाटील कुटुंबियांनी समाधान व्यक्त केले.

चौकट :भेट दिलेल्या कार्यकर्त्यांच्या घरी पोहोच केली फळे व ड्रायफुट्स.

गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी निगडे येथील ज्येष्ठ कार्यकर्ते दत्तात्रय पाटील व मुळगाव येथील हंबीरराव देसाई यांचे घरी भेट देऊन त्यांच्या तब्ब्येची आस्थेवाईकपणे विचारपूस करत वेळेवर औषधोपचार घेऊन तब्येची काळजी घ्या असे त्यांना सांगीतले.तसेच ना.शंभूराज देसाई यांनी दुसऱ्या दिवशी लगेच निगडयाचे दत्तात्रय पाटील व मुळगावचे हंबीरराव देसाई यांचेकरीता फळे व ड्रायफुट्स त्यांचे घरी पोहोच केली.

 

 

Monday 25 April 2022

गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे प्रयत्नातून जलजिवन मिशन योजनेतून 28 योजनांना 14.89 कोटींचा निधी. जलजिवन मिशन योजनेतून विविध गावांतील नळ पाणी पुरवठा योजनांची कामे लागणार मार्गी.

 


दौलतनगर दि.25(जनसंपर्क कक्ष,राज्यमंत्री कार्यालय):- पाटण तालुक्यातील डोंगरी व दुर्गम भागातील विविध गावांसाठी अस्तित्वात असलेल्या नळ पाणी  पाणी पुरवठा जीर्ण व कालबाह्य झाल्या असल्याने या नळ पाणी पुरवठा योजनांची कामे पुन्हा नव्याने करण्यात येऊन जलजिवन मिशन योजनेअंतर्गत राज्य शासनाचे नियमानुसार घरोघरी नळ जोडणी या योजनेअंतर्गत पाटण तालुक्यातील नादुरुस्त झालेल्या नळ पाणी पुरवठा योजनांच्या कामांना आवश्यक निधी मंजूर होण्याकरीता राज्याचे पाणी पुरवठा मंत्री ना.गुलाबराव पाटील यांचेकडे शिफारस करण्यात आली होती.त्यानुसार पाटण तालुक्यातील 28 नळ पाणी पुरवठा योजनांचे कामांना 14 कोटी 89 लक्ष रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असल्याची माहिती गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे कार्यालयाचेवतीने प्रसिध्दीपत्रकांत देण्यात आली आहे.

              प्रसिध्दीस देण्यात आलेल्या पत्रकांत पुढे म्हंटले आहे की, पाटण तालुक्यात माहे जुलै महिन्यामध्ये मोठया प्रमाणांत अतिवृष्टी होऊन डोंगरी व दुर्गम भागात वसलेल्या अनेक गावांतील नळ पाणी पुरवठा योजनांचे मोठया प्रमाणांत नुकसान झाले होते. तसेच काही गावातील नळ पाणी पुरवठा योजना हया जीर्ण व कालबाहय झाल्या असल्याने या गावांना कमी दाबाने पाणी पुरवठा होऊन गावांमध्ये तीव्र पाणी टंचाई जाणवत होती. पिण्याच्या पाण्याची होणारी गैरसोय लक्षात घेऊन या नादुरुस्त झालेल्या नळ पाणी पुरवठा योजनांचे कामांना आवश्यक निधी मंजूर करण्यासंदर्भात संबंधित गावातील ग्रामस्थांनी गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई यांचेकडे निवेदनाव्दारे मागणी केली होती. त्यानुसार गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी पाटण तालुक्यातील नळ पाणी पुरवठा योजनांना राज्य शासनाचे जलजिवन मिशन योजनेअंतर्गत निधी मंजूर होण्याकरीता राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री ना.गुलाबराव पाटील यांचेकडे केलेल्या शिफारसीनुसार पाटण 28 नळ पाणी पुरवठा योजनांचे कामांना 14 कोटी 89 लक्ष रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असल्याचे नमूद करत मंजूर नळ पाणी पुरवठा योजनांचे कामांमध्ये जानुगडेवाडी 27.92 लक्ष,आंबेघर तर्फ मरळी 27.17 लक्ष, चाफळ 163.26 लक्ष, शिंदेवाडी 22.44 लक्ष, चौगुलेवाडी मुठ्ठलवाडी 90.64 लक्ष, ढाणकल 29.24 लक्ष, गाडखोप 21.56 लक्ष, नाव 18.47 लक्ष, मालोशी 39.92 लक्ष, बांधवाट 19.83 लक्ष, डांगीष्टेवाडी 19.26 लक्ष, बोपोली 29.80 लक्ष, शिवंदेश्वर 22.84 लक्ष, बनपूरी 197.52 लक्ष, मुरुड 42.41 लक्ष, काहिर 50.31 लक्ष, आटोली 106.21 लक्ष, पाडळोशी,तावरेवाडी व मसुगडेवाडी 43.05 लक्ष, गलमेवाडी 83.37 लक्ष, गव्हाणवाडी 67.39 लक्ष, सांगवड 40.43 लक्ष, सातर 42.82 लक्ष, लोटलेवाडी (काळगाव) 22.01 लक्ष, रुवले 55.78 लक्ष, गोषटवाडी 40.82 लक्ष, घाटमाथा ढाणकल 17.29 लक्ष, बोडकेवाडी 35.23 लक्ष, ऊरुल 51.40 लक्ष, आंब्रुळे 35.76 लक्ष, निवडे पुनर्वसन 24.88 लक्ष या कामांचा समावेश होत आहे.जलजिवन मिशन योजनेअंतर्गत मंजूर करण्यात आलेल्या नळ पाणी पुरवठा योजनांची कामांची निविदा प्रक्रिया करण्यात येऊन या कामांना सुरुवात करण्याच्या सुचना गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी आढावा बैठकीमध्ये दिल्या असून लवकरच मंजूर असलेली नळ पाणी पुरवठा योजनांची कामे मार्गी लागणार असल्याने पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई भासणाऱ्या या गावांचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न कायमस्वरुपी सुटण्यास मदत होणार असल्याचे शेवटी पत्रकांत म्हंटले आहे.

चौकट:- राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेतील गावांचा जलजिवन मिशन योजनेअंतर्गत समावेश.

         गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे प्रयत्नातून पाटण तालुक्यातील पेठशिवापूर,गव्हाणवाडी,मस्करवाडी,उधवणे,जिंती, शितपवाडी,मुठ्ठलवाडी चौगुलेवाडी(का.) व कोळगेवाडी या गावांमध्ये राज्य शासनाच्या राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेअंतर्गत नळ पाणी  पुरवठा योजना मंजूर झाल्या होत्या. परंतु जलजीवन मिशन योजनेअंतर्गत घरो-घरी नळ जोडणीचे कामाचा समावेश असल्याने तसेच कामांचे अंदाजपत्रकांमध्ये वाढ झाल्याने जादा निधी आवश्यकता लक्षात घेऊन राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेतून मंजूर कामे रद्द करुन या योजनांचा समावेश हा जलजिवन मिशन योजनेअंतर्गत  करुन नव्याने मंजूरी देण्याचे प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना ना.शंभूराज देसाई यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी व ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे अधिकारी यांना बैठकीत केल्या होत्या. त्यानुसार पाटण तालुक्यातील राष्ट्रीय पेयजल योजनेतील कामांचा नव्याने जलजिवन मिशन योजनेअंतर्गत समावेश करण्यात आला आहे.

Saturday 23 April 2022

येथे दौलतनगर श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा उत्साहात साजरा. लोकनेते बाळासाहेब देसाई यांना ३9 व्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन. भव्यदिव्य दिंडी व रिंगण सोहळयाने दौलतनगरला भक्तीमय वातावरण



  दौलतनगर दि.२३(जनसंपर्क कक्ष,राज्यमंत्री कार्यालय):-महाराष्ट्राचे पोलादी पुरुष,पाटण तालुक्याचे दैवत लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या ३9 व्या पुण्यतिथीनिमित्त पाटण तालुक्यातील दौलतनगर येथे प्रतिवर्षी साजऱ्या होणाऱ्या तीन दिवसीय श्री.ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा हा गेली दोन वर्षांचे कोविड संसर्गाचे कालावधीनंतर यंदाच्या वर्षी मोठया उत्साहात साजरा करण्यात आला.लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे पुण्यतिथी दिवशी तीन दिवसीय श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायणाच्या निमित्ताने भव्य दिव्य दिंडी सोहळयाने श्री.ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज व लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे प्रतिमांची भव्य मिरवणूक काढण्यात आली. तसेच लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी कारखाना कार्यस्थळावरील लोकनेते साहेब यांचे पुर्णाकृती पुतळा परिसरात महाराष्ट्र राज्याचे गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई यांच्या हस्ते ध्वजारोहण करुन पुर्णाकृती पुतळयावर व स्व.शिवाजीराव देसाई (आबासाहेब) यांचे समाधीस्थळावर पुष्पवृष्टी करत पारायण सोहळयातील भाविक भक्तांच्या उपस्थितीत लोकनेते बाळासाहेब देसाई यांना विन्रम अभिवादन करण्यात आले.भव्यदिव्य दिंडी व रिंगण सोहळयाने दौलतनगरला सकाळपासून भक्तीमय वातावरण होते.

              दौलतनगर ता.पाटण येथील महाराष्ट्र दौलत लोकनेते बाळासाहेब देसाई शताब्दी स्मारकामध्ये लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे ३9 व्या पुण्यतिथीनिमित्त गत बारा वर्षापासून सुरु असलेल्या श्री.ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळयाचे यंदाचे तेरावे वर्ष होते.या पारायण सोहळयामध्ये 530 वाचक सहभागी झाले होते.तसेच तालुक्या बाहेरीलही भाविक भक्त या सोहळयामध्ये मोठया संख्येने सहभागी होते.तर वारकरी साप्रंदयातील विविध मान्यवरांची प्रवचने,कीर्तने तसेच गावोगावच्या भजनांचे जागराचे कार्यक्रम यानिमित्ताने आयोजीत करण्यात आले होते.या संपुर्ण पारायण सोहळयामध्ये गृहराज्यमंत्री नामदार शंभूराज देसाई,श्रीमती विजयादेवी देसाई मॉसाहेब,मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रविराज देसाई, सौ.स्मितादेवी देसाई, सौ.अस्मितादेवी देसाई,युवा नेते मा.यशराज देसाई, ईश्वरी देसाई,चि.जयराज देसाई,चि.आदित्यराज देसाई यांचा विशेष सहभाग होता.तर ह...जयवंतराव शेलार महाराज, ...अनिल पाटील महाराज पापर्डेकर,...जगन्नाथ ठोंबरे महाराज ह.भ.प.दगडू माळी, नाना देसाई पापर्डेकर,अमित लोहार,सुभाष देसाई यांच्यासह त्यांचे सहकारी यांचाही सहभाग होता.

              तीन दिवसीय श्री ग्रंथराज ज्ञानेश्वर ग्रंथाचे वाचन पुर्ण झालेनंतर लोकनेते यांचे पुण्यतिथी दिवशी फुलाने सजविलेल्या पालखीत श्री ज्ञानेश्वर महाराज,संत तुकाराम महाराज व लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या प्रतिमा ठेवून टाळ मृदुंगाच्या तालावर,डोक्यावर कलश,तुळशी वृंदावन घेतलेल्या सुहासिनी ढोल वाद्यांसमवेत श्री विठ्ठल नामाचा तसेच ज्ञानोबा माऊली ज्ञानराज माऊली यांचे गजरात आणि लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या जयघोषात माऊलीच्या मंडपातून निघालेल्या भव्य दिंडीला लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे शताब्दी स्मारकापासून सुरुवात करण्यात आली.पारायण सोहळयाची भव्य दिंडी ही कारखाना कार्यस्थळावरील लोकनेते यांचे पुर्णाकृती पुतळयासमोर आलेनंतर नामदार शंभूराज देसाई यांचे हस्ते पुतळयासमोर प्रथमत: ध्वजारोहण करण्यात येवून लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या पुतळयावर हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी करण्यात आली तसेच २१ तोफांची सलामी देण्यात आली. तर पुतळयासमोर अभंग व आरती करुन लोकनेते यांचा ३9 वा पुण्यतिथी सोहळा साजरा करण्यात आला. त्यानंतर पुतळ्यासमोर भव्य असा रंगलेला रिंगण सोहळा हे दृष्य अत्यंत मनमोहक होते. चौथ्या दिवशी काल्याच्या किर्तनाने उपस्थित सर्व भाविक भक्तांना महाप्रसाद देवून या अखंड हरीनाम भव्य सोहळ्याची सांगता करण्यात आली. लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे पुण्यतिथी दिवशी दौलतनगरला प्रती पंढरपुर अवतरले होते. गत बारा वर्षापासून ह...पुडंलिक महाराज कापसे आळंदीकर हे या पारायण सोहळ्यामध्ये व्यासपीठ चालक म्हणून आपली सेवा बजावीत आहेत. यंदाचा सोहळयातही त्यांनी व्यासपीठ चालक म्हणून सेवा बजावली तर हा पारायण सोहळा यशस्वी करण्याकरीता गृहराज्यमंत्री ना. शंभूराज देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली ह...जयवंतराव शेलार महाराज,...अनिल पाटील महाराज,...जगन्नाथ ठोंबरे महाराज यांच्यासह त्यांचे सहकारी यांचेसोबत लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी उद्योग व शिक्षण समूहातील अधिकारी कर्मचारी तसेच शासनाच्या विविध विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांनी कष्ट घेतले. या सर्वांचे आभार नामदार शंभूराज देसाईंनी मानले.या सोहळ्यास लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी उद्योग व शिक्षण समूहातील सर्व प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते यांची मोठया संख्येने उपस्थिती होती.

चौकट- दोन वर्षानंतरचा रिंगण सोहळा ठरला भाविकांसाठी आकर्षण.

            लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे पुण्यतिथी निमित्ताने लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे पुतळ्यास अभिवादन केलेनंतर पुतळ्यासमोर प्रतिवर्षी साजरा करण्यात येणारा रिंगण सोहळा हा या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण असते, या रिंगण सोहळ्यामध्ये अबाल वृध्दासंह लहानथोर सर्वजण मोठ्या संख्येने सहभागी होत असतात. दरम्यान गत दोन वर्षामध्ये कोरोना प्रादुर्भावामुळे हा रिंगण सोहळा मोठया प्रमाणांत साजरा करण्यात आला नव्हता.परंतु यंदाच्या वर्षी लोकनेते साहेब यांचे पुण्यतिथी  सोहळयानिमित्त रिंगण सोहळयाचे आयोजन करण्यात आले होते. या रिंगण सोहळयामध्ये ना.शंभूराज देसाई यांचे सह सौ.स्मितादेवी देसाई, रविराज देसाई, सौ.अस्मितादेवी देसाई, युवा नेते मा.यशराज देसाई, ईश्वरी देसाई,चि.जयराज देसाई, चि.आदित्यराज देसाई यांचे उपस्थितीमुळे दोन वर्षानंतर झालेला हा रिंगण सोहळा उपस्थित सर्व भक्त,भाविकांसाठी आकर्षण आकर्षण ठरले.तसेच हा रिंगण सोहळा पाहून उपस्थित भाविक भक्त भारावून गेले.

चौकट-लोकनेते साहेब यांचे पुर्णाकृती पुतळा व स्व.शिवाजीराव देसाई यांचे समाधी स्थळावर हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी करत केले अभिवादन.

महाराष्ट्राचे पोलादी पुरुष,राज्याचे माजी गृहमंत्री यांचा शनिवार दि. 23 रोजी  पुण्यतिथी सोहळा पार पडला.या पुण्यतिथी सोहळयामध्ये महाराष्ट्र राज्याचे गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे संकल्पनेतून लोकनेते साहेब यांचे पुर्णाकृती पुतळा व समाधी स्थळावर हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी करण्याचे नियोजन करण्यात आले होते.त्यानुसार आज पुण्यतिथी दिनानिमित्त त्यांचे पुर्णाकृती पुतळा व  स्व.शिवाजीराव देसाई (आबासाहेब) यांचे समाधीस्थळावर हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी करण्यात येऊन लोकनेते साहेब यांचे 39 व्या पुण्यतिथी दिनानिमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले.


Friday 22 April 2022

गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे उपस्थितीत शनिवारी दौलतनगर येथे लोकनेते बाळासाहेब देसाई यांचा 39 वा पुण्यतिथी सोहळा व श्री ग्रंथराज पारायण सोहळ्याची होणार सांगता.


                 



दौलतनगर दि.22(जनसंपर्क कक्ष,राज्यमंत्री कार्यालय):- महाराष्ट्राचे पोलादी पुरुष,राज्याचे माजी गृहमंत्री लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या 39 व्या पुण्यतिथीनिमित्त लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी कारखान्याचे मार्गदर्शक संचालक आणि महाराष्ट्र राज्याचे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या संकल्पनेतून लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी उदयोग समुह व पाटण तालुका वारकरी संघ यांचे सौजन्याने दौलतनगर,ता. पाटण येथील महाराष्ट्र दौलत लोकनेते बाळासाहेब देसाई शताब्दी स्मारकामध्ये  आयोजित  ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी पारायण सोहळयाची सांगता व लोकनेते बाळासाहेब देसाईसाहेब यांचा पुण्यतिथी सोहळा शनिवार दि.23 एप्रिल,2022 रोजी गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे प्रमुख उपस्थितीत साजरा होणार असून यावेळी मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रविराज देसाई,युवा नेते मा.यशराज देसाई यांचीही उपस्थिती राहणार असल्याचे प्रसिध्दीपत्रकांत म्हंटले आहे.

            सन २०१० या लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या जन्मशताब्दी वर्षापासून पाटण तालुक्यात दौलतनगर येथे भव्य प्रमाणांत श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळयाचे आयोजन करण्यात येत असून श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळयास पाटण तसेच शेजारील तालुक्यातील भाविकांचा मिळालेला उदंड प्रतिसाद पाहता लोकनेते बाळासाहेब देसाई यांची पुण्यतिथी हि दौलतनगर येथे तीन दिवसीय श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी सामुदायिक पारायण सोहळयानेच साजरी करण्यात येत आहे. यंदा या पारायणाचे तेरावे वर्ष असून प्रति वर्षाप्रमाणे लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे ३9 व्या पुण्यतिथीनिमित्त दि. २० ते २३ एप्रिल, २०22 पर्यंत तीन दिवसीय पारायण या ठिकाणी होत आहे.

दौलतनगर,ता.पाटण येथील महाराष्ट्र दौलत लोकनेते बाळासाहेब देसाई शताब्दी स्मारकामध्ये सुरु झालेल्या पारायण सोहळयामध्ये 530 वाचक सहभागी झाले आहेत.गृहराज्यमंत्री नामदार शंभूराज देसाई यांच्या संकल्पनेतून सुरु झालेल्या या पारायण सोहळयाच्या निमित्ताने तालुक्यातील तसेच शेजारील तालुक्यातील किर्तनकार, प्रवनचनकारांना एक चांगले तालुकास्तरीय व्यासपिठ निर्माण झालेले असून प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी पाटण तालुक्यातील दौलतनगरला लोकनेते बाळासाहेब देसाई नगरीमध्ये पारायण सोहळयामुळे प्रति पंढरीचे रुप अवतरले असल्याचे चित्र दिसत आहे. लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या ३9 व्या पुण्यतिथी सोहळयानिमित्त शनिवार दि. २३ एप्रिल २०२२ रोजी सकाळी 8.३० ते 9.३० वा.नामदार श्री. शंभूराज देसाई व सौ.स्मितादेवी देसाई यांचे प्रमुख उपस्थितीत लोकनेते बाळासाहेब देसाईसाहेब यांचे पुतळयापर्यंत दिंडी सोहळा आयोजित केला आहे.त्यांनतर कारखाना कार्यस्थळावरील लोकनेते बाळासाहेब देसाईसाहेब यांचे पुतळयावर पुष्पवृष्टी करण्यात येऊन लोकनेते साहेबांना विनम्र अभिवादन करण्यात येणार आहे.त्यानंतर दौलतनगर येथे भव्य रिंगण सोहळा होणार असून सकाळी १० ते १२ वा.पर्यंत ह.भ.प. दत्तात्रय घुले महाराज,मांजरी बुद्रुक पुणे यांचे काल्याचे किर्तन झाल्यानंतर लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी उद्योग समुह,दौलतनगर यांचेतर्फे महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असून त्यांनतर ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी पारायण सोहळयाची सांगता होणार आहे.

 चौकट :- लोकनेते साहेब,स्व.शिवाजीराव देसाई यांचे पुतळा व समाधी स्थळावर होणार हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी.

महाराष्ट्राचे पोलादी पुरुष,राज्याचे माजी गृहमंत्री लोकनेते बाळासाहेब देसाई यांचा पुण्यतिथीनिमित्त प्रतिवर्षी तीन दिवसीय श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळयाचे आयोजन करण्यात येते. लोकनेते साहेब यांचा पुण्यतिथी सोहळा दि. 23 एप्रिल रोजी भक्तीमय वातावरणात साजरा करत या दिवशी ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी पारायण सोहळयाची सांगता होते.यंदाचे वर्षी गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे संकल्पनेतून दौलतनगर कारखाना कार्यस्थळावरील लोकनेते बाळासाहेब देसाई,स्व.शिवाजीराव देसाई यांचे पुर्णाकृती पुतळा व समाधी स्थळ यांचेवर हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी करण्यात येऊन लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे पुण्यतिथी निमित्त हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी करुन त्यांचे पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन करण्यात येणार आहे.

                                                                                                       

Thursday 21 April 2022

शेत जमिनींच्या दुरुस्तीचे कामांना आवश्यक निधी उपलब्ध करणार.गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई पाटण तालुक्यातील अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेत जमिनींचे दुरुस्तीचे कामाचा झाला शुभारंभ.

 



दौलतनगर दि.20(जनसंपर्क कक्ष,राज्यमंत्री कार्यालय):-  माहे जुलै महिन्यामध्ये पाटण तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे सार्वजनिक मालमत्तेसह शेतकऱ्यांच्या शेत जमिनींचे मोठया प्रमाणांत नुकसान झाले होते,अनेक शेत जमिनींचे क्षेत्र पूर्णपणे खरवडून गेले होते व काही ठिकाणी मोठेमोठे दगड गोठे आले होते. त्यामुळे सर्व सामान्य शेतकरी कुटुंबांचा शेती अभावी उदर-निर्वाहाचा गंभीर प्रश्न निर्माण झाल्याने या नुकसान झालेल्या शेत जमीनींची तातडीने दुरुस्ती करणे गरजेचे होते.पाटण तालुक्यातील  शेत जमिनींच्या दुरुस्तीचे कामाचा शुभारंभ आज धावडे येथे करत असून अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेत जमिनींच्या दुरुस्तीचे कामांना आवश्यक असणारा निधी राज्य शासनाकडून उपलब्ध करुन दिला जाईल असे प्रतिपादन गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी केले. पाटण तालुक्यातील नुकसान झालेल्या शेतजमिनीचे सुधारणा करणे अंतर्गत जेसीबी ने दगड, माती,गाळ इ काढणेव जमिनीचे सपाटीकरण करणे या कामांचा शुभारंभ धावडे याठिकाणी पार पडला.यावेळी गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई, प्रांताधिकारी सुनिल गाढे, तहसिलदार रमेश पाटील, गटविकास अधिकारी मीना साळुंखे,बशीर खोंदू,गणेश भिसे,दत्ता अवघडे यांचे सह शेतकरी,कार्यकर्ते यांची प्रमुख उपस्थिती होती. 

          याप्रसंगी बोलताना ते पुढे म्हणाले की,  अतिवृष्टीमुळे पाटण तालुक्यात जिवीत, वित्तहानीसह शेतजमिनींते भयंकर नुकसान झाले.नुकसान झालेल्या शेत जमिनींचे दुरुस्तीचे कामाकरीता निधी मंजूर होण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री ना.उध्दवजी ठाकरे  यांच्याकडे पाठपुरवठा करुन तालुक्याला भरघोस निधी उपलब्ध करुन घेतला. शेतजमिनींच्या दुरुस्तींच्या कामासह पिंकाचे झालेल्या नुकसानीचीही भरपाई देऊन तालुक्यातील सर्व सामान्य जनतेला न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. माहे जुलै महिन्यामध्ये पाटण तालुक्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे, भूस्खलन व पूरस्थितीमध्ये तालुक्यात फार नुकसान झाले.अतिवृष्टीमध्ये पुराच्या पाण्यामुळे अनेक गावांचे रस्ते,पूल वाहून गेल्याने संपर्क तुटला होता,तर पुराच्या पाणी शेतामध्ये जाऊन शेतजमीनी पुर्णपणे उखडून गेल्या,तर काही ठिकाणी जमिनीमध्ये मोठया प्रमाणांत दगड गोटे आल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेत जमिनींचे मोठया प्रमाणांत नुकसान झाले.आपला तालुका हा वेग वेगळया खोऱ्यांमध्ये वसलेला आहे. शेतकऱ्यांचे झालेले नुकसानीमुळे राज्य शासनाकडून शेतकऱ्यांना मदत देणे क्रमप्राप्त होते.त्यानुसार आज आपण शेतक-यांच्या शेतजमिनी सपाटीकरणाचा शुभारंभ करत आहोत. अतिवृष्टीमुळे तालुक्यातील पाण्याचे नैसर्गिक स्रोत मुजले आहेत.  ते नैसर्गिक स्रोत खुले करणं गरजेचे आहे. अडचणीच्या काळात बाधित शेतकऱ्यांना मदत झाली पाहिजे ही राज्य शासनाची प्राथमिक भूमिका असून, शेत जमिनींचे दुरुस्तीचे कामाकरीता निधीची अडचण भासू देणार नाही. कृषी व महसूल  विभागाने चांगले काम करुन शेत जमिनींची कामे चांगल्या पध्दतीने करावीत.कोणत्याही गोष्टीची हयगय करु नये. माहे मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्या पर्यंत शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनींची दुरुस्ती करुन देण्याची जबाबदारी कृषी विभागाची आहे. दोन वर्षांचा कालावधी कोविडमध्ये गेला. सध्या सर्व परिस्थिती पुर्वपदावर येत असून विकास कामांना निधी उपलब्ध होत आहे. अतिवृष्टीमुळे पाटण तालुक्यातील 119 गावातील 275 हेक्टर शेत जमिनींचे नुकसान झाले असून उपलब्ध झालेल्या जेसीबी मशीनला शासनामार्फत इंधन पुरवठा करुन हि शेत जमीनींची दुरुस्तीची कामे होणार असल्याचे त्यांनी शेवटी म्हंटले आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रांताधिकारी सुनिल गाढे यांनी करताना शेतकऱ्यांचे न भरुन येणारे नुकसान झालेले आहे. नाले व नद्यांचे प्रवाह बदलले आहेत.अतिवृष्टी पावसाळा सुरू होण्या अगोदर आम्ही ही काम पार पाडणार आहोत अशी ग्वाही दिली.  कार्यक्रमाचे आभार मा. जि. प. स बशीर खोंदू यांनी मानले. यावेळी मंडल अधिकारी सोनवणे, डी एन निकाळजे, जे जे शिंदे, महसूल चे अधिकारी व कर्मचारी वर्ग, पंचायत समितीचे कर्मचारी व अधिकारी वर्ग तसेच मोरणा भागातील कार्यकर्ते उपस्थित होते. 

चौकट: विकास कामांचे श्रेय घेण्याचा प्रयत्न करुन नये

              तालुक्यातील विकास कामांबाबत बोलत असताना काही लोक म्हणतात विकास काम आम्ही करतो,अतिवृष्टीच्या निधीमध्ये श्रेय घेण्याचा केविलवाणा प्रयत्न काही लोक करत आहेत.त्यांनी नेमका निधी कुठून कसा आणला ते तपासावे. निधी कसा आणला जातो त्याची मंजूरी कशी घेतात हे पहिलं बघा उगाचं फुकटाच श्रेय घेऊ नका, काही लोकांना आमचा विकास दिसत नाही.  झोपलेल्या लोकांना विकास कसा दिसणार हा ही प्रश्न आहे. या गोष्टींकडे दुर्लक्ष करुन सर्व सामान्य जनतेसाठी आपण काम करत आहोत. नको त्या गोष्टीसाठी वेळ वाया घालवण्यापेक्षा विकास कामे केलेली केव्हाही चांगली.असा टोला ना. शंभूराजे देसाई यांनी लगावला.

Wednesday 20 April 2022

लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे 39 व्या पुण्यतिथीनिमित्त दौलतनगर,ता.पाटण येथे भक्तीमय वातावरणात श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळयास प्रारंभ.

 

                       



दौलतनगर दि.20(जनसंपर्क कक्ष,राज्यमंत्री कार्यालय):- महाराष्ट्राचे पोलादी पुरुष,राज्याचे माजी गृहमंत्री लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या 39 व्या पुण्यतिथीनिमित्त लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी कारखान्याचे मार्गदर्शक संचालक आणि महाराष्ट्र राज्याचे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या संकल्पनेतून लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी उदयोग समुह व पाटण तालुका वारकरी संघ यांचे सौजन्याने दौलतनगर, ता. पाटण येथील महाराष्ट्र दौलत लोकनेते बाळासाहेब देसाई शताब्दी स्मारकामध्ये  तेराव्या वर्षी ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी पारायण सोहळयाचा प्रारंभ बुधवार दि. २० एप्रिल,२०22 रोजी भाविक भक्तांच्या उदंड प्रतिसादाने भक्तीमय वातावरणात ह...जयवंतराव शेलार व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. रंजना जयवंतराव शेलार यांच्या शुभहस्ते दिप प्रज्वलन करुन तसेच गृहराज्यमंत्री ना. शंभूराज देसाई व त्यांच्या मातोश्री श्रीमती विजयादेवी देसाई यांचे शुभहस्ते श्री ज्ञानेश्वरी ग्रंथाचे पूजन करुन करण्यात आला.

            सन २०१० या लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या जन्मशताब्दी वर्षापासून पाटण तालुक्यात दौलतनगर येथे भव्य प्रमाणांत श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळयाचे आयोजन करण्यात येत असून श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळयास पाटण तसेच शेजारील तालुक्यातील भाविकांचा मिळालेला उदंड प्रतिसाद पाहता लोकनेते बाळासाहेब देसाई यांची पुण्यतिथी हि दौलतनगर येथे तीन दिवसीय श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी सामुदायिक पारायण सोहळयानेच साजरी करण्यात येत आहे. यंदा या पारायणाचे तेरावे वर्ष असून प्रति वर्षाप्रमाणे लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे ३9 व्या पुण्यतिथीनिमित्त दि. २० ते २३ एप्रिल, २०22 पर्यंत तीन दिवसीय पारायण या ठिकाणी होत आहे.

दौलतनगर,ता.पाटण येथील महाराष्ट्र दौलत लोकनेते बाळासाहेब देसाई शताब्दी स्मारकामध्ये सुरु झालेल्या पारायण सोहळयामध्ये 530 वाचक सहभागी झाले आहेत.गृहराज्यमंत्री नामदार शंभूराज देसाई यांच्या संकल्पनेतून सुरु झालेल्या या पारायण सोहळयाच्या निमित्ताने तालुक्यातील तसेच शेजारील तालुक्यातील किर्तनकार, प्रवनचनकारांना एक चांगले तालुकास्तरीय व्यासपिठ निर्माण झालेले असून प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी पाटण तालुक्यातील दौलतनगरला लोकनेते बाळासाहेब देसाई नगरीमध्ये पारायण सोहळयामुळे प्रति पंढरीचे रुप अवतरले असल्याचे चित्र दिसत आहे. गत दोन वर्षामध्ये कोविड 19 च्या संसर्गामुळे मोठया प्रमाणांत पारायण सोहळा साजरा करता आला नाही.प्रातिनिधीक स्वरुपात श्री गणेश मंदिरामध्ये गत दोन वर्ष शासनाने घालून दिलेल्या नियमानुसार पारायण सोहळा साजरा करण्यात आला. दरम्यान यंदाचे  पारायण सोहळयास वाचकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. प्रति वर्षाप्रमाणे व्यासपीठ चालक म्हणून ह...पुंडलिक महाराज कापसे,आळंदीकर हे उपस्थित असून पहिल्या दिवशी बुधवार दि. २० एप्रिल २०२२ रोजी ह.भ.प.  विजय महाराज, रामिष्टेवाडी यांचे प्रवचन, ह.भ.प. सुरेश जाधव महाराज,मुंबई यांचे किर्तन,गुरुवार दि. २१ एप्रिल, २०२२ रोजी ह.भ.प. पृथ्वीराज शिंदे,भुयाचीवाडी उंब्रज यांचे प्रवचन तर ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज शिंदे,अध्यापक वारकरी शिक्षण संस्था आळंदी देवाची यांचे किर्तन आणि शुक्रवार दि.२२ एप्रिल, २०२२ रोजी ह.भ.प यशवंत नारायण मेहेंदळे,सद्गुरु श्री वामनराव पै यांचे सतशिष्य यांचे प्रवचन तर ह.भ.प. डॉ.रामचंद्र देखणे महाराज,आळंदी विद्या वाचस्पती पुणे यांचे किर्तन होणार असून लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या ३9 व्या पुण्यतिथी सोहळयानिमित्त शनिवार दि. २३ एप्रिल २०२२ रोजी सकाळी 8.३० ते 9.३० वा.नामदार श्री. शंभूराज देसाई व सौ.स्मितादेवी देसाई यांचे प्रमुख उपस्थितीत लोकनेते बाळासाहेब देसाईसाहेब यांचे पुतळयापर्यंत दिंडी सोहळा व पुतळयावर पुष्पवृष्टी आणि विनम्र अभिवादन व नंतर रिंगण सोहळा होणार असून त्यानंतर सकाळी १० ते १२ वा.पर्यंत ह.भ.प. दत्तात्रय घुले महाराज,मांजरी बुद्रुक पुणे यांचे काल्याचे किर्तन झाल्यानंतर लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी उद्योग समुह,दौलतनगर यांचेतर्फे महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असून त्यांनतर पारायणाची सांगता करण्यात येणार आहे.

या पारायण सोहळयाच्या शुभारंभ प्रसंगी बोलताना ना. शंभूराज देसाई म्हणाले, लोकनेते बाळासाहेब देसाई साहेब यांचे विचाराने आपण या तालुक्यात कार्य करीत आहोत. गेली 13 वर्ष हा पारायण सोहळा यशस्वीपणे पार पडण्यामागे श्री ज्ञानेश्वर माऊलींबरोबर लोकनेते बाळासाहेब देसाई यांचा आशिर्वाद आपल्या पाठीशी आहे. समाजाच्या हिताकरीता,समाजातील उपेक्षित घटकांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे काम लोकनेते साहेबांनी केले. लोकनेते साहेब यांची कर्मभूमी असलेल्या दौलतनगर(मरळी) येथे स्मारक उभे करुन त्यांच्या आठवणींना,कार्याला उजाळा देण्याचे काम आपण केले आहे.विधानसभा निवडणूकी पूर्वी झालेल्या पारायण सोहळयाच्या सांगता समारंभामध्ये मंत्री झाल्यानंतर आता लोकनेते साहेबांच्या पुर्णाकृती पुतळयावर पुष्पवृष्टी अशी भावना व्यक्त केली होती.श्रध्दा आणि निष्ठेने काम केल्यानंतर हव ते यश मिळण्यासाठी माऊली आपल्याला शक्ती देत असल्याचे सांगत ते पुढे म्हणाले की,महाविकास आघाडीचे सरकार मध्ये राज्यमंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली असल्याने यंदाच्या लोकनेते साहेबांच्या 39 व्या पुण्यतिथी दिवशी त्यांचे पुर्णाकृती पुतळयावर हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी करणार असल्याचे त्यांनी शेवटी सांगीतले.तसेच हा पारायण सोहळा यशस्वी करण्याकरीता सहभागी असलेले लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी उद्योग शिक्षण समुह,प्रशासनातले अधिकारी,कर्मचारी,वारकरी सांप्रदायातील सर्व भक्त भाविक उपस्थित वाचक मंडळी यांचे आभार मानले.यावेळी कारखान्याचे चेअरमन अशोकराव पाटील,माजी चेअरमन डॉ.दिलीपराव चव्हाण ह... पुंडलिक महाराज कापसे आळंदीकर,...अनिल महाराज पापर्डेकर, ...जगन्नाथ ठोंबरे,विजय पवार,संतोष गिरी,जालंदर पाटील,पंजाबराव देसाई,हणमंतराव चव्हाण,अशोक डिगे,प्रकाशराव जाधव,राजाराम मोहिते,डी.वाय.पाटील,बबनराव भिसे व कारखान्याचे सर्व संचालक मंडळ तसेच सर्व पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य तसेच प्रमुख कार्यकर्ते व लोकनेते प्रेमी जनतेची मोठया प्रमाणांत उपस्थिती होती.