Monday 11 April 2022

प्रादेशिक पर्यटन विकास योजनेअंतर्गत पाटण तालुक्यातील कामांकरीता 10 कोटी रुपयांचा निधी . गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे प्रयत्नातून कोयना परिचय केंद्र उभारणीसह दौलतनगर(मरळी)पर्यटन स्थळ होणार विकसित.

 



        

दौलतनगर दि.11 (जनसंपर्क कक्ष,राज्यमंत्री कार्यालय):- पाटण तालुक्यामध्ये कोयनानगर,ता.पाटण या ठिकाणांस राज्यासह इतर ठिकाणांहून अनेक पर्यटक हे भेट देत असतात. विशेषत: उन्हाळयामध्ये कोयनानगर या ठिकाणी पर्यटकांची मोठी गर्दी असते. कोयनानगर व तालुक्यातील आसपासचे परिसरामध्ये पर्यटन स्थळांची माहिती या पर्यटकांना मिळण्याच्या हेतूने कोयनानगर येथे निसर्ग परिचय केंद्र उभारणे गरजेचे होते. तसेच दौलतनगर या पर्यटन स्थळास भेट देणाऱ्या पर्यटकांना सोयी-सुविधा देणे गरजेचे असल्याने कोयनानगर येथे निसर्ग परिचय केंद्र उभारणे व दौलतनगर(मरळी),ता.पाटण येथील पर्यटन स्थळाचा विकास करण्याकरीता गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी राज्याचे मुख्यमंत्री ना.उध्दवजी ठाकरे व पर्यटन मंत्री ना. आदित्यजी ठाकरे यांचेकडे विनंती केलेली होती. त्यानुसार  सन 2021-22 या आर्थिक वर्षामध्ये कोयनानगर,ता.पाटण येथे पर्यटकांसाठी निसर्ग परिचय केंद्र उभारणे व इतर सुविधा उपलब्ध करुन देण्याकरीता 05 कोटी व दौलतनगर (मरळी),ता.पाटण या पर्यटन स्थळ विकसित करणे व इतर सुविधा उपलब्ध करण्याकरीता 05 कोटी असा एकूण 10 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असल्याचा शासन निर्णय राज्य शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाने पारीत केला असल्याची माहिती ना.शंभूराज देसाई यांचे कार्यालयाचे वतीने प्रसिध्दीपत्रकांत देण्यात आली आहे.

           प्रसिध्दीपत्रकांत पुढे म्हंटले आहे की,कोयनानगर या ठिकाणी महाराष्ट्राची वरदायीनी समजले जाणारे कोयना धरण असून या कोयना धरणासह या परिसरातील निसर्ग रम्य ठिकाणांना राज्यासह इतर ठिकाणचे पर्यटक मोठया संख्येने भेट देत असतात. विशेषत: उन्हाळयात कोयनानगर,ता.पाटण येथे पर्यटकांची मोठी गर्दी असते.कोयनानगर परिसरामधे पर्यटकांना भेट देण्यासारखी अनेक ठिकाणे असून तालुक्यामध्येही अनेक पर्यटन स्थळ असल्याने तालुक्यातील सर्व पर्यटन स्थळांची एकत्रित माहिती एकाच ठिकाणी या पर्यटकांना मिळावी यासाठी कोयनानगर येथे कोयना परिचय केंद्र उभारण्याची संकल्पना गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई यांची होती.तसेच दौलतनगर (मरळी),ता.पाटण या स्थळाचा वर्ग पर्यटनामध्ये समावेश असून येथे राज्य शासनाच्या वतीने महाराष्ट्राचे पोलादी पुरुष आदरणीय लोकनेते बाळासाहेब देसाईसाहेब यांचे भव्य असे महाराष्ट्र दौलत लोकनेते बाळासाहेब देसाई शताब्दी स्मारक उभारण्यात आले आहे.तसेच याच परिसरामध्ये प्रसिध्द असे श्री.गणपतीचे भव्य मंदीर असून अनेक पर्यटक प्रतिवर्षी श्री.गणरायाच्या दर्शनाकरीता तसेच शताब्दी स्मारकाची पहाणी करण्याकरीता येत असतात. पर्यटकांना या ठिकाणी आवश्यक सोयी सुविधा पुरविण्याबरोबर या पर्यटनस्थळाचा सर्वांगीण विकास करणेकरीता निधीची आवश्यकता होती.त्यामुळे कोयनानगर,ता.पाटण येथे पर्यटकांसाठी निसर्ग परिचय केंद्र उभारणे व इतर सुविधा उपलब्ध करुन देण्याकरीता 05 कोटी व दौलतनगर (मरळी),ता.पाटण या पर्यटन स्थळ विकसित करणे व इतर सुविधा उपलब्ध करण्याकरीता 05 कोटी असा एकूण 10 कोटी रुपयांचा निधी मंजूर होण्यासाठीचा प्रस्ताव राज्याचे मुख्यमंत्री ना.उध्दवजी ठाकरे व पर्यटन मंत्री ना.आदित्यजी ठाकरे यांचेकडे सादर करण्यात येऊन या दोन्ही कामांसाठी 10 कोटी रुपयांचा निधी मंजूर व्हावा,अशी विनंती ना.शंभूराज देसाई यांनी त्यांचेकडे केली होती. त्यानुसार सन 2021-22 या आर्थिक वर्षामध्ये कोयनानगर,ता.पाटण येथे पर्यटकांसाठी निसर्ग परिचय केंद्र उभारणे व इतर सुविधा उपलब्ध करुन देण्याकरीता 05 कोटी व दौलतनगर (मरळी),ता.पाटण या पर्यटन स्थळ विकसित करणे व इतर सुविधा उपलब्ध करण्याकरीता 05 कोटी असा एकूण 10 कोटी रुपयांचा भरघोस निधी राज्य शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाने मंजूर केला आहे.त्यामुळे कोयनानगर सह दौलतनगर(मरळी) या दोन्ही पर्यटन स्थळे विकसित होण्याबरोबर पर्यटकांना या ठिकाणी आवश्यक अशा इतर सोयी-सुविधा पुरविण्यात येणार आहेत.यामध्ये कोयनानगर,ता.पाटण येथे पर्यटकांसाठी निसर्ग परिचय केंद्र उभारणे व इतर सुविधा उपलब्ध करणे,दौलतनगर येथे शताब्दी स्मारक परिसरात पर्यटकांसाठी शिवसृष्टी उभारणे,परिसरातील रस्त्यांची सुधारणा, विद्युतीकरण, पर्यटकांना तात्पुरता निवारा शेड उभारणे,पर्यटन परिसरात व शताब्दी परिसरात बागबगीचा सुधारणासह लहान मुलांना खेळणेकरीता खेळाचे साहित्य व बैठक व्यवस्था करणे या कामांचा समावेश आहे. कोयनानगर,ता.पाटण येथे पर्यटकांसाठी निसर्ग परिचय केंद्र व दौलतनगर (मरळी),ता.पाटण या पर्यटन स्थळ विकसित करणे व इतर सुविधा उपलब्ध करण्याकरीता 10 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाल्याने या ठिकाणी पर्यटकांसाठी आवश्यक त्या सोयी सुविधा उपलब्ध होणार असून पर्यटकांची चांगली सोय होणार असल्याने भविष्यामध्ये तालुक्यामध्ये पर्यटन वाढीस चालना मिळणार आहे. कोयनानगर,ता.पाटण येथे कोयना परिचय केंद्र व दौलतनगर (मरळी) पर्यटन स्थळासाठी निधी मंजूर केल्याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री ना.उध्दवजी ठाकरे व पर्यटन मंत्री ना. आदित्यजी ठाकरे यांचे गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई  यांनी विशेष आभार मानले.

No comments:

Post a Comment