दौलतनगर दि.08 (जनसंपर्क कक्ष,राज्यमंत्री कार्यालय):- पाटण तालुक्यामध्ये माहे जुलै मध्ये
मोठया प्रमाणांत झालेल्या ढगफुटीसदृश्य अतिवृष्टीमुळे डोंगरी व दुर्गम भागातील अनेक गावांचे पोहोच रस्त्यासह
अंतर्गत रस्त्यांची मोठी हानी झाली होती.त्यामुळे या गावांतील नागरीकांची दळण-वळणाची मोठी गैरसोय होत असल्याने गावपोहोच रस्त्यांसह
अंतर्गत रस्त्यांचे पुनर्बांधणीकरीता निधी मंजूर करण्याकरीता गृहराज्यमंत्री ना.शंभूराज
देसाई यांचेकडे ग्रामस्थांनी मागणी केली होती.
ग्रामस्थांच्या
मागणीनुसार गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी पाटण विधानसभा
मतदारसंघातील 31 गावांतील पोहोच रस्ते व अंतर्गत रस्त्यांचे पुनर्बांधणीचे
कामाकरीता राज्य शासनाचे 2515 योजनेतून 05
कोटी रुपयांचा
निधी मंजूर होण्याकरीता राज्याचे ग्रामविकास विभागाकडे शिफारस केली होती.त्यानुसार
पाटण विधानसभा मतदारसंघातील 31 गावांतील पोहोच व अंतर्गत रस्त्यांचे
पुनर्बांधणीकरीता 05 कोटी रुपयांचा निधी सन 2021-22 या आर्थिक वर्षामध्ये मंजूर केला असल्याचा शासन निर्णय राज्य शासनाच्या
ग्रामविकास विभागाने दि. 31 मार्च 2022
रोजी पारीत केला
असल्याची माहिती ना.शंभूराज देसाई यांचे कार्यालयाचे वतीने प्रसिध्दीपत्रकांत
देण्यात आली आहे.
प्रसिध्दीपत्रकांत पुढे म्हंटले आहे की, पाटण
तालुक्यामध्ये माहे जुलै मध्ये मोठया प्रमाणांत झालेल्या ढगफुटीसदृश्य
अतिवृष्टीमुळे डोंगरी व दुर्गम भागातील
अनेक गावांचे पोहोच रस्त्यासह अंतर्गत रस्त्यांचे अतोनात नुकसान झाले होते.अतिवृष्टीमुळे
गावांतर्गत रस्ते पुर्णपणे उखडून जाऊन या रस्त्यांची मोठया प्रमाणांत दुरावस्था
झाली होती. तर पोहोच रस्त्यांचे झालेल्या नुकसानीमुळे अनेक अनेक
गावांचा दळणवळणाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला होता.त्यामुळे पाटण विधानसभा मतदारसंघातील
विविध गावांतील ग्रामस्थांनी अतिवृष्टीमुळे नुकसान झालेले पोहोच तसेच अंतर्गत
रस्त्यांची कामे तातडीने मार्गी
लागण्याकरीता निधी मंजूर होण्यासाठी गृहराज्यमंत्री ना.शंभूराज
देसाई यांचेकडे मागणी केली होती.त्यानुसार गृहराज्यमंत्री ना.शंभूराज
देसाई यांनी पाटण विधानसभा मतदारसंघातील 31
गावांतील पोहोच
रस्ते व अंतर्गत रस्त्यांचे पुनर्बांधणीचे कामाकरीता राज्य शासनाचे 2515 योजनेतून 05 कोटी रुपयांचा निधी मंजूर होण्याकरीता राज्याचे ग्रामविकास
विभागाकडे शिफारस केली होती.त्यानुसार पाटण विधानसभा मतदारसंघातील 31 गावांतील
पोहोच व अंतर्गत रस्त्यांचे पुनर्बांधणीकरीता 05
कोटी रुपयांचा
निधी राज्याचे ग्रामविकास विभागाने मंजूर करण्यात आला आहे.यामध्ये चाफेर
मुरावस्ती रस्ता सुधारणा 20 लाख, सावंतवस्ती
यमकरवस्ती (मारुल तर्फ पाटण) रस्ता सुधारणा 15 लाख, गावडेवाडी
ते खुडुपलेवाडी पोहोच रस्ता खडीकरण,डांबरीकरण 20 लाख, वाटोळे
बौध्दवस्ती ते शंकर दगडू पवार यांचे घरापर्यंतचा रस्ता डांबरीकरण 15 लाख, टोळेवाडी
पोहोच रस्ता सुधारणा 20 लाख, वजरोशी
अंतर्गत रस्ता खडीकरण, डांबरीकरण 15 लाख, सावरघर,ता.पाटण
अंतर्गत रस्ता सुधारणा 20 लाख, दुटाळवाडी
(नुने),ता.पाटण पोहोच रस्ता खडीकरण,डांबरीकरण 10 लाख, आंबळे
येथे अंतर्गत रस्ता खडीकरण डांबरीकरण 10 लाख, वाघजाईवाडी
अंतर्गत रस्ता खडीकरण डांबरीकरण 15 लाख, कवठेकरवाडी(नाणेगाव
बु)अंतर्गत रस्ता सुधारणा 10 लाख, केरळ
लोहारवस्ती ते मराठवाडी रस्ता खडीकरण डांबरीकरण 20 लाख, मंद्रुळहवेली
पर्यायी पोहोच रस्ता सुधारणा 20 लाख, बोडकेवाडी
सुर्वेआळी रस्ता सुधारणा 15 लाख, बेलवडे
खुर्द,ता.पाटण विक्रमवार्ड व आधुनिक मंडळ अंतर्गत रस्ता सुधारणा 20 लाख, बोर्गेवाडी
पुनर्वसन सुर्यवंशीवाडी अंतर्गत रस्ता सुधारणा 20 लाख, भिलारवाडी
अंतर्गत रस्ता सुधारणा 15 लाख, किल्ले
मोरगिरी येथे मागसवर्गीयवस्ती रस्ता खडीकरण डांबरीकरण 15 लाख, नाटोशी
(इनामवाडी)अंतर्गत रस्ता सुधारणा 15 लाख, मोरगिरी
अंतर्गत रस्ता खडीकरण,डांबरीकरण 10 लाख, पाणेरी
अंतर्गत रस्ता सुधारणा 20 लाख, तेटमेवाडी
वरची (काळगाव) पोहोच रस्ता खडी.,डांबरीकरण 15 लाख, मोळावडेवाडी
(मोरेवाडी) येथे हनुमानमंदिर रस्ता सुधारणा 15 लाख, रामिष्टेवाडी
(काळगाव) अंतर्गत रस्ता सुधारणा 10 लाख, तारुख
हद्द ते साईकडे हद्द मळे मार्ग रस्ता खडीकरण,डांबरीकरण 20 लाख, दऱ्यातील मोरेवाडी (कुंभारगावं) रस्ता
सुधारणा 20 लाख, वायचळवाडी
(कुंभारगाव) पोहोच रस्ता सुधारणा 15 लाख, वस्ती
साकुर्डी भवानी मंदिर पोहोच रस्ता खडीकरण डांबरीकरण 15 लाख, पाठरवाडी(गमेवाडी)
पोहोच रस्ता सुधारणा 25 लाख, साजूर
नविन गावठाण अंतर्गत रस्ता खडीकरण,डांबरीकरण 15 लाख, बेलदरे
अंतर्गत रस्ता खडीकरण,डांबरीकरण 10 लाख
या कामांचा समावेश आहे. 2515 योजनेतून मंजूर झालेल्या या विकास
कामांची तातडीने निवीदा प्रक्रिया करुन पावसाळयापूर्वी ही कामे मार्गी
लावण्यासंदर्भात गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी संबंधित
अधिकाऱ्यांना सूचना केली असल्याचे शेवटी पत्रकांत नमूद केले आहे.
No comments:
Post a Comment