दौलतनगर दि.13 (जनसंपर्क कक्ष,राज्यमंत्री कार्यालय):- राज्य शासनाच्या मा.बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री
ग्रामपंचायत बांधणी योजनेअंतर्गत गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे
प्रयत्नातून पाटण तालुक्यातील पाच ग्रामपंचायत कार्यालय इमारतींचे कामांना मंजूरी
देण्यात आली आहे. यामध्ये तालुक्यातील बांबवडे,नाटोशी,घोट,कोळेकरवाडी व आडूळ
गावठाण या ग्रामपंचायतींचे कामांचा समावेश असून या ग्रामपंचायत कार्यालय इमारतींचे
कामांना मंजूरी दिली असल्याचा शासन निर्णय राज्य शासनाचे ग्रामविकास विभागाने दि.
31 मार्च 2022 रोजी पारित केला असल्याची माहिती गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई
यांचे कार्यालयाचेवतीने प्रसिध्दीपत्रकांत देण्यात आली आहे.
प्रसिध्दीपत्रकांत पुढे म्हंटले आहे की, पाटण
तालुक्यातील विविध गावच्या सध्या अस्तित्वात असलेल्या ग्रामपंचायती हया जुन्या व
जीर्ण झाल्या असल्याने या ग्रामपंचायतींमध्ये दैनंदिन कार्यालयीन कामकाज करताना
मोठी अडचणी निर्माण होत होत्या.ग्रामपंचायत इमारती अभावी होणारी गैरसोय लक्षात
घेऊन जुन्या व जीर्ण झालेल्या ग्रामपंचायत कार्यालय इमारतींचे ठिकाणी नवीन
इमारतीचे कामांना मंजूरी मिळावी याकरीता सरपंच व ग्रामस्थ यांनी महाराष्ट्र
राज्याचे गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई यांचेकडे मागणी केली होती. त्यांचे
मागणीनुसार गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी राज्याचे ग्रामविकास विभागाकडे
संबंधित गावांमध्ये नवीन ग्रामपंचायत कार्यालय इमारतींची कामे मंजूर होण्याकरीता
शिफारस केली होती. दरम्यान राज्यातील ज्या ग्रामपंचायतींना स्वत:च्या
कार्यालयासाठी स्वतंत्र इमारत नाही अशा ग्रामपंचायतींना स्वतंत्र कार्यालयाची
इमारत बांधण्यासाठी मा.बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजना
हि योजना राज्य शासनाचेवतीने राबविण्यात येत आहे. गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई
यांनी शिफारस केलेल्या पाटण तालुक्यातील पाटण तालुक्यातील बांबवडे,नाटोशी,घोट,कोळेकरवाडी
व आडूळ गावठाण या गावांमध्ये मा.बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत
बांधणी योजनेअंतर्गत नवीन ग्रामपंचायत कार्यालय इमारतींचेच्या कामांना मंजूरी
देण्यात आली असून याबाबतचा शासन निर्णय राज्य शासनाचे ग्रामविकास विभागाने दि. 31
मार्च 2022 रोजी पारित केला आहे.त्यामुळे पाटण तालुक्यातील मंजूर झालेल्या बांबवडे,नाटोशी,घोट,कोळेकरवाडी
व आडूळ गावठाण या गावांना नवीन
ग्रामपंचायत इमारती होणार असल्याने या
ग्रामपंचायतीमधील दैनंदिन कार्यालयीन कामकाज सुरळीत होऊन नवीन सोयी-सुविधांसह या
इमारतींची कामे होणार आहेत.दरम्यान मा.बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री
ग्रामपंचायत बांधणी योजनेअंतर्गत या अगोदर पाटण तालुक्यातील बांधवाट, बोडकेवाडी, जळव,उधवणे,चाळकेवाडी,
मरळी,भुडकेवाडी,ठोमसे व येराडवाडी या गावांमध्ये गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई
यांचे प्रयत्नातून नवीन ग्रामपंचायत कार्यालय इमारतींची कामे मार्गी लावण्यात आली
आहेत. स्थानिक स्वराज्य संस्था असलेल्या ग्रामपंचायतींना सर्व सोयींनीयुक्त अशी
नवीन इमारती होणार असल्याने ग्रामपंचायतींमधून ग्रामस्थांच्या असलेल्या अडी-अडचणी
सोडविण्याच्यादृष्टीने दैनंदिन कामकाज सुलभ होण्यास मदत होणार आहे. मा.बाळासाहेब
ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या पाचही
कामांचे लवकरात लवकर निविदा प्रक्रिया करण्यात येऊन ही कामे तातडीने मार्गी
लावण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना केल्या असल्याची माहितीही शेवटी
प्रसिध्दीपत्रकांत देण्यात आली आहे.
No comments:
Post a Comment