Wednesday 20 April 2022

लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे 39 व्या पुण्यतिथीनिमित्त दौलतनगर,ता.पाटण येथे भक्तीमय वातावरणात श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळयास प्रारंभ.

 

                       



दौलतनगर दि.20(जनसंपर्क कक्ष,राज्यमंत्री कार्यालय):- महाराष्ट्राचे पोलादी पुरुष,राज्याचे माजी गृहमंत्री लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या 39 व्या पुण्यतिथीनिमित्त लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी कारखान्याचे मार्गदर्शक संचालक आणि महाराष्ट्र राज्याचे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या संकल्पनेतून लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी उदयोग समुह व पाटण तालुका वारकरी संघ यांचे सौजन्याने दौलतनगर, ता. पाटण येथील महाराष्ट्र दौलत लोकनेते बाळासाहेब देसाई शताब्दी स्मारकामध्ये  तेराव्या वर्षी ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी पारायण सोहळयाचा प्रारंभ बुधवार दि. २० एप्रिल,२०22 रोजी भाविक भक्तांच्या उदंड प्रतिसादाने भक्तीमय वातावरणात ह...जयवंतराव शेलार व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. रंजना जयवंतराव शेलार यांच्या शुभहस्ते दिप प्रज्वलन करुन तसेच गृहराज्यमंत्री ना. शंभूराज देसाई व त्यांच्या मातोश्री श्रीमती विजयादेवी देसाई यांचे शुभहस्ते श्री ज्ञानेश्वरी ग्रंथाचे पूजन करुन करण्यात आला.

            सन २०१० या लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या जन्मशताब्दी वर्षापासून पाटण तालुक्यात दौलतनगर येथे भव्य प्रमाणांत श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळयाचे आयोजन करण्यात येत असून श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळयास पाटण तसेच शेजारील तालुक्यातील भाविकांचा मिळालेला उदंड प्रतिसाद पाहता लोकनेते बाळासाहेब देसाई यांची पुण्यतिथी हि दौलतनगर येथे तीन दिवसीय श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी सामुदायिक पारायण सोहळयानेच साजरी करण्यात येत आहे. यंदा या पारायणाचे तेरावे वर्ष असून प्रति वर्षाप्रमाणे लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे ३9 व्या पुण्यतिथीनिमित्त दि. २० ते २३ एप्रिल, २०22 पर्यंत तीन दिवसीय पारायण या ठिकाणी होत आहे.

दौलतनगर,ता.पाटण येथील महाराष्ट्र दौलत लोकनेते बाळासाहेब देसाई शताब्दी स्मारकामध्ये सुरु झालेल्या पारायण सोहळयामध्ये 530 वाचक सहभागी झाले आहेत.गृहराज्यमंत्री नामदार शंभूराज देसाई यांच्या संकल्पनेतून सुरु झालेल्या या पारायण सोहळयाच्या निमित्ताने तालुक्यातील तसेच शेजारील तालुक्यातील किर्तनकार, प्रवनचनकारांना एक चांगले तालुकास्तरीय व्यासपिठ निर्माण झालेले असून प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी पाटण तालुक्यातील दौलतनगरला लोकनेते बाळासाहेब देसाई नगरीमध्ये पारायण सोहळयामुळे प्रति पंढरीचे रुप अवतरले असल्याचे चित्र दिसत आहे. गत दोन वर्षामध्ये कोविड 19 च्या संसर्गामुळे मोठया प्रमाणांत पारायण सोहळा साजरा करता आला नाही.प्रातिनिधीक स्वरुपात श्री गणेश मंदिरामध्ये गत दोन वर्ष शासनाने घालून दिलेल्या नियमानुसार पारायण सोहळा साजरा करण्यात आला. दरम्यान यंदाचे  पारायण सोहळयास वाचकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. प्रति वर्षाप्रमाणे व्यासपीठ चालक म्हणून ह...पुंडलिक महाराज कापसे,आळंदीकर हे उपस्थित असून पहिल्या दिवशी बुधवार दि. २० एप्रिल २०२२ रोजी ह.भ.प.  विजय महाराज, रामिष्टेवाडी यांचे प्रवचन, ह.भ.प. सुरेश जाधव महाराज,मुंबई यांचे किर्तन,गुरुवार दि. २१ एप्रिल, २०२२ रोजी ह.भ.प. पृथ्वीराज शिंदे,भुयाचीवाडी उंब्रज यांचे प्रवचन तर ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज शिंदे,अध्यापक वारकरी शिक्षण संस्था आळंदी देवाची यांचे किर्तन आणि शुक्रवार दि.२२ एप्रिल, २०२२ रोजी ह.भ.प यशवंत नारायण मेहेंदळे,सद्गुरु श्री वामनराव पै यांचे सतशिष्य यांचे प्रवचन तर ह.भ.प. डॉ.रामचंद्र देखणे महाराज,आळंदी विद्या वाचस्पती पुणे यांचे किर्तन होणार असून लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या ३9 व्या पुण्यतिथी सोहळयानिमित्त शनिवार दि. २३ एप्रिल २०२२ रोजी सकाळी 8.३० ते 9.३० वा.नामदार श्री. शंभूराज देसाई व सौ.स्मितादेवी देसाई यांचे प्रमुख उपस्थितीत लोकनेते बाळासाहेब देसाईसाहेब यांचे पुतळयापर्यंत दिंडी सोहळा व पुतळयावर पुष्पवृष्टी आणि विनम्र अभिवादन व नंतर रिंगण सोहळा होणार असून त्यानंतर सकाळी १० ते १२ वा.पर्यंत ह.भ.प. दत्तात्रय घुले महाराज,मांजरी बुद्रुक पुणे यांचे काल्याचे किर्तन झाल्यानंतर लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी उद्योग समुह,दौलतनगर यांचेतर्फे महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असून त्यांनतर पारायणाची सांगता करण्यात येणार आहे.

या पारायण सोहळयाच्या शुभारंभ प्रसंगी बोलताना ना. शंभूराज देसाई म्हणाले, लोकनेते बाळासाहेब देसाई साहेब यांचे विचाराने आपण या तालुक्यात कार्य करीत आहोत. गेली 13 वर्ष हा पारायण सोहळा यशस्वीपणे पार पडण्यामागे श्री ज्ञानेश्वर माऊलींबरोबर लोकनेते बाळासाहेब देसाई यांचा आशिर्वाद आपल्या पाठीशी आहे. समाजाच्या हिताकरीता,समाजातील उपेक्षित घटकांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे काम लोकनेते साहेबांनी केले. लोकनेते साहेब यांची कर्मभूमी असलेल्या दौलतनगर(मरळी) येथे स्मारक उभे करुन त्यांच्या आठवणींना,कार्याला उजाळा देण्याचे काम आपण केले आहे.विधानसभा निवडणूकी पूर्वी झालेल्या पारायण सोहळयाच्या सांगता समारंभामध्ये मंत्री झाल्यानंतर आता लोकनेते साहेबांच्या पुर्णाकृती पुतळयावर पुष्पवृष्टी अशी भावना व्यक्त केली होती.श्रध्दा आणि निष्ठेने काम केल्यानंतर हव ते यश मिळण्यासाठी माऊली आपल्याला शक्ती देत असल्याचे सांगत ते पुढे म्हणाले की,महाविकास आघाडीचे सरकार मध्ये राज्यमंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली असल्याने यंदाच्या लोकनेते साहेबांच्या 39 व्या पुण्यतिथी दिवशी त्यांचे पुर्णाकृती पुतळयावर हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी करणार असल्याचे त्यांनी शेवटी सांगीतले.तसेच हा पारायण सोहळा यशस्वी करण्याकरीता सहभागी असलेले लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी उद्योग शिक्षण समुह,प्रशासनातले अधिकारी,कर्मचारी,वारकरी सांप्रदायातील सर्व भक्त भाविक उपस्थित वाचक मंडळी यांचे आभार मानले.यावेळी कारखान्याचे चेअरमन अशोकराव पाटील,माजी चेअरमन डॉ.दिलीपराव चव्हाण ह... पुंडलिक महाराज कापसे आळंदीकर,...अनिल महाराज पापर्डेकर, ...जगन्नाथ ठोंबरे,विजय पवार,संतोष गिरी,जालंदर पाटील,पंजाबराव देसाई,हणमंतराव चव्हाण,अशोक डिगे,प्रकाशराव जाधव,राजाराम मोहिते,डी.वाय.पाटील,बबनराव भिसे व कारखान्याचे सर्व संचालक मंडळ तसेच सर्व पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य तसेच प्रमुख कार्यकर्ते व लोकनेते प्रेमी जनतेची मोठया प्रमाणांत उपस्थिती होती.

No comments:

Post a Comment