Tuesday 19 April 2022

लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे चित्ररथ गौरव यात्रेची उत्साहात मिरवणूक पाटण विधानसभा मतदारसंघातील आम जनतेने केले लोकनेते साहेबांना विनम्र अभिवादन.

 




दौलतनगर दि.16 (जनसंपर्क कक्ष,राज्यमंत्री कार्यालय):- महाराष्ट्राचे पोलादी पुरुष लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या ३9 व्या पुण्यतिथी सोहळयानिमित्त लोकनेते साहेब यांचे जीवन कार्यावरील काही महत्त्वाच्या घटनांचे दर्शन घडविणारे तसेच गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे माध्यमातून मार्गी लागलेली व नियोजित विकास कामांचे दर्शन घडविणारे चित्ररथ व गौरव यात्रोची भव्य मिरवणूक पाटण तालुक्यात मंगळवारी मोठया उत्साहात पार पडली. लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी उद्योग व शिक्षण समुहाचे प्रमुख व महाराष्ट्र राज्याचे गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे संकल्पनेतून साकारलेल्या लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे जीवन कार्यावरील चित्ररथ व गौरवयात्रेला तालुक्यातील जनतेने चागला प्रतिसाद दिला.तसेच या चित्ररथ गौरव यात्रेमधील रथामध्ये ठेवलेल्या लोकनेते साहेब यांचे पादुकांचे दर्शन घेऊन अभिवादन केले.

                         लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून प्रत्येक वर्षी दौलतनगर,ता.पाटण येथे  श्री ग्रंथराज पारायण सोहळा आयोजित केला जातो.परंतु गत दोन वर्षामध्ये कोविड 19 चा संसर्गामुळे राज्य शासनाने घालून दिलेल्या निर्बंधामुळे प्रातिनिधीक स्वरुपात साजरा करण्यात आला. परंतु सध्या शासनाने सर्व निर्बंध शिथील केले असल्याने यंदाच्या वर्षी लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या 39 व्यापुण्यतिथी सोहळयानिमित्त बुधवार दि. 20 ते शनिवार दि. 23 एप्रिल पर्यंत दौलतनगर,ता.पाटण येथील महाराष्ट्र दौलत लोकनेते बाळासाहेब देसाई शताब्दी स्मारकामध्ये तीन दिवसीय श्री ग्रंथराज पारायण सोहळा संपन्न होत आहे. गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई यांच्या संकल्पनेतून पारायण सोहळयाच्या अगोदर लोकनेते बाळासाहेब देसाई यांनी महाराष्ट्र राज्याकरीता केलेल्या अतुलनीय कार्याची ओळख करुन देण्याकरीता त्यांच्याकार्याचा मागोवा घेणारे,लोकनेते साहेब यांनी राज्यासाठी,जिल्हयासाठी तसेच तालुक्यासाठी दिलेल्या योगदानाची युवा पिढीला माहिती देणारे तसेच लोकनेते साहेब यांचे स्वप्नातील तालुका या संकल्पनेतून गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे माध्यमातून मतदारसंघात साकारलेले तसेच नियोजित विकास कामे या सर्वांचे चित्ररथांची गैारवयात्रा व गौरवयात्रेच्यापुढे लोकनेते यांच्या पादुकांचा पालखीरथ असा सोहळा साजरा करण्यातय येऊन तालुक्यातील 22 गावातून हे चित्ररथ व गौरवयात्रेचे मार्गक्रमण झाले. मंगळवारी सकाळी 09 वाजता कारखाना कार्यस्थळावरील लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या पुर्णाकृती पुतळयास पुष्पहार अर्पण करुन विनम्र अभिवादन करीत गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे शुभहस्ते या चित्ररथ गौरवयात्रेचा शुभारंभ करण्यात आला.यावेळी मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रविराज देसाई,युवा नेते मा.यशराज देसाई,आदित्यराज देसाई,शिवसेना जिल्हा प्रमुख जयवंतराव शेलार,चेअरमन अशोकराव पाटील, संतोष गिरी,भरत साळूंखे,अभिजित पाटील,बबनराव शिंदे,गजानन जाधव,सोमनाथ खामकर,संजय देशमुख यांचेसह लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी उद्योग व शिक्षण समुहातील विविध संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते अभिवादन करण्यासाठी दौलतनगर येथे उपस्थित होते.

             लोकनेते बाळासाहेब देसाई चित्ररथ व गौरवयात्रेमध्ये विविध वाद्य,लोकनेत्यांची आकर्षक पालखी,फटाक्यांची आतषबाजी यामुळे तालुक्यातील सर्व वातावरण दुमदुमुन गेले होते.तालुक्यातील दौलतनगर, चोपदारवाडी, गव्हाणवाडी, सुर्यवंशीवाडी, पापर्डे, मारुलहवेली फाटा,गारवडे बहुले फाटा, सोनाईचीवाडी, नावडी वसाहत,निसरे,निसरे विहिर,निसरे फाटा, आबदारवाडी,गिरेवाडी, मल्हारपेठ, नारळवाडी,येराडवाडी,नवसरी, नाडे नवारस्ता, आडूळ गावठाण, आडूळपेठ, सुभाषनगर, लुगडेवाडी सोनगाव,येरफळे,म्हावशी स्टॉप,पाटण असा मार्ग होता.एकूण 22 गावातून जाणारा हा चित्ररथ गौरवयात्रेच्या सोहळयाचे मोठया उत्साहात ठिकठिकाणी पुष्पहार अर्पण करुन लोकनेत्यांच्या पालखी सोहळयाचे महिला वर्गाकडून पूजन करुन या चित्ररथ गौरवयात्रेचे स्वागत करण्यात आले.या चित्ररथ गौरवयात्रेमध्ये लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी उद्योग व शिक्षण समुहातील लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखाना,कोयना परिसर साखर कामगार संघटना,शिवदौलत सह.बँक, उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय पाटण, सार्वजनिक बांधकाम उपविभाग उत्तर व दक्षिण, न्यू इग्लिश स्कूल नाटोशी व  धावडे, जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग पाटण, शिवाजीराव देसाई विद्यालय सोनवडे,मल्हारपेठ पोलीस ठाणे, दौलत औद्योगिक प्रशिक्षण संस्था व श्रीमती विजयादेवी देसाई ज्यूनि.व सिनि. कॉलेज, तालुका कृषी अधिकारी कार्यालय यांचे 12 आकर्षक चित्ररथ या सोहळयामध्ये सहभागी झाले होते.गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई हे स्वत: सहभागी झालेल्या या चित्ररथ गौरव यात्रेची मिरवणूक भर उन्हातही अत्यंत उत्साहात संपन्न झाली. यावेळी ना.शंभूराज देसाईयांचे ठिकठिकाणी महिलांकडून औक्षणही करण्यात येऊन ग्रामस्थांचेवतीने सत्कारही करण्यात आला. या अनोख्या सोहळयामध्ये प्रत्येक ठिकाणी मिरवणूकीत सहभागी झालेल्यांना सरबत,केळी,वेपर्स,लस्सी अशा अल्पोपहाराचे वाटप करण्यात आले.पाटण येथे चित्ररथ गौरव यात्रेच्या सांगता समारंभामध्ये गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी या चित्ररथ गौरव यात्रेमध्ये सहभागी झालेल्यांचे तसेच चित्ररथ तयार करुन सहभागी झालेल्या सर्व संस्था तसेच शासकीय विभागांचे आभार मानले.

No comments:

Post a Comment