Thursday 21 April 2022

शेत जमिनींच्या दुरुस्तीचे कामांना आवश्यक निधी उपलब्ध करणार.गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई पाटण तालुक्यातील अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेत जमिनींचे दुरुस्तीचे कामाचा झाला शुभारंभ.

 



दौलतनगर दि.20(जनसंपर्क कक्ष,राज्यमंत्री कार्यालय):-  माहे जुलै महिन्यामध्ये पाटण तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे सार्वजनिक मालमत्तेसह शेतकऱ्यांच्या शेत जमिनींचे मोठया प्रमाणांत नुकसान झाले होते,अनेक शेत जमिनींचे क्षेत्र पूर्णपणे खरवडून गेले होते व काही ठिकाणी मोठेमोठे दगड गोठे आले होते. त्यामुळे सर्व सामान्य शेतकरी कुटुंबांचा शेती अभावी उदर-निर्वाहाचा गंभीर प्रश्न निर्माण झाल्याने या नुकसान झालेल्या शेत जमीनींची तातडीने दुरुस्ती करणे गरजेचे होते.पाटण तालुक्यातील  शेत जमिनींच्या दुरुस्तीचे कामाचा शुभारंभ आज धावडे येथे करत असून अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेत जमिनींच्या दुरुस्तीचे कामांना आवश्यक असणारा निधी राज्य शासनाकडून उपलब्ध करुन दिला जाईल असे प्रतिपादन गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी केले. पाटण तालुक्यातील नुकसान झालेल्या शेतजमिनीचे सुधारणा करणे अंतर्गत जेसीबी ने दगड, माती,गाळ इ काढणेव जमिनीचे सपाटीकरण करणे या कामांचा शुभारंभ धावडे याठिकाणी पार पडला.यावेळी गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई, प्रांताधिकारी सुनिल गाढे, तहसिलदार रमेश पाटील, गटविकास अधिकारी मीना साळुंखे,बशीर खोंदू,गणेश भिसे,दत्ता अवघडे यांचे सह शेतकरी,कार्यकर्ते यांची प्रमुख उपस्थिती होती. 

          याप्रसंगी बोलताना ते पुढे म्हणाले की,  अतिवृष्टीमुळे पाटण तालुक्यात जिवीत, वित्तहानीसह शेतजमिनींते भयंकर नुकसान झाले.नुकसान झालेल्या शेत जमिनींचे दुरुस्तीचे कामाकरीता निधी मंजूर होण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री ना.उध्दवजी ठाकरे  यांच्याकडे पाठपुरवठा करुन तालुक्याला भरघोस निधी उपलब्ध करुन घेतला. शेतजमिनींच्या दुरुस्तींच्या कामासह पिंकाचे झालेल्या नुकसानीचीही भरपाई देऊन तालुक्यातील सर्व सामान्य जनतेला न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. माहे जुलै महिन्यामध्ये पाटण तालुक्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे, भूस्खलन व पूरस्थितीमध्ये तालुक्यात फार नुकसान झाले.अतिवृष्टीमध्ये पुराच्या पाण्यामुळे अनेक गावांचे रस्ते,पूल वाहून गेल्याने संपर्क तुटला होता,तर पुराच्या पाणी शेतामध्ये जाऊन शेतजमीनी पुर्णपणे उखडून गेल्या,तर काही ठिकाणी जमिनीमध्ये मोठया प्रमाणांत दगड गोटे आल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेत जमिनींचे मोठया प्रमाणांत नुकसान झाले.आपला तालुका हा वेग वेगळया खोऱ्यांमध्ये वसलेला आहे. शेतकऱ्यांचे झालेले नुकसानीमुळे राज्य शासनाकडून शेतकऱ्यांना मदत देणे क्रमप्राप्त होते.त्यानुसार आज आपण शेतक-यांच्या शेतजमिनी सपाटीकरणाचा शुभारंभ करत आहोत. अतिवृष्टीमुळे तालुक्यातील पाण्याचे नैसर्गिक स्रोत मुजले आहेत.  ते नैसर्गिक स्रोत खुले करणं गरजेचे आहे. अडचणीच्या काळात बाधित शेतकऱ्यांना मदत झाली पाहिजे ही राज्य शासनाची प्राथमिक भूमिका असून, शेत जमिनींचे दुरुस्तीचे कामाकरीता निधीची अडचण भासू देणार नाही. कृषी व महसूल  विभागाने चांगले काम करुन शेत जमिनींची कामे चांगल्या पध्दतीने करावीत.कोणत्याही गोष्टीची हयगय करु नये. माहे मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्या पर्यंत शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनींची दुरुस्ती करुन देण्याची जबाबदारी कृषी विभागाची आहे. दोन वर्षांचा कालावधी कोविडमध्ये गेला. सध्या सर्व परिस्थिती पुर्वपदावर येत असून विकास कामांना निधी उपलब्ध होत आहे. अतिवृष्टीमुळे पाटण तालुक्यातील 119 गावातील 275 हेक्टर शेत जमिनींचे नुकसान झाले असून उपलब्ध झालेल्या जेसीबी मशीनला शासनामार्फत इंधन पुरवठा करुन हि शेत जमीनींची दुरुस्तीची कामे होणार असल्याचे त्यांनी शेवटी म्हंटले आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रांताधिकारी सुनिल गाढे यांनी करताना शेतकऱ्यांचे न भरुन येणारे नुकसान झालेले आहे. नाले व नद्यांचे प्रवाह बदलले आहेत.अतिवृष्टी पावसाळा सुरू होण्या अगोदर आम्ही ही काम पार पाडणार आहोत अशी ग्वाही दिली.  कार्यक्रमाचे आभार मा. जि. प. स बशीर खोंदू यांनी मानले. यावेळी मंडल अधिकारी सोनवणे, डी एन निकाळजे, जे जे शिंदे, महसूल चे अधिकारी व कर्मचारी वर्ग, पंचायत समितीचे कर्मचारी व अधिकारी वर्ग तसेच मोरणा भागातील कार्यकर्ते उपस्थित होते. 

चौकट: विकास कामांचे श्रेय घेण्याचा प्रयत्न करुन नये

              तालुक्यातील विकास कामांबाबत बोलत असताना काही लोक म्हणतात विकास काम आम्ही करतो,अतिवृष्टीच्या निधीमध्ये श्रेय घेण्याचा केविलवाणा प्रयत्न काही लोक करत आहेत.त्यांनी नेमका निधी कुठून कसा आणला ते तपासावे. निधी कसा आणला जातो त्याची मंजूरी कशी घेतात हे पहिलं बघा उगाचं फुकटाच श्रेय घेऊ नका, काही लोकांना आमचा विकास दिसत नाही.  झोपलेल्या लोकांना विकास कसा दिसणार हा ही प्रश्न आहे. या गोष्टींकडे दुर्लक्ष करुन सर्व सामान्य जनतेसाठी आपण काम करत आहोत. नको त्या गोष्टीसाठी वेळ वाया घालवण्यापेक्षा विकास कामे केलेली केव्हाही चांगली.असा टोला ना. शंभूराजे देसाई यांनी लगावला.

No comments:

Post a Comment