Friday 8 April 2022

गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे प्रयत्नातून अल्पसंख्यांक विभागांतर्गत 01 कोटी 20 लाखाचा निधी मंजूर. पाटण तालुक्यातील मुस्लिमवस्तींमधील विविध विकास कामे लागणार मार्गी.

 


 

दौलतनगर दि.08 (जनसंपर्क कक्ष,राज्यमंत्री कार्यालय):- पाटण तालुक्यातील मुस्लिमवस्तीमध्ये आवश्यक असणाऱ्या विकास कामांना महाराष्ट्र शासनाच्या अल्पसंख्यांक विकास विभागाकडून तातडीने निधी मंजूर होणेकरीता महाराष्ट्र राज्याचे गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी अल्पसंख्यांक विकास विभागाकडे विविध विकास कामांची शिफारस करुन सातत्याने पाठपुरावा केला होता.गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी केलेल्या शिफारशीनुसार पाटण तालुक्यातील मुस्लिमवस्ती अंतर्गत असणाऱ्या विकास कामांना सन 2021-22 या आर्थिक वर्षामध्ये रुपये 01 कोटी 20 लाख रुपयांचा निधी मंजूर केला असल्याचा शासन निर्णय राज्य शासनाच्या अल्पसंख्यांक विकास विभागाने दि. 31 मार्च 2022 रोजी पारीत केला असल्याची माहिती ना.शंभूराज देसाई यांचे कार्यालयाचे वतीने प्रसिध्दीपत्रकांत देण्यात आली आहे.

              प्रसिध्दीपत्रकांत पुढे म्हंटले आहे की, राज्यातील अल्पसंख्याक बहुल ग्रामीण क्षेत्रात मुलभूत व पायाभूत सुविधा उपलब्ध करुन देऊन ग्रामीण भागात वास्तव्यास आलेल्या अल्पसंख्यांक लेाकसमुहातील नागरिकांच्या जीवनमानाचा दर्जा उंचविण्यासाठी ग्रामीण क्षेत्र विकास कार्यक्रम राज्य शासनामार्फत कार्यान्वित करण्यात आला असून अल्पसंख्यांक समाज असलेल्या मुस्लिमवस्त्यांमधील विविध विकास कामांना राज्य शासनाच्या अल्पसंख्यांक विकास विभागाकडून मंजूरी देण्यात आली.यामध्ये पाटण तालुक्यातील मुस्लिमवस्तीमध्ये आवश्यक असणाऱ्या विकास कामांना महाराष्ट्र शासनाच्या अल्पसंख्यांक विकास विभागाकडून तातडीने निधी मंजूर होणेकरीता महाराष्ट्र राज्याचे गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी अल्पसंख्यांक विकास विभागाकडे शिफारस करण्यात आली होती. त्यानुसार पाटण तालुक्यातील मुस्लिमवस्ती अंतर्गत असणाऱ्या विकास कामांना सन 2021-22 या आर्थिक वर्षामध्ये रुपये 01 कोटी 20 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असून यामध्ये तारळे मुस्लिम दफनभूमी निवाराशेड संरक्षक भिंत 15 लाख,पवारवाडी कुठरे मुस्लिम समाज कब्रस्तानला संरक्षक भिंत 15 लाख,घाटमाथा ढाणकल मुस्लिमवस्ती कब्रस्तानास संरक्षक भिंत 15 लाख,कुंभारगाव मुस्लिम कब्रस्तानला संरक्षक भिंत 15 लाख,नुने मुस्लिमवस्ती अंतर्गत रस्ता सुधारणा 20 लाख,चाफळ मुस्लिमवस्ती अंतर्गत रस्ता सुधारणा 20 लाख,पेठशिवापूर येथे शादीखाना इमारत बांधकाम 20 लाख या विकास कामांचा समावेश असून लवकरच या विकास कामांची निविदा प्रक्रिया करण्यात येणार असून या कामांना तातडीने सुरुवात करण्यात यावी अशा सूचना गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी अधिकाऱ्यांना दिल्या असल्याची माहिती शेवटी  प्रसिध्दीपत्रकांत देण्यात आली आहे.

No comments:

Post a Comment