Monday 25 April 2022

गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे प्रयत्नातून जलजिवन मिशन योजनेतून 28 योजनांना 14.89 कोटींचा निधी. जलजिवन मिशन योजनेतून विविध गावांतील नळ पाणी पुरवठा योजनांची कामे लागणार मार्गी.

 


दौलतनगर दि.25(जनसंपर्क कक्ष,राज्यमंत्री कार्यालय):- पाटण तालुक्यातील डोंगरी व दुर्गम भागातील विविध गावांसाठी अस्तित्वात असलेल्या नळ पाणी  पाणी पुरवठा जीर्ण व कालबाह्य झाल्या असल्याने या नळ पाणी पुरवठा योजनांची कामे पुन्हा नव्याने करण्यात येऊन जलजिवन मिशन योजनेअंतर्गत राज्य शासनाचे नियमानुसार घरोघरी नळ जोडणी या योजनेअंतर्गत पाटण तालुक्यातील नादुरुस्त झालेल्या नळ पाणी पुरवठा योजनांच्या कामांना आवश्यक निधी मंजूर होण्याकरीता राज्याचे पाणी पुरवठा मंत्री ना.गुलाबराव पाटील यांचेकडे शिफारस करण्यात आली होती.त्यानुसार पाटण तालुक्यातील 28 नळ पाणी पुरवठा योजनांचे कामांना 14 कोटी 89 लक्ष रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असल्याची माहिती गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे कार्यालयाचेवतीने प्रसिध्दीपत्रकांत देण्यात आली आहे.

              प्रसिध्दीस देण्यात आलेल्या पत्रकांत पुढे म्हंटले आहे की, पाटण तालुक्यात माहे जुलै महिन्यामध्ये मोठया प्रमाणांत अतिवृष्टी होऊन डोंगरी व दुर्गम भागात वसलेल्या अनेक गावांतील नळ पाणी पुरवठा योजनांचे मोठया प्रमाणांत नुकसान झाले होते. तसेच काही गावातील नळ पाणी पुरवठा योजना हया जीर्ण व कालबाहय झाल्या असल्याने या गावांना कमी दाबाने पाणी पुरवठा होऊन गावांमध्ये तीव्र पाणी टंचाई जाणवत होती. पिण्याच्या पाण्याची होणारी गैरसोय लक्षात घेऊन या नादुरुस्त झालेल्या नळ पाणी पुरवठा योजनांचे कामांना आवश्यक निधी मंजूर करण्यासंदर्भात संबंधित गावातील ग्रामस्थांनी गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई यांचेकडे निवेदनाव्दारे मागणी केली होती. त्यानुसार गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी पाटण तालुक्यातील नळ पाणी पुरवठा योजनांना राज्य शासनाचे जलजिवन मिशन योजनेअंतर्गत निधी मंजूर होण्याकरीता राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री ना.गुलाबराव पाटील यांचेकडे केलेल्या शिफारसीनुसार पाटण 28 नळ पाणी पुरवठा योजनांचे कामांना 14 कोटी 89 लक्ष रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असल्याचे नमूद करत मंजूर नळ पाणी पुरवठा योजनांचे कामांमध्ये जानुगडेवाडी 27.92 लक्ष,आंबेघर तर्फ मरळी 27.17 लक्ष, चाफळ 163.26 लक्ष, शिंदेवाडी 22.44 लक्ष, चौगुलेवाडी मुठ्ठलवाडी 90.64 लक्ष, ढाणकल 29.24 लक्ष, गाडखोप 21.56 लक्ष, नाव 18.47 लक्ष, मालोशी 39.92 लक्ष, बांधवाट 19.83 लक्ष, डांगीष्टेवाडी 19.26 लक्ष, बोपोली 29.80 लक्ष, शिवंदेश्वर 22.84 लक्ष, बनपूरी 197.52 लक्ष, मुरुड 42.41 लक्ष, काहिर 50.31 लक्ष, आटोली 106.21 लक्ष, पाडळोशी,तावरेवाडी व मसुगडेवाडी 43.05 लक्ष, गलमेवाडी 83.37 लक्ष, गव्हाणवाडी 67.39 लक्ष, सांगवड 40.43 लक्ष, सातर 42.82 लक्ष, लोटलेवाडी (काळगाव) 22.01 लक्ष, रुवले 55.78 लक्ष, गोषटवाडी 40.82 लक्ष, घाटमाथा ढाणकल 17.29 लक्ष, बोडकेवाडी 35.23 लक्ष, ऊरुल 51.40 लक्ष, आंब्रुळे 35.76 लक्ष, निवडे पुनर्वसन 24.88 लक्ष या कामांचा समावेश होत आहे.जलजिवन मिशन योजनेअंतर्गत मंजूर करण्यात आलेल्या नळ पाणी पुरवठा योजनांची कामांची निविदा प्रक्रिया करण्यात येऊन या कामांना सुरुवात करण्याच्या सुचना गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी आढावा बैठकीमध्ये दिल्या असून लवकरच मंजूर असलेली नळ पाणी पुरवठा योजनांची कामे मार्गी लागणार असल्याने पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई भासणाऱ्या या गावांचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न कायमस्वरुपी सुटण्यास मदत होणार असल्याचे शेवटी पत्रकांत म्हंटले आहे.

चौकट:- राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेतील गावांचा जलजिवन मिशन योजनेअंतर्गत समावेश.

         गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे प्रयत्नातून पाटण तालुक्यातील पेठशिवापूर,गव्हाणवाडी,मस्करवाडी,उधवणे,जिंती, शितपवाडी,मुठ्ठलवाडी चौगुलेवाडी(का.) व कोळगेवाडी या गावांमध्ये राज्य शासनाच्या राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेअंतर्गत नळ पाणी  पुरवठा योजना मंजूर झाल्या होत्या. परंतु जलजीवन मिशन योजनेअंतर्गत घरो-घरी नळ जोडणीचे कामाचा समावेश असल्याने तसेच कामांचे अंदाजपत्रकांमध्ये वाढ झाल्याने जादा निधी आवश्यकता लक्षात घेऊन राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेतून मंजूर कामे रद्द करुन या योजनांचा समावेश हा जलजिवन मिशन योजनेअंतर्गत  करुन नव्याने मंजूरी देण्याचे प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना ना.शंभूराज देसाई यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी व ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे अधिकारी यांना बैठकीत केल्या होत्या. त्यानुसार पाटण तालुक्यातील राष्ट्रीय पेयजल योजनेतील कामांचा नव्याने जलजिवन मिशन योजनेअंतर्गत समावेश करण्यात आला आहे.

No comments:

Post a Comment