Sunday 17 April 2022

दि.१९ रोजी पाटण तालुक्यात लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे कार्यावरील चित्ररथ व गौरवयात्रा निघणार. गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांचे शुभहस्ते होणार गौरव यात्रेचा शुभारंभ.

 

दौलतनगर दि.16 (जनसंपर्क कक्ष,राज्यमंत्री कार्यालय):- महाराष्ट्राचे पोलादी पुरुष लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या ३9 व्या पुण्यतिथी सोहळयानिमित्त लोकनेते बाळासाहेब देसाईसाहेब यांचे जीवनचरीत्राची तसेच कार्याची विविधांगी माहिती देणारे व लोकनेते साहेब यांचे स्वप्नातील तालुका या संबंधीचे चित्ररथ व गौरव यात्रेची मिरवणूक पाटण तालुक्यात काढण्यात येणार आहे.लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे कार्यावरील चित्ररथ व गौरव यात्रेचा शुभारंभ महाराष्ट्र राज्याचे गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे शुभहस्ते व मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रविराज देसाई व युवा नेते मा.यशराज देसाई यांचे प्रमुख उपस्थितीमध्ये मंगळवार दि.19 एप्रिल 2022 रोजी सकाळी 08.00 वा. दौलतनगर,ता.पाटण येथे होणार असल्याची माहिती लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी उद्योग व शिक्षण समुहाच्यावतीने पत्रकाव्दारे दिली आहे.

सन २०१० या लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त पाटण तालुक्यात प्रथमच भव्य स्वरुपात तीन दिवसीय श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळयाचे आयोजन करण्यात आले होते. सन २०१० पासून प्रतिवर्षी हा पारायण सोहळा आयोजीत करण्यात येतो.दरम्यान गत दोन वर्षामध्ये कोविड 19 चे प्रादुर्भावामुळे राज्य  शासनाने घातलेल्या निर्बंधामुळे शासनाचे नियमाचे पालन करुन प्रातिनिधीक स्वरुपात पारायण  सोहळयाचे आयोजन करण्यात आले होते.परंतु सध्या सर्व निर्बंध शिथिल केले असल्याने यंदाच्या वर्षी दि.२३ एप्रिल,२०२२ रोजी लोकनेते बाळासाहेब देसाईसाहेब यांच्या ३9 व्या पुण्यतिथी सोहळयाच्या निमित्ताने दि.२० ते २३ एप्रिल,२०२२ पर्यंत तीन दिवसीय श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी सामुदायिक पारायण सोहळयाचे आयोजन करण्यात आले आहे. हा पारायण सोहळा कारखाना कार्यस्थळावर साजरा होत असताना मंगळवार दि.9 एप्रिल रोजी सकाळी ०8.०० वा.लोकनेते बाळासाहेब देसाई संहकारी उद्योग व शिक्षण समुहात कार्यान्वित असणाऱ्या विविध संस्थांचे वतीने तसेच शासकीय विभागांकडून लोकनेते बाळासाहेब देसाई यांनी राज्य शासनाच्या विविध खात्यांचे कर्तबगार मंत्री आणि महाराष्ट्राचे पोलादी पुरुष म्हणून केलेल्या अतुलनीय कार्याचे व त्यांच्या जीवनचरित्रावरील काही महत्वाच्या घटनांचे दर्शन घडविणारे तसेच लोकनेते साहेब यांचे स्वप्नातील तालुका या संबंधित पाटण तालुक्यामध्ये गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे प्रयत्नातून साकारणाऱ्या विविध विकास कामांचे,राज्य शासनाच्या विविध योजनांची माहिती असलेले  चित्ररथ व गौरव यात्रेचे नियोजन करण्यात आले आहे. या चित्ररथाचे व गौरव यात्रेचा प्रारंभ हा कारखाना कार्यस्थळावरील लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे पुर्णाकृती पुतळयापासून करण्यात येणार असून लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे कार्यावरील चित्ररथ व गौरव यात्रेचा शुभारंभ महाराष्ट्र राज्याचे गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे शुभहस्ते व मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रविराज देसाई व युवा नेते मा.यशराज देसाई यांचे प्रमुख उपस्थितीमध्ये मंगळवार दि.19 एप्रिल 2022 रोजी सकाळी 08.00 वा. दौलतनगर,ता.पाटण येथे होणार आहे. दरम्यान  हा चित्ररथ व गौरव यात्रा चोपदारवाडी, गव्हाणवाडी, सुर्यवंशीवाडी, पापर्डे, मारुलहवेली फाटा,गारवडे बहुले फाटा, सोनाईचीवाडी, नावडी वसाहत,निसरे,निसरे विहिर,निसरे फाटा, आबदारवाडी,गिरेवाडी, मल्हारपेठ, नारळवाडी,येराडवाडी,नवसरी, नाडे नवारस्ता, आडूळ गावठाण, आडूळपेठ, सुभाषनगर, लुगडेवाडी सोनगाव,येरफळे,म्हावशी स्टॉप,पाटण पर्यंत अशी चित्ररथ व गौरव यात्रेची मिरवणूक काढण्यात येणार असून पाटण येथील लोकनेते बाळासाहेब देसाई भवन पंचायत समिती पाटणचे प्रांगणामध्ये या चित्ररथ व गौरव यात्रेची सांगता होणार आहे.दरम्यान प्रतिवर्षी या गौरवयात्रा हि नेरळे,मोरगिरी,नाटोशी,वाडीकोतावडे,कुसरुंड,सुळेवाडी,सोनवडे मार्गे दौलतनगर,ता.पाटण येथे सांगता होत असते.परंतु सध्या राज्यामध्ये असलेल्या उष्णतेची तीव्रता लक्षात घेऊन या चित्ररथ व गौरव यांत्रेची सांगता ही पाटण येथे होणार असून लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे ३9 व्या पुण्यतिथीनिमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या लोकनेते बाळासाहेब देसाईसाहेब यांचे जीवनचरीत्राची तसेच कार्याची विविधांगी माहिती देणारे व लोकनेते साहेब यांचे स्वप्नातील तालुका या संबंधीचे चित्ररथ व गौरवयात्रेचा तालुक्यातील भाविक भक्तांनी लाभ घ्यावा व या चित्ररथ गौरवयात्रेमध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन ही पत्रकांत करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment