दौलतनगर दि.13 (जनसंपर्क कक्ष,राज्यमंत्री कार्यालय):- माहे जुलै महिन्यामध्ये पाटण मतदारसंघामध्ये झालेल्या
अतिवृष्टीमुळे डोंगरी,दुर्गम भागातील गावांना जोडणारे रस्ते व साकव पूलांचे मोठया
प्रमाणांत नुकसान झाले. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेले रस्ते व
साकव पूलांच्या नुकसानीमुळे गावांचा दळण-वळणाचा मोठा गंभीर प्रश्न निर्माण झाला
होता. नुकसानग्रस्त रस्ते व साकव पूलांचे पुनर्बांधणीकरीता भरीव
निधी मंजूर होणेकरीता गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी एकूण 50 कोटी
रुपयांचा प्रस्ताव राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाकडे सादर करण्यात केला होता. त्यानुसार
पहिल्या टप्प्यामध्ये ग्रामीण मार्ग व साकव पूल यांचे दुरुस्तीसाठी या आर्थिक
वर्षासाठी 3054 रस्ते व पूल परिक्षण कार्यक्रम अंतर्गत गट ब व गट क या
योजनेअंतर्गत 30 कोटी रुपयांचा निधी दि.
07 मार्च 2022 रोजी मंजूर करण्यात
आला होता. तर उर्वरित 20 कोटी रुपयांच्या प्रस्तावाला दि. 08 एप्रिल 2022 चे ग्रामविकास विभागाने पारित केलेल्या शासन
निर्णयाने मंजूरी देण्यात आली असल्याची
माहिती गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे कार्यालयाचेवतीने प्रसिध्दीपत्रकांत
देण्यात आली आहे.
पाटण तालुक्यामध्ये
नुकसानग्रस्त
रस्ते व साकव पूलांचे पुनर्बांधणीकरीता गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे विशेष प्रयत्नामुळे
पहिल्या टप्प्यामध्ये मंजुर झालेल्या 30 कोटी रुपयांच्या निधीमध्ये 106 कामांचा
समावेश होता. तर उर्वरीत 20 कोटींच्या निधीची 68 कामे ग्रामीण विकास
विभागाकडे प्रस्तावित करण्यात आलेल्या कामांनाही मंजूरी देण्यात आली होती. मंजूर कामांमध्ये पाळशी ते भालेकरवाडी ते वाल्मिकी रस्ता
ग्रामा 278 सुधारणा 80 लाख, दिवशी खुर्द येथे धारेश्वर खालच्या मठाकडील रस्ता
ग्रामा 67 सुधारणा 20 लाख,कुसवडे झाकडे येथे रस्ता ग्रामा 187 सुधारणा 15 लाख,लेंढोरी
पोहोच रस्ता ग्रामा 185 रस्ता सुधारणा 10 लाख,पाठवडे गावपोहोच रस्ता ग्रामा 115
सुधारणा 20 लाख,टोळेवाडी रस्ता ग्रामा 114 रस्ता सुधारणा 50 लाख,कवडेवाडी रस्ता
ग्रामा 101 सुधारणा 15 लाख,धजगाव जंगमवाडी(धजगावं) रस्ता ग्रामा 380डांबरीकरण 15
लाख, पायथ्याचावाडा गोषटवाडी पोहोच रस्ता ग्रामा 165 सुधारणा 25 लाख,चाफेर ते
तळीये पश्चिम पोहोच रस्ता ग्रामा 198 सुधारणा 15 लाख,गारवडे हरीजन वस्ती ग्रामा
277 रस्ता सुधारणा 15 लाख,दुटाळवाडी नुने ग्रामा 33 रस्ता सुधारणा 10 लाख,सणबूर
विठ्ठलवाडी संरक्षक भिंतीसह रस्ता ग्रामा 305 सुधारणा 20 लाख,वायचळवाडी रस्ता
ग्रामा 338 येथे पोहोच रस्ता सुधारणा व संरक्षक भिंत 15 लाख,माजगाव सनगरवाडी रस्ता
ग्रामा 135 सुधारणा 50 लाख,चोपदारवाडी जोड रस्ता ग्रामा 247 खडीकरण,डांबरीकरण 25
लाख,खोणोली कोचरेवाडी पोहोच रस्ता ग्रामा 121
सुधारणा 30 लाख,जोतीबाचीवाडी ग्रामा 174 रस्ता सुधारणा 20 लाख,धारेश्वर
दिवशी फुरसाई ग्रामा 71 रस्ता सुधारणा 30
लाख,डेरवण भैरेवाडी ग्रामा 129 रस्ता सुधारणा 20 लाख,कोरीवळे टेळेवाडी भवानी मंदिर
ते जि.प.शाळा पोहोच रस्ता ग्रामा 272 सुधारणा 20 लाख,वाटोळे नहिंबे जोडरस्ता रस्ता
खडी. डांबरीकरण ग्रामा 89 20 लाख,मालदन हरीजन वस्ती ग्रामा 316 सुधारणा 15 लाख,काळगाव
ते डाकेवाडी मळयाचीवाडी रस्ता ग्रामा 354 सुधारणा 20 लाख,सवारवाडी बेंदवाडी ते
कडवे बुद्रुक ग्रामा 07 घाट रस्ता सुधारणा 15 लाख,काळगाव मस्करवाडी जोशेवाडी पोहोच
रस्ता ग्रामा 361 खडीकरण,डांबरीकरण 15 लाख,मालदन वरचे आवाड रस्ता ग्रामा 294
खडीकरण,डांबरीकरण 25 लाख, इजिमा 135 भाग मोरगिरी ते मोरेवाडी रस्ता सुधारणा 40
लाख,प्रजिमा 29 काठी टेक ते आवसरी काठी स्मशानभूमी पोहोच रस्ता ग्रामा 55 सुधारणा
20 लाख, साईकडे जोडरस्ता ग्रामा 324 सुधारणा 30 लाख,दुसाळे ते सडा दुसाळे रस्ता
ग्रामा 43 भाग सडादुसाळे पोहोच रस्ता सुधारणा 35 लाख,पाणेरी जोडरस्ता सुधारणा करणे
ग्रामा 279 25 लाख,प्रजिमा 29 ते रामेल फाटा ते जांभूळबन रस्ता ग्रामा 52 सुधारणा
40 लाख,दास्तान रस्ता सुधारणा करणे ग्रामा 163 20 लाख,बोर्गेवाडी मेंढोशी श्री
माऊली मंदिर ते सडावाघापूर रस्ता ग्रामा 80 सुधारणा 25 लाख,जंगलवाडी (जाधववाडी
चाफळ) पोहोच रस्ता ग्रामा 127 सुधारणा 30 लाख,निनाई देवी मंदिर नाडे,ता.पाटण
रस्ता सुधारणा ग्रामा 254 25 लाख,प्रजिमा 57 ते वेंखडवाडी अंतर्गत रस्ता ग्रामा 48
सुधारणा 35 लाख,रामिष्टेवाडी ते काळगाव रस्ता ग्रामा 383 सुधारणा 25 लाख,महाबळवाडी
ते सडादाढोली ग्रामा 376 रस्ता सुधारणा 15 लाख,करपेवाडी तेटमेवाडी ग्रामा 365
रस्ता सुधारणा 15 लाख, मस्करवाडी नं.2 सुधारणा 15 लाख,मरळोशी बांबवडे ढोरोशी रस्ता
ग्रामा 20 भाग बांबवडे येथील ओढयाशेजारी संरक्षक भिंत 20 लाख,खळे ते काजारवाडी
ग्रामा 322 रस्ता सुधारणा 10 लाख,शिंगणवाडी जोडरस्ता ग्रामा 373 वर संरक्षक भिंत
10 लाख,निवी सतीचीवाडी मस्करवाडी ग्रामा 313 रस्ता
खडीकरण डांबरीकरण 20 लाख,पवारवाडी ते
प्रजिमा 54 रस्ता ग्रामा 335 सुधारणा 10 लाख,रोमनवाडी येराड जोडरस्ता
ग्रामा 175 भाग हुंबरपेढा ते ढेरुगडेवाडी रस्ता सुधारणा 40 लाख,सांगवड ते पापर्डे
रस्ता सुधारणा 50 लाख,दिक्षी आटोली ग्रामा 208 रस्त्यावर कोकणेवस्ती येथे
रस्त्याचा भराव,संरक्षक भिंत व रस्ता सुधारणा 90 लाख,महिंद येथे ग्रामा 286 शेडगे
व साळूंखेवस्ती मुख्य रस्त्यावर साकव व संरक्षक भिंत 40 लाख,मठवाडी (महिंद) येथे
साकव पूलासह रस्ता ग्रामा 285 सुधारणा 35 लाख,धामणी (डागेचीआळी) श्रीरामनगर मुख्य
रस्ता ग्रामा 352 ओढयावर साकव पूल 30 लाख,वाल्मिकी फाटा ते कारळे रस्त्यावर साकवसह
ग्रामा 299रस्ता सुधारणा 35 लाख,काळगाव ते मस्करवाडी ग्रामा 361रस्त्यावरील गावझरा
येथे साकव 35 लाख,जांभूळवाडी चिखलेवाडी माटेकरवाडी ग्रामा 342 रस्त्यावर नाईकबा
मंदिर ओढयावर साकव 35 लाख,जुंगठी येथे विहिर व स्मशानभूमी जवळील रस्त्यावर ग्रामा
72 ओढयावर साकव 35 लाख,धारेश्वर हायस्कूल
खिवशी येथे ग्रामा 74 वर केरा नदीवर साकव पूल 40 लाख,तावरेवाडी ग्रामा 119
रस्त्यावरील ओढयावर स्लॅब ड्रेन व रस्ता सुधारणा 40 लाख,सणबूर रुवले तामिणे
वाल्मिकी रस्ता ग्रामा 281 वर कोलदकाटा कुरु येथील ओढयावर साकव 40 लाख,देवघर नाव
गोवारे रस्ता गवळीनगर येथील ओढयावर साकव बांधणे ग्रामा 193 40 लाख,चाफेर हरीजन
वस्ती ओढयावर साकव पूल व रस्ता ग्रामा 197 सुधारणा 35 लाख,नाटोशी कदमवाडी ग्रामा
231 जोतिबा मंदिराशेजारील ओढयावर साकव पूल 35 लाख,चिखलेवाडी माटेकरवाडी रस्ता
ग्रामा 330 भाग शेंडेवाडी पवारवस्ती येथे साकव 30 लाख,इजिमा 142 ते जगदाळवाडी कडवे
खुर्द ता.पाटण ओढयावरील रस्त्यावर साकव 30 लाख,गोठणे पोहोच रस्ता साकव व
ग्रामा 206 सुधारणा 40 लाख, गोकूळ तर्फ
पाटण ते आंबेघर मधील रस्त्यावरील तीन साकव पूलांचे बांधकाम व रस्ता सुधारणा 120
लाख,कुसरुंड येथील शिंदेवाडी व पाटीलवस्ती रस्ता ग्रामा 229 साकव 30 लाख या कामांचा समावेश आहे.अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या रस्ते
व साकव पूलांचे पुनर्बांधणीकरीता मंजूर झालेल्या कामांच्या कमी
कालावधीमध्ये निविदा प्रक्रिया पूर्ण करुन हि कामे पावसाळयापूर्वी पूर्ण करण्यात
यावीत अशा सूचना गृहराज्यमंत्री ना.शंभूराज
देसाई यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
No comments:
Post a Comment