Tuesday 31 October 2023

लोकनेते बाळासाहेब देसाई सह.साखर कारखान्याचा नामदार शंभूराज देसाई व 14 ज्येष्ठ सभासदांच्या हस्ते शुक्रवार दि.03 नोव्हेंबर रोजी पन्नासाव्या गळीत हंगामाचा शुभारंभ - पांडूरंग नलवडे व्हा.चेअरमन

 

 दौलतनगर दि.31:- दौलतनगर, ता.पाटण येथील लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचा सन २०२3-२4 मधील 50 व्या गळीत हंगामाचा शुभारंभ समारंभ शुक्रवार दि.03 नोव्हेंबर,२०२3 रोजी दुपारी 12.30 वा. लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी उद्योग व शिक्षण समुहाचे मार्गदर्शक, महाराष्ट्र राज्याचे राज्य उत्पादन शुल्क मंत्री तथा सातारा व ठाणे जिल्हयाचे पालकमंत्री नामदार शंभूराज देसाई व त्यांच्या सुविद्य पत्नी मा.सौ. स्मितादेवी शंभूराज देसाई, कारखान्याचे चेअरमन मा.यशराज देसाई(दादा), मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा.श्री.रविराज देसाई(दादा) यांचे प्रमुख उपस्थितीत व कारखान्याचे ज्येष्ठ १4 सभासद यांचे शुभहस्ते कारखाना कार्यस्थळ,दौलतनगर,ता.पाटण येथे संपन्न होणार असल्याची माहिती कारखान्याचे व्हा.चेअरमन पांडूरंग नलवडे यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे दिली आहे.

                 पत्रकात म्हंटले आहे की, चालु गळीत हंगामाची पुर्वतयारी पुर्ण झाली असून गाळप हंगाम पुर्ण क्षमतेने होण्याच्या दृष्टीने कारखान्यातील सर्व कामकाज पुर्णत्वाकडे गेले आहे. कारखान्याने ऊस तोडणी व वाहतूकीकरीता पुरेसे तोडणी मजुर व वाहनांचे करार पुर्ण केलेले असून कारखान्याकडे करार केलेली सर्व ऊस तोडणी व वाहतूक तोडणी मजुर यंत्रणा कारखाना कार्यक्षेत्रात दाखल होण्यास सुरुवात झाली आहे.यंदाचाही गळीत हंगाम कारखान्याचे सभासद,ऊस उत्पादक शेतकरी यांचे सहकार्यातून यशस्वी होईल असा विश्वास व्यक्त करीत या गळीत हंगामाचा शुभारंभ हा प्रतिवर्षाप्रमाणे कारखान्याचे ज्येष्ठ १4 सभासद श्री.बाळाराम पाटलू निकम बाचोली,श्री.जगन्नाथ परशराम चव्हाण कुंभारगाव,श्री.सतिश रामचंद्र पवार शिंगणवाडी, श्री.विनायक गणपती चव्हाण नारळवाडी,श्री.सुरेश चंद्रु संकपाळ विहे,श्री.आनंदराव हणमंत जाधव मारुलहवेली,श्री.रामचंद्र गणपती पानस्कर मल्हारपेठ,श्री.दिलीप कुंडलिक साळूंखे येराड,श्री.विनायक आण्णा जामदार नावडी,श्री.सुभाष दाजीराम देशमुख तारळे,श्री.संपतराव दिनकर पानस्कर बहुले,श्री.शंकर रामचंद्र देसाई ऊरुल,श्री.सखाराम ज्ञानू मुगदूम येरफळे व श्री.दत्तात्रय विठ्ठल पवार नाडे या १4 ज्येष्ठ सभासदांचे शुभहस्ते व लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी उद्योग व शिक्षण समुहाचे मार्गदर्शक, महाराष्ट्र राज्याचे राज्य उत्पादन शुल्क मंत्री तथा सातारा व ठाणे जिल्हयाचे पालकमंत्री नामदार शंभूराज देसाई व त्यांच्या सुविद्य पत्नी मा.सौ.स्मितादेवी शंभूराज देसाई, कारखान्याचे चेअरमन मा.यशराज देसाई(दादा) व मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा.श्री. रविराज देसाई (दादा) यांचे प्रमुख उपस्थितीत शुक्रवार दि.03 नोव्हेंबर,२०२3 रोजी दुपारी 12.30 वा. संपन्न होणार असून या गळीत हंगाम शुभारंभानिमित्त कारखान्याचे संचालक प्रशांत राजाराम पाटील व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. राधिका प्रशांत पाटील यांचे शुभहस्ते सत्यनारायण महापुजा आयोजीत केलेली आहे. तरी या समारंभास कारखान्याचे सर्व सभासद,ऊस उत्पादक शेतकरी, पदाधिकारी, कार्यकर्ते, हितचिंतक यांनी बहुसंख्येने उपस्थित रहावे, असे आवाहनही व्हा.चेअरमन पांडूरंग नलवडे यांनी शेवटी पत्रकात केले आहे.


Monday 30 October 2023

शिवशंभू दूध संघाच्या 'डेरिस्टा' ब्रँडच्या दुग्धजन्य पदार्थांच्या उत्पादनाचा शुभारंभ मा. यशराजदादा देसाई साहेबांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न



सोमवार, ३० ऑक्टोबर २०२३


आज शिवशंभू सहकारी दूध उत्पादक व प्रक्रिया संघ लि., दौलतनगर संघाने 'डेरिस्टा' (Dairista) या ब्रँडद्वारे दुग्धजन्य उपपदार्थांच्या उत्पादनास शुभारंभ केला. हा शुभारंभ कार्यक्रम लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन व दौलत उद्योग समूहाचे मार्गदर्शक मा. यशराजदादा देसाई साहेबांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. 


यावेळी मा. यशराजदादा देसाई साहेबांनी उपस्थितांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, दूध शीतकरण यंत्रणेच्या यशस्वी वाटचालीनंतर शिवशंभू दूध संघ दुग्धजन्य पदार्थ निर्मितीमध्ये पाऊल टाकत आहे, याचा आनंद आहे. दुग्धजन्य पदार्थ निर्मितीची पारंपरिक पद्धत, अत्याधुनिक यंत्रणा व निर्भेळ दूध यांच्या संयोगाने भेसळमुक्त अशी दर्जेदार उत्पादने तयार करून दूध संघाने आपला वेगळा ठसा उमटविला आहे. शिवशंभू संघाची चविष्ट व पौष्टिक उत्पादने नक्कीच ग्राहकांच्या पसंतीस पडतील, असा विश्वास मा. यशराजदादा देसाई साहेबांनी यावेळी व्यक्त केला. 


शिवशंभू दूध संघाने सध्या श्रीखंड, आम्रखंड, पनीर, बासुंदी, कंदी पेढा, आंबा बर्फी, लस्सी, ताक, दही, तूप, कुल्फी, खवा यांसारख्या दुग्धजन्य पदार्थांचे उत्पादन सुरू केले आहे.


या कार्यक्रमास दूध संघाचे चेअरमन श्री. अधिकराव पाटील, व्हॉ. चेअरमन श्री. संजय शिर्के, व्यवस्थापकीय संचालक श्री. सूरज अगाणे यांच्यासह संचालक मंडळ, पदाधिकारी, कार्यकर्ते व कर्मचारी उपस्थित होते.

Thursday 26 October 2023

शेतकरी सभासदांच्या खात्यावर एफ.आर.पी. ची संपूर्ण रक्कम जमा तर कामगारांना ११ टक्के बोनस जाहिर. लोकनेते बाळासाहेब देसाई कारखानाच्या सभासद,कामगारांना चेअरमन यशराज देसाई यांच्याकडून दिवाळी भेट.

 

दौलतनगर दि.26-  लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी कारखाना हा सभासद शेतकऱ्यांच्या हितासाठीच सदैव प्रयत्नशील राहून गळीत हंगाम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करेल असा विश्वास व्यक्त करून कारखान्याच्या शेतकरी सभासदांच्या खात्यावर एफ.आर.पी. ची सर्व रक्कम अदा करून ही संस्था नावारूपाला आणण्यासाठी सभासद शेतकरी यांच्याबरोबर कर्मचारी वर्ग यांचा मोठा सहभाग आहे त्यासाठी यावर्षी देसाई कारखान्याच्या कर्मचाऱ्यांना ११ टक्के बोनस जाहीर करत असल्याची घोषणा लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन यशराज देसाई(दादा) यांनी केली.दरम्यान हा निर्णय देसाई कारखान्याच्या सभासद शेतकरी आणि कामगारांना खऱ्या अर्थाने ही दिवाळी भेट ठरली आहे.

         ते दौलतनगर,ता.पाटण याठिकाणी लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे ५० व्या गळीत हंगामाच्या बॉयलर अग्निप्रदिपन कार्यक्रमात ते बोलत होते. याप्रसंगी मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रविराज देसाई यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी कारखान्याचे संचालक मा.श्री.रामचंद्र बाबासो पाटील व त्यांच्या सुविद्य पत्नी मा. सौ. वत्सला रामचंद्र पाटील यांच्या शुभहस्ते सत्यनारायण महापूजा संपन्न झाली. यासमयी कारखान्याचे व्हा.चेअरमन पांडुरंग नलवडे,अशोकराव पाटील, ॲङडी.पी.जाधव,ॲङमिलिंद पाटील,जालंदर पाटील,बबनराव भिसे,सुनील पानस्कर,सर्जेराव जाधव,विकास गोसावी,सुनील पवार,बी.आर.पाटील,गोरख देसाई,प्रकाशराव जाधव,बशीर खेांदू,शशिकांत निकम,अधिक पाटील,राजाराम मोहिते,कार्यकारी संचालक सुहास देसाई तसेच कारखान्याचे सर्व संचालक,सभासद,ऊस उत्पादक शेतकरी,अधिकारी,कामगार वर्ग हितचिंतक, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

            चेअरमन यशराज देसाई(दादा) म्हणाले की,गेल्या पन्नास वर्षापासून देसाई कारखाना हा 1250 मेट्रिक टन क्षमतेमध्ये  गाळप करीत आहे. मात्र यावर्षीपासून सर्व शेतकरी सभासद यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच या जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय शंभूराज देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली 1250 मेट्रिक टनाचा हा कारखानातीन हजार मेट्रिक टन गाळप क्षमतेचा करण्यात आला आहे.राज्यात सध्या पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा कमी आहे त्यामुळे त्याचा परिणाम उसाच्या क्षेत्रावर होण्याची शक्यता आहे त्यामुळे आगामी गळीत हंगाम अडचणीचा ठरण्याची शक्यता आहे . सातारा जिल्ह्यात एकूण 15 सहकारी आणि खाजगी साखर कारखाने आहेत त्यामध्ये 1200 मे.टन क्षमतेचा लोकनेते बाळासाहेब देसाई हा एकमेव कारखाना आहे मात्र शेतकऱ्यांना दिला जाणाऱ्या दरात लोकनेते देसाई कारखान्याने जिल्ह्यातील इतर कारखान्याच्या बरोबरीत दर दिला आहे ही अभिमानाची बाब आहे असे स्पष्ट करून यशराज देसाई(दादा) पुढे म्हणाले कारखान्याच्या कार्यक्षेत्रात ऊस तोडणी कामगारांची टंचाई निर्माण होत असते या टंचाईवर मात करण्यासाठी आगामी गळीत हंगामात हार्वेस्टरच्या मार्फत ऊस तोडणी साठी प्रयत्न केला जाईल त्यामुळे शेतकऱ्यांच्या उसाची तोडणी वेळेत होईल आणि वेळेत ऊस गळीत होण्यास मदत होईल असे सांगून 17 कोटींची मदत राज्य शासनाने देसाई कारखान्याला तातडीने केली त्याबद्दलही राज्य शासनाचे आभार मानले.

     दरम्यान लोकनेते बाळासाहेब देसाई कारखान्याने  १०० टक्के एफआरपी रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली असून राज्यातीला सहकारी साखर उद्योग सध्या अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत चालला असून सहकारी साखर कारखाने शंभर टक्के शासनाच्या नियमाचे पालन करूनच  कारखाने चालवावे लागतात लोकनेते बाळासाहेब देसाई कारखान्याचे कार्यक्षेत्र पाहिल्यानंतर निम्माहून अधिक क्षेत्र हे डोंगरी भागात आहे. कोयना नदीकाठी अल्प प्रमाणात ऊसाचे कार्यक्षेत्र आहे. संपुर्ण पाटण तालुक्यातील ऊसाची लागवड पाहिली तर तीन ते साडेतीन लाख मे.टनाच्या वर जात नाही. ही वस्तूस्थिती असताना देखील आपले कारखान्याने कारखान्याच्या सभासंदाना व ऊस उत्पादक शेतक-यांना इतर मोठया कारखान्यांच्या बरोबरीने प्रतिवर्षी दर दिला आहे. मात्र जाणीवपूर्वेक बाहेरच्या काऱखान्याला ऊस घालणार्याची मानसिकता बदलली पाहिजे. बाहेर जाणार ऊस थांबवण्यासाठी संचालक मंडळाबरोबर सर्वानी प्रयत्न करणे गरजेचे आहे. तालुक्यातील शेतक-यांनी व सभासदांनी कार्यक्षेत्रातील ऊस बाहेरच्या कारखान्यांना न घालता नोंद केलेला संपुर्ण ऊस हा आपलेच लोकनेते बाळासाहेब देसाई साखर कारखान्यास गळीताकरीता देवून गळीत हंगाम य़शस्वी करण्यासाठी सर्व सभासदांनी प्रयत्न करावेत असे आवाहन चेअरमन यशराज देसाई(दादा) यांनी शेवटी  केले. 

Sunday 22 October 2023

पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे मार्गदर्शनाखाली दौलतनगर,ता.पाटण येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळा उभारणी तालुकास्तरीय समितीची बैठक संपन्न.

 


दौलतनगर दि.22-   हिंदूस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचे पुतळे मुंबईत गेट वे ऑफ इंडिया व छ. शिवाजी पार्क,शिवाजी विद्यापिठ कोल्हापूर येथे लोकनेते बाळासाहेब देसाई यांनी छत्रपती शिवरायांचे पुतळा उभारण्यात पुढाकार घेतला होता. आजही त्या तिन्ही ठिकाणी असणारे पुतळे नव्या पिढीबरोबरच देशी-परदेशी पर्यटकांना महाराजांच्या विचार व कार्याची आठवण करून देत असतात. लोकनेते बाळासाहेब देसाई यांनी दिलेला जनसेवेचा हा वारसा जपताना पाटण तालुक्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा कुठेही अश्वारुढ मोठा पुतळा नसल्याने पाटण तालुक्याची मध्यतर्वी बाजारपेठ असलेल्या नाडे-नवरस्ता येथील मुख्य चौकामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा भव्य अश्वारुढ  पुतळा उभारणी संदर्भात पालकमंत्री ना.शंभूराज देसाई व मोरणा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष रविराज देसाई यांचे प्रमुख मार्गदर्शनाखाली व अध्यक्ष मा.यशराज देसाई(दादा) यांचे उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराज पुतळा उभारणी तालुकास्तरीय समितीची बैठक संपन्न झाली.

               आज दौलतनगर,ता.पाटण येथे संपन्न झालेल्या या बैठकीला दूरदृश्य प्रणालीव्दारे समिती अध्यक्ष मा.यशराज देसाई(दादा),प्रमुख मार्गदर्शक मा.रविराज देसाई(दादा),उपाध्यक्ष विजय पवार,सचिव/खजिनदार माणिक पवार  व समिती सदस्य सुमोध  साळूंखे,विलास गोडांबे,मनोज मोहिते,जगदिशसिंह पाटणकर,शैलेंद्र शेलार,गणेश भिसे,बशीर खोंदू श्रीमती मुक्ताबाई माळी या समिती सदस्यांसह सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता रोकडे,कार्यकारी अभियंता संजय सोनवणे, उपविभागीय अधिकारी सुनील गाडे,तहसिलदार रमेश पाटील यांचेसह इतर शासकीय अधिकाऱ्यांची उपस्थिती  होती.

                  नाडे ता.पाटण येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारुढ पुतळा उभारण्यासाठी सातारा जिल्हयाचे पालकमंत्री ना.शंभूराज देसाई मार्गदर्शनाखाली लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन मा.यशराज देसाई(दादा) यांचे अध्यक्षतेखाली नुकतीच छत्रपती शिवाजी महाराज पुतळा  उभारणी तालुकास्तरीय समिती  गठीत करण्यात आली होती. या तालुकास्तरीय समितीची बैठक पालकमंत्री ना. शंभूराज देसाई यांचे प्रमुख मार्गदर्शनाखाली व सर्व समिती सदस्य यांचे उपस्थितीत आज दौलतनगर ता.पाटण येथे पार पडली. रयतेच्या  हिंदवी स्वराज्याचे संस्थापक  छत्रपती  शिवाजी   महाराजांचा गेट वे ऑफ इंडीया समोर असणाऱ्या अश्वारूढ  पुतळयाचीच प्रतिकृती आवश्यक असलेल्या शासकीय परवानग्या घेऊन सहा महिन्यांत उभारण्याचा निर्णय आज झालेल्या समितीच्या बैठकीत झाला.त्याचबरोबर पाटण विधानसभा मतदारसंघातील  छत्रपती शिवप्रेमींच्या मदतीने  पुतळा  उभारण्याचा विचार करुन शिवसेना भाजपा महायुती पाटण तालुका यांचेवतीने आज पहिल्या बैठकीतच छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारुढ पुतळा उभारण्यासाठी 11 लक्ष रुपयांचा निधी छत्रपती शिवाजी महाराज पुतळा उभारणी तालुकास्तरीय समितीकडे देण्याबाबतची  घोषणा राज्य उत्पादन शुल्कमंत्री तथा पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी बैठकीदम्यान केली.तसेच या पुतळा उभारणी तालुका स्तरीय समितीची धर्मादाय आयुक्त कार्यालयाकडे आवश्यक ती नोंदणी करुन या समितीचे बँक खाते शिवदौलत सहकारी बँक मल्हारपेठ या बँकेत उघडणार असून या बँकेतील खात्यावरुन समितीचा जमा-खर्च करण्याचे ठरविण्यात आले.  प्रामुख्याने नाडे  नवारस्ता येथे छत्रपती शिवाजी  महाराज यांचा अश्वारुढ पुतळा उभारणी चे काम तातडीने सुरु करण्यासंदर्भातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या महसलू विभागाच्या अधिकाऱ्यांनी आवश्यक त्या परवानग्या तातडीने घेण्याच्या  सुचना पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी या बैठकीमध्ये संबंधित अधिकाऱ्यांना केल्या.