सोमवार, ३० ऑक्टोबर २०२३
आज शिवशंभू सहकारी दूध उत्पादक व प्रक्रिया संघ लि., दौलतनगर संघाने 'डेरिस्टा' (Dairista) या ब्रँडद्वारे दुग्धजन्य उपपदार्थांच्या उत्पादनास शुभारंभ केला. हा शुभारंभ कार्यक्रम लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन व दौलत उद्योग समूहाचे मार्गदर्शक मा. यशराजदादा देसाई साहेबांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.
यावेळी मा. यशराजदादा देसाई साहेबांनी उपस्थितांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, दूध शीतकरण यंत्रणेच्या यशस्वी वाटचालीनंतर शिवशंभू दूध संघ दुग्धजन्य पदार्थ निर्मितीमध्ये पाऊल टाकत आहे, याचा आनंद आहे. दुग्धजन्य पदार्थ निर्मितीची पारंपरिक पद्धत, अत्याधुनिक यंत्रणा व निर्भेळ दूध यांच्या संयोगाने भेसळमुक्त अशी दर्जेदार उत्पादने तयार करून दूध संघाने आपला वेगळा ठसा उमटविला आहे. शिवशंभू संघाची चविष्ट व पौष्टिक उत्पादने नक्कीच ग्राहकांच्या पसंतीस पडतील, असा विश्वास मा. यशराजदादा देसाई साहेबांनी यावेळी व्यक्त केला.
शिवशंभू दूध संघाने सध्या श्रीखंड, आम्रखंड, पनीर, बासुंदी, कंदी पेढा, आंबा बर्फी, लस्सी, ताक, दही, तूप, कुल्फी, खवा यांसारख्या दुग्धजन्य पदार्थांचे उत्पादन सुरू केले आहे.
या कार्यक्रमास दूध संघाचे चेअरमन श्री. अधिकराव पाटील, व्हॉ. चेअरमन श्री. संजय शिर्के, व्यवस्थापकीय संचालक श्री. सूरज अगाणे यांच्यासह संचालक मंडळ, पदाधिकारी, कार्यकर्ते व कर्मचारी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment