Sunday 22 October 2023

पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे मार्गदर्शनाखाली दौलतनगर,ता.पाटण येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळा उभारणी तालुकास्तरीय समितीची बैठक संपन्न.

 


दौलतनगर दि.22-   हिंदूस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचे पुतळे मुंबईत गेट वे ऑफ इंडिया व छ. शिवाजी पार्क,शिवाजी विद्यापिठ कोल्हापूर येथे लोकनेते बाळासाहेब देसाई यांनी छत्रपती शिवरायांचे पुतळा उभारण्यात पुढाकार घेतला होता. आजही त्या तिन्ही ठिकाणी असणारे पुतळे नव्या पिढीबरोबरच देशी-परदेशी पर्यटकांना महाराजांच्या विचार व कार्याची आठवण करून देत असतात. लोकनेते बाळासाहेब देसाई यांनी दिलेला जनसेवेचा हा वारसा जपताना पाटण तालुक्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा कुठेही अश्वारुढ मोठा पुतळा नसल्याने पाटण तालुक्याची मध्यतर्वी बाजारपेठ असलेल्या नाडे-नवरस्ता येथील मुख्य चौकामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा भव्य अश्वारुढ  पुतळा उभारणी संदर्भात पालकमंत्री ना.शंभूराज देसाई व मोरणा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष रविराज देसाई यांचे प्रमुख मार्गदर्शनाखाली व अध्यक्ष मा.यशराज देसाई(दादा) यांचे उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराज पुतळा उभारणी तालुकास्तरीय समितीची बैठक संपन्न झाली.

               आज दौलतनगर,ता.पाटण येथे संपन्न झालेल्या या बैठकीला दूरदृश्य प्रणालीव्दारे समिती अध्यक्ष मा.यशराज देसाई(दादा),प्रमुख मार्गदर्शक मा.रविराज देसाई(दादा),उपाध्यक्ष विजय पवार,सचिव/खजिनदार माणिक पवार  व समिती सदस्य सुमोध  साळूंखे,विलास गोडांबे,मनोज मोहिते,जगदिशसिंह पाटणकर,शैलेंद्र शेलार,गणेश भिसे,बशीर खोंदू श्रीमती मुक्ताबाई माळी या समिती सदस्यांसह सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता रोकडे,कार्यकारी अभियंता संजय सोनवणे, उपविभागीय अधिकारी सुनील गाडे,तहसिलदार रमेश पाटील यांचेसह इतर शासकीय अधिकाऱ्यांची उपस्थिती  होती.

                  नाडे ता.पाटण येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारुढ पुतळा उभारण्यासाठी सातारा जिल्हयाचे पालकमंत्री ना.शंभूराज देसाई मार्गदर्शनाखाली लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन मा.यशराज देसाई(दादा) यांचे अध्यक्षतेखाली नुकतीच छत्रपती शिवाजी महाराज पुतळा  उभारणी तालुकास्तरीय समिती  गठीत करण्यात आली होती. या तालुकास्तरीय समितीची बैठक पालकमंत्री ना. शंभूराज देसाई यांचे प्रमुख मार्गदर्शनाखाली व सर्व समिती सदस्य यांचे उपस्थितीत आज दौलतनगर ता.पाटण येथे पार पडली. रयतेच्या  हिंदवी स्वराज्याचे संस्थापक  छत्रपती  शिवाजी   महाराजांचा गेट वे ऑफ इंडीया समोर असणाऱ्या अश्वारूढ  पुतळयाचीच प्रतिकृती आवश्यक असलेल्या शासकीय परवानग्या घेऊन सहा महिन्यांत उभारण्याचा निर्णय आज झालेल्या समितीच्या बैठकीत झाला.त्याचबरोबर पाटण विधानसभा मतदारसंघातील  छत्रपती शिवप्रेमींच्या मदतीने  पुतळा  उभारण्याचा विचार करुन शिवसेना भाजपा महायुती पाटण तालुका यांचेवतीने आज पहिल्या बैठकीतच छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारुढ पुतळा उभारण्यासाठी 11 लक्ष रुपयांचा निधी छत्रपती शिवाजी महाराज पुतळा उभारणी तालुकास्तरीय समितीकडे देण्याबाबतची  घोषणा राज्य उत्पादन शुल्कमंत्री तथा पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी बैठकीदम्यान केली.तसेच या पुतळा उभारणी तालुका स्तरीय समितीची धर्मादाय आयुक्त कार्यालयाकडे आवश्यक ती नोंदणी करुन या समितीचे बँक खाते शिवदौलत सहकारी बँक मल्हारपेठ या बँकेत उघडणार असून या बँकेतील खात्यावरुन समितीचा जमा-खर्च करण्याचे ठरविण्यात आले.  प्रामुख्याने नाडे  नवारस्ता येथे छत्रपती शिवाजी  महाराज यांचा अश्वारुढ पुतळा उभारणी चे काम तातडीने सुरु करण्यासंदर्भातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या महसलू विभागाच्या अधिकाऱ्यांनी आवश्यक त्या परवानग्या तातडीने घेण्याच्या  सुचना पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी या बैठकीमध्ये संबंधित अधिकाऱ्यांना केल्या.

No comments:

Post a Comment