Thursday 19 October 2023

चेअरमन मा.यशराज देसाई(दादा) यांचे अध्यक्षतेखाली नाडे ता.पाटण येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य अश्वारूढ पुतळा उभारण्या संदर्भात तालुकास्तरीय समिती गठीत *

 



दौलतनगर दि.19-  महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती  शिवाजी महाराज यांचा भव्य असा अश्वारुढ पुतळा पाटण तालुक्यातील नवारस्ता येथील चौकामध्ये उभारण्याचा वाढदिनी संकल्प लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन मा.यशराज देसाई(दादा) यांनी केला होता.  त्या अनुशंगाने छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारुढ पुतळा उभारण्यासाठी सातारा जिल्हयाचे पालकमंत्री ना.शंभूराज देसाई मार्गदर्शनाखाली लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन मा.यशराज देसाई(दादा) यांचे अध्यक्षतेखाली नुकतीच छत्रपती शिवाजी महाराज पुतळा  तालुकास्तरीय समिती  गठीत करण्यात आली असल्याची माहिती पालकमंत्री  मा.शंभूराज देसाई साहेब यांचे कार्यालय यांच्या वतीने प्रसिध्दीपत्रकांत देण्यात आली आहे.

            प्रसिध्दीपत्रकांत पुढे म्हंटले आहे की,रयतेच्या हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा पाटण तालुक्यात असावा आणि तालुक्यातील प्रत्येक नागरिकाला छत्रपती शिवरायांच्या या पुतळ्याच्या दर्शनाने सदैव प्रेरणा मिळावी, या उद्देशाने मा.यशराज देसाई(दादा) यांनी वाढदिवसाचे औचित्य साधून केलेल्या संकल्पामुळे हा पुतळा उभारण्यात येणार आहे. छत्रपती शिवरायांचे तेजस्वी व्यक्तित्व, त्यांचे विचार आणि कार्याचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचावा हीच यामागील प्रांजळ भावना आहे. देसाई कुटुंबिय हे नेहमीच छत्रपती शिवरायांच्या विचार आणि कार्याने भारलेले असून त्यांच्या प्ररणेनेच जनसेवेत सक्रिय आहे. लोकनेते बाळासाहेब देसाई यांनी मुंबईत गेट वे ऑफ इंडिया . शिवाजी पार्क,शिवाजी विद्यापिठ कोल्हापूर येथे छत्रपती शिवरायांचा पुतळा उभारण्यात पुढाकार घेतला होता. आजही त्या दोन्ही ठिकाणी असणारे पुतळे नव्या पिढीबरोबरच देशी-परदेशी पर्यटकांना महाराजांच्या विचार कार्याची आठवण करून देत असतात. लोकनेते बाळासाहेब देसाई यांनी दिलेला जनसेवेचा हा वारसा जपताना पाटण तालुक्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा कुठेही अश्वारुढ मोठा पुतळा नसल्याने पाटण तालुक्याची मध्यतर्वी बाजारपेठ असलेल्या नाडे-नवरस्ता येथील मुख्य चौकामध्ये छत्रपती शिवरायांचा पुतळा उभारण्याचा निर्णय मा.यशराज देसाई(दादा) यांनी घेतला असून राज्य उत्पादन शुल्कमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे मार्गदर्शनाखाली  छत्रपती शिवाजी महाराज पुतळा  तालुकास्तरीय समिती  गठीत करण्यात आली  आहे. यामध्ये पालकमंत्री .ना.शंभूराज देसाई मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा.रविराज देसाई(दादा) हे छत्रपती शिवाजी महाराज पुतळा समितीचे प्रमुख मार्गदर्शक असून या तालुकास्तरीय समितीचे अध्यक्ष मा.यशराज देसाई(दादा), उपाध्यक्ष विजय पवार नाडे,सचिव/खजिनदार माणिक पवार वेखंडवाडी यांची निवड केली आहे. तर छपत्रती शिवाजी महाराज पुतळा तालुकास्तरीय समिती सदस्यांमध्ये सुमोध साळूंखे जाळगेवाडी,विलास गोडांबे घोटील,मनोज मोहिते उमरकांचन,जगदिशसिंह पाटणकर केर,शैलेंद्र शेलार नवजा,गणेश भिसे नाटोशी,बशीर खोंदू पेठशिवापूर श्रीमती मुक्ताबाई माळी चोपदारवाडी यांची निवड करण्यात आली आहे. दरम्यान लवकरच छत्रपती शिवाजी महाराज यांचे नवारस्ता येथे पुतळा उभारणीसंदर्भात गठीत केलेल्या तालुकास्तरीय समितीची पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे समवेत बैठक होणार असून तातडीने छत्रपती शिवाजी महाराज यांचे पुतळा उभारणीचे कामाला सुरुवात करण्यासंदर्भात या बैठकीमध्ये चर्चा करुन पुढील दिशा ठरविण्यात  येणार असल्याचे शेवटी प्रसिध्दीपत्रकांत म्हंटले आहे.

 


1 comment:

  1. छत्रपती श्री शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारण्याचे काम करणाऱ्या सर्व समितीस सर्वप्रथम शुभेच्छा...
    लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या प्रेरणेने श्री रणजित देसाई यांनी लिहिलेली श्रीमान योगी कादंबरी वाचून काढा एकदा कारण समितीतील जर कोणी वाचली नसेल तर त्यांना प्रेरणा मिळणार नाही.
    18 पगड जातींचा समितीतील सहभाग फक्त नावापुरते राहू नये त्यासाठी त्यांचे यापूर्वीचे शिवकार्य पण लक्षात घेतले असते तर योग्य झाले असले हे माझे वैयक्तिक मत आहे..
    पण पाटण तालुक्यातील तमाम शिवप्रेमी याना हेवा वाटावा असा पुतळा/ स्मारक उभा कराल हीच सदिच्छा...
    जय शिवराय ....

    ReplyDelete