दौलतनगर दि.11: लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर
कारखान्याने सन 2022-23 च्या गळीत हंगाम राज्याचे
राज्य उत्पादन शुल्कमंत्री नामदार शंभूराज देसाई यांचे मार्गदर्शनाखाली कारखाना
व्यवस्थापनाने यशस्वीपणे पार पाडत
गळीतास आलेल्या ऊसाच्या एफ.आर.पी.ची उर्वरित रु.150.80/- प्र.मे.टन प्रमाणे होणारी
रक्कम रु.327.21 लाख ही नवरात्र उत्सावापुर्वीच संबंधित ऊस पुरवठादारांच्या बँक खाती
वर्ग करत लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे जिल्हयातील इतर कारखान्यांचे
बरोबरीने एफ.आर.पी.ची 100 टक्के रक्कम ही ऊस उत्पादक सभादांचे बँक खाती वर्ग केली असल्याची
माहिती कारखान्याचे चेअरमन यशराज देसाई यांनी प्रसिध्दीपत्रकांत देण्यात आली आहे.
पत्रकात पुढे म्हंटले आहे की, लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याने सन 2022-23 चे गळीत हंगामामध्ये 2,16,982.920 मे.टन ऊस गाळप करुन सरासरी 12.07 टक्के साखर उताऱ्याने 2,61,790 क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे.कारखान्याची सन 2022-23 चे गळीत हंगामामध्ये निव्वळ देय एफ.आर.फी.रु.2800.80/- प्र.मे.टन होत असून हंगाम 2022-23 मधील एफ.आर.पी.पोटी रु.2650/- प्र.मे.टन प्रमाणे यापूर्वीच रु. 5750.05 लाख रक्कम ऊस पुरवठादारांना अदा केली आहे. तर उर्वरित रु. 150.80/- प्र.मे.टन प्रमाणे रु.327.21 लाख एवढी होणारी रक्कम नवरात्र उत्सावापूर्वी संबंधित ऊस पुरवठादारांच्या बँक खाती वर्ग केली असून आतापर्यंत सन 2022-23 चे गळीत हंगामात एकूण एफ.आर.पी.पोटी रक्कम रुपये 6077.26 लाख ऊस उत्पादक सभासद व शेतकरी यांचे बँक खाती वर्ग केले आहेत, असे सांगत ते पुढे म्हणाले की,लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे मार्गदर्शक,राज्य उत्पादन शुल्कमंत्री नामदार शंभूराज देसाई यांचे मार्गदर्शनाखाली कारखाना व्यवस्थापनाने आर्थिक नियोजन केले आहे. सध्या सन 2023-24 च्या गळीत हंगामाची तयारी सुरु असून आधुनिकीकरणासह विस्तारीकरणाच्या दुसऱ्या टप्प्याचे काम अंतिम टप्प्यामध्ये सुरु आहे. दरम्यान लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याने इतर मोठया कारखान्यांचे बरोबरीने एफ.आर.पी.प्रमाणे होणारी सर्व रक्कम ही ऊस पुरवठादार सभासद व शेतकरी यांचे बँक खाती वर्ग केली असून कारखाना कार्यक्षेत्रातील सर्व ऊस उत्पादक सभासद शेतकरी यांनी आपला पिकविलेला सर्व ऊस आपले लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्यास नोंद करुन सन 2023-24 चा गळीत हंगाम यशस्वी करण्यासाठी कारखाना कार्यक्षेत्रातील सर्व सभासद व ऊस उत्पादक शेतकरी यांनी सहकार्य करावे असे आवाहनही शेवटी प्रसिध्दीपत्रकांत केले आहे.
No comments:
Post a Comment