Thursday 26 October 2023

शेतकरी सभासदांच्या खात्यावर एफ.आर.पी. ची संपूर्ण रक्कम जमा तर कामगारांना ११ टक्के बोनस जाहिर. लोकनेते बाळासाहेब देसाई कारखानाच्या सभासद,कामगारांना चेअरमन यशराज देसाई यांच्याकडून दिवाळी भेट.

 

दौलतनगर दि.26-  लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी कारखाना हा सभासद शेतकऱ्यांच्या हितासाठीच सदैव प्रयत्नशील राहून गळीत हंगाम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करेल असा विश्वास व्यक्त करून कारखान्याच्या शेतकरी सभासदांच्या खात्यावर एफ.आर.पी. ची सर्व रक्कम अदा करून ही संस्था नावारूपाला आणण्यासाठी सभासद शेतकरी यांच्याबरोबर कर्मचारी वर्ग यांचा मोठा सहभाग आहे त्यासाठी यावर्षी देसाई कारखान्याच्या कर्मचाऱ्यांना ११ टक्के बोनस जाहीर करत असल्याची घोषणा लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन यशराज देसाई(दादा) यांनी केली.दरम्यान हा निर्णय देसाई कारखान्याच्या सभासद शेतकरी आणि कामगारांना खऱ्या अर्थाने ही दिवाळी भेट ठरली आहे.

         ते दौलतनगर,ता.पाटण याठिकाणी लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे ५० व्या गळीत हंगामाच्या बॉयलर अग्निप्रदिपन कार्यक्रमात ते बोलत होते. याप्रसंगी मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रविराज देसाई यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी कारखान्याचे संचालक मा.श्री.रामचंद्र बाबासो पाटील व त्यांच्या सुविद्य पत्नी मा. सौ. वत्सला रामचंद्र पाटील यांच्या शुभहस्ते सत्यनारायण महापूजा संपन्न झाली. यासमयी कारखान्याचे व्हा.चेअरमन पांडुरंग नलवडे,अशोकराव पाटील, ॲङडी.पी.जाधव,ॲङमिलिंद पाटील,जालंदर पाटील,बबनराव भिसे,सुनील पानस्कर,सर्जेराव जाधव,विकास गोसावी,सुनील पवार,बी.आर.पाटील,गोरख देसाई,प्रकाशराव जाधव,बशीर खेांदू,शशिकांत निकम,अधिक पाटील,राजाराम मोहिते,कार्यकारी संचालक सुहास देसाई तसेच कारखान्याचे सर्व संचालक,सभासद,ऊस उत्पादक शेतकरी,अधिकारी,कामगार वर्ग हितचिंतक, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

            चेअरमन यशराज देसाई(दादा) म्हणाले की,गेल्या पन्नास वर्षापासून देसाई कारखाना हा 1250 मेट्रिक टन क्षमतेमध्ये  गाळप करीत आहे. मात्र यावर्षीपासून सर्व शेतकरी सभासद यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच या जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय शंभूराज देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली 1250 मेट्रिक टनाचा हा कारखानातीन हजार मेट्रिक टन गाळप क्षमतेचा करण्यात आला आहे.राज्यात सध्या पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा कमी आहे त्यामुळे त्याचा परिणाम उसाच्या क्षेत्रावर होण्याची शक्यता आहे त्यामुळे आगामी गळीत हंगाम अडचणीचा ठरण्याची शक्यता आहे . सातारा जिल्ह्यात एकूण 15 सहकारी आणि खाजगी साखर कारखाने आहेत त्यामध्ये 1200 मे.टन क्षमतेचा लोकनेते बाळासाहेब देसाई हा एकमेव कारखाना आहे मात्र शेतकऱ्यांना दिला जाणाऱ्या दरात लोकनेते देसाई कारखान्याने जिल्ह्यातील इतर कारखान्याच्या बरोबरीत दर दिला आहे ही अभिमानाची बाब आहे असे स्पष्ट करून यशराज देसाई(दादा) पुढे म्हणाले कारखान्याच्या कार्यक्षेत्रात ऊस तोडणी कामगारांची टंचाई निर्माण होत असते या टंचाईवर मात करण्यासाठी आगामी गळीत हंगामात हार्वेस्टरच्या मार्फत ऊस तोडणी साठी प्रयत्न केला जाईल त्यामुळे शेतकऱ्यांच्या उसाची तोडणी वेळेत होईल आणि वेळेत ऊस गळीत होण्यास मदत होईल असे सांगून 17 कोटींची मदत राज्य शासनाने देसाई कारखान्याला तातडीने केली त्याबद्दलही राज्य शासनाचे आभार मानले.

     दरम्यान लोकनेते बाळासाहेब देसाई कारखान्याने  १०० टक्के एफआरपी रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली असून राज्यातीला सहकारी साखर उद्योग सध्या अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत चालला असून सहकारी साखर कारखाने शंभर टक्के शासनाच्या नियमाचे पालन करूनच  कारखाने चालवावे लागतात लोकनेते बाळासाहेब देसाई कारखान्याचे कार्यक्षेत्र पाहिल्यानंतर निम्माहून अधिक क्षेत्र हे डोंगरी भागात आहे. कोयना नदीकाठी अल्प प्रमाणात ऊसाचे कार्यक्षेत्र आहे. संपुर्ण पाटण तालुक्यातील ऊसाची लागवड पाहिली तर तीन ते साडेतीन लाख मे.टनाच्या वर जात नाही. ही वस्तूस्थिती असताना देखील आपले कारखान्याने कारखान्याच्या सभासंदाना व ऊस उत्पादक शेतक-यांना इतर मोठया कारखान्यांच्या बरोबरीने प्रतिवर्षी दर दिला आहे. मात्र जाणीवपूर्वेक बाहेरच्या काऱखान्याला ऊस घालणार्याची मानसिकता बदलली पाहिजे. बाहेर जाणार ऊस थांबवण्यासाठी संचालक मंडळाबरोबर सर्वानी प्रयत्न करणे गरजेचे आहे. तालुक्यातील शेतक-यांनी व सभासदांनी कार्यक्षेत्रातील ऊस बाहेरच्या कारखान्यांना न घालता नोंद केलेला संपुर्ण ऊस हा आपलेच लोकनेते बाळासाहेब देसाई साखर कारखान्यास गळीताकरीता देवून गळीत हंगाम य़शस्वी करण्यासाठी सर्व सभासदांनी प्रयत्न करावेत असे आवाहन चेअरमन यशराज देसाई(दादा) यांनी शेवटी  केले. 

No comments:

Post a Comment