Friday 26 July 2024

पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी पाटण व मोरणा विभागातील पूरपरिस्थितीची केली पाहणी. गोकूळ तर्फ पाटण, आडदेव व मुळगाव या पूलांनाची केली पाहणी .



दौलतनगर दि.26:- गेली सहा ते सात दिवस पाटण तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस पडत असल्याने सर्व नद्या दुधडी भरुन वाहू लागल्या आहेत. सतत पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे नद्यावरील पूल हे पुराचे पाण्याखाली जाऊन परिसरातील वाहतूक विस्कळीत होत आहे. मोरणा विभागातील मोरणा नदीवर असलेल्या गोकूळ तर्फ पाटण, आडदेव ते कुसरुंड रस्त्यावरील पूल तसेच कोयना नदीवरील मुळगाव पूल या तीन पुलांचा पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी पाहणी दौरा करुन पुरपरिस्थितीची  माहिती घेतली.

                यावेळी  उपविभागीय अधिकारी सुनील गाढे,तहसिलदार अनंत गुरव,सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता संजय शिंदे,गिरीश सावंत,जिल्हा परिषद बांधकाम विभाग उपअभियंता चव्हाण यांचेसह आरोग्य विभाग,पोलीस विभागचे संबंधित अधिकारी यांचेसह विविध गावातील सरपंच,उपसरपंच, पदाधिकारी व कार्यकर्ते यांची उपस्थिती होती.

              गत सहा ते सात दिवसापासून कोयना धरण पाणलोट क्षेत्रासह पाटण तालुक्यात मुसळधार पाऊस पडत असून मुसळधार पावसामुळे महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असणाऱ्या कोयना धणाच्या पाणीसाठयात झपाटयाने वाढ होत आहे. पाटण तालुक्यात सर्वदूर मुसळधार पाऊस पडत आहे. कोयना पाणलोट क्षेत्रामध्ये जादा पावसाची नोंद झाली असून कोयना धरणात 72 टिएमसी  पाणी साठा झालाआहे. गत चार दिवसा पासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे तारळी,उत्तर मांड धरण, मोरणा गुरेघर,वांग मराठवाडी,चिटेघर,महिंद या लहान मोठया धरणांत पाण्यासाठयामध्ये मोठी वाढ झाली असून तारळी,उत्तर मांड, मोरणा,केरा,वांग या नद्या दुधडी भरून वाहू लागल्या असून या नद्यांच्या पाणी पातळीतही वाढ झाली असल्याने काही गावे काही काळासाठी संपर्कहिन झाली होती. मोरणा विभागातील गोकूळ तर्फ पाटण येथील पूलावरुन पाणी जात असल्याने कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून खबरदारीची उपाय योजना म्हणून प्रशासनाने या पूलावरील वाहतूक बंद केली आहे. तर आडदेव ते कुसरुंड या रस्त्यावरील पूलाचा भराव वाहून गेला असल्याने या मार्गावरीलही वाहतूक सध्या बंद आहे. तसेच कोयना नदीमधून सध्या 32100 हजार क्यूसेक पाणी  सोडल्याने मुळगाव येथील कोयना नदीवरील पूलाला पाणी लागल्याने याही पुलावरुन वाहतूक बंद करण्यात आली आहे. पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी  पाटण येथे जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांचे उपस्थितीमध्ये पूरपरिस्थितीची आढावा बैठक घेऊन पूरपरिस्थितीबाबतच्या सद्यस्थितीची सर्व माहिती संबंधित अधिकारी यांचेकडून घेऊन पूरपरिस्थितीवर नियंत्रण करण्यासाठी करावयाच्या आवश्यक उपाययोजनाबाबत त्यांनी अधिकाऱ्यांना सूचना करत या बैठकीनंतर सर्व शासकीय अधिकारी यांचे समवेत मोरणा विभागातील मोरणा नदीवर असलेल्या गोकूळ तर्फ पाटण, आडदेव ते कुसरुंड रस्त्यावरील पूल तसेच कोयना नदीवरील मुळगाव पूल या तीन पुलांचा पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी पाहणी दौरा करत सार्वजनिक बांधकाम व जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना नुकसान झालेल्या  पुलांची तसेच रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करुन यावरुन वाहतूक सुरळीत करण्याच्या सूचना दिल्या. तसेच अतिवृष्टीच्या कालावधीत पुलावरुन पाणी वाहत असताना पोलीस विभागाने सुरक्षिततेच्या दृष्टीने बॅरिकेटींग करुन वाहतूक तात्काळ बंद करण्याबरोबर रात्री संबंधित पुलांवर बंदोबस्त तैनात करण्याच्या सूचना केल्या. तसेच महसूल विभागाने  पुलावरुन ये-जा करणाऱ्या नागरीकांना प्रशासनामार्फत योग्य ती खबरदारी घेण्यासंदर्भात गावामध्ये सर्व नागरीकांना माहिती देण्यात यावी जेणेकरुन कोणतीही  अनुचित घटना घडणार नाही याची प्रशासनाकडून काळजी घेण्यासंदर्भात उपस्थित शासकीय अधिकाऱ्यांसमवेत चर्चा केली.

Thursday 25 July 2024

पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे प्रयत्नातून जिल्हा नियोजन समितीच्या वार्षिक आराखडयामध्ये पाटण विधानसभा मतदारसंघातील ग्रामपंचायत इमारत,स्मशानभूमींच्या कामांना निधी मंजूर

                                               

दौलतनगर दि.25:- पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी पाटण विधानसभा मतदारसंघातील नवीन ग्रामपंचायत इमारतींची व स्मशानभूमी सुधारणा करण्याची कामे मंजूर होण्यासाठी जिल्हा नियोजन समितीचे 2024-25 चे जिल्हा वार्षिक आराखडयामध्ये समाविष्ठ करण्यात आली होती.त्यानुसार सन 2024-25चे जिल्हा वार्षिक आराखडयातून पाटण विधानसभा मतदारसंघातील ग्रामपंचाय कार्यालय इमारती,स्मशानभूमींच्या कामांना निधी मंजूर झाला असल्याची माहिती पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे कार्यालयाचेवतीने प्रसिध्दीपत्रकांत दिली आहे.

         प्रसिध्दीपत्रकांत पुढे म्हंटले आहे की, पाटण विधानसभा मतदारसंघातील गावांमध्ये ग्रामपंचायत कार्यालय व स्मशानभूमी नसलेल्या गावातील ग्रामस्थांनी पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचेकडे ग्रामपंचायत कार्यालयांच्या नवीन इमारती तसेच स्मशानभूमीशी निगडीत असलेली कामे होण्यासाठी निवेदनाव्दारे विनंती केलेली होती. त्यानुसार पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी पाटण विधानसभा मतदारसंघातील नवीन ग्रामपंचायत इमारतींची कामे,स्मशानभूमी सुविधांची कामे मंजूर होण्यासाठी जिल्हा नियोजन समितीचे 2024-25 चे जिल्हा वार्षिक आराखडयामध्ये समाविष्ठ करण्यात आली होती.त्यानुसार सन 2024-25चे जिल्हा वार्षिक आराखडयातून पाटण विधानसभा मतदारसंघातील ग्रामपंचाय कार्यालय इमारती,स्मशानभूमी सुविधा पुरविण्याचे कामांना 02 कोटी 37 लक्ष निधी मंजूर झाला आहे.मंजूर झालेल्या कामांमध्ये जनसुविधा योजने अंतर्गत पाटण तालुक्यातील कडवे बुद्रुक,कुसरुंड,बेलवडे या गावांमध्ये नवीन ग्रामपंचायत इमारतींचे बांधकामासाठी प्रत्येकी 15 लाख याप्रमाणे 45 लक्ष रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.तर जनसुविधा योजने अंतर्गत स्मशानभूमीचे कामांमध्ये येळेवाडी काळगाव येथे स्मशानभूमी संरक्षक भिंत,घोटील स्मशानभूमी शेड,निगडे स्मशानभूमी सुधारणा,चाळकेवाडी स्मशानभूमी सुधारणा,माटेकरवाडी चिखलेवाडी स्मशानभूमी शेड व निवारा शेड,मानेगाव स्मशानभूमी रस्ता सुधारणा,शिद्रुकवाडी काजारवाडी स्मशानभूमी सुधारणा,काढोली चिरंबे स्मशानभूमी रस्ता सुधारणा,मारुल तर्फ पाटण स्मशानभूमी शेड,गमेवाडी चाफळ स्मशानभूमी सुधारणा,सडावाघापूर स्मशानभूमी सुधारणा,जळव स्मशानभूमी निवारा शेड, निवडे स्मशानभूमी  शेड व निवारा शेड, वेखंडवाडी स्मशानभूमी सुधारणा, पांढरेपाणी आटोली स्मशानभूमी शेड, कदमवाडी नाटोशी स्मशानभूमी शेड, तळीये पूर्व स्मशानभूमी सुधारणा, धावडे स्मशानभूमी सुधारणा, कोकीसरे गावठाण स्मशानभूमी शेड, आंब्रुळे स्मशानभूमी शेड, आडदेव बु. खालचे स्मशानभूमी शेड, आडूळ गावठाण स्मशानभूमी सुधारणा, मालदन स्मशानभूमी व रस्ता सुधारणा, शिंदेवाडी चोरगेवस्ती अंबवडे खुर्द स्मशानभूमी शेड, मल्हारपेठ दिंडूकलेवाडी स्मशानभूमी शेड, वेताळवाडी स्मशानभूमी सुधारणा, नहिंबे चिरंबे स्मशानभूमी निवारा शेड, डावरी स्मशानभूमी निवारा शेड, मरळी स्मशानभूमी निवारा शेड, सांगवड स्मशानभूमी रस्ता सुधारणा, आवर्डे स्मशानभूमी सुधारणा, जगदाळवाडी कडवे स्मशानभूमी निवारा शेड, मुरुड स्मशानभूमी सुधारणा, बांबवडे स्मशानभूमी निवारा शेड, केरळ स्मशानभूमी सुधारणा, ढेरुगडेवाडी येराड स्मशानभूमी शेड, जुंगठी दिवशी खुर्द स्मशानभूमी सुधारणा, टोळेवाडी स्मशानभूमी सुधारणा, धनगरवाडा मरड स्‍मशानभूमी रस्ता सुधारणा, महिंद स्मशानभूमी सुधारणा, सळवे मागासवर्गीयवस्ती स्मशानभूमी शेड, तांबवे स्मशानभूमी सुधारणा, पाडळी जूनी स्मशानभूमी शेड, वस्ती साकुर्डी स्मशानभूमी निवारा शेड, भोळेवाडी स्मशानभूमी सुधारणा, घोट स्मशानभूमी शेड, मोडकवाडी जिंती स्मशानभूमी शेड या 48 कामांसाठी प्रत्येकी 4 लाख या प्रमाणे 1 कोटी 92 लक्ष रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. जिल्हा वार्षिक आराखडयांतर्गत मंजूर झालेल्या विकास कामांच्या निविदा प्रक्रिया तातडीने करण्यात येऊन ही कामे तातडीने हाती घेण्यासंदर्भात पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी संबंधित अधिकाऱ्यांना केल्या असल्याची माहिती शेवटी प्रसिध्दीपत्रकां देण्यात आली आहे.

 



Tuesday 23 July 2024

मंत्री ना.शंभूराज देसाईंच्या माध्यमातून पाटण मतदारसंघातील 123.500 ‍कि.मी.लांबीच्या ग्रामीण व इतर जिल्हा मार्ग रस्त्यांना प्रमुख जिल्हा मार्ग म्हणून दर्जोन्नती. दर्जोन्नत रस्त्यांवर राज्याच्या अर्थसंकल्पातून निधी खर्ची पडणार.

 


 

            दौलतनगर दि.०६:- राज्याच्या राज्य उत्पादन शुल्कमंत्री या महत्वाच्या खात्यांच्या मंत्रीपदाबरोवर सातारा व ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री या महत्वाचे पदावर विराजमान झालेले ना.शंभूराज देसाई यांचेकडे राज्याच्या या महत्वाच्या खात्याची जबाबदारी असताना देखील त्यांनी आपल्या पाटण विधानसभा मतदारसंघातील विविध जनहितार्थ कामांवरील लक्ष अजिबात विचलीत केले नाही. आपल्याला मिळालेल्या मंत्रीपदाचा लाभ हा पाटण मतदारसंघातील जनतेला झालाच पाहिजे ही त्यांची भूमिका असून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे व सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्रजी चव्हाण यांचेकडे शिफारस करत पाटण विधानसभा मतदारसंघातील ग्रामीण रस्त्यांना प्रमुख जिल्हा मार्ग म्हणून दर्जोन्नती देण्याचा विषय मार्गी लावून घेतला आहे. ना.शंभूराज देसाईंच्या माध्यमातून पाटण विधानसभा मतदारसंघातील 123.500 किलोमीटर लांबीच्या ग्रामीण व  इतर जिल्हा मार्गाच्या रस्त्यांना  5 प्रमुख जिल्हा मार्ग म्हणून दर्जोन्नती मिळाली असून दर्जोन्नती झालेल्या दर्जोन्नत रस्त्यांवर आता राज्याच्या अर्थसंकल्पातून निधी खर्ची पडणार आहे.

                पाटण विधानसभा मतदारसंघातील डोंगरी आणि दुर्गम भागातील ग्रामीण व इतर जिल्हा मार्गाच्या रस्त्यांना प्रमुख जिल्हा मार्ग याप्रमाणे दर्जोन्नती मिळणेचा विषय राज्याच्या सार्वजनीक बांधकाम विभागाकडे प्रलंबीत होता याकरीता ना.शंभूराज देसाईंनी गत काही दिवसापासून शासनाकडे पाठपुरावा करुन पाटण मतदारसंघातील ग्रामीण व इतर जिल्हा मार्गाच्या रस्त्यांना प्रमुख जिल्हा मार्ग असा दर्जा मिळणेकरीताचा आराखडा जिल्हा परीषद बांधकाम व सार्वजनीक बांधकाम विभागामार्फत तयार करुन घेतला मुख्यमंत्री ना. एकनाथजी शिंदे व बांधकाम मंत्री ना.रविंद्रजी चव्हाण यांचे निर्दशनास आणून देत या ग्रामीण व इतर जिल्हा मार्गावरील रस्त्यांच्या कामांना प्रमुख जिल्हा मार्ग म्हणून दर्जोन्नती देण्याची आग्रही मागणी केली. त्यांनीही तात्काळ या प्रस्तावास मान्यता देवून पाटण विधानसभा मतदारसंघातील 123.500 किलोमीटर लांबीच्या एकूण  ग्रामीण व इतर जिल्हा मार्गाच्या रस्त्यांना  5 प्रमुख जिल्हा मार्ग म्हणून दर्जोन्नती दिली. दर्जोन्नती दिल्याचा शासन निर्णय सार्वजनीक बांधकाम विभागाने दि.22 जुलै 2024 रोजी पारित केला असून या निर्णयामध्ये ग्रामीण आणि इतर जिल्हा मार्गावरील रस्त्यांचा समावेश आहे. दर्जोन्नती मिळालेल्या ग्रामीण आणि इतर जिल्हा मार्गावर आता राज्य शासनाच्या अर्थसंकल्पातून निधी उपलब्ध होणार असून दळणवळणाच्या दृष्टीने पाटण मतदारसंघाच्या विकासात यामुळे भर पडणार आहे.

                ना.शंभूराज देसाईंच्या आग्रही मागणीमुळे राज्य शासनाच्या सार्वजनीक बांधकाम विभागाने पाटण विधानसभा मतदारसंघातील दर्जोन्नती दिलेल्या 5 रस्त्यांमध्ये प्रजिमा -54 ते पवारवाडी मेंढ निवी डाकेवाडी मस्करवाडी लोटलेवाडी काळगांव भरेवाडी रामिष्टेवाडी  प्रजिमा 162 दर्जोन्नतीची लांबी 20 कि.मी, मोरगिरी किल्लेमोरगिरी गुंजाळी बनपेठवाडी येराड ढेरुगडेवाडी विठ्ठलवाडी कारवट सावंतवाडी बाजे नाणेल रासाठी रस्ता प्रजिमा 163 दर्जोन्नतीची लांबी 30 कि.मी, प्रजिमा-66 खळे ते गुढेकरवाडी मालदन साबळेवाडी शितपवाडी बाचोली महिंद सळवे पाळशी रस्ता प्रजिमा 164 दर्जोन्नतीची लांबी 21 कि.मी, प्रजिमा - 58 ते आसवलेवाडी भालेकरवाडी शिंगमोडेवाडी बनपुरी शिंदेवाडी जोंजाळवाडी रुवले ते जिंती ते प्रजिमा -126 पर्यंत प्रजिमा 165 रस्ता दर्जोन्नतीची लांबी 26 कि.मी, वाघजाईवाडी नाणेगांव जाळगेवाडी चव्हाणवाडी दुसाळे प्रतिमा-37 ते पाबळवाडी फडतरवाडी खडकवाडी जंगलवाडी तारळे रस्ता प्रजिमा 166 दर्जोन्नतीची लांबी 26.500 कि.मी,  असे एकूण 123.500 किलोमीटर लांबीच्या ग्रामीण व इतर जिल्हा मार्गाच्या एकूण 5 रस्त्यांना प्रमुख जिल्हा मार्ग म्हणून दर्जोन्नती देण्यात आली आहे. राज्याचे मुख्यमंत्री ना. एकनाथजी शिंदे व सार्वजनिक बांधकाम मंत्री ना.रविंद्रजी चव्हाण यांनी पाटण विधानसभा मतदारसंघातील ग्रामीण व इतर जिल्हा मार्गावरील रस्त्यांच्या कामांना तात्काळ प्रमुख जिल्हा मार्ग म्हणून दर्जोन्नती दिल्याबद्दल ना.शंभूराज देसाईंनी त्यांचे विशेष आभार मानले असून या 5 रस्त्यांच्या कामांवरील अत्यंत खराब झालेल्या रस्त्यांच्या भागांची सुधारणा करणेकरीता आवश्यक असणारा निधी उपलब्ध करुन देणेबाबत मुख्यमंत्री ना.एकनाथजी शिंदे व सार्वजनिक बांधकाम मंत्री ना.रविंद्रजी चव्हाण यांचेकडे मागणीही केली आहे.

 

लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचा गळीत हंगाम यशस्वी करण्यासाठी सहकार्य करा. चेअरमन मा.यशराज देसाई(दादा). लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्यात चेअरमन मा.यशराज देसाईंचे हस्ते रोलरचे पुजन.

 


दौलतनगर दि.23:- लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखाना हा नामदार शंभूराज देसाई यांचे मार्गदर्शनाखाली सहकार क्षेत्रामध्ये चांगली वाटचाल करत आहे. सध्या आपल्या कारखान्याचे विस्तारवाढ पूर्ण झाली असून यंदाचे गळीत हंगामाची पूर्वतयारी सुरु आहे. कारखान्याने गतवर्षीचा गळीत हंगाम चांगल्या प्रकारे पुर्ण केला होता. यंदाच्या गळीत हंगामातही कार्यक्षेत्रातील जास्तीत जास्त ऊसाचे गाळप करण्याचे उद्दीष्ट कारखान्याने ठेवले आहे. नियोजनबध्द काम करुन सन 2024-25 चा गळीत हंगाम प्रतिवर्षाप्रमाणे यशस्वी करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन चेअरमन यशराज देसाई (दादा) यांनी केले.

                दौलतनगर,ता.पाटण येथील लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे सन 2024-25 चे गळीत हंगामासाठी रोलरचे पूजन  कारखान्याचे चेअरमन यशराज देसाई यांचे शुभहस्ते करण्यात आले.यावेळी मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा.रविराज देसाई(दादा), चि.आदित्यराज देसाई,अशोकराव पाटील, शशिकांत निकम,बबनराव शिंदे,प्रशांत पाटील,शंकरराव पाटील,सर्व संचालक,पदाधिकारी,कार्यकारी संचालक एस.एल.देसाई यांचेसह कारखान्यातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

                 यावेळी बोलताना चेअरमन यशराज देसाई (दादा)  पुढे म्हणाले,लोकनेते बाळासाहेब देसाई कारखान्याचे संस्थापक चेअरमन स्व.शिवाजीराव देसाई(आबासाहेब) यांचे विचारांचा वारसा जोपासत आपले उद्योग समुहाचे प्रमुख व महाराष्ट्र राज्याचे राज्य उत्पादन शुल्क मंत्री नामदार शंभूराज देसाई यांचे मार्गदर्शनाखाली आपला कारखाना उत्तरोत्तर चांगली प्रगती करत आहे.सभासद शेतकऱ्यांचे ऊसाला योग्य दर मिळावा आणि त्यांचे आर्थिक जिवनमान उंचवावे हे लोकनेते बाळासाहेब देसाई व स्व.शिवाजीराव देसाई (आबासाहेब) यांचे स्वप्न आपल्या उद्योग समुहाच्या व्यवस्थापनाकडून सत्यात उतरवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला जात आहे.लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याने सन 2023-24 चे गळीत हंगामामध्ये 2,24,413 मे.टन इतके ऊसाचे गाळप करुन  सरासरी 11.98% साखर उताऱ्याने 2,68,775 क्विंटल साखर उत्पादन केले असून आपण कारखान्याच्या विस्तारवाढीचे  काम पूर्ण झाले आहे.तसेच कारखान्याच्या आगामी गळीत हंगामाकरीता यंत्रसामग्री देखभाल,दुरुस्ती आदी कामे प्रगतीपथावर असून येणाऱ्या गळीत हंगामामध्ये कारखाना कार्यक्षेत्रातील जास्तीत जास्त नोंद केलेल्या ऊसाचे गाळप करण्याचे उद्दीष्ट व नियेाजन कारखाना व्यवस्थापनाने केले आहे.त्याचबरोबर गतवर्षीच्या सरासरी साखर उताऱ्यामध्ये यंदाच्या वर्षी वाढ करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे ही ते म्हणाले. गळीत हंगामाची पूर्वतयारी म्हणून मशिनरी विभागाकडील मिलमधील रोलरचे आज पूजन होत आहे.प्रतिवर्षी कारखाना गळीत हंगामामध्ये आलेल्या अडचणींवर मात करीत, यशस्वी गळीत  करण्याची आपल्या कारखान्याची परंपरा यापुढेही अशीच ठेवण्यासाठी सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी चांगले काम करावे.आपला हा कारखाना सभादांचा हक्काचा कारखाना असल्याने कारखाना चालविण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे.तालुक्याच्या कार्यक्षेत्रातील जास्तीत जास्त ऊसाचे गाळप करुन  ऊस उत्पादक सभासद व शेतकरी यांना एफआरपीच्या धोरणानुसार ऊस दर देण्याचा कारखाना व्यवस्थापनाचा नेहमीच प्रयत्न राहणार आहे.आज जरी सहकारी साखर कारखानदारीपुढे अनेक संकटे असले तरी ऊस उत्पादक सभासद,शेतकरी,ऊस तोडणी मजूर,कारखान्यातील अधिकारी व कर्मचारी यांचे सांघिक प्रयत्नातून या संकटांना सामोरे जाऊन त्यावर मात करत येणारा गळीत हंगाम यशस्वी करण्याचा प्रयत्न राहणार आहे.येणारा गळीत हंगाम यशस्वी करण्यासाठी  सर्व अधिकारी कर्मचारी यांनी नियोजनबध्द काम करावे.तसेच आपले कारखाना कार्यक्षेत्रातील ऊस पिकवणाऱ्या सभासद तसेच बिगर ऊस उत्पादक शेतकरी यांनी आपला पिकविलेला संपूर्ण ऊस आपल्या कारखान्याला गळीतास देऊन येणार गळीत हंगाम यशस्वी करण्यासाठी सहकार्य करावे,असे आवाहनही त्यांनी शेवटी केले.


Monday 22 July 2024

चेअरमन मा.यशराज देसाई (दादा) यांनी केली ढेबेवाडी विभागातील पूरपरिस्थितीची पाहणी. ढेबेवाडी विभागातील बाचोली,खळे व काढणे या पूलांची केली पाहणी .

                                     

      

दौलतनगर दि.22:- गेली तीन ते चार दिवस पाटण तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस पडत असल्याने सर्व नद्या दुधडी भरुन वाहू लागल्या आहेत. सतत पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे नद्यावरील पूल हे पुराचे पाण्याखाली जाऊन या परिसरातील वाहतूक विस्कळीत होत आहे. ढेबेवाडी विभागातील वांग नदीवर असलेल्या बाचोली,खळे व  काढणे या तीन पुलांवरुन पुराच पाणी जाऊ लागल्याने हे पूल पाण्याखाली गेले. पाण्याखाली गेलेल्या ढेबेवाडी विभागातील या बाचोली,खळे व काढणे या तीन पुलांची पाहणी लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन मा.यशराज देसाई(दादा) यांनी पाहणी केली. दरम्यान महाराष्ट्र राज्याचे राज्य उत्पादन शुल्कमंत्री तथा सातारा व ठाणे जिल्हा पालकमंत्री ना.शंभूराज देसाई हे मुंबई याठिकाणी मंत्रालयीन काममाजामुळे पुर्णवेळ व्यस्त असल्या कारणाने त्यांच्या अनुपस्थितीमध्ये चेअरमन मा.यशराज देसाई (दादा) यांनी ढेबेवाडी विभागातील या तीन पुलांचा आज पाहणी दौरा करुन पुरपरिस्थितीची  माहिती घेतली.

                यावेळी  मा.यशराज देसाई(दादा) यांचे समवेत पंजाबराव देसाई, शिवाजीराव शेवाळे,विलास गोडांबे,अनिल शिंदे,मनोज मोहिते,मधुकर पाटील,रणजित पाटील,सचिन पाटील,सचिन यादव,शामराव कोळेकर,गजानन पाटील,अजित पाटील,प्रफुल्ल कचरे, नाना साबळे,सार्वजनिक बांधकाम,जिल्हा परिषद बांधकाम विभाग,आरोग्य विभाग,पोलीस विभागचे संबंधित अधिकारी यांचेसह विविध गावातील सरपंच,उपसरपंच, पदाधिकारी व कार्यकर्ते यांची उपस्थिती होती.

              गत चार दिवसापासून कोयना धरण पाणलोट क्षेत्रासह पाटण तालुक्यात मुसळधार पाऊस पडत असून मुसळधार पावसामुळे महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असणाऱ्या कोयना धणाच्या पाणीसाठयात झपाटयाने वाढ होत आहे. पाटण तालुक्यात सर्वदूर मुसळधार पाऊस पडत आहे. कोयना पाणलोट क्षेत्रामध्ये जादा पावसाची नोंद झाली असून कोयना धरणात 61.97 टिएमसी  पाणी साठा झालाआहे. गत चार दिवसा पासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे तारळी,उत्तर मांड धरण, मोरणा गुरेघर,वांग मराठवाडी,चिटेघर,महिंद या लहान मोठया धरणांत पाण्यासाठयामध्ये मोठी वाढ झाली असून तारळी,उत्तर मांड, मोरणा,केरा,वांग या नद्या दुधडी भरून वाहू लागल्या असून या नद्यांच्या पाणी पातळीतही वाढ झाली असल्याने काही गावे काही काळासाठी संपर्कहिन झाली होती. दरम्यान पालकमंत्री शंभूराज देसाई हे तालुकास्तरीय वरिष्ठ अधिकाऱ्यांना तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना देत आहेत. आज त्यांच्या अनुपस्थितीत युवा नेते यशराज देसाई यांनी ढेबेवाडी विभागातील वांग नदीवर असलेल्या बाचोली,खळे व  काढणे या तीन पुलांची प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी करत सार्वजनिक बांधकाम व जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना नुकसान झालेल्या  पुलांची तसेच रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करुन यावरुन वाहतूक सुरळीत करण्याच्या सूचना दिल्या. तसेच अतिवृष्टीच्या कालावधीत पुलावरुन पाणी वाहत असताना पोलीस विभागाने सुरक्षिततेच्या दृष्टीने बॅरिकेटींग करुन वाहतूक तात्काळ बंद करण्याबरोबर रात्री संबंधित पुलांवर बंदोबस्त तैनात करण्याच्या सूचना केल्या. तसेच महसूल विभागाने  पुलावरुन ये-जा करणाऱ्या नागरीकांना प्रशासनामार्फत योग्य ती खबरदारी घेण्यासंदर्भात गावामध्ये सर्व नागरीकांना माहिती देण्यात यावी जेणेकरुन कोणतीही  अनुचित घटना घडणार नाही याची प्रशासनाकडून काळजी घेण्यासंदर्भात उपस्थित शासकीय अधिकाऱ्यांसमवेत चर्चा केली.

चौकट: मा.यशराज देसाई यांची तशीच कार्यतत्परता…

         लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे पासून देसाई घराण्याची  पाटण विधानसभा मतदारसंघातील सामान्य जनतेविषयी असलेली तळमळ आजही अनेक प्रसंगातून पाहवयास मिळते.पालकमंत्री  शंभूराज देसाई हे ज्या पध्दतीने आपत्कालीन परिस्थितीमध्ये,संकटामध्ये सामान्य जनतेच्या पाठीशी ठामपणे उभे राहिलेले दिसतात.अतिवृष्टी असो की पूरपरिस्थिती या दोन्ही वेळेला ना.शंभूराज देसाई यांनी आपद्ग्रस्तांना नेहमीच मदतीचा हात दिला.त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून मा.यशराज देसाई हे सुध्दा पाटण विधानसभा मतदारसंघातील आपत्कालीन परिस्थितीचा आढावा घेत ढेबेवाडी विभागातील पूरपरिस्थितीची  पाहणी करत उपस्थित नागरीकांशी संवाद साधत अडी-अडचणी विचार होते तर अधिकाऱ्यांना सूचना करत होते.लोकनेते बाळासाहेब देसाई,ना.शंभूराज देसाई यांचे प्रमाणे मा.यशराज देसाई यांचीही तशीच कार्यतत्परता असल्याची कुजबूज उपस्थितांमध्ये होती.    

 

Saturday 20 July 2024

पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे प्रयत्नातून मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत 41 कि.मी. लांबीच्या 11 रस्त्यांच्या कामांना 57 कोटी 49 लक्ष रुपयांचा निधी मंजूर.



दौलतनगर दि.20:-पाटण विधानसभा मतदारसंघातील डोंगरी व दुर्गम भागात वसलेल्या गावांचे पोहोच रस्ते हे दळण वळणाच्यादृष्टीने नादुरुस्त झाले असल्याने या नादुरुस्त रस्त्यांच्या कामांना  राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाकडून मुख्य मंत्री ग्रामसडक योजनेअंतर्ग निधी मंजूर होण्यासाठी राज्याचे राज्य उत्पादन शुल्कमंत्री व सातारा,ठाणे जिल्हा पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी मुख्यमंत्री ना.एकनाथजी शिंदे व ग्रामीण विकास मंत्री ना.गिरीशजी महाजन यांचेकडे शिफारस केली होती. त्यानुसार पाटण विधानसभा मतदारसंघातील 11 गावांच्या रस्त्यांच्या कामांना मुख्यमंत्री ग्रामसडक योजना टप्पा 2 संशोधन व विकास योजने अंतर्गत एकूण 41.500 कि.मी. लांबींच्या 11 रस्त्यांच्या कामांना 57 कोटी 48 लाख 97 हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असल्याचा शासन निर्णय शासनाचे ग्राम विकास विभागाने पारित केला असल्याची माहिती पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे कार्यालयाचेवतीने प्रसिध्दीपत्रकांत देण्यात आली आहे.

            प्रसिध्दीपत्रकां पुढे म्हंटले आहे की, पाटण हा डोंगरी व दुर्गम तालुका असून सततच्या अतिवृष्टीमुळे मतदारसंघातील प्रमुख रस्तयांची  अतिवृष्टीमध्ये मोठया प्रमाणात दुरावस्था होत असल्याने या रस्त्यांचे पुनर्बांधणीसाठी निधीची आवश्यकता होती. दरम्यान पाटण विधानसभा मतदारसंघातील दुर्गम भागातील गावांना पोहोच रस्त्यांच्या पुनर्बांधणीचे कामासाठी आवश्यक तो निधी मंजूर होण्यासाठी पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी  मुख्यमंत्री ना.एकनाथजी शिंदे व ग्रामीण विकास मंत्री ना.गिरीशजी महाजन यांचेकडे शिफारस केली होती. तसेच या रस्त्यांच्या कामांना मुख्यमंत्री ग्रामसडक योजना टप्पा 2 संशोधन व विकास योजने अंतर्गत निधी मंजूर होण्यासाठी सातत्याचा पाठपुरावा सुरु होता.त्यानुसार पाटण विधानसभा मतदारसंघातील 11 रस्त्यांच्या कामांना मुख्यमंत्री  ग्रामसडक योजना टप्पा 2 संशोधन व विकास योजने अंतर्गत मंजूरी मिळाली असून या कामांमध्ये टीआर 15 ते वनकुसवडे रस्ता 6.380 किमी करीता 07 कोटी 65 लाख 26 हजार तर देखभाल दुरुस्तीसाठी 36 लाख 07 हजार असा एकूण 08 कोटी 01 लाख 33 हजार, एलआर 81 ते चव्हाणवाडी रस्ता 4.490 किमीसाठी 06 कोटी 31 लाख 67 हजार तर देखभाल दुरुस्तीसाठी 32 लाख 90 हजार असा एकूण 6 कोटी 64 लाख 57 हजार, जळव ते बामणेवाडी रस्ता 9.050 किमीसाठी 10 कोटी 17 लाख 81 हजार तर देखभाल दुरुस्तीसाठी 47 लाख 64 हजार असा एकूण 10 कोटी 65 लाख 45 हजार, सळवे ते पाळशी रस्ता 6.040 किमीसाठी 06 कोटी 58 लाख 96 हजार तर देखभाल दुरुस्तीसाठी 35 लाख 99 हजार असा एकूण 6 कोटी 94 लाख 95 हजार, प्रजिमा 37 ते पाबळवाडी रस्ता 1.525 किमीसाठी 03 कोटी 12 लाख 44 हजार तर देखभाल दुरुस्तीसाठी 11 लाख 27 हजार असा एकूण 3 कोटी 23 लाख 71 हजार, खालचे आडदेव ते वरचे आडदेव रस्ता 1.200 किमीसाठी 1 कोटी 59 लाख 34 हजार तर देखभाल दुरुस्तीसाठी 8 लाख 19 हजार असा एकूण 1 कोटी 67 लाख 53 हजार, भरेवाडी ते काळगाव लोटलेवाडी रस्ता 2.035 किमीसाठी 2 कोटी 67 लाख 44 हजार तर देखभाल दुरुस्तीसाठी 14 लाख 02 हजार असा एकूण 2 कोटी 81 लाख 46 हजार, कराटे रस्ता 2.150 किमीसाठी 3 कोटी 15 लाख 73 हजार तर देखभाल दुरुस्तीसाठी 15 लाख 57 हजार असा एकूण 3 कोटी 31 लाख 30 हजार, टीआर 07 ते डावरी रस्ता 4 किमीसाठी 5 कोटी 84 लाख 57 हजार तर देखभाल दुरुस्तीसाठी 27 लाख 70 हजार असा एकूण 6 कोटी 12 लाख 27 हजार, टीआर 02 ते डिगेवाडी 1.870 किमीसाठी 2 कोटी 63 लाख 89 हजार तर देखभाल दुरुस्तीसाठी 12 लाख 33 हजार असा एकूण 2 कोटी 76 लाख 22 हजार  तर कराड तालुक्यातील टीआर 02 ते बिरोबावाडी मंदिर विमानतळ रस्ता 2.765 किमीकरीता 05 कोटी 07 लाख 49 हजार तर देखभाल दुरुस्तीसाठी 22 लाख 69 हजार असा एकूण 5 कोटी 30 लाख 18 हजार या 11 रस्त्यांच्या कामांसाठी मुख्यमंत्री ग्रामसडक योजना टप्पा 2 संशोधन व विकास योजने अंतर्गत 57 कोटी 48 लाख 97 हजार निधी मंजूर करण्यात आला आहे. मुख्यमंत्री ग्रामसडक योजना टप्पा 2 संशोधन व विकास योजनेतून मंजूर झालेल्या 11 रस्त्यांची कामे ही सुरु होण्याच्या दृष्टीने लवकरात लवकर या कामाची निविदा प्रक्रिया पुर्ण करुन  कामे तातडीने  सुरु करण्याच्या सूचना पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी संबंधित अधिकारी यांना केल्या असल्याची माहिती शेवटी प्रसिध्दीपत्रकांत देण्यात आली आहे.

Thursday 11 July 2024

मा.बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेअंतर्गत पाटण तालुक्यातील 22 ग्रामपंचायतींचे कामांना मंजूरी. मंत्री ना.शंभूराज देसाई यांचे प्रयत्नातनू ग्रामपंचायतींचे नवीन इमारतींसाठी 4 कोटी 45लक्ष रुपयांचा निधी मंजूर.

 

 

  दौलतनगर दि.11:- राज्य शासनाच्या मा.बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेअंतर्गत राज्य उत्पादन शुल्कमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे प्रयत्नातून पाटण तालुक्यातील एकाचवेळी 22 ग्रामपंचायत कार्यालय इमारतींचे कामांना 4 कोटी 45 लक्ष रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याचा शासन निर्णय राज्य शासनाचे ग्रामविकास विभागाने दि. 05 जुलै,2024 रोजी पारित केला असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्कमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे कार्यालयाचेवतीने प्रसिध्दीपत्रकांत देण्यात आली आहे.

           प्रसिध्दीपत्रकांत पुढे म्हंटले आहे की, पाटण तालुक्यातील विविध गावच्या सध्या अस्तित्वात असलेल्या ग्रामपंचायती हया जुन्या व जीर्ण झाल्या असल्याने या ग्रामपंचायतींमध्ये दैनंदिन कार्यालयीन कामकाज करताना मोठी अडचणी निर्माण होत होत्या.ग्रामपंचायत इमारती अभावी होणारी गैरसोय लक्षात घेऊन जुन्या व जीर्ण झालेल्या ग्रामपंचायत कार्यालय इमारतींचे ठिकाणी नवीन इमारतीचे कामांना मंजूरी मिळावी याकरीता संबंधित गावचे सरपंच व ग्रामस्थ यांनी महाराष्ट्र राज्याचे राज्य उत्पादन शुल्कमंत्री ना.शंभूराज देसाई यांचेकडे मागणी केली होती. त्यांचे मागणीनुसार मंत्री ना.शंभूराज देसाई यांनी राज्याचे ग्रामविकास विभागाकडे संबंधित गावांमध्ये नवीन ग्रामपंचायत कार्यालय इमारतींची कामे मंजूर होण्याकरीता शिफारस केली होती. दरम्यान राज्यातील ज्या ग्रामपंचायतींना स्वत:च्या कार्यालयासाठी स्वतंत्र इमारत नाही अशा ग्रामपंचायतींना स्वतंत्र कार्यालयाची इमारत बांधण्यासाठी मा.बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजना हि योजना राज्य शासनाचेवतीने राबविण्यात येत आहे. ना.शंभूराज देसाई यांनी शिफारस केलेल्या पाटण तालुक्यातील पाटण तालुक्यातील पाठवडे,नेचल,कळंबे,शितपवाडी,कोचरेवाडी,लुगडेवाडी,सातर,हुंबरवाडी,टेळेवाडी,आंबवणे,काढोली,नाव,किल्ले मोरगिरी, पाचगणी, पाळशी,गावडेवाडी,गोकूळ तर्फ पाटण,चौगुलेवाडी (सां),ढाणकल,रुवले,पापर्डे,नुने या गावांमध्ये मा.बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेअंतर्गत नवीन ग्रामपंचायत कार्यालय इमारतींचेच्या कामांना मंजूरी देण्यात आली असून याबाबतचा शासन निर्णय राज्य शासनाचे ग्रामविकास विभागाने दि. 05 जुलै,2024 रोजी पारित केला आहे.त्यामुळे पाटण तालुक्यातील मंजूर झालेल्या पाठवडे, नेचल, कळंबे, शितपवाडी, कोचरेवाडी, लुगडेवाडी, सातर, हुंबरवाडी, टेळेवाडी, आंबवणे, काढोली,नाव,किल्ले मोरगिरी, पाचगणी, पाळशी,गावडेवाडी,गोकूळ तर्फ पाटण,चौगुलेवाडी (सां),ढाणकल,रुवले,पापर्डे,नुने या गावांना  नवीन ग्रामपंचायत इमारती  होणार असून प्रत्येक ग्रामपंचायतीच्या नवीन इमारतीचे बांधकामासाठी प्रत्येकी 20 लाख रुपये प्रमाणे 4 कोटी 45 लक्ष रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याने या ग्रामपंचायतीमधील दैनंदिन कार्यालयीन कामकाज सुरळीत होऊन नवीन सोयी-सुविधांसह या इमारतींची कामे होणार आहेत.दरम्यान मा.बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेअंतर्गत या अगोदर पाटण तालुक्यातील बांधवाट, बोडकेवाडी, जळव,उधवणे,चाळकेवाडी, मरळी, भुडकेवाडी, ठोमसे, घोट,कोळेकरवाडी,नाटोशी,बांबवडे व येराडवाडी या गावांमध्ये मंत्री ना.शंभूराज देसाई यांचे प्रयत्नातून नवीन ग्रामपंचायत कार्यालय इमारतींची कामे मार्गी लावण्यात आली आहेत. स्थानिक स्वराज्य संस्था असलेल्या ग्रामपंचायतींना सर्व सोयींनीयुक्त अशी नवीन इमारती होणार असल्याने ग्रामपंचायतींमधून ग्रामस्थांच्या असलेल्या अडी-अडचणी सोडविण्याच्यादृष्टीने दैनंदिन कामकाज सुलभ होण्यास मदत होणार आहे. मा.बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या कामांचे लवकरात लवकर निविदा प्रक्रिया करण्यात येऊन ही कामे तातडीने मार्गी लावण्याच्या सूचना ना.शंभूराज देसाई यांनी संबंधित अधिकाऱ्यांना केल्या असल्याची माहितीही शेवटी प्रसिध्दीपत्रकांत देण्यात आली आहे.

पाटण मतदारसंघातील 26 तलाठी कार्यालयांचे बांधकामासाठी 3 कोटी 90 लक्ष रुपयांची तरतूद. ना.शंभूराज दसेाई यांचे प्रयत्नातून मतदारसंघात 26 तलाठी कार्यालयांच्या इमारतींचा प्रश्न मार्गी.

 

 

  दौलतनगर दि.11:- पाटण विधानसभा मतदारसंघामध्ये तलाठी सजा असलेल्या गावांच्या ठिकाणी सुसज्ज असे तलाठी कार्यालयांच्या इमारतींचे बांधकामासाठी निधी मंजूर होण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क मंत्री ना.शंभूराज देसाई यांनी महसूल मंत्री ना.राधाकृष्ण विखे-पाटील यांचेकडे शिफारस केली होती. त्यानुसार राज्याचे पुरवणी अर्थसंकल्पामध्ये पाटण मतदारसंघातील 26 नवीन तलाठी कार्यालयांच्या इमारतींचे बांधकामासाठी 3 कोटी 90 लक्ष रुपयांची तरतूद करण्यात आली असल्याची माहिती पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे कार्यालयाचेवतीने प्रसिध्दीपत्रकांत देण्यात आली आहे.

           प्रसिध्दीपत्रकांत पुढे म्हंटले आहे की, पाटण मतदासंघामध्ये तलाठी सजा असलेल्या गावांमध्ये तलाठी कार्यालयांसाठी स्वतंत्र अशा इमारती नसून या गावांमध्ये भाडयाचे खोलीमध्ये किंवा त्या-त्या विभागातील मुख्य बाजारपेठेचे गाव असलेल्या ठिकाणी तलाठी कार्यालयांचे  कामकाज सुरु असून याच ठिकाणी  सर्व कागदपत्रांचे रेकॉर्ड ठेवले जात आहे.त्यामुळे गावाला सजा असूनही इमारतीच्या अभावी गावा-गावांतील लोकांना कामकाज सुरु असलेल्या तलाठी कार्यालयात कामासाठी त्या-त्या विभागातील मुख्य बाजारपेठ असलेल्या ठिकाणी जावे  लागत असल्याने या नागरीकांचा वेळेसह आर्थिक भुर्दंड सोसावा लागत असल्याने नागरीकांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन पाटण विधानसभा मतदारसंघातील तलाठी सजा असलेल्या ठिकाणी सुसज्ज अशी अद्यावत इमारती मंजूर होण्यासाठी पालकमंत्री ना.शंभूराज देसाई हे प्रयत्नशील होते.त्यानुसार त्यांनी राज्याचे महसूल मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांचेकडे मतदारसंघातील 26 तलाठी कार्यालयांच्या इमारतीचे बांधकामासाठी निधी मंजूर होण्यासाठी शिफारस केली होती.त्यानुसार महसूल विभागाकडून संबंधित 26 तलाठी कार्यालयांच्या इमारतीचे बांधकामासाठी निधी मंजूर होण्यासाठीचा आवश्यक तो प्रस्तावही सादर करण्यात आला होता.नुकतेच मुंबई या‍ ठिकाणी सुरु असलेल्या पावसाळी अधिवेशनात पुरवणी अर्थसंकल्पामध्ये पाटण विधानसभा मतदारसंघातील 26 नवीन तलाठी कार्यालयांचे बांधकामासाठी 3 कोटी 90 लक्ष रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. मंजूर झालेल्या नवीन तलाठी कार्यालयांमध्ये मरळी,सांगवड,कोकीसरे,आंब्रुळे,सोनवडे,काळगाव,चोपडी,नाटोशी,चाफळ,येराड,आवर्डे,नवसरी,घोट,नुने,डेरवण,मरळोशी, हेळवाक,वेताळवाडी,शेडगेवाडी,दिवशी बुद्रुक,विहे,कुंभारगाव,मारुलहवेली,कडवे बुद्रुक,पाडळोशी व वेखंडवाडी या तलाठी सजा असलेल्या गावांचा समावेश असून या ठिकाणी तलाठी कार्यालयांसाठी आता नव्याने इमारती होणार असल्याने गावा-गावातील तलाठयांकडे असणारी कामे ही गावांमध्येच होण्यासाठी याचा मोठा फायदा होणार असून नवीन तलाठी इमारतींमध्ये कार्यालयीन कामकाज करताना मोठी सुलभता येणार आहे.

चौकट: ना.शंभूराज देसाई यांचे प्रयत्नातून मतदारसंघात सुसज्ज  लाठी कार्यालय

सन 2014 ते 19 या पंचवार्षिकमध्ये पाटण मतदारसंघातील तारळे,नाडे,ऊरुल,आडूळपेठ,मल्हारपेठ व बहुले या 6 ठिकाणी नवीन तलाठी कार्यालयांचे बांधकामासाठी निधी मंजूर करण्यात येऊन या तलाठी कार्यालयांच्या इमारतींची कामे पूर्ण होऊन या इमारतींमध्ये सध्या कामकाज सुरु आहे.तर नुकतेच मुंबई या ठिकाणी सुरु असलेल्या पावसाळी अधिवेशनादरम्यान पुरवणी अर्थसंकल्पामध्ये 26 तलाठी कार्यालयांचे नवीन इमारतींचे बांधकामासाठी 3 कोटी 90 लक्ष रुपयांची तरतूद करण्यात आली असल्याने पाटण मतदारसंघातील 32 तलाठी कार्यालयांच्या स्वतंत्र इमारतींचा प्रश्न ना.शंभूराज देसाई यांचे माध्यमातून मार्गी लागला आहे.