Tuesday 23 July 2024

मंत्री ना.शंभूराज देसाईंच्या माध्यमातून पाटण मतदारसंघातील 123.500 ‍कि.मी.लांबीच्या ग्रामीण व इतर जिल्हा मार्ग रस्त्यांना प्रमुख जिल्हा मार्ग म्हणून दर्जोन्नती. दर्जोन्नत रस्त्यांवर राज्याच्या अर्थसंकल्पातून निधी खर्ची पडणार.

 


 

            दौलतनगर दि.०६:- राज्याच्या राज्य उत्पादन शुल्कमंत्री या महत्वाच्या खात्यांच्या मंत्रीपदाबरोवर सातारा व ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री या महत्वाचे पदावर विराजमान झालेले ना.शंभूराज देसाई यांचेकडे राज्याच्या या महत्वाच्या खात्याची जबाबदारी असताना देखील त्यांनी आपल्या पाटण विधानसभा मतदारसंघातील विविध जनहितार्थ कामांवरील लक्ष अजिबात विचलीत केले नाही. आपल्याला मिळालेल्या मंत्रीपदाचा लाभ हा पाटण मतदारसंघातील जनतेला झालाच पाहिजे ही त्यांची भूमिका असून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे व सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्रजी चव्हाण यांचेकडे शिफारस करत पाटण विधानसभा मतदारसंघातील ग्रामीण रस्त्यांना प्रमुख जिल्हा मार्ग म्हणून दर्जोन्नती देण्याचा विषय मार्गी लावून घेतला आहे. ना.शंभूराज देसाईंच्या माध्यमातून पाटण विधानसभा मतदारसंघातील 123.500 किलोमीटर लांबीच्या ग्रामीण व  इतर जिल्हा मार्गाच्या रस्त्यांना  5 प्रमुख जिल्हा मार्ग म्हणून दर्जोन्नती मिळाली असून दर्जोन्नती झालेल्या दर्जोन्नत रस्त्यांवर आता राज्याच्या अर्थसंकल्पातून निधी खर्ची पडणार आहे.

                पाटण विधानसभा मतदारसंघातील डोंगरी आणि दुर्गम भागातील ग्रामीण व इतर जिल्हा मार्गाच्या रस्त्यांना प्रमुख जिल्हा मार्ग याप्रमाणे दर्जोन्नती मिळणेचा विषय राज्याच्या सार्वजनीक बांधकाम विभागाकडे प्रलंबीत होता याकरीता ना.शंभूराज देसाईंनी गत काही दिवसापासून शासनाकडे पाठपुरावा करुन पाटण मतदारसंघातील ग्रामीण व इतर जिल्हा मार्गाच्या रस्त्यांना प्रमुख जिल्हा मार्ग असा दर्जा मिळणेकरीताचा आराखडा जिल्हा परीषद बांधकाम व सार्वजनीक बांधकाम विभागामार्फत तयार करुन घेतला मुख्यमंत्री ना. एकनाथजी शिंदे व बांधकाम मंत्री ना.रविंद्रजी चव्हाण यांचे निर्दशनास आणून देत या ग्रामीण व इतर जिल्हा मार्गावरील रस्त्यांच्या कामांना प्रमुख जिल्हा मार्ग म्हणून दर्जोन्नती देण्याची आग्रही मागणी केली. त्यांनीही तात्काळ या प्रस्तावास मान्यता देवून पाटण विधानसभा मतदारसंघातील 123.500 किलोमीटर लांबीच्या एकूण  ग्रामीण व इतर जिल्हा मार्गाच्या रस्त्यांना  5 प्रमुख जिल्हा मार्ग म्हणून दर्जोन्नती दिली. दर्जोन्नती दिल्याचा शासन निर्णय सार्वजनीक बांधकाम विभागाने दि.22 जुलै 2024 रोजी पारित केला असून या निर्णयामध्ये ग्रामीण आणि इतर जिल्हा मार्गावरील रस्त्यांचा समावेश आहे. दर्जोन्नती मिळालेल्या ग्रामीण आणि इतर जिल्हा मार्गावर आता राज्य शासनाच्या अर्थसंकल्पातून निधी उपलब्ध होणार असून दळणवळणाच्या दृष्टीने पाटण मतदारसंघाच्या विकासात यामुळे भर पडणार आहे.

                ना.शंभूराज देसाईंच्या आग्रही मागणीमुळे राज्य शासनाच्या सार्वजनीक बांधकाम विभागाने पाटण विधानसभा मतदारसंघातील दर्जोन्नती दिलेल्या 5 रस्त्यांमध्ये प्रजिमा -54 ते पवारवाडी मेंढ निवी डाकेवाडी मस्करवाडी लोटलेवाडी काळगांव भरेवाडी रामिष्टेवाडी  प्रजिमा 162 दर्जोन्नतीची लांबी 20 कि.मी, मोरगिरी किल्लेमोरगिरी गुंजाळी बनपेठवाडी येराड ढेरुगडेवाडी विठ्ठलवाडी कारवट सावंतवाडी बाजे नाणेल रासाठी रस्ता प्रजिमा 163 दर्जोन्नतीची लांबी 30 कि.मी, प्रजिमा-66 खळे ते गुढेकरवाडी मालदन साबळेवाडी शितपवाडी बाचोली महिंद सळवे पाळशी रस्ता प्रजिमा 164 दर्जोन्नतीची लांबी 21 कि.मी, प्रजिमा - 58 ते आसवलेवाडी भालेकरवाडी शिंगमोडेवाडी बनपुरी शिंदेवाडी जोंजाळवाडी रुवले ते जिंती ते प्रजिमा -126 पर्यंत प्रजिमा 165 रस्ता दर्जोन्नतीची लांबी 26 कि.मी, वाघजाईवाडी नाणेगांव जाळगेवाडी चव्हाणवाडी दुसाळे प्रतिमा-37 ते पाबळवाडी फडतरवाडी खडकवाडी जंगलवाडी तारळे रस्ता प्रजिमा 166 दर्जोन्नतीची लांबी 26.500 कि.मी,  असे एकूण 123.500 किलोमीटर लांबीच्या ग्रामीण व इतर जिल्हा मार्गाच्या एकूण 5 रस्त्यांना प्रमुख जिल्हा मार्ग म्हणून दर्जोन्नती देण्यात आली आहे. राज्याचे मुख्यमंत्री ना. एकनाथजी शिंदे व सार्वजनिक बांधकाम मंत्री ना.रविंद्रजी चव्हाण यांनी पाटण विधानसभा मतदारसंघातील ग्रामीण व इतर जिल्हा मार्गावरील रस्त्यांच्या कामांना तात्काळ प्रमुख जिल्हा मार्ग म्हणून दर्जोन्नती दिल्याबद्दल ना.शंभूराज देसाईंनी त्यांचे विशेष आभार मानले असून या 5 रस्त्यांच्या कामांवरील अत्यंत खराब झालेल्या रस्त्यांच्या भागांची सुधारणा करणेकरीता आवश्यक असणारा निधी उपलब्ध करुन देणेबाबत मुख्यमंत्री ना.एकनाथजी शिंदे व सार्वजनिक बांधकाम मंत्री ना.रविंद्रजी चव्हाण यांचेकडे मागणीही केली आहे.

 

No comments:

Post a Comment