दौलतनगर दि.20:-पाटण विधानसभा मतदारसंघातील डोंगरी व दुर्गम भागात वसलेल्या
गावांचे पोहोच रस्ते हे दळण वळणाच्यादृष्टीने नादुरुस्त झाले असल्याने या नादुरुस्त
रस्त्यांच्या कामांना राज्य शासनाच्या ग्रामविकास
विभागाकडून मुख्य मंत्री ग्रामसडक योजनेअंतर्ग निधी मंजूर होण्यासाठी राज्याचे राज्य
उत्पादन शुल्कमंत्री व सातारा,ठाणे जिल्हा पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी मुख्यमंत्री
ना.एकनाथजी शिंदे व ग्रामीण विकास मंत्री ना.गिरीशजी महाजन यांचेकडे शिफारस केली होती.
त्यानुसार पाटण विधानसभा मतदारसंघातील 11 गावांच्या रस्त्यांच्या कामांना मुख्यमंत्री
ग्रामसडक योजना टप्पा 2 संशोधन व विकास योजने अंतर्गत एकूण 41.500 कि.मी. लांबींच्या
11 रस्त्यांच्या कामांना 57 कोटी 48 लाख 97 हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असल्याचा
शासन निर्णय शासनाचे ग्राम विकास विभागाने पारित केला असल्याची माहिती पालकमंत्री ना.शंभूराज
देसाई यांचे कार्यालयाचेवतीने प्रसिध्दीपत्रकांत देण्यात आली आहे.
प्रसिध्दीपत्रकां
पुढे म्हंटले आहे की, पाटण हा डोंगरी व दुर्गम तालुका असून सततच्या अतिवृष्टीमुळे मतदारसंघातील
प्रमुख रस्तयांची अतिवृष्टीमध्ये मोठया प्रमाणात
दुरावस्था होत असल्याने या रस्त्यांचे पुनर्बांधणीसाठी निधीची आवश्यकता होती. दरम्यान
पाटण विधानसभा मतदारसंघातील दुर्गम भागातील गावांना पोहोच रस्त्यांच्या पुनर्बांधणीचे
कामासाठी आवश्यक तो निधी मंजूर होण्यासाठी पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी मुख्यमंत्री ना.एकनाथजी शिंदे व ग्रामीण विकास मंत्री
ना.गिरीशजी महाजन यांचेकडे शिफारस केली होती. तसेच या रस्त्यांच्या कामांना मुख्यमंत्री
ग्रामसडक योजना टप्पा 2 संशोधन व विकास योजने अंतर्गत निधी मंजूर होण्यासाठी सातत्याचा
पाठपुरावा सुरु होता.त्यानुसार पाटण विधानसभा मतदारसंघातील 11 रस्त्यांच्या कामांना
मुख्यमंत्री ग्रामसडक योजना टप्पा 2 संशोधन
व विकास योजने अंतर्गत मंजूरी मिळाली असून या कामांमध्ये टीआर 15 ते वनकुसवडे रस्ता
6.380 किमी करीता 07 कोटी 65 लाख 26 हजार तर देखभाल दुरुस्तीसाठी 36 लाख 07 हजार असा
एकूण 08 कोटी 01 लाख 33 हजार, एलआर 81 ते चव्हाणवाडी
रस्ता 4.490 किमीसाठी 06 कोटी 31 लाख 67 हजार तर देखभाल दुरुस्तीसाठी 32 लाख 90 हजार
असा एकूण 6 कोटी 64 लाख 57 हजार, जळव ते
बामणेवाडी रस्ता 9.050 किमीसाठी 10 कोटी 17 लाख 81 हजार तर देखभाल दुरुस्तीसाठी 47
लाख 64 हजार असा एकूण 10 कोटी 65 लाख 45 हजार, सळवे ते पाळशी रस्ता 6.040 किमीसाठी 06 कोटी 58 लाख 96 हजार तर देखभाल दुरुस्तीसाठी
35 लाख 99 हजार असा एकूण 6 कोटी 94 लाख 95 हजार, प्रजिमा 37 ते पाबळवाडी रस्ता 1.525 किमीसाठी 03 कोटी 12 लाख 44 हजार तर देखभाल
दुरुस्तीसाठी 11 लाख 27 हजार असा एकूण 3 कोटी 23 लाख 71 हजार, खालचे आडदेव ते वरचे आडदेव रस्ता 1.200 किमीसाठी 1 कोटी
59 लाख 34 हजार तर देखभाल दुरुस्तीसाठी 8 लाख 19 हजार असा एकूण 1 कोटी 67 लाख 53 हजार,
भरेवाडी ते काळगाव लोटलेवाडी रस्ता 2.035 किमीसाठी 2 कोटी
67 लाख 44 हजार तर देखभाल दुरुस्तीसाठी 14 लाख 02 हजार असा एकूण 2 कोटी 81 लाख 46 हजार,
कराटे रस्ता 2.150 किमीसाठी 3 कोटी 15 लाख 73 हजार तर देखभाल
दुरुस्तीसाठी 15 लाख 57 हजार असा एकूण 3 कोटी 31 लाख 30 हजार, टीआर 07 ते डावरी रस्ता 4 किमीसाठी 5 कोटी 84 लाख 57 हजार
तर देखभाल दुरुस्तीसाठी 27 लाख 70 हजार असा एकूण 6 कोटी 12 लाख 27 हजार, टीआर 02 ते डिगेवाडी 1.870 किमीसाठी 2 कोटी 63 लाख 89 हजार
तर देखभाल दुरुस्तीसाठी 12 लाख 33 हजार असा एकूण 2 कोटी 76 लाख 22 हजार तर कराड तालुक्यातील टीआर 02 ते बिरोबावाडी मंदिर
विमानतळ रस्ता 2.765 किमीकरीता 05 कोटी 07 लाख 49 हजार तर देखभाल दुरुस्तीसाठी 22 लाख
69 हजार असा एकूण 5 कोटी 30 लाख 18 हजार या 11 रस्त्यांच्या कामांसाठी मुख्यमंत्री
ग्रामसडक योजना टप्पा 2 संशोधन व विकास योजने अंतर्गत 57 कोटी 48 लाख 97 हजार निधी
मंजूर करण्यात आला आहे. मुख्यमंत्री
ग्रामसडक योजना टप्पा 2 संशोधन व विकास योजनेतून मंजूर झालेल्या 11
रस्त्यांची कामे ही सुरु होण्याच्या दृष्टीने लवकरात लवकर या कामाची निविदा प्रक्रिया
पुर्ण करुन कामे तातडीने सुरु करण्याच्या सूचना पालकमंत्री ना.शंभूराज देसाई
यांनी संबंधित अधिकारी यांना केल्या असल्याची माहिती शेवटी
प्रसिध्दीपत्रकांत देण्यात आली आहे.
No comments:
Post a Comment