दौलतनगर दि.23:- लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर
कारखाना हा नामदार शंभूराज देसाई यांचे मार्गदर्शनाखाली सहकार क्षेत्रामध्ये चांगली वाटचाल करत आहे. सध्या आपल्या कारखान्याचे
विस्तारवाढ पूर्ण झाली असून यंदाचे गळीत हंगामाची पूर्वतयारी सुरु आहे. कारखान्याने गतवर्षीचा गळीत हंगाम चांगल्या प्रकारे पुर्ण
केला होता.
यंदाच्या गळीत हंगामातही कार्यक्षेत्रातील
जास्तीत जास्त ऊसाचे गाळप करण्याचे उद्दीष्ट कारखान्याने ठेवले आहे.
नियोजनबध्द काम करुन सन 2024-25
चा गळीत हंगाम प्रतिवर्षाप्रमाणे यशस्वी करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन चेअरमन
यशराज देसाई (दादा) यांनी केले.
दौलतनगर,ता.पाटण येथील लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे सन
2024-25 चे गळीत हंगामासाठी रोलरचे पूजन
कारखान्याचे चेअरमन यशराज देसाई यांचे शुभहस्ते करण्यात आले.यावेळी
मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा.रविराज देसाई(दादा), चि.आदित्यराज देसाई,अशोकराव
पाटील, शशिकांत निकम,बबनराव शिंदे,प्रशांत पाटील,शंकरराव पाटील,सर्व
संचालक,पदाधिकारी,कार्यकारी संचालक एस.एल.देसाई यांचेसह कारखान्यातील अधिकारी व
कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी बोलताना चेअरमन यशराज देसाई (दादा) पुढे म्हणाले,लोकनेते बाळासाहेब देसाई
कारखान्याचे संस्थापक चेअरमन स्व.शिवाजीराव देसाई(आबासाहेब) यांचे विचारांचा वारसा
जोपासत आपले उद्योग समुहाचे प्रमुख व महाराष्ट्र राज्याचे राज्य उत्पादन शुल्क मंत्री
नामदार शंभूराज देसाई यांचे मार्गदर्शनाखाली आपला कारखाना उत्तरोत्तर चांगली प्रगती
करत आहे.सभासद शेतकऱ्यांचे ऊसाला योग्य दर मिळावा आणि त्यांचे आर्थिक जिवनमान उंचवावे
हे लोकनेते बाळासाहेब देसाई व स्व.शिवाजीराव देसाई (आबासाहेब) यांचे स्वप्न आपल्या
उद्योग समुहाच्या व्यवस्थापनाकडून सत्यात उतरवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला जात आहे.लोकनेते
बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याने सन 2023-24 चे गळीत हंगामामध्ये 2,24,413
मे.टन इतके ऊसाचे गाळप करुन सरासरी 11.98%
साखर उताऱ्याने 2,68,775 क्विंटल साखर उत्पादन केले असून आपण कारखान्याच्या विस्तारवाढीचे काम पूर्ण झाले आहे.तसेच कारखान्याच्या आगामी गळीत
हंगामाकरीता यंत्रसामग्री देखभाल,दुरुस्ती आदी कामे प्रगतीपथावर असून येणाऱ्या गळीत
हंगामामध्ये कारखाना कार्यक्षेत्रातील जास्तीत जास्त नोंद केलेल्या ऊसाचे गाळप करण्याचे
उद्दीष्ट व नियेाजन कारखाना व्यवस्थापनाने केले आहे.त्याचबरोबर गतवर्षीच्या सरासरी
साखर उताऱ्यामध्ये यंदाच्या वर्षी वाढ करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे ही ते म्हणाले.
गळीत हंगामाची पूर्वतयारी म्हणून मशिनरी विभागाकडील मिलमधील रोलरचे आज पूजन होत आहे.प्रतिवर्षी
कारखाना गळीत हंगामामध्ये आलेल्या अडचणींवर मात करीत, यशस्वी गळीत करण्याची आपल्या कारखान्याची परंपरा यापुढेही अशीच
ठेवण्यासाठी सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी चांगले काम करावे.आपला हा कारखाना सभादांचा
हक्काचा कारखाना असल्याने कारखाना चालविण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे.तालुक्याच्या
कार्यक्षेत्रातील जास्तीत जास्त ऊसाचे गाळप करुन
ऊस उत्पादक सभासद व शेतकरी यांना एफआरपीच्या धोरणानुसार ऊस दर देण्याचा कारखाना
व्यवस्थापनाचा नेहमीच प्रयत्न राहणार आहे.आज जरी सहकारी साखर कारखानदारीपुढे अनेक संकटे
असले तरी ऊस उत्पादक सभासद,शेतकरी,ऊस तोडणी मजूर,कारखान्यातील अधिकारी व कर्मचारी यांचे
सांघिक प्रयत्नातून या संकटांना सामोरे जाऊन त्यावर मात करत येणारा गळीत हंगाम यशस्वी
करण्याचा प्रयत्न राहणार आहे.येणारा गळीत हंगाम यशस्वी करण्यासाठी सर्व अधिकारी कर्मचारी यांनी नियोजनबध्द काम करावे.तसेच
आपले कारखाना कार्यक्षेत्रातील ऊस पिकवणाऱ्या सभासद तसेच बिगर ऊस उत्पादक शेतकरी यांनी
आपला पिकविलेला संपूर्ण ऊस आपल्या कारखान्याला गळीतास देऊन येणार गळीत हंगाम यशस्वी
करण्यासाठी सहकार्य करावे,असे आवाहनही त्यांनी शेवटी केले.
No comments:
Post a Comment