Monday 22 July 2024

चेअरमन मा.यशराज देसाई (दादा) यांनी केली ढेबेवाडी विभागातील पूरपरिस्थितीची पाहणी. ढेबेवाडी विभागातील बाचोली,खळे व काढणे या पूलांची केली पाहणी .

                                     

      

दौलतनगर दि.22:- गेली तीन ते चार दिवस पाटण तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस पडत असल्याने सर्व नद्या दुधडी भरुन वाहू लागल्या आहेत. सतत पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे नद्यावरील पूल हे पुराचे पाण्याखाली जाऊन या परिसरातील वाहतूक विस्कळीत होत आहे. ढेबेवाडी विभागातील वांग नदीवर असलेल्या बाचोली,खळे व  काढणे या तीन पुलांवरुन पुराच पाणी जाऊ लागल्याने हे पूल पाण्याखाली गेले. पाण्याखाली गेलेल्या ढेबेवाडी विभागातील या बाचोली,खळे व काढणे या तीन पुलांची पाहणी लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन मा.यशराज देसाई(दादा) यांनी पाहणी केली. दरम्यान महाराष्ट्र राज्याचे राज्य उत्पादन शुल्कमंत्री तथा सातारा व ठाणे जिल्हा पालकमंत्री ना.शंभूराज देसाई हे मुंबई याठिकाणी मंत्रालयीन काममाजामुळे पुर्णवेळ व्यस्त असल्या कारणाने त्यांच्या अनुपस्थितीमध्ये चेअरमन मा.यशराज देसाई (दादा) यांनी ढेबेवाडी विभागातील या तीन पुलांचा आज पाहणी दौरा करुन पुरपरिस्थितीची  माहिती घेतली.

                यावेळी  मा.यशराज देसाई(दादा) यांचे समवेत पंजाबराव देसाई, शिवाजीराव शेवाळे,विलास गोडांबे,अनिल शिंदे,मनोज मोहिते,मधुकर पाटील,रणजित पाटील,सचिन पाटील,सचिन यादव,शामराव कोळेकर,गजानन पाटील,अजित पाटील,प्रफुल्ल कचरे, नाना साबळे,सार्वजनिक बांधकाम,जिल्हा परिषद बांधकाम विभाग,आरोग्य विभाग,पोलीस विभागचे संबंधित अधिकारी यांचेसह विविध गावातील सरपंच,उपसरपंच, पदाधिकारी व कार्यकर्ते यांची उपस्थिती होती.

              गत चार दिवसापासून कोयना धरण पाणलोट क्षेत्रासह पाटण तालुक्यात मुसळधार पाऊस पडत असून मुसळधार पावसामुळे महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असणाऱ्या कोयना धणाच्या पाणीसाठयात झपाटयाने वाढ होत आहे. पाटण तालुक्यात सर्वदूर मुसळधार पाऊस पडत आहे. कोयना पाणलोट क्षेत्रामध्ये जादा पावसाची नोंद झाली असून कोयना धरणात 61.97 टिएमसी  पाणी साठा झालाआहे. गत चार दिवसा पासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे तारळी,उत्तर मांड धरण, मोरणा गुरेघर,वांग मराठवाडी,चिटेघर,महिंद या लहान मोठया धरणांत पाण्यासाठयामध्ये मोठी वाढ झाली असून तारळी,उत्तर मांड, मोरणा,केरा,वांग या नद्या दुधडी भरून वाहू लागल्या असून या नद्यांच्या पाणी पातळीतही वाढ झाली असल्याने काही गावे काही काळासाठी संपर्कहिन झाली होती. दरम्यान पालकमंत्री शंभूराज देसाई हे तालुकास्तरीय वरिष्ठ अधिकाऱ्यांना तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना देत आहेत. आज त्यांच्या अनुपस्थितीत युवा नेते यशराज देसाई यांनी ढेबेवाडी विभागातील वांग नदीवर असलेल्या बाचोली,खळे व  काढणे या तीन पुलांची प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी करत सार्वजनिक बांधकाम व जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना नुकसान झालेल्या  पुलांची तसेच रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करुन यावरुन वाहतूक सुरळीत करण्याच्या सूचना दिल्या. तसेच अतिवृष्टीच्या कालावधीत पुलावरुन पाणी वाहत असताना पोलीस विभागाने सुरक्षिततेच्या दृष्टीने बॅरिकेटींग करुन वाहतूक तात्काळ बंद करण्याबरोबर रात्री संबंधित पुलांवर बंदोबस्त तैनात करण्याच्या सूचना केल्या. तसेच महसूल विभागाने  पुलावरुन ये-जा करणाऱ्या नागरीकांना प्रशासनामार्फत योग्य ती खबरदारी घेण्यासंदर्भात गावामध्ये सर्व नागरीकांना माहिती देण्यात यावी जेणेकरुन कोणतीही  अनुचित घटना घडणार नाही याची प्रशासनाकडून काळजी घेण्यासंदर्भात उपस्थित शासकीय अधिकाऱ्यांसमवेत चर्चा केली.

चौकट: मा.यशराज देसाई यांची तशीच कार्यतत्परता…

         लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे पासून देसाई घराण्याची  पाटण विधानसभा मतदारसंघातील सामान्य जनतेविषयी असलेली तळमळ आजही अनेक प्रसंगातून पाहवयास मिळते.पालकमंत्री  शंभूराज देसाई हे ज्या पध्दतीने आपत्कालीन परिस्थितीमध्ये,संकटामध्ये सामान्य जनतेच्या पाठीशी ठामपणे उभे राहिलेले दिसतात.अतिवृष्टी असो की पूरपरिस्थिती या दोन्ही वेळेला ना.शंभूराज देसाई यांनी आपद्ग्रस्तांना नेहमीच मदतीचा हात दिला.त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून मा.यशराज देसाई हे सुध्दा पाटण विधानसभा मतदारसंघातील आपत्कालीन परिस्थितीचा आढावा घेत ढेबेवाडी विभागातील पूरपरिस्थितीची  पाहणी करत उपस्थित नागरीकांशी संवाद साधत अडी-अडचणी विचार होते तर अधिकाऱ्यांना सूचना करत होते.लोकनेते बाळासाहेब देसाई,ना.शंभूराज देसाई यांचे प्रमाणे मा.यशराज देसाई यांचीही तशीच कार्यतत्परता असल्याची कुजबूज उपस्थितांमध्ये होती.    

 

No comments:

Post a Comment