दौलतनगर दि.05:- महाराष्ट्राचे पर्यटन मंत्री ना.शंभूराज देसाई यांचे संकल्पनेतून
पाटण विधानसभा मतदारसंघातील हेळवाक ते पापर्डे या दरम्यान जलपर्यटन हा प्रकल्प
साकारात आहे. जलपर्यटन वाढीस चालना देण्याकरीता कोयना नदीकाठी येराड येथील श्री येडोबा
मंदिर परिसरामध्ये जलपर्यटनाच्या अनुषंगाने विविध विकास कामांना मंत्री ना.शंभूराज देसाई यांनी प्रादेशिक पर्यटन
विकास योजने अंतर्गत निधी मंजूर केला आहे. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या कोयना
नदीकाठी येराड येथील श्री येडोबा मंदिर
परिसरामध्ये जलपर्यटनाच्या अनुषंगाने जेट्टी,बोट थांबा,काठावरील पर्यटक
केंद्र,स्वच्छता गृह ई. बांधकाम करण्याच्या कामांना 4 कोटी 95 लक्ष
रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याचा शासन निर्णय शासनाचे पर्यटन व सांस्कृतिक कार्य
विभागाने पारित केला असल्याची माहिती पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे
कार्यालयाचेवतीने प्रसिध्दीपत्रकांत देण्यता आली आहे.
प्रसिध्दीपत्रकांत पुढे म्हंटले
आहे की, पाटण विधानसभा मतदारसंघातील हेळवाक ते पापर्डे दरम्यान जल पर्यटन प्रकल्प
होण्यासाठी पालकमंत्री ना.शंभूराज देसाई
यांनी निधी मंजूर केला आहे. त्यानुसार हेळवाक व पापर्डे या ठिकाणी दोन बोटींग
स्पॉट निश्चित करण्यात येऊन जलपर्यटनाच्यादृष्टीने या दोन स्पॉट विकसित करण्याकरीता आवश्यक ती कामे हाती
घेण्यात आली आहेत. पालकमंत्री ना.शंभूराज
देसाई यांचे संकल्पनेतून साकारत असलेल्या या जलपर्यटनामुळे स्थानिकांना रोजगार
उपलब्ध होणार असून महाराष्ट्रासह इतर राज्यातील पर्यटकांसाठी एक पर्वणी ठरणारा हा
जलपर्यटन प्रकल्प पाटण मतदारसंघात साकारत आहे. हेळवाक ते पापर्डे दरम्यान एक बोट
थांबा विकसित करण्यासंदर्भात पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी सर्व संबंधित
अधिकारी यांना घेऊन कराड चिपळूण महामार्गावरील महाराष्ट्रातील प्रसिध्द
तिर्थक्षेत्र असलेल्या येराड ता.पाटण येथील श्री येडाबा मंदिर परिसरातील कोयना नदी
काठी असलेल्या जागेची प्रत्यक्ष जाऊन
पाहणी केली होती.त्यानंतर सर्व शासकीय अधिकारी यांचे समवेत झालेल्या बैठकीमध्ये
जलपर्यटनाच्यादृष्टीने बोट थांबा विकसित करण्यासाठी येराड हे ठिकाण निश्चित करुन बोट थांबा विकसित
करण्याच्या अनुषंगाने या ठिकाणी जी विकास
कामे मार्गी लावणे गरजेचे आहे अशा विकास कामांचा प्रस्ताव तातडीने शासनास सादर करावा
अशा सुचना पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी अधिकाऱ्यांना केल्या होत्या.तद्नंतर
सदरचा बोट थांबा विकसित करण्याचा प्रस्ताव शासनाकडे सादर झाल्यानंतर प्रादेशिक पर्यटन विकास योजने अंतर्गत महाराष्ट्र
पर्यटन विकास महामंडळाच्या कोयना नदीकाठी येराड येथील श्री येडोबा मंदिर
परिसरामध्ये जलपर्यटनाच्या अनुषंगाने
आवश्यक असलेल्या विकास कामांना 4 कोटी 95 लक्ष रुपयांचा निधी मंजूर झाला
असल्याचा शासन निर्णय शासनाचे पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाने पारित केला आहे. त्यानुसार महाराष्ट्र पर्यटन
विकास महामंडळाकडून श्री येडोबा मंदिर येराड परिसरामध्ये बोट थांबा विकसित
करण्यासाठी जेट्टी,बोट थांबा,काठावरील पर्यटक केंद्र,स्वच्छता गृह ई. बांधकाम
करण्यासारखी कामे मार्गी लागणार असून राज्यासह इतर भागातून येणाऱ्या पर्यटकांसाठी विविध सोयी सुविधा उपलब्ध करुन दिल्या जाणार
आहेत.दरम्यान पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी प्रादेशिक पर्यटन विकास योजने
अंतर्गत मंजूर केलेल्या निधीचा शासन निर्णय हा समस्थ ग्रामस्थ मंडळ येराड यांना
सुपुर्द केला.
चौकट: ना.शंभूराज देसाई यांनी श्रध्देपोटी प्रादेशिक पर्यटन
योजनेधून पहिला निधी श्री येडोबा देवस्थानला मंजूर.
कराड चिपळूण या राष्ट्रीय महामार्गावरील
महाराष्ट्रातील प्रसिध्द तिर्थक्षेत्र असलेल्या येराड येथील श्री येडोबा मंदिर या
ठिकाणी दररोज हजारो भाविक भक्त हे भेट देत असतात. पालकमंत्री ना.शंभूराज देसाई
यांची पहिल्यापासून येराड येथील श्री येडोबा देवावर श्रध्दा असल्याने ते
शुभकार्याप्रसंगी पहिल श्री येडोबा चरणी नतमस्तक होऊन आशिर्वाद घेतात. पालकमंत्री
ना.शंभूराज देसाई यांच्या माध्यमातून क वर्ग तिर्थक्षेत्र असलेल्या श्री येडोबा
मंदिराच्या परिसरामध्ये विविध विकासाची कामे मार्गी लागली असून भाविक भक्तांना
विविध सोयी सुविधा देण्यात आल्या आहेत.दरम्यान ना.शंभूराज देसाई यांचे प्रयत्नातून
प्रादेशिक पर्यटन विकास योजने अंतर्गत येराड येथील श्री येडोबा मंदिर परिसरामध्ये
जलपर्यटनासाठी महत्त्वपूर्ण असलेला बोट
थांबा महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाकडून विकसित होणार असल्याने येराड येथील
श्री येडोबा मंदिर परिसराचा कायापालट होणार आहे.तसेच येराड येथे येणाऱ्या
पर्यटकांना महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाकडून चांगल्या सुविधा पुरविण्यावर भर
राहणार असल्याने पर्यटकांची गैरसाय दूर होण्यास मदत होणार असल्याने पालकमंत्री
ना.शंभूराज देसाई यांनी श्री येडोबा देवावरील
श्रध्देपोटी प्रादेशिक पर्यटन योजनेमधील पहिला निधी श्री येडोबा देवस्थान
परिसरातील कामांसाठी मंजूर केला आहे.