Thursday 28 December 2017

दादा, पाटणच्या आमदारांची धमक सामान्य जनतेने लोकमतातून दाखवून दिली आहे. सामान्य जनता हीच आमदारांची धमक आहे. आमदार शंभूराज देसाईंचे आमदार अजित पवारांना प्रतिउत्तर.



पाटणच्या आमदारांची धमक काय आहे ? हे राज्याचे माजी उपमुख्यमंत्री राहिलेले आमदार अजित पवार यांना चांगलीच माहिती आहे आणि पाटण मतदारसंघातील सामान्य जनतेने ती लोकमतातूनही दाखवून दिली आहे. याच धमकची धडकी भरल्याने आमदार अजित पवारदादांनी त्यांच्या पक्षाच्या माजी आमदारांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आयोजीत केलेल्या कार्यक्रमात माझेवर पाटणच्या आमदारांकडे धमक नाही हे केलेले वक्तव्य राज्याचे माजी उपमुख्यमंत्री राहिलेल्या दादांना आणि त्यांच्या कार्याला न शोभणारे आहे. दादा, तुमच्यासारखी आर्थिक धमक पाटणच्या आमदारांकडे नक्कीच नाही हे खरे आहे पण पाटणच्या आमदारांची धमक मतदारसंघातील सामान्य जनता आहे ही सामान्य जनता आमदारांच्या पाठीशी ठाम उभी आहे म्हणूनच या जनतेमध्ये बुध्दीभेद करण्यासाठी तुम्हाला बोलावून टिका करायला लावणे हा तुमच्या पक्षाच्या माजी आमदारांचा केविलवाणा प्रयत्न आहे दुसरे काहीही नाही असे प्रतिउत्तर आमदार शंभूराज देसाईंनी माजी उपमुख्यमंत्री आमदार अजितदादा पवार यांना प्रसिध्दीपत्रकाव्दारे दिले आहे.

      आमदार शंभूराज देसाईंनी दिलेल्या पत्रकात म्हंटले आहे की, अजितदादा,पाटणच्या आमदारांची धमक काय आहे याचे अनुभव आपण अनेकदा घेतले आहेत.तुम्ही तुमच्या पक्षाच्या माजी आमदारांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने पाटण तालुक्यात येवून तुमच्या माजी आमदारांचे कौतुक करत बसा.तालुक्यातील जनतेला याचे काहीएक घेणेदेणे नाही परंतू वाढदिवसाच्या कार्यक्रमात माजी आमदारांना बरे वाटावे म्हणून माझेवर केलेली नाहक टिका ही तुम्हाला न शोभणारी आहे.तुमचा पक्ष वेगळा असला तरी तुमच्या मैत्रीखातर अनेकदा मी तुम्हाला पक्ष बाजूला ठेवून सहकार्याची भूमिका ठेवली आहे याचा विसर पडू देवू नका.मैत्रीखातर मी आजपर्यंत मर्यादा ठेवूनच बोलत होतो परंतू माझी कामगिरी काय असा सवाल करुन आपण जी माझेवर नाहक टिका केली आहे ही तुम्हाला न शोभणारी आहे. माझी कामगिरी माझे मतदारसंघातील जनतेने लोकमतातून अनेकदा दाखवून दिली आहे. अजितदादा, तुमच्यासारखी तसेच पाटण मतदारसंघातील तुमच्या सहका-यांसारखी आर्थिक धमक पाटणच्या आमदारांकडे नक्कीच नाही हे एकशे एक टक्के खरे आहे पण पाटणच्या आमदारांची धमक मतदारसंघातील सामान्य जनता आहे ही सामान्य जनता तुमच्या सहका-यांच्या आर्थिक धमकच्या मागे नाही तर सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवून त्यांना विकासाच्या मार्गावर नेणा-या आमदारांच्या पाठीशी ठाम उभी आहे.आणि जनता ठामपणे ज्या आमदारांच्या मागे उभी आहे तो आमदार तुमच्या पक्षाचा नाही याचे तुम्हाला वाईट वाटणे स्वाभाविक आहे.तुमच्या पक्षाच्या माजी आमदारांनी विकास न करता आत्तापर्यंत नुसत्याच थापा मारल्याने मतदारसंघातील सुज्ञ सर्वसामान्य जनतेने त्यांना आणि त्यांच्या सुपुत्रांना घरी बसण्याचा सल्ला दिला आहे यावरुनच पाटणच्या आमदारांकडे किती धमक आहे हे सिध्द झाले आहे. पाटणच्या आमदारांची धमक तुम्ही विधानसभेतील एक सहकारी म्हणून पहातच आहात ती धमक तुम्हाला माझेअगोदरच्या आमदारांकडून पहायला मिळाली नाही याचे तुम्हाला वाईट वाटणे सहाजिकच आहे पाटणच्या आमदारांची हीच धमक पाहून तुमच्या पक्षाच्या माजी आमदारांना धडकी भरल्याने माझेवर नाहक टिका करण्याकरीता तुम्हाला निमंत्रीत केले होते हे समजण्याइतकी पाटण मतदारसंघातील जनता दादा, आता नक्कीच शहाणी झाली आहे. असे सांगून त्यांनी म्हंटले आहे की, आमचे मतदारसंघातील डोंगरी आणि दुर्गम भागातील सर्वसामान्य शेतक-यांची आर्थिक वाहिनी असणारा लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखाना कसा बंद पडेल आणि तुमच्या पक्षाच्या माजी आमदारांना याचा कसा फायदा होईल याकरीता दादा तुम्ही नाही परंतू तुमच्या नेत्यांनी केलेले प्रयत्न आमच्या कारखान्यांच्या सभासदांच्या अजुनही स्मरणात आहेत.आणि याचा विसर आम्हाला कधीही पडणार नाही डोंगरी भागातील कारखाना कसा चालवायचा आणि तो कसा चालवावा लागतो हे तुम्हाला चांगलेच माहिती आहे. ते मी तुम्हाला सांगण्याची गरज नाही परंतू अजितदादा, आमच्या कारखान्यावर बोलण्याआधी आपण खाजगी नाही परंतू डोंगरी भागातील एखादा सहकारी साखर कारखाना चालवून बघा म्हणजे तुम्हालाही तुमच्या पक्षाच्या माजी आमदारांना डोंगरी भागातील सहकारी साखर कारखाना चालविण्यामध्ये किती अडचणी येतात आणि तुमच्या पक्षाच्या माजी आमदारांप्रमाणे अडचणी निर्माण करणारेही कितीजण येतात हे आवर्जुन सांगता येईल असा टोलाही आमदार शंभूराज देसाईंनी अजितदादा पवार यांना प्रतिउत्तर देताना पत्रकात लगाविला आहे.

उमरकांचन येथील ६१ प्रकल्पबाधितांना तडसरला पुनर्वसनासाठी ५८ हे. ७६ आर गायरान जमिन मान्य. महसूल व वन विभागाकडून दि.२७ रोजी शासन निर्णय पारित. आमदार शंभूराज देसाईंची माहिती.


पाटण तालुक्यातील वांग मराठवाडी धरणप्रकल्पातील पुर्णत: बाधित मौजे उमरकांचन येथील ६१ धरण प्रकल्पबाधितांना पुनर्वसनासाठी सांगली जिल्हयातील तडसर ता.कडेगांव येथील ५८ हेक्टर ७६ आर एवढी आवश्यक असणारी गायरान जमिन उपलब्ध करुन दयावी अशी आमची शासनाकडे सातत्याची मागणी होती.राज्याचे मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांचेकडे या कामासाठी आमचा पाठपुरावा सुरु होता मुख्यमंत्री फडणवीस यांनी आमचे मागणीची आणि पाठपुराव्याची गांभीर्याने दखल घेत उमरकांचन येथील ६१ धरण प्रकल्पबाधितांना पुनर्वसनासाठी तडसर ता.कडेगांव जि.सांगली येथील ५८ हेक्टर ७६ आर एवढी आवश्यक असणारी गायरान जमिन उपलब्ध करुन देण्याचा धोरणात्मक असा निर्णय घेतला असून शासनाच्या महसूल व वन विभागाने ही गायरान जमिन उमरकांचन येथील ६१ प्रकल्पबाधितांना पुनर्वसनासाठी देण्याची मान्यता दिली असल्याचा शासन निर्णय दि.२७ डिसेंबर,२०१७ रोजी पारित केला असल्याची माहिती आमदार शंभूराज देसाई यांनी दिली असून या धोरणात्मक निर्णयामुळे मौजे उमरकांचन येथील या ६१ प्रकल्पग्रस्तांचा अनेक वर्षाचा वनवास संपला असल्याची प्रतिक्रिया त्यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे दिली आहे.

आमदार शंभूराज देसाईंनी दिलेल्या पत्रकात म्हंटले आहे की, दि.१८/०५/२०१७ रोजी राज्याचे मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस हे सातारा जिल्हयाच्या दौ-यावर आले असताना त्यांचे अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जिल्हा नियोजन सभागृहामध्ये झालेल्या आढावा बैठकीत मी पाटण तालुक्यातील वांग मराठवाडी धरण प्रकल्पातील मौजे उमरकांचन येथील पुर्णत: बाधित ६१ धरण प्रकल्पबाधितांनी त्यांच्या पुनर्वसनासाठी सांगली जिल्हयातील तडसर ता.कडेगांव येथे उपलब्ध असणारी गायरान जमिन पसंत केली आहे. या ६१ प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी सुमारे ५८ हेक्टर ७६ आर एवढया गायरान जमिनीची आवश्यक आहे ही गायरान जमिन उमरकांचन येथील पुर्णत: बाधित ६१ धरण प्रकल्पबाधितांना तात्काळ प्राधान्याने उपलब्ध करुन दयावी अशी मागणी केली होती तर याचदिवशी मुख्यमंत्री ना.फडणवीस साहेब यांना माझे निवासस्थानी चहापानास निमंत्रीत केले होते तेव्हा या प्रकल्पातील पुर्णत: बाधित कुंटुबातील शिष्टमंडळास मुख्यमंत्री यांना भेटवूनही हा विषय मी त्यांचेकडे मांडला होता. मुख्यमंत्री यांनी या विषयांची गांभीर्याने दखल घेवून मी उद्या सांगली जिल्हयाच्या दौ-यावर असून या शिष्टमंडळातील काही ठराविक प्रकल्पग्रस्तांना मला सांगली याठिकाणी भेटण्यास सांगा.सांगलीचे जिल्हाधिकारी यांना तात्काळ या जमिनीची पहाणी करुन अहवाल सादर करण्याच्या सुचना दिल्या जातील असे आश्वासन दिले होते. त्यानुसार या शिष्टमंडळातील काही ठराविक प्रकल्पग्रस्त यांनी मुख्यमंत्री यांची सांगली याठिकाणी जावून भेट घेतल्यानंतर मुख्यमंत्री यांचे आदेशावरुन सांगलीचे जिल्हाधिकारी व शासनाचे महसुल विभागाचे अधिकारी यांनी संयुक्त पहाणी करुन तडसर ता.कडेगांव जि.सांगली येथील सदर गायरान जमिनींचा अहवाल सादर केल्यानंतर मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांनी पाटण तालुक्यातील वांग मराठवाडी धरण प्रकल्पातील मौजे उमरकांचन येथील पुर्णत: बाधित ६१ प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी सांगली जिल्हयातील तडसर ता.कडेगांव येथील ५८ हेक्टर ७६ आर एवढी आवश्यक असणारी गायरान जमिन उपलब्ध करुन देण्याचा धोरणात्मक असा निर्णय घेतला असून शासनाच्या महसूल व वन विभागाने दि.२७ डिसेंबर, २०१७ रोजी हा निर्णय पारितही केला आहे. शासनाने पारित केलेल्या निर्णयामध्ये मौजे तडसर ता.कडेगांव जि.सांगली येथील गट नं.१००१,१०२७,११६०,११६२/१,११६३ व ११८३ हे पुर्णत: व गट नं.११६७,११६४ हे अंशत: असे आठ गट नंबरचे शेती वाटपाकरीता ५४ हेक्टर ९२ आर व गावठाणासाठी ३ हेक्टर ८४ आर असे एकूण ५८ हेक्टर ७६ आर गायरान क्षेत्र जिल्हाधिकारी तथा उपसंचालक (पुनर्वसन) सांगली यांचेकडे महसूलमुक्त व भोगवठारहित कब्जेहक्काने सातारा जिल्हयातील वांग मराठवाडी धरण प्रकल्पाचे एकूण बाधित ६१ प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी प्रदान करण्यास शासन मान्यता देत आहे असे म्हंटले आहे.दरम्यान वांग मराठवाडी धरण प्रकल्पातील मौजे उमरकांचन येथील पुर्णत: बाधित ६१ प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी सांगली जिल्हयातील तडसर ता.कडेगांव येथील ५८ हेक्टर ७६ आर एवढी आवश्यक असणारी गायरान जमिन उपलब्ध करुन देण्याचा धोरणात्मक असा निर्णय राज्याचे मुख्यमंत्री यांचे आदेशावरुन शासनाने घेवून उमरकांचन येथील ६१ प्रकल्पग्रस्तांचा गेल्या अनेक वर्षापासूनचा वनवास मुख्यमंत्री यांनी संपविला असलेबद्दल तालुक्याचा लोकप्रतिनिधी या नात्याने मी त्यांचे मनपुर्वक आभार व्यक्त करतो असेही आमदार शंभूराज देसाईंनी पत्रकात म्हंटले आहे. 

सातत्याच्या पाठपुराव्यामुळेच कृष्णा खोरेकडून महिंद धरणाच्या विशेष दुरुस्तीचे काम हाती. दुरुस्तीकरीता ७६.४१ लक्ष रुपयांच्या निधींची तरतूद आमदार शंभूराज देसाईंची माहिती.



पाटण तालुक्यातील महिंद येथील लघू पाटबंधारे तलावाच्या सांडव्याच्या विशेष दुरुस्तीच्या कामांस निधी उपलब्ध करुन दयावा याकरीता सन २०१५ पासून शासनाच्या जलसंपदा विभाग व महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळ यांचेकडे दि.१३.०३.२१०५ व दि.१५.०७.२०१६ या पत्रव्यवहारानुसार तसेच यासंदर्भात नागपुरच्या हिवाळी अधिवेशनामध्ये दि.१६.१२.२०१६ रोजी चर्चेला आलेल्या तारांकीत प्रश्नाच्या माध्यमातून पाठपुरावा करीत होतो. सातत्याच्या पाठपुराव्यावरुन शासनाच्या जलसंपदा विभाग व महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाने महिंद लघू पाटबंधारे तलावाच्या सांडव्याच्या विशेष दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे. दुरुस्तीच्या कामांकरीता ७६.४१ लक्ष रुपयांचा निधी शासनाच्या जलसंपदा विभागाने मंजुर केला असून या कामांची निविदाही काढली असल्याची माहिती आमदार शंभूराज देसाई यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे दिली आहे.
आमदार शंभूराज देसाईंनी दिलेल्या पत्रकात म्हंटले आहे की, पाटण तालुक्यात महिंद येथे शासनाच्या जलसंपदा विभागातंर्गत व महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाने बांधलेल्या लघू पाटबंधारे तलावाच्या सांडव्याची दुरावस्था झाली असल्याने तलावाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने तलावातून होणारी गळती थांबविणेकरीता शासनाच्या जलसंपदा विभागाने महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळास या तलावाची विशेष दुरुस्ती करणेसाठी आवश्यक असणारा निधी उपलब्ध करुन दयावा याकरीता मी तालुक्याचा लोकप्रतिनिधी या नात्याने सन २०१५ पासून शासनाच्या जलसंपदा विभागाकडे प्रयत्न करीत आहे. या कामांकरीता निधी मिळणेसाठी राज्याचे जलसंपदा मंत्री ना.गिरीश महाजन यांना प्रत्यक्ष भेटून दि.१३.०३.२१०५ व दि.१५.०७.२०१६ रोजी पत्रव्यवहारही केला होता तर दि.१६.१२.२०१६ रोजी यासंदर्भात नागपुरच्या हिवाळी अधिवेशनामध्ये चर्चेला आलेल्या तारांकीत प्रश्नाच्या माध्यमातून विशेष दुरुस्तीच्या कामांस निधी देणेबाबतची मागणी केली होती.यावेळी राज्याचे जलसंपदा मंत्री ना.गिरीश महाजन यांनी या तारांकीत प्रश्नास उत्तर देताना आमदार शंभूराज देसाई यांच्या मागणीवरुन महिंद येथील लघू पाटबंधारे तलावामधून होणारी पाण्याची गळती थांबविणे व या सांडव्याच्या विशेष दुरुस्तीच्या कामांस निधी उपलब्ध करुन दिला जाईल असे आश्वासन दिले होते. त्यानुसार राज्याच्या जलसंपदा विभागाने महिंद येथील लघू पाटबंधारे तलावामधून होणारी पाण्याची गळती थांबविणे व या सांडव्याच्या विशेष दुरुस्तीच्या कामांस आवश्यक असणारा ७६.४१ लक्ष रुपयांचा निधी मंजुर केला असून महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळ, पुणे अंतर्गत सातारा पाटबंधारे प्रकल्प मंडळ,सातारा यांचे अखत्यारित लघू पाटबंधारे विभाग, सातारा यांचेकडून महिंद येथील लघू पाटबंधारे तलावाच्या सांडव्याच्या विशेष दुरुस्तीच्या कामांची निविदाही काढली असून या कामांमध्ये सांडवा, पुच्छ कालवा मजबुतीकरण करणेकरीता पुर्ण सांडव्यास संधानकामध्ये जॅकेटींग करणे, पुच्छ कालव्यामध्ये चेकवॉल बांधणे, सर्व्हीस गेटजवळ मातीचा भराव करणे व तलावाच्या वरील बाजूचे अश्मपटल दुरुस्ती करणे या कामांचा समावेश करण्यात आला आहे. महिंद येथील लघू पाटबंधारे तलावामधून होणारी पाण्याची गळती थांबविणे व या सांडव्याच्या विशेष दुरुस्तीच्या कामांस ७६.४१ लक्ष रुपयांचा निधी मंजुर झाल्याने लवकरच या पावसाळयापुर्वी हे विशेष दुरुस्तीचे काम पुर्णत्वाकडे जावून तलावातील पाण्याची गळती थांबेल असेही आमदार शंभूराज देसाईंनी पत्रकात म्हंटले आहे. 

Monday 25 December 2017

शाळासिध्दी कार्यक्रमात पाटण तालुक्यातील अ श्रेणीप्राप्त १८८ प्राथमिक, माध्यमिक,उच्च माध्यमिक शाळांचे आमदार शंभूराज देसाईंकडून कौतुक व पुढील वाटचालीस शुभेच्छा.


ग्रामीण भागातील मुलांना सर्वोत्कृष्ट असे शिक्षण मिळाले पाहिजे व त्याचाच एक भाग म्हणून शांळाची गुणवत्ता प्रमाणित करण्यासाठी राज्य शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने केंद्र शासनाचा शाळासिध्दी हा कार्यक्रम राज्यात राबविला आहे.राज्यातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांनी त्यांचे स्वयंमुल्यमापन शाळेतील मुख्याध्यापक,सर्व शिक्षक व शाळा व्यवस्थापन समिती यांच्या एकमताने पुर्ण केले. या स्वयंमूल्यमापनानुसार न्यूपा, नवी दिल्ली यांनी या शाळांची श्रेणीनिहाय स्थिती सादर केलेली आहे. यामध्ये पाटण तालुक्यातील अ श्रेणीप्राप्त १८८ शाळांचा समावेश झाला आहे. या शाळांच्या चांगल्या कार्याबद्दल पाटण तालुक्याचे आमदार शंभूराज देसाई यांनी पाटण तालुक्यातील अ श्रेणीप्राप्त सर्व शाळांचे मुख्याध्यापक,सर्व शिक्षक व शाळा व्यवस्थापन समिती यांचे कौतुक केले असून त्यांना व या शाळांना तसेच ब व क श्रेणीतील शाळांना अ श्रेणी प्राप्त होणेसाठी पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.
ग्रामीण शिक्षणाचा दर्जा सुधारला पाहिजे ही भूमिका तालुक्याचा आमदार म्हणून माझी पहिल्यापासून राहिली आहे त्यानुसार तालुक्यातील ग्रामीण आणि डोंगरी भागातील गरीब कुटुंबातील मुलांना सर्वोत्कृष्ट शिक्षण देणेकरीता प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांनी पुढे यावे व तशाप्रकारचे सर्वोतोपरी प्रयत्न ग्रामीण भागातील शाळेतील मुख्याध्यापक, सर्व शिक्षक व शाळा व्यवस्थापन समिती याकरीता आपण नेहमीच आग्रही राहिलो आहोत. दरम्यान ग्रामीण भागातील मुलांना सर्वोत्कृष्ट असे शिक्षण मिळाले पाहिजे व त्याचाच एक भाग म्हणून शांळाची गुणवत्ता प्रमाणित करण्यासाठी राज्य शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने केंद्र शासनाचा शाळासिध्दी हा कार्यक्रम राज्यात राबविला आहे. राज्यातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना शाळासिध्दीच्या संकेतस्थळावर स्वयंमुल्यमापनविषयक माहिती अपलोड करण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेली होती त्यानुसार शाळांनी त्यांचे स्वयंमुल्यमापन शाळेतील मुख्याध्यापक,सर्व शिक्षक व शाळा व्यवस्थापन समिती यांनी संकेतस्थळावर भरून सर्वांच्या एकमताने पुर्ण केले. या स्वयंमूल्यमापनानुसार न्यूपा, नवी दिल्ली यांनी या शाळांची श्रेणीनिहाय स्थिती सादर केलेली आहे.त्यानुसार सातारा जिल्हयातील एकूण प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांची संख्या ही ३८६७ इतकी असून त्यापैकी अ श्रेणी प्राप्त शाळांची संख्या १७६६ इतकी आहे यामध्ये पाटण तालुक्यातील अ श्रेणीप्राप्त १८८ शाळांचा समावेश झाला आहे. अ श्रेणीप्राप्त शाळांची संख्या ही चांगली असून आपला तालुका ग्रामीण आणि डोंगरी असूनही तालुक्यातील डोंगरी व दुर्गम भागातील शाळा वेगाने अ श्रेणीकडे वाटचाल करीत आहेत ही बाब कौतुकास्पद आणि अभिमानास्पद आहे. तसेच ब व क श्रेणीमधील शाळा या अ श्रेणीमध्ये वर्ग होणेकरीता शाळांचे विशेषत्वाने प्रयत्न सुरु आहेत हेही कौतुकास्पद असून पाटण तालुक्यातील ज्या १८८ प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांचा समावेश शाळासिध्दी उपक्रमात झाला आहे त्या शांळामधील मुख्याध्यापक,सर्व शिक्षक व शाळा व्यवस्थापन समिती यांचे मी मनापासून कौतुक करुन शुभेच्छा व्यक्त करतो व त्यांचेबरोबर ब आणि क श्रेणीतील शाळांना अ श्रेणी प्राप्त होणेकरीता त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देतो असे आमदार शंभूराज देसाईंनी म्हंटले आहे.



Friday 22 December 2017

पाटण तालुक्यातील बाटेवाडी (पाठवडे) गावातील २६ कुटुंबांचे तात्काळ पुनर्वसन करा. आमदार शंभूराज देसाईंनी औचित्याच्या मुद्दयाव्दारे केली विधानसभेत मागणी.


पाटण तालुक्यातील चाफळ विभागात डोंगर उतारावर बाटेवाडी (पाठवडे) हे गांव वसलेले असून सन २००७ मधील जुलै महिन्यामध्ये मोठया प्रमाणात झालेल्या अतिवृष्टीमुळे या गावाच्या वर डोंगरात असणारी जमिन खचली आहे. याठिकाणची जमिन खचल्यामुळे डोंगर पायथ्याला असणा-या या गांवातील एकूण २६ कुटुंबांना धोका निर्माण झाला आहे. या २६ कुटुंबाचे शासनाने तात्काळ पुनर्वसन करावे याकरीता शासनदरबारी सन २००७ पासून माझा पाठपुरावा सुरु आहे परंतू शासनाने अद्यापही यासंदर्भात कोणताही निर्णय घेतला नाही शासनाने ही बाब गांभीर्याने घेवून बाटेवाडी (पाठवडे) या गांवातील त्या २६ कुटुंबांचे तात्काळ पुनर्वसन करण्यास मंजुरी देवून पुनर्वसन करावे अशी मागणी आमदार शंभूराज देसाईंनी आज औचित्याच्या मुद्दयाव्दारे विधानसभेत केली.
पाटण तालुक्यातील मौजे बाटेवाडी (पाठवडे) या गांवातील त्या २६ कुटुंबाच्या पुनर्वसनाचा प्रश्न औचित्याच्या मुद्दाव्दारे या तालुक्याचे आमदार शंभूराज देसाई यांनी हिवाळी अधिवेशनात विधानसभेत मांडून या गंभीर प्रशानाकडे शासनाचे व विशेषत: मदत व पुनर्वसन मंत्री यांचे लक्ष वेधले.

यासंदर्भात बोलताना आमदार शंभूराज देसाई म्हणाले, मौजे बाटेवाडी (पाठवडे) हे गांव पाटण तालुक्यातील चाफळ विभागात डोंगर उतारावर वसलेले गांव असून सन २००७ ला माहे जुलै महिन्यामध्ये मोठया प्रमाणात झालेल्या अतिवृष्टीमुळे या गावाच्या वर डोंगरात असणारी जमिन खचण्याचा प्रकार घडला आहे २००७ पासून प्रतिवर्षी या विभागात होणा-या अतिवृष्टीमुळे येथील खचलेली जमिन मोठया प्रमाणात खचू लागली असल्याने खचलेल्या सदरच्या जमिनीचा भाग हा या गांवातील २६ कुटुंब वास्तव्यास असणा-या घरावर येवून कोसळण्याचा धोका निर्माण झाला आहे. माळीण जि.पुणे या गावाप्रमाणेच या गांवाची ही परिस्थिती असल्यामुळे या गांवातील २६ कुटुंबांमध्ये मोठया प्रमाणात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्या २६ कुटुंबाचे तातडीने पुनर्वसन करणे गरजेचे असल्याने या तालुक्याचा लोकप्रतिनिधी या नात्याने मी २००७ पासून राज्य शासनाकडे सात्यत्याने या कुटुंबांच्या पुनर्वसनाची मागणी करीत आहे. आमच्या सातत्याच्या पाठपुराव्यामुळे भूवैज्ञानिक, भूजल सर्व्हेक्षण, सातारा यांनी महसूलचे पाटणचे प्रातांधिकारी, तहसिलदार यांना या कुटुंबांचे पुनर्वसन तातडीने करणे गरजेचे असलेबाबत पत्रव्यवहारही केला आहे.तर जिल्हाधिकारी कार्यालय सातारा यांचेकडून दि.१७.१०.२०११ रोजी मा.उपसचिव, महसूल व वन विभाग यांना पुनर्वसनासंदर्भात पत्रव्यवहार देखील केला आहे. परंतू या गंभीर विषयाकडे राज्य शासनाचे दुर्लक्ष होत असून शासनाने ही बाब गांभीर्याने घेवून पाटण तालुक्यातील मौजे बाटेवाडी (पाठवडे) या गांवातील त्या २६ कुटुंबाच्या पुनर्वसनाच्या कामांस तात्काळ मंजुरी देवून त्या २६ कुटुंबाचे तात्काळ पुनर्वसन करावे असा आग्रह आमदार शंभूराज देसाई यांनी औचित्याच्या मुद्दाव्दारे शासनाकडे आणि मदत व पुनर्वसन मंत्री यांचेकडे विधानसभेत धरला.

Thursday 21 December 2017

पाटण तालुक्यातील अन्नसुरक्षा इष्टकांची सुधारणा करण्याच्या कामाचा फेरसर्व्हे करा. आमदार शंभूराज देसाईंच्या मागणीवरुन मंत्री गिरीश बापट यांचे 31 जानेवारी,2018 पर्यंत फेरसर्व्हेचे आदेश. कोणताही लाभार्थी वंचीत राहणार नसल्याची दिली ग्वाही.


           राज्य शासनाच्या अन्न नागरी पुरवठा योजनेतंर्गत ग्रामीण आणि शहरी भागातील लाभार्थीसाठी राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम 2013 अंतर्गत जिल्हानिहाय इष्टांकात सुधारणा करणेच्या कामांमध्ये कोणीही लाभार्थी वंचीत राहू नये याकरीता या इष्टाकांची अंमलबजावणी ही गावांमध्ये व वाडीवस्तीमध्ये ग्रामसभा घेवूनच पारदर्शक व्हावी याकरीता देण्यात आलेली 31 डिसेंबर,2017 पर्यंतची वेळ ही अपुरी असून यामध्ये पारदर्शकता येणेकरीता पाटण तालुक्यापुरता याचा फेरसर्व्हे व्हावा व या फेरस्वर्हेकरीता एक महिन्याची  मुदत 31 जानेवारी,2018 पर्यंत वाढवून दयावी अशी मागणी पाटण तालुक्याचे आमदार शंभूराज देसाई यांनी राज्याचे अन्न नागरी पुरवठा मंत्री ना.गिरीश बापट यांची नागपुर याठिकाणी सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनामध्ये प्रत्यक्ष भेटून केली यावेळी ना.गिरीश बापट यांनी आमदार शंभूराज देसाई यांच्या मागणीवरुन या कामाचा फेरसर्व्हे करण्यात येवून दि.31 जानेवारी, 2018 पर्यंत याची अंमलबजावणी करावी असे स्पष्ट आदेश शासनाच्या अन्न नागरी पुरवठा विभागास दिले.
         शासनाच्या अन्न नागरी पुरवठा योजनेतंर्गत लाभार्थीसाठी राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम अंतर्गत जिल्हानिहाय इष्टांकात सुधारणा करणेच्या कामांमध्ये या इष्टांकाची अंमलबजावणी होत असताना सातारा जिल्हा पुरवठा अधिकारी यांचेकडून कळविण्यात आलेल्या इष्टांकामध्ये पाटण तालुक्यातील 400 कार्डसंख्या कमी झाल्याचे दाखविण्यात आल्याने सुमारे 50,195 इतके लाभार्थी वंचीत रहात असल्याची बाब पुढे आलेनंतर आमदार शंभूराज देसाईंनी राज्याचे अन्न नागरी पुरवठा मंत्री ना.गिरीश बापट यांची नागपुर याठिकाणी हिवाळी अधिवेशनामध्ये प्रत्यक्ष भेट घेवून यासदंर्भात लेखी पत्र देत ही बाब मंत्रीमहोदय यांचे निदर्शनास आणून दिली.यावेळी मंत्री ना.बापट यांनी आमदार शंभूराज देसाई यांच्या मागणीवरुन पाटण तालुक्यापुरता या कामांचा फेरस्वर्हे करुन याची अंमलबजावणी दि.31 डिसेंबर,2017 पर्यंत नाहीतर दि.31 जानेवारी , 2018 पर्यंत करावी असे सक्त आदेश शासनाच्या अन्न नागरी पुरवठा विभागास दिले.
    या विषयासंदर्भात मंत्री ना.बापट यांना माहिती देताना आमदार शंभूराज देसाई म्हणाले, राज्य शासनाच्या अन्न नागरी पुरवठा योजनेतंर्गत ग्रामीण आणि शहरी भागातील लाभार्थीसाठी राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम 2013 अंतर्गत जिल्हानिहाय इष्टांकात सुधारणा करणेबाबत  सुचना देण्यात आल्या आहेत. दरम्यान अन्न नागरी पुरवठा योजनेतंर्गत ग्रामीण आणि शहरी भागातील लाभार्थीसाठी राबविण्यात येणा-या विविध योजनांमध्ये दारिद्र रेषेखालील लोकांसाठी बीपीएल,सामान्य कुटुंबासाठी एपीएल,अंत्योदय आणि प्राधान्य अशा विविध योजनांचा समावेश असून त्या त्या वर्गवारी नुसार लाभार्थ्यांना लाभ दिला जातो.  सदया अन्न सुरक्षा अधिनियमानुसार जिल्हानिहाय इंष्टाकात सुधारणा करणेबाबतचे कामकाज सुरु आहे. सदर अधिनियमाची अंमलबजावणी प्रत्यक्षात सुरु झालेनंतर काही तालुक्यामध्ये इंष्टाकांमध्ये जास्त लाभार्थी तर काही तालुक्यांमध्ये कमी लाभार्थी आढळून आल्याचे निदर्शनास आले आहे. लाभार्थ्यांची यादी ही स्वस्त धान्य दुकानदार यांचेकडून मागविण्यात आल्याने यामध्ये यातील काही लाभार्थी हे मयत तर काही लाभार्थी तालुक्याच्या बाहेरगांवी वास्तव्यास असून त्यांचीही नांवे समाविष्ट असल्याचे दिसून येत असल्याने काही तालुक्यामध्ये जास्त लाभार्थी दिसून येत आहेत यामुळे ज्यांना या योजनांचा लाभ प्रत्यक्षात मिळणे आवश्यक आहे असे लाभार्थी  या इष्टांकातील जास्त संख्या दिसत असल्याने या योजनांपासून वंचीत रहात आहेत. यामध्ये पारदर्शकता येणेकरीता सदर अधिनियमाची अंमलबजावणी प्रत्यक्षात करताना तालुक्यामधील प्रत्येक गांवामध्ये तसेच वाडीवस्तीमध्ये ग्रामसभा घेवूनच लाभार्थ्यांची नांवे यादीत समाविष्ट करणे अत्यावश्यक आहे. सातारा जिल्हा पुरवठा अधिकारी यांचेकडून कळविण्यात आलेल्या इष्टांकामध्ये माझे डोंगरी आणि दुर्गम अशा पाटण तालुक्यात ग्रामीण आणि शहरी मधील सुमारे 400 कार्डसंख्या कमी झाल्याचे दिसून येत असून यामध्ये सुमारे 50,195 इतके लाभार्थी कमी झाल्याचे दिसून येत आहेत. ही माहिती पुर्णत: चुकीची झाली असल्याने या कामांचा फेरस्वर्हे करावा व हा फेरस्वर्हे हा पाटण तालुक्याच्या प्रत्येक गांवामध्ये व वाडीवस्तीमध्ये ग्रामसभा घेवूनच करावा अशी माझी आपणांकडे मागणी आहे असे सांगून आता याची अंमलबजावणी करणेकरीता दि.31 डिसेंबर,2017 पर्यंत वेळ देण्यात आली आहे फेरसर्व्हेकरीता एक महिना वाढवून दयावा अशी आमदार शंभूराज देसाईंनी मंत्री अन्न नागरी पुरवठा यांचेकडे केली.
          आमदार शंभूराज देसाईच्या मागणीची ना.गिरीष बापट मंत्री अन्न नागरी पुरवठा यांनी  तात्काळ दखल घेत राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम 2013 अंतर्गत जिल्हानिहाय इष्टांकात सुधारणा करणेबाबतच्या कामांचा पाटण तालुक्यापुरता फेरसर्व्हे करावा ही अंमलबजावणी दि.31 जानेवारी, 2018 पर्यंत करावी असे सक्त आदेश शासनाच्या अन्न नागरी पुरवठा विभागास देवून या अंमलबजावणीमध्ये एकही लाभार्थी कोणत्याही योजनेपासून वंचीत राहणार नाही त्याची खबरदारी शासनाचा अन्न नागरी पुरवठा विभाग घेईल अशी ग्वाही  ही आमदार शंभूराज देसाई यांना दिली. याबद्दल आमदार शंभूराज देसाई यांनी मंत्री ना.गिरीष बापट यांचे आभार व्यक्त केले.


Wednesday 20 December 2017

वाईचा धान्यघोटाळा विधानसभेत गाजला. आमदार शंभूराज देसाईंचा तारांकीत प्रश्न- चौकशीअंती दोषीवर कडक कारवाई करण्याचे मंत्री गिरीश बापट यांचे उत्तर.


           सातारा जिल्हयातील वाई येथील स्वस्त धान्य दुकानदारांना देण्यात येणारा धान्यसाठा महाराष्ट्र औदौगिक विकास महामंडळाच्या (एमआयडीसी) लगत खाजगी जागेतील पत्रयाच्या शेडमधून शासनाची छापील पोती बदलून प्लास्टीक पोत्यात भरुन ती अवैद्य विक्रीकरीता पाठविताना वाईच्या पोलिस यंत्रणेने छापा टाकून जप्त केलेला वाईचा हा धान्यघोटाळा आमदार शंभूराज देसाई यांचे तारांकीत प्रश्नांने विधानसभेत चांगलाच गाजला. जिल्हा पुरवठा विभागाच्या संगनमताने करण्यात आलेला हा घोटाळा पोलिस यंत्रणेने उघडकीस आणला असून यामध्ये जिल्हा पुरवठा विभागाचे वरीष्ट अधिकारी हे दोषी असल्याचा थेट आक्षेप आमदार शंभूराज देसाईंनी केला यावर राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री ना.गिरीश बापट यांनी वाईच्या या धान्यघोटाळा प्रकरणाची उच्चस्तरीय सर्व चौकशी पोलीस उपायुक्तांमार्फत करुन चौकशीअंती जिल्हा पुरवठा विभागाचे वरीष्ट अधिकारी दोषी सापडले तर त्यांच्यावर प्रथम प्राधान्याने कायदेशीर कडक कारवाई केली जाईल असे विधानसभेत जाहीर केले.
           आमदार शंभूराज देसाईंनी सातारा जिल्हयातील वाई तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदारांना दिले जाणारे शासकीय धान्य हे वाई याठिकाणच्या महाराष्ट्र औदौगिक विकास महामंडळाच्या (एमआयडीसी) लगत असणा-या खाजगी जागेतील पत्रयाच्या शेडमधून शासकीय धान्यांकरीता असणारी शासकीय छापील पोती बदलून 9200 किलो शासकीय गहू व 1500 किलो तांदूळ प्लास्टीक पोत्यात भरुन ते अवैद्य विक्रीकरीता पाठविताना वाईच्या पोलिस यंत्रणेने रंगेहात पकडले असून यामध्ये जिल्हा पुरवठा विभागाचे संगनमत असल्याने उघडपणे हा धान्यघोटाळा अनेक दिवसांपासून याठिकाणी सुरु असलेबाबतचा तारांकीत प्रश्न विधानसभेत विचारला व हे प्रकरण चांगलेच विधानसभेत लावून धरले.

         याविषयी माहिती देताना आमदार शंभूराज देसाई म्हणाले, सातारा जिल्हयातील वाई तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदारांना दिले जाणारे शासकीय धान्य हे वाई याठिकाणच्या महाराष्ट्र औदौगिक विकास महामंडळाच्या (एमआयडीसी) लगत असणा-या खाजगी जागेतील पत्रयाच्या शेडमधून शासकीय धान्यांकरीता असणारी शासकीय छापील पोती बदलून 9200 किलो शासकीय गहू व 1500 किलो तांदूळ प्लास्टीक पोत्यात भरुन ते अवैद्य विक्रीकरीता पाठविताना वाईच्या पोलिस यंत्रणेने रंगेहात पकडले आहे. यामध्ये जिल्हा पुरवठा विभागाचे संगनमत असल्यानेच उघडपणे हा धान्यघोटाळा अनेक दिवसांपासून याठिकाणी सुरु असल्याचे महाराष्ट्र औदौगिक विकास महामंडळाच्या (एमआयडीसी) लगत असणा-या खाजगी जागेतील पत्रयाच्या शेडशेजारी वास्तव्यास असणा-या लोकांकडून सांगण्यात आले आहे. असे सांगत ही बाब किती गंभीर आहे हे राज्याचे अन्न नागरी व पुरवठा मंत्री यांचे निदर्शनास आणूत देताना आमदार शंभूराज देसाईंनी धान्याचा असा अपहार मोठया प्रमाणात सुरु असताना त्याकडे जिल्हा पुरवठा विभागाने जाणिवपुर्वक केलेल्या दुर्लक्षामुळेच असे प्रकार उघडपणे घडत आहेत. जिल्हा पुरवठा विभागाचे संगनमत असल्याशिवाय उघडपणे असा धान्य घोटाळा होणार नाही कारण उघडपणे असा धान्याचा अपहार होत असताना त्याचेवर जिल्हा पुरवठा विभागाचा अंकुश असणे गरजेचे होते आणि हा अपहार पुरवठा विभागाने नाही तर पोलिस यंत्रणेने पकडला असल्याने संशयाची सुई सहाजिकच पुरवठा विभागाकडे जात आहे असा थेट आक्षेप जिल्हा पुरवठा विभागाच्या वरीष्ट अधिका-यांवर घेत या वाईच्या धान्य घोटाळयामुळे जिल्हा पुरवठा विभागाचा भोंगळ कारभार चव्हाटयावर आला असून वाईच्या धान्यघोटाळयाची एसआयटीमार्फत उच्चस्तरीय चौकशी करुन दोषींवर कायदेशीर कडक कारवाई करावी अशी मागणी आमदार शंभूराज देसाई यांनी लावून धरली यावर राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री ना.गिरीश बापट यांनी वाईच्या या धान्यघोटाळा प्रकरणाची उच्चस्तरीय सर्व चौकशी पोलीस उपायुक्तांमार्फत करुन चौकशीअंती जिल्हा पुरवठा विभागाचे वरीष्ट अधिकारी दोषी सापडले तर त्यांच्यावर प्रथम प्राधान्याने कायदेशीर कडक कारवाई केली जाईल असे विधानसभेत जाहीर केले.

पाटण तालुक्यातील पवनचक्की वाहतूकीमुळे खराब रस्त्यांना, विद्युत विकासच्या कामांना व कोयना पुनर्वसित गावठाणांतील कामांना तात्काळ निधी देणार. आमदार शंभूराज देसाईंच्या लक्षवेदी सुचनेवर ऊर्जा मंत्री व मदत व पुनर्वसन मंत्री यांचे उत्तर.


पाटण विधानसभा मतदारसंघाचे आमदार शंभूराज देसाई यांनी त्यांचे मतदारसंघातील शासनाकडे प्रलंबीत असणा-या पवनऊर्जा प्रकल्पाच्या अवजड वाहतूकीमुळे खराब झालेल्या रस्त्यांच्या तसेच विद्यूत विकासच्या त्याचबरोबर कोयना धरणामुळे पुनर्वसित भूकंपबाधित गावठाणांतील मुलभूत सुविधांच्या कामांना आवश्यक असणारा निधी मिळणे करीताची लक्षवेदी सुचना मांडली आहे. लक्षवेदी सुचनेला उत्तर देताना राज्याचे ऊर्जामंत्री ना.चंद्रशेखर बावनकुळे यांनी आमदार शंभूराज देसाईंच्या मागणीनुसार पवनऊर्जा प्रकल्पाच्या वाहतूकीमुळे खराब झालेल्या 21 रस्त्यांच्या कामांमधील 10 रस्त्यांच्या कामांना सन 2017-18 मध्ये हरीतऊर्जा निधीमधून महाऊर्जामार्फत 18 कोटी 69 लाख 51 हजार रुपये व उर्वरीत 11 रस्त्यांच्या कामांना सन 2018-19 मध्ये आवश्यक असणारा निधी तसेच विद्यूत विकासच्या कामांना डोंगरी तालुक्याकरीता करण्यात आलेल्या विद्यूत विकास आराखडयातून पाटण तालुक्याकरीता 11.22 कोटी असा निधी तात्काळ उपलब्ध करुन देण्यात येईल असे उत्तर दिले तर मदत व पुनर्वसन मंत्री ना.चंद्रकांत पाटील यांनी कोयना धरणामुळे पुनर्वसित भूकंपबाधित गावठाणांतील मुलभूत सुविधांच्या कामांना आवश्यक असणारा निधी मिळणेकरीता आमदार शंभूराज देसाई यांचेमार्फत मागणी केलेल्या 4 कोटी 55 लाख 98 हजार रुपयांच्या निधीच्या प्रस्तावांपैकी 1 कोटी 26 लाख 98 हजार रुपयांच्या कामांचे प्रस्ताव सादर झालेले आहेत तर 3 कोटी 29 लाख रुपयांच्या कामांचे प्रस्ताव मागवुन घेवून या कामांना तात्काळ निधी उपलब्ध करुन देणेबाबत सहानुभूतीपुर्वक विचार करु असे उत्तर दिले आहे.
आमदार शंभूराज देसाई यांनी त्यांचे मतदारसंघातील पवनऊर्जा प्रकल्पाच्या अवजड वाहतूकीमुळे खराब झालेल्या रस्त्यांच्या तसेच विद्यूत विकासच्या त्याचबरोबर कोयना धरणामुळे पुनर्वसित भूकंपबाधित गावठाणांतील मुलभूत सुविधांच्या कामांना आवश्यक असणारा निधी मिळणेकरीताची लक्षवेदी सुचना सादर केली होती ही लक्षवेदी सुचना आज दि.20 डिसेंबर रोजी सभागृहात चर्चेला आली यावर वरीलप्रमाणे राज्याचे ऊर्जामंत्री ना.चंद्रशेखर बावनकुळे व मदत व पुनर्वसन मंत्री ना.चंद्रकांत पाटील यांनी सकारात्मक अशी उत्तरे दिली.
लक्षवेदी सुचनेतील मुद्दयाकडे शासनाचे आणि विशेषत: ऊर्जामंत्री व मदत व पुनर्वसन मंत्री यांचे लक्ष्य वेधताना आमदार शंभूराज देसाई म्हणाले,सातारा जिल्हयातील आमचा पाटण तालुका हा डोंगरी,दुर्गम व भूकंपबाधित तालुका असून तालुक्यातील डोंगरी, दुर्गम भागात मोठया प्रमाणात सुरु असलेल्या पवनऊर्जा प्रकल्पाच्या अवजड वाहतूकीमुळे डोंगर पठारावरील ग्रामीण रस्त्यांची मोठया प्रमाणात दुरावस्था झाली आहे या ग्रामीण रस्त्यांच्या पुर्नंबांधणीकरीता राज्य शासनाच्या ऊर्जा विभागाने महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरणतर्गंत निधी उपलब्ध करुन देणेविषयी सन्माननीय ऊर्जामंत्री यांचेकडे पाठपुरावा करुन आवश्यक निधी उपलब्ध करुन देणेविषयी मागणी केली असता सदरचा निधी उपलब्ध करुन देणेसंदर्भात ऊर्जामंत्री यांनी आश्वासित केले आहे आणि त्यांचे आश्वासनानुसार प्रस्तावही सादर केले आहेत. यामध्ये प्रथम सादर केलेल्या 10 रस्त्यांच्या कामांना 18 कोटी 69 लाख 51 हजार रुपये व उर्वरीत 11 रस्त्यांच्या कामांना 25 कोटी 69 लाख रुपयांच्या निधीची आवश्यकता आहे.तसेच महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीकडून राज्यातील डोंगरी तालुक्या करिता विद्यूत विकासाची प्रलंबित कामे करणेकरीता डोंगरी विकास आराखडा तयार करण्याच्या सुचनेवरुन पाटण या डोंगरी तालुक्याचा आम्ही सुमारे 11.22 कोटी रुपयांचा आराखडा तयार केला असून या आराखडयामध्ये  ट्रान्स्फार्मर, गंजलेले विजेचे खांब बदलणे,नव्याने लागणारे विजेचे खांब बसविणे,आवश्यक ठिकाणी डी. पी. बसविणे तसेच घरगुती व शेती पंपाकरिता द्यावयाची प्रलंबित कनेक्शन देणेकरिता लागणारे साहित्य याचा समावेश आहे या आराखडयासही तात्काळ मंजुरी देऊन निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन देण्यात आले होते मात्र निधी उपलब्ध झाला नाही तो निधी उपलब्ध करुन दयावा अशी आग्रही मागणी ऊर्जामंत्री यांचेकडे करीत आमदार देसाई यांनी राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री यांचे लक्ष्य वेधताना पाटण तालुक्यात असणा-या कोयना प्रकल्पामुळे सुमारे 100 गांवे पुर्नर्वसित झाली असून कोयना प्रकल्पातील स्तर 1 व 2 मुळे बाधित झालेल्या पुनर्वसित गावठाणांतील नागरी सुविधांची कामे करणेकरीता सन 2016 पासून राज्य शासनाच्या मदत व पुनर्वसन विभागामार्फत 4 कोटी 55 लाख 98 हजार  रुपयांचा निधी मिळणेकरीताची मागणी केली आहे.असे सांगून त्यांनी पाटण तालुक्यातील मागणी केलेल्या परंतू शासनाकडे प्रलंबीत राहिलेल्या या कामांना शासनाने तात्काळ निधी उपलब्ध करुन दयावा असा आग्रह सभागृहात केला.
यावर राज्याचे ऊर्जामंत्री ना.चंद्रशेखर बावनकुळे यांनी आमदार शंभूराज देसाईंच्या मागणीनुसार पाटण तालुक्यात सन 2017-18 मध्ये हरीतऊर्जा निधीमधून महाऊर्जामार्फत 10 रस्त्यांच्या कामांना 18 कोटी 69 लाख 51 हजार रुपये व उर्वरीत 11 रस्त्यांच्या कामांना सन 2018-19 मध्ये आवश्यक असणारा निधी व विद्यूत विकासच्या कामांना डोंगरी विद्यूत विकास आराखडयातून 11.22 कोटी असा निधी तात्काळ उपलब्ध करुन देण्यात येईल असे सांगितले तर मदत व पुनर्वसनमंत्री ना.चंद्रकांत पाटील यांनी कोयना धरणामुळे पुनर्वसित भूकंपबाधित गावठाणांतील मुलभूत सुविधांच्या आमदार देसाई यांनी मागणी करण्यात आलेल्या कामांना आवश्यक असणारा निधी तात्काळ उपलब्ध करुन देवू असे आश्वासित केले.


Monday 18 December 2017

परतीच्या पावसाने झालेल्या नुकसानीचे पंचनामे करुन अहवाल सादर करावा. आमदार शंभूराज देसाईंच्या तारांकीत प्रश्नांवर मदत व पुनर्वसन मंत्री यांचे लेखी उत्तर


             संपुर्ण राज्यात माहे सप्टेंबर,ऑक्टोंबर 2017 मध्ये अनेक भागात अवकाळी तसेच परतीच्या पावसाने काढणीला आलेल्या पिकांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले असून नुकसान झालेल्या नुकसानीचे पंचनामे अद्यापही महसूल अथवा संबधित विभागांकडून झाले नसल्याने नुकसानग्रस्त शेतक-यांना आर्थिक मदत मिळाली नाही.तातडीने या नुकसानीचे पंचनामे करुन नुकसानग्रस्त शेतक-यांना शासनाने आर्थिक मदत दयावी अशी मागणी आमदार शंभूराज देसाई यांनी तारांकीत प्रश्नाच्या माध्यमातून शासनाकडे केली होती.या तारांकीत प्रश्नांस राज्याचे महसूल, मदत व पुर्नवसन मंत्री ना.चंद्रकांत पाटील यांनी परतीच्या पावसाने नुकसान झालेल्या शेती व फळपिकांच्या नुकसानीचे पंचनामे करुन पिकांच्या नुकसानीबाबतचा अहवाल शासनास सादर करण्याच्या सुचना क्षेत्रीय अधिका-यांना दिल्या असल्याचे लेखी उत्तर दि.15 डिसेंबरच्या तारांकीत प्रश्नांच्या उत्तरामध्ये दिले आहे.
नागपुर याठिकाणी सुरु असणा-या हिवाळी अधिवेशनामध्ये पाटणचे आमदार शंभूराज देसाई यांनी माहे सप्टेंबर,ऑक्टोंबर 2017 मध्ये अनेक भागात अवकाळी तसेच परतीच्या पावसाने काढणीला आलेल्या पिकांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले असून नुकसानग्रस्तांना आर्थिक मदत देणेबाबतचा तारांकीत प्रश्न सादर केलेला होता.त्यांचेबरोबर राज्यातील नुकसान झालेल्या ठिकाणच्या लोकप्रतिनिधींनीही सादर केलेल्या याच आशयाच्या तारांकीत प्रश्नास राज्याचे महसूल, मदत व पुर्नवसन मंत्री ना.चंद्रकांत पाटील यांनी वरीलप्रमाणे लेखी उत्तर दिले आहे.
आमदार शंभूराज देसाईंनी मांडलेल्या प्रश्नामध्ये संपुर्ण राज्यात माहे सप्टेंबर,ऑक्टोंबर 2017 मध्ये अनेक भागात अवकाळी तसेच परतीच्या पावसाने काढणीला आलेल्या पिकांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. आमचा पाटण विधानसभा मतदारसंघ हा तर अतिवृष्टीचा तालुका म्हणून ओळखला जातो. माहे एप्रिल व मे  2017 मध्ये अवकाळी पावसामुळे तसेच सप्टेंबर,ऑक्टोंबर, 2017 मध्ये परतीच्या मोठया प्रमाणात झालेल्या पावसामुळे काढणीला आलेल्या पिकांचे मोठे नुकसान झाल्याने राज्यातील इतर भागातील शेतक-यांप्रमाणे पाटण तालुक्यातीलही शेतकरी हवालदिल झाला असून कर्ज काढून पेरणी केलेले पीक काढणीच्या वेळेला अवकाळी व परतीच्या पावसाने पुर्णत: उध्दवस्त झाल्याने ग्रामीण भागातील शेतकरी कर्जबाजारी झाला आहे. त्यातच अवकाळी व परतीच्या पावसाने नुकसान झालेल्या नुकसानीचे पंचनामे महसूल अथवा संबधित विभागाकडून झाले नसल्याने या नुकसानग्रस्तांना नुकसानीची आर्थिक मदत मिळाली नाही तर या परतीच्या पावसाने अनेक ठिकाणी डोंगरी भागात घरांचे व सार्वजनिक मालमत्तेचेही अतोनात नुकसान झाले आहे अवकाळी पावसामुळे तसेच सप्टेंबर, ऑक्टोंबर, 2017 मध्ये परतीच्या पावसामुळे नुकसान झालेल्या नुकसानग्रस्त शेतक-यांना त्यांच्या शेतीतील नुकसानीकरीता तसेच ज्यांच्या घरांची पडझड झाली आहे अशा बाधितांना नुकसान भरपाई मिळणेबाबत तसेच सार्वजनिक मालमत्तेची पुर्नबांधणी करणेकरीता राज्य शासनाने कोणता निर्णय घेतला आहे.असा प्रश्न करण्यात आला होता या प्रश्नांस महसूल, मदत व पुर्नवसन मंत्री ना.चंद्रकांत पाटील यांनी राज्यात अतिवृष्टीमुळे व परतीच्या पावसामुळे झालेल्या शेती व फळपिकांच्या नुकसानीचे पंचनामे करुन पिकांच्या नुकसानीबाबतचा अहवाल शासनास सादर करण्याच्या सुचना क्षेत्रीय अधिका-यांना दिल्या असल्याचे लेखी उत्तर दिले आहे.



जलयुक्त शिवार योजनेसाठी शासनाचा वाटा कधी देणार ? आमदार शंभूराज देसाईंचा विधानसभेत सवाल. जिल्हा नियोजन कडून मिळणा-या निधींचाच वापर.

युतीच्या शासनाने हाती घेतलेल्या जलयुक्त शिवार योजनेला मागील वर्षी जिल्हा नियोजन समितीकडे असणा-या निधीतूनच निधी देण्यात आला आहे यामध्ये शासनाच्या मृद व जलसंधारण विभागाकडून शासनाचा वाटाच आला नाही त्यामुळे गेल्यावर्षीच्या झालेल्या कामांना निधी दयायचा कुठुन असा सवाल पाटणचे आमदार शंभूराज देसाईंनी आज विधानसभेत उपस्थित करुन हा निधी लवकरात लवकर देण्याची मागणी सभागृहात केली तसेच डोंगरी पठारावरील गांवामध्ये पावसांचे वाहून जाणारे पाणी अडविण्याकरीता जलयुक्त शिवार योजनेची कांमे डोंगर पठारावर करणेकरीताची आमची अनेक वर्षाची मागणी आहे मृद व जलसंधारण मंत्री यांनी ही मागणी मान्य केली आहे परंतू अंमलबजावणी झाली नाही या अंमलबजावणीकरीता लेखी आदेश देणेत यावा अशीही मागणी आमदार शंभूराज देसाईंनी विधानसभेत केली यावर गतवर्षीचा निधी लवकरच दिला जाईल आणि डोंगरपठारावर पाणी अडविणेकरीता याठिकाणी ही योजना राबविणेबाबत लेखी आदेश केले जातील असे आश्वासन मृद व जलसंधारण मंत्री ना.राम शिंदे यांनी दिले.
              हिवाळी अधिवेशनात राज्यात युतीच्या शासनाने राबविलेल्या जलयुक्त शिवार योजनेतंर्गत प्रास्तावित कामांना तीन वर्षापुर्वीचीच दरसुची लागू केल्याबद्दल प्रश्न उपस्थित करण्यात आला होता या अनुषंगाने आमदार शंभूराज देसाईंनी सातारा जिल्हयात राबविण्यात येणा-या जलयुक्त शिवार योजनेतंर्गत कामे करण्याकरीता गतवर्षी जिल्हा नियोजन समितीला देण्यात आलेल्या निधीतूनच जिल्हयातील कामांना निधी देण्यात आला आहे. शासनाच्या मृद व जलसंधारण विभागामार्फत देण्यात येणारा निधीचा वाटा गतवर्षी देण्यातच आला नाही त्यामुळे झालेल्या कामांना निधी देणे तसेच उर्वरीत राहिलेली कामे पुर्ण करुन घेणे याकरीता निधीची आवश्यकता आहे तो शासनाचा वाटा शासनाचे मृद व जलसंधारण विभाग कधी जिल्हयाला देणार असा सवाल उपस्थित केला व सदरचा गतवर्षीचा निधी तात्काळ जिल्हयाला उपलब्ध करुन दयावा अशी त्यांनी मागणी केली त्याचबरोबर डोंगरी तालुक्यामध्ये पावसाळयात डोंगरपठारावरील पावसाचे वाहून जाणारे पाणी हे डोंगरपठारावरच अडवून ठेवणेकरीता जलयुक्त शिवार ही योजना डोंगरपठारावर राबविण्याचा धोरणात्मक निर्णय डोंगरी तालुक्यांपुरता शासनाने व मृद व जलसंधारण विभागाने घ्यावा अशी मी अनेकवेळा शासनाकडे आग्रही मागणी केली आहे. राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री ना.राम शिंदे यांनीही या मागणीस दुजोरा देवून ही योजना डोंगरी पठारावर राबविण्याचे तोंडी आदेश दिले होते मात्र मृद व जलसंधारण विभागाकडून यासंदर्भात कोणतीही उपाययोजना अथवा अंमलबजावणी झाली नसल्याने डोंगर पठारावरील गांवामध्ये ही योजना राबविली जात नाही त्याकरीता मृद व जलसंधारण मंत्री यांनी तोंडी आदेश न देता मृद व जलसंधारण विभागाला लेखी आदेश तात्काळ पारित करावे डोंगरपठारावरील गांवामध्ये पावसाळयातील वाहून जाणारे पाणी अडविणेकरीताचा धोरणात्मक निर्णय अंमलात आणला तर नक्कीच याचा फायदा डोंगरपठारावरील लोकांना होईल व डोंगरी भागामध्ये उन्हाळयात जाणवणारी पाण्याची टंचाई दुर होण्यास मदत होईल याकरीता लवकरात लवकर हा आदेश मंत्रीमहोदयांनी पारित करावा अशी त्यांनी बोलताना मागणी केली यावर मृद व जलसंधारण मंत्री ना.राम शिंदे यांनी जलयुक्त शिवार योजनेतंर्गत गतवर्षी जिल्हा नियोजन समितीतून देण्यात आलेल्या निधीबरोबर ही कामे पुर्णत्वाकडे जाणेकरीता व झालेल्या कामांची बिले देणेकरीता मृद व जलसंधारण विभागाचा शासनाचा वाटा लवकरच संबधित जिल्हयाना दिला जाईल व डोंगरी तालुक्यातील डोंगरपठारावर पावसाचे पाणी अडविणेकरीता याठिकाणी जलयुक्त शिवार योजना राबविणेबाबत तोंडी नाहीतर लेखी आदेश केले जातील असे आश्वासनही त्यांनी यावेळी बोलताना दिले.


Thursday 14 December 2017

पर्यटनमंत्री ना.जयकुमार रावल यांनी आमदार शंभूराज देसाई यांचेकडून मागविला पाटण तालुक्यातील पर्यटन विकासाचा आराखडा.



                        प्रादेशिक पर्यटन विकास योजनेतंर्गत पाटण तालुक्यातील पर्यटन तसेच तीर्थक्षेत्रांच्या विकासाकरीता व येथील मुलभूत सुविधांच्या विकासकामांकरिता निधी उपलब्ध करुन दयावा अशी आग्रही मागणी पाटणचे आमदार शंभूराज देसाई यांनी राज्याचे पर्यटन विकास मंत्री ना.जयकुमार रावल यांच्याकडे केली होती. आमदार देसाई यांच्या सातत्याच्या पाठपुराव्यामुळे प्रादेशिक पर्यटन विकास योजनेतंर्गत या कामांना निधी उपलब्ध करुन देणेकरीताचे प्रस्ताव तात्काळ जिल्हाधिकारी, सातारा यांचेमार्फत राज्य पर्यटन विकास समितीस सादर करावेत अशा सुचना मंत्री ना.रावल यांचे सुचनेवरुन पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग, मंत्रालय यांनी जिल्हाधिकारी, सातारा यांना दिल्या आहेत. तर या आशयाचे पत्रही ना.जयकुमार रावल यांनी आमदार शंभूराज देसाई यांचेकडे पाठविले आहे व या विषयासंदर्भात ना.रावल व आमदार देसाई यांची दुरध्वनीवरुन चर्चा देखील झाली आहे. पर्यटन मंत्री ना.रावल यांनी मागविलेल्या प्रस्तावानुसार लवकरच पाटण तालुक्यातील पर्यटन तसेच तीर्थक्षेत्रांच्या  विकासाकरीता व येथील मुलभूत सुविधांच्या विकासकामांकरिता निधी उपलब्ध होण्याचा सविस्तर प्रस्ताव सादर करणार असल्याचे आमदार शंभूराज देसाईंनी आमचे प्रतिनिधींशी बोलताना सांगितले आहे.
                       याप्रसंगी प्रतिनिधींशी बोलताना आमदार देसाई म्हणाले, पाटण तालुका निर्सगरम्य आणि सौदर्यांने नटलेला तालुका असुन तालुक्यामध्ये आठ विभागात विखरुलेल्या भागात अनेक ठिकाणी पर्यटन विकासास वाव आहे. तसेच तालुक्यातील देवस्थाने व तीर्थक्षेत्रांचा नावलौकीक संपुर्ण महाराष्ट्र राज्यासह शेजारील राज्यामध्येही आहे. त्यामुळे पाटण तालुक्यात पर्यटक आणि देवस्थांना व तीर्थक्षेत्रांना भेटी देण्याकरीता राज्याच्या व शेजारच्या राज्याच्या विविध भागातून भाविक भक्त येत असतात. ही पर्यटन स्थळे तसेच तीर्थस्थळे चांगल्याप्रकारे विकसीत होण्याकरीता राज्य शासनाच्या पर्यटन विभागाने पुढाकार घेणे गरजेचे असल्याने शासनाच्या पर्यटन विभागामार्फत प्रादेशिक पर्यटन विकास योजनेतंर्गत राज्य  पर्यटन विकास समितीच्या माध्यमातून जो निधी उपलब्ध करुन दिला जातो तो निधी पाटण तालुक्यातील पर्यटन स्थळे व तीर्थक्षेत्र असणा-या देवस्थांनाच्या विकासाकरीता देण्यात यावा व पाटण तालुक्यातील सर्व विभागातील पर्यटनस्थळे व तीर्थक्षेत्रांची माहिती एकत्रित करुन या स्थळांना व देवस्थांनाना आवश्यक असणारा निधी उपलब्ध करुन दयावा याकरीता मी राज्याचे पर्यटन विकास मंत्री ना.जयकुमार रावल यांचेकडे सातत्याने पाटपुरावा करीत होतो. पर्यटन विकास मंत्री यांनी पाटण तालुक्यातील पर्यटन आणि तीर्थक्षेत्र ठिकाणांच्या विकासाकरीता आवश्यक असणारा निधी उपलब्ध करुन देण्यासाठी सर्वोत्तोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन मला दिले होते त्यानुसार सदर ठिकाणांचे प्रस्ताव जिल्हाधिकारी सातारा यांचेमार्फत मागविण्यात आले आहेत. असे सांगून ते म्हणाले, पाटण तालुक्यात महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असणारे कोयना धरण आहे. कोयना धरणाच्या १० किलोमीटरच्या अंतरात प्रादेशिक पर्यटन विकासास चांगला वाव आहे तसेच या परिसरात पुरातन एैतिहासिक अशी अनेक ठिकाणे आहेत ज्या ठिकाणांची अजुनही पर्यटकांना माहिती नाही ही ठिकाणे विकसीत झाल्यास पाटण तालुका पर्यटन क्षेत्रात अग्रेसर तालुका होईल.तालुक्यातील सह्याद्रीच्या पर्वतरांगावर राज्यातील सर्वात जास्त प्रमाणात पवनऊर्जा प्रकल्प कार्यान्वीत आहेत. कोयना धरण, येथील मोठमोठ धबधबे पर्यटकांचे खास आकर्षण आहेत. तसेच नाईकबा, येराड,येराडवाडी येथील रुद्रेश्वर,धारेश्वर दिवशी  व चाफळ येथील श्रीराम मंदीर, जळव येथील श्री.जोतिबा मंदीर,निवकणे येथील श्री.जानाई मंदीर व दौलतनगर येथील श्री.गणेश मंदीर ही देवस्थाने व तीर्थक्षेत्र भाविकांची श्रध्दास्थाने आहेत.तर एैतिहासिक किल्यांची निर्मितीही पाटण तालुक्यात झालेली आहे. घेरादातेगड, गुणवंतगड,रामघळ यासारखे अनेक गड व ठिकाणे पर्यटकांना आकर्षित करतात. महत्वाच्या असणा-या सर्व पर्यटनस्थळांचा तसेच देवस्थाने व तीर्थक्षेत्रांचा विकास व येथील मुलभूत सुविधांच्या विकासकामांकरिता आवश्यक असणारा निधी मिळणेकरीताचा प्रस्ताव जिल्हाधिकारी सातारा यांचेबरोबर बैठक घेवून प्रादेशिक पर्यटन विकास योजनेसाठी तपशिलवार प्रकल्प अहवाल पाठविताना सादर करावयाच्या सर्व बाबींची माहिती लवकरच राज्य शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक विभागाने निर्माण केलेल्या राज्य पर्यटन विकास समितीकडे सादर करणार असून तालुक्यातील महत्वाच्या पर्यटनस्थळांना व तीर्थक्षेत्र विकासाकरीता शासनाकडून निधी उपलब्ध करुन आणण्यास मी कठीबध्द असल्याचेही त्यांनी शेवठी बोलताना सांगितले.


पवनचक्की प्रकल्पाच्या अवजड वाहतूकीमुळे नुकसान झालेल्या रस्त्यांच्या कामांना तात्काळ निधी दया. आमदार शंभूराज देसाईंचा विधानसभेत तारांकीत प्रश्न हरीत ऊर्जा निधीतंर्गत 2017-18 मध्येच निधी वितरणाची कार्यवाही करणार. ऊर्जा मंत्री ना.चंद्रशेखर बावनकुळेंचे लेखी उत्तर.


        पाटण तालुक्यात सह्याद्रीच्या पर्वतरांगावर मोठया प्रमाणात सुरु असलेल्या पवनचक्की प्रकल्पांच्या अवजड वाहतूकीमुळे ग्रामीण आणि डोंगरी भागातील ग्रामीण रस्त्यांचे मोठया संख्येने नुकसान झाले आहे.नुकसान झालेल्या ग्रामीण व डोंगरी भागातील ग्रामीण रस्त्यांच्या कामांच्या पुर्नंबांधणीकरीता निधी उपलब्ध करुन दया अशी मागणी काल दि.13.12.2017 रोजी पाटण तालुक्याचे आमदार शंभूराज देसाई यांनी तारांकीत प्रश्नाव्दारे नागपुर येथे सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनात केली.या प्रश्नास राज्याचे ऊर्जामंत्री ना.चंद्रशेखर बावनकुळे यांनी हरीत ऊर्जा निधीतंर्गत वित्तीय वर्ष 2017-18 मध्ये निधी अर्थसंकल्पीत झाला असून विभागाव्दारे प्रशासकीय मान्यता देवून निधी वितरणाची कार्यवाही 2017-18 या आर्थिक वर्षामध्येच करण्यात येणार असल्याचे लेखी उत्तर दिले आहे.
         पाटण तालुक्याचे आमदार शंभूराज देसाई यांनी नागपुर येथे सुरु असणा-या हिवाळी अधिवेशनामध्ये सादर केलेल्या तारांकीत प्रश्नामध्ये सातारा जिल्हयातील पाटण विधानसभा मतदारसंघात सह्याद्रीच्या पर्वतरांगावर मोठया प्रमाणात सुरु असलेल्या पवनचक्की प्रकल्पांच्या अवजड वाहतूकीमुळे ग्रामीण आणि डोंगरी भागातील ग्रामीण रस्त्यांचे मोठया संख्येने नुकसान झाले आहे.नुकसान झालेल्या ग्रामीण रस्त्यांच्या कामांच्या पुर्नंबांधणीकरीता राज्य शासनाच्या ऊर्जा विभागातंर्गत महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरणतर्गंत या विभागाकडून आवश्यक असणारा निधी उपलब्ध करुन मिळावा याकरीता राज्याचे ऊर्जामंत्री यांचेकडे दि.06/06/2016, दि.22/03/2017, दि.05/04/2017, दि.26/04/2017 व दि.10/07/2017  रोजी पत्रव्यवहार केला आहे या वरीलचे पत्रांनुसार मतदारसंघातील अत्यंत खराब झालेल्या अशा विविध रस्त्यांची कामे वरील तारखांनुसार ऊर्जा मंत्री यांचेकडे प्रास्तावित करुन निधीची मागणी केली आहे.दरम्यान सदरच्या खराब झालेल्या रस्त्यांचे प्रस्ताव तात्काळ पाठविणेबाबत व या रस्त्यांच्या पुर्नंबांधणीकरीता आवश्यक असणारा निधी उपलब्ध करुन देणेबाबत ऊर्जा मंत्री यांनी मला आश्वासित केले होते व आहे. अद्यापही हा निधी मिळाला नसल्याने खराब रस्त्यांची कामे मार्गी लागण्यास अडचण येत असून यामुळे डोंगर पठारावरील ग्रामस्थांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. पाटण मतदारसंघातील पवनचक्की प्रकल्पांच्या अवजड वाहतूकीमुळे ग्रामीण आणि डोंगरी भागातील ज्या ग्रामीण रस्त्यांचे अतोनात नुकसान झाले आहे त्या रस्त्यांच्या पुर्नंबांधणीला आवश्यक असणारा निधी देणेसंदर्भात शासनाने कोणता निर्णय घेतला आहे असा प्रश्न आमदार शंभूराज देसाईंनी या तारांकीत प्रश्नामध्ये उपस्थित केला होता.या प्रश्नास राज्याचे ऊर्जामंत्री यांनी लेखी दिलेल्या उत्तरामध्ये हरीत ऊर्जा निधीतंर्गत वित्तीय वर्ष 2017-18 मध्ये निधी अर्थसंकल्पीत झाला असून विभागाव्दारे प्रशासकीय मान्यता देवून निधी वितरणाची कार्यवाही 2017-18 या आर्थिक वर्षामध्येच करण्यात येणार असल्याचे म्हंटले आहे.
         दरम्यान यावर बोलताना आमदार शंभूराज देसाई म्हणाले, पाटण मतदारसंघात सुरु असणा-या पवनचक्की प्रकल्पांच्या अवजड वाहतूकीमुळे ग्रामीण आणि डोंगरी भागातील ज्या ग्रामीण रस्त्यांचे अतोनात नुकसान झाले आहे त्या रस्त्यांच्या पुर्नंबांधणीला आवश्यक असणारा निधी मिळणेसंदर्भात मी 2004 ते 2009 पहिल्यांदा आमदार झालेनंतर अश्या रस्त्यांची पुर्नंबांधणी करणेकरीता प्रति किलोमीटर 10 लाख रुपये निधी देणेबाबतचा निर्णय तत्कालीन पारंपारीक ऊर्जामंत्री यांचेकडून करुन घेतला. मागील वर्षी या विभागाकडून काही रस्त्यांच्या कामांना निधीही प्राप्त्‍ झाला प्राप्त निधीतून सध्या असे खराब झालेल्या रस्त्यांची कामेही सुरु आहेत. तालुक्यात असे अनेक रस्ते आहेत ज्यांना निधीची आवश्यकता आहे त्या रस्त्यांना निधी मिळावा याकरीता माझा प्रयत्न सुरु आहे. ऊर्जामंत्री यांनी दिलेल्या उत्तरानुसार उर्वरीत रस्त्यांच्या कामांना यंदाच्या वर्षी निधी प्राप्त होईल व कामे सुरु होतील असा विश्वास आमदार शंभूराज देसाईंनी शेवठी व्यक्त केला.

विकासाचा महामेरु, बहुत जनांशी आधारु ---- आमदार शंभूराज देसाईसाहेब.





      
            आमदार शंभूराज देसाई हे नाव घेतल्याशिवाय सातारा जिल्हयातील राजकीय वर्तुळच पुर्ण होत नाही. सन 1986 ला लोकनेते  बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे आशिया खंडातील सर्वात लहान वयाचे चेअरमन म्हणून त्यांचे अपघाताने पाटण तालुक्याच्या सहकार क्षेत्रात पदार्पण झाले.सहकार क्षेत्रात सलग 10 वर्षे साखर कारखान्याचे चेअरमन म्हणून त्यांनी राज्याच्या सहकार क्षेत्रात आपला नावलौकीक मिळविला. सहकारातून उदयास आलेल्या या नेतृत्वाने हळूहळू तालुक्याच्या राजकारणात आपली चमक दाखविण्यास सुरुवात केली. राजकारणातील त्यांच्या या कारकिर्दीला 30 वर्षे पुर्ण झाली असून महाराष्ट्र राज्यात एक अभ्यासू आमदार म्हणून त्यांना अवघा महाराष्ट्र ओळखू लागला आहे. आज पाटण या डोंगरी आणि दुर्गम तालुक्याचा   दुस-यांदा आमदार म्हणून काम करताना संसदपटु आमदार, कामगिरी दमदार म्हणत विकासाचा महामेरु बहूत जनांशी आधारु अशी ओळख संपुर्ण महाराष्ट्र राज्यात निर्माण करण्यात ते यशस्वी झाले आहेत त्यानिमित्ताने...
             सन 1992 ला पहिल्यांदा जिल्हा परिषद सदस्य होत राजकीय कारकिर्दीलाही सुरुवात करणारे शंभूराज देसाई यांनी राजकीय क्षेत्रात टप्प्या टप्प्याने झेप घेण्यास प्रारंभ केला.1992 झाले की, 1997 असे दोन वेळा जिल्हा परिषद सदस्य. त्यानंतर सन 1997 ला त्यांचा सहकारातील अभ्यास पाहून शिवसेना पक्षातील प्रवेशानंतर सहकार परिषदेचे अध्यक्षपद व राज्यमंत्री पदाचा दर्जा त्यांना बहाल करण्यात आला. सहकार परिषदेचा कार्यकाल पुर्ण होत असतानाच बँक ऑफ महाराष्ट्र या देशातील अग्रगण्य बँकेचे संचालक म्हणून 2001 ला त्यांची निवड झाली. सन 1995 व 1999 ला बोटावर मोजण्याइतपत मतांनी विधानसभा निवडणुकीला त्यांना पराभूत व्हावे लागले परंतु या पराभवाने खचून न जाता लोकनेत्यांनी भोगलेले तालुक्याचे आमदारपद मिळवायचेच या ध्येयाने त्यांनी अहोरात्र कष्ट घेऊन 2004 च्या विधानसभा निवडणुकीत राज्याच्या मंत्रीपदावर बसलेल्या विरोधकांस सुमारे 6000 मतांनी पराभूत करुन मंत्रीपदावरुन पायउतार होण्यास शंभूराज देसाईंनी भाग पाडून पाटण तालुक्यात नव्याने इतिहास रचला आणि जी अशी काय फिनीक्स पक्षाप्रमाणे भरारी घेतली. तेव्हापासून त्यांनी एकच ध्यास मनी बाळगला तो म्हणजे लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या स्वप्नातील आपला पाटण तालुका लोकनेत्यांच्या प्रमाणे उभा करण्याचा, त्यांच्या काळातील तालुक्याचे वैभव तालुक्याला पुन्हा मिळवून देत तालुका नव्याने घडविण्याचा.
            आमदार शंभूराज देसाईंनी सन 2004 ला तालुक्याचा आमदार म्हणून कामांस सुरुवात केली ती आपले आजोबा महाराष्ट्राचे पोलादी पुरुष लोकनेते बाळासाहेब देसाईसाहेब यांचे आदर्श,त्यांचे विचार आणि संस्कार डोळयासमोर ठेवूनच. पहिल्यांदाच आमदार झालेले आमदार शंभूराज देसाई यांनी विरोधी पक्षाच्या बाकावर बसून सन 2004 ते 2009 या कार्यकालात विरोधी पक्षाचा आमदार असताना देखील पहिल्याच टर्ममध्ये सुमारे 217 कोटी रुपयांचा भरघोस असा निधी तालुक्याच्या प्रलंबित विकास कामांना खेचून आणला. विधानसभेतील प्रभावी आणि अभ्यासपूर्ण भाषणांनी त्यांनी अवघ्या महाराष्ट्रातील राजकीय क्षेत्रातील मातब्बरांचे लक्ष वेधून घेतले व विधानसभेच्या सभागृहात पहिल्यांदाच निवडून जावूनही त्यांनी सत्ताधा-यांना विधानसभेच्या सर्व आयुधांचा वापर करुन आपल्या तालुक्यातील जनतेला सभागृहातील बोलण्याने जादाचा निधी कसा खेचून आणता येईल याचा कसोशिने प्रयत्न केला. त्यांचा विकासकामांचा पाठपुरावा, विधानसभेतील अभ्यासू भाषणे याची दखल घेऊन पहिल्या पाचच वर्षात विधानसभेतील उत्कृष्ट संसदपटु आमदार म्हणून त्यांना गौरविण्यात आले.
            तालुक्याचा प्रलंबित राहिलेला विकास या पाच वर्षात गतीने पुढे नेण्याकरीता 12 महिने 24 तास धडपड करणारे आमदार शंभूराज देसाईंना 2009 च्या विधानसभा निवडणूकीत केवळ 580 मतांनी पराभूत व्हावे लागले. आणि पुढील पाच वर्षात पुन्हा ये रे माझ्या मागल्याप्रमाणेच तालुक्याचा विकास खुंटत गेला. 580 मतांनी पराभूत झाले त्यांनी हार मानली नाही. हारेल तो शंभूराज कसला याचा प्रत्यय यावा तसे त्यांनी पराभवाच्या दुस-या दिवसापासून पायाला भिंगरी बांधून संपुर्ण पाटण तालुक्यातील जनतेचे आभार मानले. सलग पाच वर्षे न थकता दररोज त्यांनी तालुक्यातील जनतेशी एवढा संपर्क वाढविला की शंभूराज देसाई हे त्या काळात आमदार नसतानादेखील आमदारांना लाजवेल अशी कामे करुन त्यांनी जनतेला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला. सत्ताधारी आमदारांना जेवढे प्रश्न आमदार म्हणून सोडविता आले नाहीत एवढे जनतेचे प्रश्न त्यांनी एक माजी आमदार म्हणून मार्गी लावले. आपला खुंटलेला विकास पुर्ण करुन घ्यायचा असेल तर शंभूराज देसाई हेच आपले आमदार पाहिजेत ही खुणगाठ तालुक्यातील जनतेने मनाशी बांधली आणि 2014 च्या विधानसभेच्या निवडणुकीत 18824 अशा भरघोस मतांनी त्यांना पुन्हा तालुक्यातील जनतेने विधानसभेत पाठविले.
            आमदार शंभूराज देसाई यांच्या दुस-या टर्ममधील आमदारकीची अडीच वर्ष पुर्ण होत असताना त्यांनी त्यांच्या आमदारकीच्या माध्यमातून विकासकामांचा धडाकाच पाटण मतदारसंघात लावला आहे. तर शिवसेना पक्षाचे पक्षप्रतोद म्हणून पक्षाची बाजू भक्कमपणे विधानसभेच्या सभागृहात व सभागृहाच्या बाहेर राज्य शासनासमोर मांडून या माध्यमातून राज्यातील विविध प्रश्न शासनाकडून सोडवून घेण्याचे शिवधनुष्य ते लिलया पेलत आहेत. सातारा जिल्हयात सर्वाधिक निधी पाटण तालुक्यात खेचून आणण्यात ते यशस्वी झाले असून विकास कामांसदर्भातील प्रत्येक कामांचा त्यांचा पाठपुरावा यामुळेच एवढया मोठया स्वरुपातील निधी पाटण तालुक्यात येत असून तालुक्यातील जनतेचे प्रलंबित असे अनेक प्रश्न ते आमदार म्हणून मार्गी लावत आहेत आमदार शंभूराज देसाईं यांच्या या कार्याचे कौतुक करावे एवढे थोडेच आहे. पाटण तालुक्यात आजच्या तारखेला जावू तिथे आमदार शंभूराज देसाई यांच्या माध्यमातून विकासकामे सुरु आहेत. मतदारसंघातील जनतेबरोबरच मतदारसंघाचया बाहेरुन येणा-या जनतेमधून त्यांच्या याच कार्याची विकासाच्या माध्यमातून पोहोच मिळू लागली आहे. विकासाचा महामेरु, बहुत जनांशी आधारु म्हणूनच आमदार शंभूराज देसाई यांची प्रतिमा पहावयास मिळत आहेत. कुणीही यावं आणि त्यांच्याकडून काम करुन घेवून जावं असाच त्यांचा दिनक्रम सुरु असून गत अडीच वर्षात त्यांनी सातत्याने प्रयत्न करुन तालुक्यातील विविध विकास कामांकरीता मंजूर करुन आणलेल्या विविध कामांची माहिती पाहिल्यानंतर आमदार शंभूराज देसाई यांच्या कार्याचा प्रत्यय आपणा सर्वांना येईल. मतदार संघातील प्रत्येक गावाला रस्ता, पाणी, वीज या मुलभूत सुविधा देण्याचा त्यांचा प्रयत्न यातून दिसून येईल. आमदार म्हणून दुस-या टर्ममधील त्यांचे पहिले काम आदरणीय लोकनेते बाळासाहेब देसाईसाहेब यांचे राज्य शासनाच्या निधीतून जन्मशताब्दी स्मारकाचे 10 कोटी रुपयांचे काम व या कामांस निधी मंजूर करुन आणला आज हे काम लोकनेतेसाहेबांच्या कर्मभूमित दिमाखाने सुरु आहे. वाढीवचा 10 कोटी रुपयांचा निधी मिळावा याचा प्रस्ताव मान्यतेकरीता राज्य शासनाकडे सादर केला आहे. तसेच लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे पुण्यतिथीनिमित्त प्रतिवर्षी दौलतनगर,ता.पाटण येथे राज्य स्तरीय भव्य कृषी प्रदर्शनास मान्यता मिळविली व सन 2016 आणि 2017 चे राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन उत्साहात साजरे झाले, आदरणीय लोकनेते बाळासाहेब देसाईसाहेब यांचे कोल्हापूर येथील पुर्णाकृती पुतळयाचे सुशोभिकरणाकरीता 20 लाख रुपयांचा निधी मंजूर, सर्वात महत्त्वाचे म्हणजे पाटण तालुक्यातील 55,213 भूकंपबाधित भूकंपग्रस्तांना सन 1995 पासून बंद झालेले भूकंपाचे दाखले पुर्ववत सुरु केले दि. 22/12/2015 पासून तालुक्यातील अनेक भूकंपग्रस्तांनी याचा लाभ घेतला. दि. 01 मे कामगार दिनानिमित्त तालुक्याच्या आमदारांच्या हस्ते तहसिल कार्यालय येथे ध्वजारोहण करण्याचा धोरणात्मक निर्णय करुन घेतला, कोयना भूकंप पुनर्वसन निधी समितीच्या निधीमध्ये समितीचे कोषाध्यक्ष म्हणून प्रतिवर्षी मिळणा-या 5 कोटी रुपयांच्या निधीमध्ये प्रतिवर्षी 5 कोटी रुपयांची वाढ करुन  घेतल्याने प्रतिवर्षी आता 10 कोटी रुपयांचा निधी तालुक्यातील भूकंबबाधित गावातील कामे करण्यास मिळणार आहे, आमदार आदर्श ग्रामयोजनेअंतर्गत पाटण मतदार संघातील सोनवडे,वेखंडवाडी व आरेवाडी गावांच्या निवडी करुन राज्यात ही तीन गावे आदर्श ग्राम करणेचेदृष्टीने त्यांनी कामांस प्रत्यक्षात सुरुवात केली आहे, तारळी मध्यम धरण प्रकल्पातील पाणी या विभागातील  शेतक-यांच्या 50 मीटरवरील उर्वरीत राहणा-या शेतीला मिळवून देणेकरीता राज्य शासनाची तत्त्वत: मान्यता घेतली आहे याचेही काम सुरु झाले आहे,जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत पाटण मतदारसंघातील डोंगरपठारावरील गावांच्या निवडी करुन पावसाळयात वाहून जाणारे पाणी डोंगरपठारावर अडवून ठेवण्याचा धोरणात्मक निर्णय करुन घेतला त्यापध्दतीने कामांसही सुरुवात झाली, केंद्रीय रस्ते वाहतूक महामार्ग विकास मंत्रालयाकडून घाटमाथा हेळवाक पाटण ते कराड या रस्त्यांच्या अद्यावतीकरणाकरीता 309.720 कोटी रुपयांचा निधी मंजूर तसेच केंद्रीय रस्ते वाहतूक विकास कार्यक्रमांतर्गत निसरे फाटा ते पाटण रामापूर पर्यंतच्या रस्त्याचे अद्यावतीकरण करणेकरीता 20 कोटी रुपयांचा निधी मंजूर, दौलतनगर,ता. पाटण येथील लोकनेते बाळासाहेब देसाई शैक्षणिक संकुलात पाटण तालुका क्रिडा संकुल उभारणेबाबतचा सविस्तर प्रस्ताव राज्य शासनाकडे सादर, मान्यता देणेकरीता क्रिडा विभागाची कार्यवाहीही सुर, पाटणच्या बसस्थानकाकरीता राज्याच्या अर्थसंकल्पातून सुमारे 6 कोटी रुपयांचा निधी मंजूर पहिल्या टप्प्यात 1.50 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला, तसेच पाटण येथील न्यायालयाच्या इमारतीकरीता 4 कोटी रुपयांचा निधी मंजुर प्रत्यक्षात कामाला सुरुवात, पाटण येथे मागासवर्गीय मुला- मुलींकरीता सुमारे 100 क्षमतेची दोन वेगवेगळी शासकीय वसतीगृह मंजुर, त्याचबरोबर पाटण येथील पोलीस स्टेशनच्या कर्मचा-यांकरीता पोलिस वसाहतीच्या कामांकरीता निधी मंजुर या कामाचे नुकतेच भूमिपुजन संपन्न, कोयना नदीकाठी वसलेल्या गावांना संरक्षण देणेकरीता मतदार संघातील 10 गावांना कोयना नदीकाठी संरक्षक भिंत बांधणेकरीता निधी उपलब्ध होणेचे दृष्टीने प्रस्ताव सादर 10 पैकी 1 कोटी रुपयांच्या आतील 4 कामांना मंजूरी, उर्वरीत 1 कोटीच्या वरच्या कामाकरीता मंत्रालयात पाठपुरावा सुरु, मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल योजनेअंतर्गत 2 कोटी 63 लाख 34 हजार एवढया रुपयांचा निधी मंजूर, मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत 11 रस्त्यांच्या कामांसाठी 17 कोटी 92 लाख 87 हजार एवढया रुपयांचा निधी मंजूर,पाटण या डोंगरी व दुर्गम तालुक्यातील ग्रामीण आणि डोंगरी भागाच्या विद्युत विकासाकरीता सुमारे 11.22 कोटी रुपयांचा डोंगरी विद्युत विकास आराखडा राज्य शासनाकडे मान्यतेकरीता सादर, महाराष्ट्र ऊर्जा विकास कार्यक्रमांतर्गत पवनचक्की प्रकल्पाच्या अवजड वाहतूकीमुळे खराब झालेल्या रस्त्यांच्या कामांकरीता 27 कोटी 82 लाख 72 हजार एवढया रुपयांचा निधी मंजूर, मोरणा गुरेघर मध्यम धरण प्रकल्पाच्या माध्यमातून या विभागातील शेतक-यांना कॅनॉलऐवजी इरिगेशनच्या माध्यमातून पाणी देणेबाबत फेरसर्व्हे करण्याच्या कामास मंजूरी फेरसर्व्हे करण्याच्या कामांस प्रत्यक्षात सुरुवात, पाटण तालुक्यातील वनविभागातील रस्ते तसेच पाणी पुरवठा योजना करणेकरीता विशेष बाब म्हणून मान्यता मिळणेकरीताचा प्रस्ताव सादर करण्याच्या राज्य शासनाच्या सुचना त्यानुसार प्रस्ताव मान्यतेकरीता सादर, पाटण तालुक्यातील सर्व प्रशासकीय कार्यालये एकाच छताखाली आणणेकरीता प्रशासकीय इमारतीला निधी मिळणेचा प्रस्ताव दि. 04-05-2016 रोजी राज्य शासनाकडे मंजूरीकरीता सादर, सहयाद्री व्याघ्र प्रकल्पातील बफर झोनमधील जाचक व अन्यायकारक अटी कमी करणेकरीता स्थानिक सल्लागार समितीच्या माध्यमातून राज्य शासनाकडे आग्रही मागणी हा अतिशय गंभीर प्रश्न सोडवून घेणेकरीता शासनाकडे सातत्याने पाठपुरावा, कृष्णा खोरे विकास महामंडळांतर्गत ढेबेवाडी ते उमरकांचन ते जिंती या रिंगरोड करीता 5.19 कोटी एवढया रुपयांचा निधी मंजूर, मारुलहवेली व बेलवडे येथे महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीची दोन सबस्टेशन कार्यान्वित, महिंद धरण प्रकल्पातील बोर्गेवाडी येथील धरणग्रस्तांचे चौगुलेवाडी (सुर्यवंशीवाडी)  येथे अद्यावत पुनर्वसन,नाबार्ड योजनेअंतर्गत काढणे पुलाच्या कामांस 5 कोटी रुपयांचा निधी मंजूर होण्याचा प्रस्ताव सादर जुलैच्या अधिवेशनात या कामांस निधी उपलब्ध होण्याचे संकेत, पाटण या तालुक्याच्या गावास कार्यान्वीत असलेली नळ पाणी पुरवठा योजनेचे मजबुतीकरण करणेकरीता नगरोत्थान विभागांतर्गत 46.57 एवढया लाखांचा निधी मंजूर, राज्य शासनाच्या 2515 योजनेअंतर्गत 29 रस्त्यांच्या कामांसाठी 3 कोटी रुपयांचा निधी मंजूर, राज्य शासनाच्या अर्थसंकल्पातून रस्त्यांच्या कामांसाठी 18 कोटी 30 लाख 74 हजार रुपयांचा निधी मंजूर तर नाबार्ड योजनेअंतर्गत रस्त्यांच्या कामांसाठी 1 कोटी 90 लाख रुपयांचा निधी मंजूर, मतदार संघातील ग्रामीण मार्गावरील रस्त्यांवरील 53 साकव पुलांची बांधकामे करण्याकरीता 10 कोटी 45 लाख 39 हजार रुपयांचा निधी मंजूर,  मल्हारपेठ येथे तालुक्याच्या मध्यवर्ती ठिकाणी पशुवैद्यकीय दवाखाना इमारत मंजूर 38 लाख 85 हजार निधी उपलब्ध तसेच उरुल याठिकाणी प्राथमिक आरोग्य विभागाचे उपक्रेंद इमारत उभी करण्याकरीता 1 कोटी 17 लाख रुपयांचा निधी मंजुर, तालुका डोंगराळ असल्याने तालुक्यात ग्रामीण रस्तेच जादा प्रमाणात असून यातील प्रमुख गांवाना जोडणा-या रस्त्यांच्या कामांना दर्जोन्नती मिळावी अशाप्रकारचे १५ रस्त्यांची कामे ही शासनाच्या मंजुरीकरीता पाठविली आहेत. भविष्यात या दर्जोन्नतीच्या कामामुळे राज्याच्या अर्थसंकल्पातून या कामांना सातत्याने प्रतिवर्षी निधी उपलब्ध होवून ग्रामीण भाग प्रमुख रस्त्यांच्या माध्यमातून एकमेकास जोडण्यास मदत होणार आहे.यांसारख्या अनेक कामांकरीता कोटयावधी रुपयांचा निधी मंजूर करुन आणला असून मतदारसंघातील सर्वसामान्य जनतेचे प्रश्न जागेवरच सोडविण्याकरीता जनता दरबार ही संकल्पना सुरु करुन दोन वर्षामध्ये पाटणमध्ये तीन व सुपने मंडलमध्ये एक जनता दरबार संपन्न. चार जनता दरबारात आलेल्या एकूण 799 निवेदनांपैकी 713 निवेदनांचा निपटारा त्यांनी केला आहे. हा मागील दोन वर्षातील त्यांच्या कामांचा लेखाजोखा असून उर्वरीत राहिलेल्या अडीच वर्षात मतदारसंघामध्ये कोणकोणत्या प्रलंबीत कामांना निधी उपलब्ध करुन आणावयाचा आहे याचा मतदारसंघातील गणनिहाय प्रत्येक गावचा तसेच वाडीवस्तीचा विकासकामांचा आराखडा त्यांनी तयार केला आहे. अशाप्रकारे धडाकेबाज आमदार म्हणून आमदार शंभूराज देसाईंचे पाटण मतदार संघात काम सुरु असून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्याकरीता त्यांनी गत अडीच वर्षात आपल्या सर्वांकरीता केलेल्या विविध कामांचा तसेच जनहितार्थ विविध विकासकामांचा प्रसार व प्रचार करुन त्यांना व त्यांच्या कार्याला आपण सर्वांनी बळ देऊया व त्यांची तालुक्यावर असणारी राजकीय पकड मजबूत करुया एवढीच माफक अपेक्षा.

महाराष्ट्राचे पोलादी नेतृत्व- आदरणीय लोकनेते बाळासाहेब देसाई




v  महाराष्ट्र राज्याच्या उभारणीत मोलाचे योगदान देणारे आदरणीय लोकनेते बाळासाहेब देसाई साहेब यांनी सन 1941 मध्ये ब्रिटीश राजवटीच्या विरोधात सातारा जिल्हा लोकल बोर्ड अध्यक्षपदावरुन आपल्या राजकीय, सामाजिक कार्याला सुरुवात केली. 1941 ते 1952 पर्यंत ब्रिटीश धारजिणी असणा-यांचा पराभव करुन सामान्य जनतेची सत्ता प्रस्थापित करण्यात यश मिळविले होते. सलग 11 वर्षे ते सातारा जिल्हा लोकल बोर्डाचे अध्यक्ष होते.
v  सन 1952 ला सातारा जिल्हयातील पाटण विधानसभा मतदारसंघातून ते पहिल्यांदा विधानसभेवर निवडून आले होते.
v  त्यानंतर सन 1957, 1962 लाही आमदार म्हणून विजयी झाले.
v  सन 1967 साली पाटण विधानसभा मतदारसंघातून विधानसभेवर बिनविरोध निवडून जाणारे महाराष्ट्रातील एकमेव बिनविरोध आमदार म्हणून त्यांचा अभिमानाने उल्लेख करण्यात येतो.
v  सन 1957 ला आमदारकीच्या दुस-या टर्ममध्ये पहिल्यांदा राज्याच्या मंत्रीमंडळात त्यांचा समावेश करण्यात आला होता.
v  सन 1957 ते 1970 पर्यंत राज्य शासनाच्या बांधकाम,शिक्षण,कृषी,महसूल व गृह अशा विविध राज्य मंत्रीमंडळातील महत्त्वाच्या खात्यांची जबाबदारी त्यांनी लिलया पेलली होती.
v  राज्याच्या मंत्रीमंडळात लोकनेते बाळासाहेब देसाईसाहेब यांनी घेतलेल्या अनेक धोरणात्मक निर्णयांची अंमलबजावणी आजही राज्य शासन करीत आहे. त्यांनी घेतलेले अनेक धोरणात्मक निर्णय राज्य हिताच्या दृष्टीने आणि राज्याला प्रगतीच्या दिशेने नेणारे आहेत याचा आवर्जुन या ठिकाणी उल्लेख करणे क्रमप्राप्त आहे.
v  यामध्ये 1250 रुपये वार्षिक उत्पन्न असणा-या पालकांच्या पाल्यांना मोफत शिक्षण देणेचा क्रांतीकारी निर्णय लोकनेते साहेबांनी घेतला होता त्यांच्या या धोरणात्मक निर्णयामुळे महाराष्ट्र राज्यात शैक्षणिक क्रांती उदयास आली आणि ई.बी.सी.सवलतीचे जनक म्हणून लोकनेते साहेबांच्या या धोरणात्मक निर्णयाची नोंद झाली. या निर्णयाचे कौतुक देशाचे तत्कालीन पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरू यांनी केले होते.
v  तर महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी म्हणून पाटण विधानसभा मतदार संघातील कोयना धरणाची जी ओळख आहे त्या कोयना धरणाची उभारणी ही लोकनेते बाळासाहेब देसाईंनी करुन या धरणाच्या माध्यमातून धरणाच्या शिवसागर जलाशयात 100 टी.एम.सी. पाणी साठा होईल एवढा धरणाचा विस्तार हा त्यांचा आणखी एक धोरणात्मक निर्णय या धरणामुळे महाराष्ट्र राज्याला प्रकाशमान करणारा 2000 मे. वॅट वीज निर्मिती प्रकल्प कोयना जलविद्युत प्रकल्प नावाने कार्यान्वित झाला याचे सर्व श्रेय लोकनेते बाळासाहेब देसाईसाहेब यांचे आहे.
v  त्याच्या पुढेही जावून राज्याचे महसूल मंत्री म्हणून जबाबदारी पेलत असताना कसेल त्याची जमीन या धोरणानुसार त्यांनी कुळ कायदा राज्यात अंमलात आणला आणि शेतक-यांच्या जमिनी शेतक-यांना परत मिळवून दिल्या या कायद्याचे अंमल करणारे पहिले महसूल मंत्री म्हणून त्यांची राज्यात नोंद आहे.
v  छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर त्यांची असणारी निस्सिम भक्ती यातून त्यांनी महाराष्ट्र राज्याचे प्रवेशव्दार असणा-या गेट वे ऑफ इंडीयासमोर तसेच दादर येथील भव्य शिवाजी पार्कवर छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळे उभारण्याचे भरीव कार्य केले.
v  पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर येथील गोरगरीब घरातील मुला-मुलींना चांगले शिक्षणाची कवाडे खुली व्हावीत याकरीता राज्याचे शिक्षणमंत्री असताना त्यांनी कोल्हापूर या मध्यवर्ती ठिकाणी शिवाजी विद्यापिठाची स्थापना केली.
v  बांधकाम मंत्री म्हणून त्यांनी राज्यातील सर्व गडकिल्ले व तिर्थक्षेत्रांना जोडणारे रस्ते करण्यास प्राधान्य दिले.
v  राज्याचे गृहमंत्री म्हणून काम करताना धर्मगुरु पोप जॉन पॉल यांचेकडून राज्यातील गृह विभागाचे प्रभावी कामगिरीबद्दल त्यांचे विशेष कौतुक करण्यात आले होते. जनतेच्या हिताकरीता सातत्याने धाडसी निर्णय घेऊन जनतेला न्याय मिळवून देणारे लोकांच्यातले लोकनते म्हणून आणि वेळप्रसंगी कायद्यात बदल करणारे पोलादी नेतृत्व म्हणून लोकनेते बाळासाहेब देसाई यांचा गौरव संपुर्ण महाराष्ट्रात करण्यात येतो.
v  सन 1976 ते 1980 या कालावधीत महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष म्हणून त्यांना काम करण्याची संधी मिळाली तेव्हा त्यांनी विधानसभेचे अध्यक्ष म्हणून प्रभावी कामगिरी बजावली होती.
v  आदरणीय लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या कार्याचा गौरव करणेकरीता सन 2010 ला त्यांचे जन्मशताब्दी वर्षानिमित्त त्यांचे नातू आमदार शंभूराज देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली संपुर्ण महिनाभर लोकनेते साहेब यांचे जन्मभूमित जन्मशताब्दी वर्ष मोठया उत्साहाने साजरे केले. या महिनाभराच्या कालावधीत लोकनेते साहेब यांना अभिवादन करण्याकरीता देशातील व राज्यातील विविध पक्षांचे मान्यवर लोकनेते साहेब यांचे जन्मभूमित पाटण तालुक्यात आले होते.
v  याच जन्मशताब्दी वर्षात आमदार शंभूराज देसाईंनी आदरणीय लोकनेते बाळासाहेब देसाईसाहेब यांचे जन्मभूमित राज्य शासनाच्या माध्यमातून जन्मशताब्दी स्मारक उभारण्याचा संकल्प केला होता. सन 2014 ला पुनश्च: पाटण विधानसभा मतदार संघाचे आमदार झालेनंतर आमदार शंभूराज देसाई यांनी युती शासनाच्या माध्यमातून या शताब्दी स्मारकाकरीता 10 कोटी रुपयांचा निधी मंजूर करुन आणला आहे. या स्मारकाचे काम मोठया दिमाखात सुरु असून राज्यातील एक देखणे असे स्मारक म्हणून हे स्मारक नावारुपास येईल. वाढीवचे 10 कोटी रुपयेही या स्मारकाच्या कामांस मिळावे याकरीताचा प्रस्ताव राज्य शासनाच्या मंजुरीकरीता सादर केला आहे.
v  आदरणीय लोकनेते बाळासाहेब देसाईसाहेब जन्मशताब्दी स्मारकामध्ये लोकनेतेसाहेब यांनी राज्याच्या मंत्रीमंडळात मंत्री म्हणून संपुर्ण राज्यात केलेल्या विविध कार्याची माहिती देणारे सुमारे 1000 छायाचित्रांचे दालन तसेच त्यांच्या कार्याची चित्रफित पाहण्याची संधी मिळणार आहे. तसेच स्पर्धा परिक्षांची तयारी करणा-या ग्रामीण आणि डोंगरी भागातील विद्यार्थी-विद्यार्थीनीकरीता इंटरनेट सुविधांसह, ग्रंथालय अद्यावत अशी अभ्यासिका केंद्राचाही या स्मारकामध्ये समावेश आहे.
v  टिप (आदरणीय लोकनेते बाळासाहेब देसाईसाहेब यांच्या कार्याची थोडक्यात माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. लोकनेते साहेबांच्या कार्यावरील लोकनायक हा चरित्रग्रंथ आमदार शंभूराज देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली प्रसिध्द करण्यात आला आहे. लोकनायक हा ग्रंथ दौलतनगर, ता. पाटण या ठिकाणी उपलब्ध आहे. कृपया अधिक माहितीसाठी लोकनायक- लोकनेते बाळासाहेब देसाईसाहेब या चरित्रग्रंथाचे वाचन करावे हि विनंती.) संपादक, साप्ताहिक महाराष्ट्र दौलत.