पाटण
तालुक्यातील महिंद येथील लघू पाटबंधारे तलावाच्या सांडव्याच्या विशेष दुरुस्तीच्या
कामांस निधी उपलब्ध करुन दयावा याकरीता सन २०१५ पासून शासनाच्या जलसंपदा विभाग व
महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळ यांचेकडे दि.१३.०३.२१०५ व दि.१५.०७.२०१६ या पत्रव्यवहारानुसार
तसेच यासंदर्भात नागपुरच्या हिवाळी अधिवेशनामध्ये दि.१६.१२.२०१६ रोजी चर्चेला
आलेल्या तारांकीत प्रश्नाच्या माध्यमातून पाठपुरावा करीत होतो. सातत्याच्या
पाठपुराव्यावरुन शासनाच्या जलसंपदा विभाग व महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास
महामंडळाने महिंद लघू पाटबंधारे तलावाच्या सांडव्याच्या विशेष दुरुस्तीचे काम हाती
घेतले आहे. दुरुस्तीच्या कामांकरीता ७६.४१ लक्ष रुपयांचा निधी शासनाच्या जलसंपदा
विभागाने मंजुर केला असून या कामांची निविदाही काढली असल्याची माहिती आमदार
शंभूराज देसाई यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे दिली आहे.
आमदार शंभूराज
देसाईंनी दिलेल्या पत्रकात म्हंटले आहे की, पाटण तालुक्यात महिंद येथे शासनाच्या
जलसंपदा विभागातंर्गत व महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाने बांधलेल्या लघू
पाटबंधारे तलावाच्या सांडव्याची दुरावस्था झाली असल्याने तलावाच्या सुरक्षिततेच्या
दृष्टीने तलावातून होणारी गळती थांबविणेकरीता शासनाच्या जलसंपदा विभागाने
महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळास या तलावाची विशेष दुरुस्ती करणेसाठी
आवश्यक असणारा निधी उपलब्ध करुन दयावा याकरीता मी तालुक्याचा लोकप्रतिनिधी या
नात्याने सन २०१५ पासून शासनाच्या जलसंपदा विभागाकडे प्रयत्न करीत आहे. या
कामांकरीता निधी मिळणेसाठी राज्याचे जलसंपदा मंत्री ना.गिरीश महाजन यांना
प्रत्यक्ष भेटून दि.१३.०३.२१०५ व दि.१५.०७.२०१६ रोजी पत्रव्यवहारही केला होता तर
दि.१६.१२.२०१६ रोजी यासंदर्भात नागपुरच्या हिवाळी अधिवेशनामध्ये चर्चेला आलेल्या
तारांकीत प्रश्नाच्या माध्यमातून विशेष दुरुस्तीच्या कामांस निधी देणेबाबतची मागणी
केली होती.यावेळी राज्याचे जलसंपदा मंत्री ना.गिरीश महाजन यांनी या तारांकीत
प्रश्नास उत्तर देताना आमदार शंभूराज देसाई यांच्या मागणीवरुन महिंद येथील लघू
पाटबंधारे तलावामधून होणारी पाण्याची गळती थांबविणे व या सांडव्याच्या विशेष
दुरुस्तीच्या कामांस निधी उपलब्ध करुन दिला जाईल असे आश्वासन दिले होते. त्यानुसार
राज्याच्या जलसंपदा विभागाने महिंद येथील लघू पाटबंधारे तलावामधून होणारी पाण्याची
गळती थांबविणे व या सांडव्याच्या विशेष दुरुस्तीच्या कामांस आवश्यक असणारा ७६.४१
लक्ष रुपयांचा निधी मंजुर केला असून महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळ, पुणे
अंतर्गत सातारा पाटबंधारे प्रकल्प मंडळ,सातारा यांचे अखत्यारित लघू पाटबंधारे
विभाग, सातारा यांचेकडून महिंद येथील लघू पाटबंधारे तलावाच्या सांडव्याच्या विशेष
दुरुस्तीच्या कामांची निविदाही काढली असून या कामांमध्ये सांडवा, पुच्छ कालवा
मजबुतीकरण करणेकरीता पुर्ण सांडव्यास संधानकामध्ये जॅकेटींग करणे, पुच्छ
कालव्यामध्ये चेकवॉल बांधणे, सर्व्हीस गेटजवळ मातीचा भराव करणे व तलावाच्या वरील
बाजूचे अश्मपटल दुरुस्ती करणे या कामांचा समावेश करण्यात आला आहे. महिंद येथील लघू
पाटबंधारे तलावामधून होणारी पाण्याची गळती थांबविणे व या सांडव्याच्या विशेष
दुरुस्तीच्या कामांस ७६.४१ लक्ष रुपयांचा निधी मंजुर झाल्याने लवकरच या
पावसाळयापुर्वी हे विशेष दुरुस्तीचे काम पुर्णत्वाकडे जावून तलावातील पाण्याची
गळती थांबेल असेही आमदार शंभूराज देसाईंनी पत्रकात म्हंटले आहे.
No comments:
Post a Comment