Wednesday 13 December 2017

कोयना शिक्षण संस्था ज्यांनी स्थापन केली त्यांचेतरी भान ठेवा. कोयना शिक्षण संस्था चालकांना आमदार शंभूराज देसाईंचा सल्ला. लोकनेते साहेबांचे नावाने सुरु असलेल्या कॉलेजला बी.डी.कॉलेज केलेला उल्लेख निषेधार्थ.





पाटण तालुक्याचे भाग्यविधाते लोकनेते बाळासाहेब देसाई यांनी तालुक्यातील गोरगरीब कुटुंबातील मुलामुंलीना चांगले शिक्षण तालुक्यातच मिळावे या उदात्त हेतूने पाटण तालुक्यात कोयना शिक्षण संस्थेची स्थापना करुन बाळासाहेब देसाई कॉलेजची निर्मिती केली. आज या संस्थेला 50 वर्षे पुर्ण होत असताना संस्थेच्या सुवर्ण महोत्सवाच्या कार्यक्रम पत्रिकेवर कॉलेजला सुरवातीपासून बाळासाहेब देसाई कॉलेज असे सरळ नाव असताना संस्थाचालकांनी जाणिवपुर्वक बी.डी.कॉलेज असा उल्लेख करुन संस्थाचालकांनी त्यांची वैचारिक पातळी कितपत ढासळली आहे हे दाखवून दिले आहे ही बाब निषेधार्थ आहे. मी या गोष्टीचा जाहीर निषेध करतो. ज्यांच्या ताब्यात ही संस्था आहे त्यांनी ही संस्था कुणी स्थापन केली त्यांचे भान या संस्थाचालकांना राहिले नसून लोकनेतेसाहेबांच्या मुळेच आपण या संस्थेच्या विविध पदावर बसला आहात लोकनेतेसाहेबांनी संस्था स्थापन केली नसती तर आपण कुठेच दिसला नसता याचे भान संस्थाचालकांनी ठेवावे असा सल्ला लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे नातू तालुक्याचे आमदार शंभूराज देसाईंनी कोयना शिक्षण संस्थेच्या संस्थाचालकांना पत्रकातून दिला आहे.

आमदार शंभूराज देसाईंनी म्हंटले आहे की, पाटण तालुक्यातील कोयना शिक्षण संस्थेची स्थापना कोणी केली हे तालुक्यातील जनतेसह अवघ्या महाराष्ट्राला माहिती आहे. डोंगरी आणि दुर्गम अशा पाटण तालुक्यातील गोरगरीब कुटुंबातील मुलामुंलीना महाविद्यालयीन शिक्षणासाठी कराड अथवा सातारा येथे जावे लागण्यापेक्षा या गरीब मुलांना आपल्या पाटण तालुक्यातच चांगले शिक्षण मिळावे हा दृष्टीकोन ठेवून लोकनेते साहेबांनी कोयना शिक्षण संस्थेच्या माध्यमातून बाळासाहेब देसाई कॉलेजची निर्मिती केली हे मी नव्याने सांगण्याची गरज नाही परंतू ज्या लोकनेतेसाहेबांनी ही स्ंस्था स्थापन करुन पाटणला कॉलेज निर्माण केले त्याच कॉलेजवर कोयना शिक्षण संस्थेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने आयोजीत केलेल्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रम पत्रिकेवर संस्था चालकांनी आणि आयोजक म्हणून काम करणा-या कॉलेजच्या व्यवस्थापनाने जाणिवपुर्वक कॉलेजला बाळासाहेब देसाई कॉलेज,पाटण असे सुरवातीपासून नाव असताना लोकनेते साहेबांच्या नावाचा सरळ वापर न करता बी.डी. कॉलेज पाटण असा उल्लेख केला आहे.ही गोष्ट लाजीरवाणी आणि निषेध व्यक्त करणारी आहे.मी लोकनेते साहेबांचा नातू म्हणूनही आणि तालुक्याचा प्रथम नागरिक म्हणून कोयना शिक्षण संस्था चालविणा-या संस्था चालकांचा जाहीरपणे निषेध करतो.कारण ज्यांच्यामुळे ही संस्था चालू झाली त्यांच्याच नावाचा विसर या संस्थाचालकांना पडला ही दुर्दैवी बाब आहे. लोकनेतेसाहेबांनी संस्था स्थापन केली नसती तर आता संस्था ताब्यात असणारे पदाधिकारी कुठेच अध्यक्ष अथवा सचिव किंवा सदस्य म्हणून कार्यरत असलेले आपल्याला दिसले नसते. कोयना शिक्षण संस्था स्थापन करण्याचा लोकनेतेसाहेबांचा हेतू उदात्त होता.उदात्त हेतूनेच लोकनेतेसाहेबांनी या संस्थेवर आमच्या विरोधकांना घेतले होते मात्र त्यांनी ज्यां लोकनेतेसाहेबांनी आपल्याला बोटाला धरुन  राजकारण शिकविले त्या लोकनेतेसाहेबांनी उभारलेल्या संस्थेतच आपल्या स्वार्थासाठी राजकारण करुन या संस्थेवरील विश्वस्तांचा विश्वासघात करुन ही संस्था विरोधकांनी त्यांच्या ताब्यात घेतली कोयना शिक्षण संस्थेचा हा इतिहास तालुक्यातील तमाम जनतेला चांगलाच माहिती आहे.मी नव्याने सांगण्याची आवश्यकता नाही.कोयना शिक्षण संस्थेच्या संस्थाचालकांनी जाणिवपुर्वक कोयना शिक्षण संस्थेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या वर्धापनदिनाच्या कार्यक्रम पत्रिकेवर लोकनेतेसाहेबांचा बाळासाहेब देसाई कॉलेज असे सरळ नाव असताना बी.डी.कॉलेज असा उल्लेख्‍ करुन त्यांची वैचारिक पातळी किती खालच्या दर्जाची आहे हे दाखवून दिले आहे आणि हे न समजण्याइतकी पाटण तालुक्यातील जनता नक्कीच सुज्ञ आहे.त्यामुळे संस्थाचालकांनी शिक्षणासारखी पवित्र संस्था चालविताना ज्यांच्यामुळे ही संस्था चालू झाली आणि ज्यांच्यामुळे या संस्थेच्या पदावर आपण आज विराजमान आहात त्यांचा आणि त्यांच्या नावाचा विसर भविष्यात पडू देवू नका अन्यथा पाटण तालुक्यातील जनता तुम्हाला कदापिही माफ करु शकणार नाही.असा इशाराही आमदार शंभूराज देसाईंनी कोयना शिक्षण संस्थेच्या संस्थाचालकांना पत्रकातून दिला आहे.

No comments:

Post a Comment