आमदार शंभूराज देसाई हे नाव घेतल्याशिवाय सातारा जिल्हयातील राजकीय वर्तुळच पुर्ण होत नाही. सन 1986 ला लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे आशिया खंडातील सर्वात लहान वयाचे चेअरमन म्हणून त्यांचे अपघाताने पाटण तालुक्याच्या सहकार क्षेत्रात पदार्पण झाले.सहकार क्षेत्रात सलग 10 वर्षे साखर कारखान्याचे चेअरमन म्हणून त्यांनी राज्याच्या सहकार क्षेत्रात आपला नावलौकीक मिळविला. सहकारातून उदयास आलेल्या या नेतृत्वाने हळूहळू तालुक्याच्या राजकारणात आपली चमक दाखविण्यास सुरुवात केली. राजकारणातील त्यांच्या या कारकिर्दीला 30 वर्षे पुर्ण झाली असून महाराष्ट्र राज्यात एक अभ्यासू आमदार म्हणून त्यांना अवघा महाराष्ट्र ओळखू लागला आहे. आज पाटण या डोंगरी आणि दुर्गम तालुक्याचा दुस-यांदा आमदार म्हणून काम करताना संसदपटु आमदार, कामगिरी दमदार म्हणत विकासाचा महामेरु बहूत जनांशी आधारु अशी ओळख संपुर्ण महाराष्ट्र राज्यात निर्माण करण्यात ते यशस्वी झाले आहेत त्यानिमित्ताने...
सन 1992 ला पहिल्यांदा जिल्हा परिषद सदस्य होत राजकीय कारकिर्दीलाही सुरुवात करणारे शंभूराज देसाई यांनी राजकीय क्षेत्रात टप्प्या टप्प्याने झेप घेण्यास प्रारंभ केला.1992 झाले की, 1997 असे दोन वेळा जिल्हा परिषद सदस्य. त्यानंतर सन 1997 ला त्यांचा सहकारातील अभ्यास पाहून शिवसेना पक्षातील प्रवेशानंतर सहकार परिषदेचे अध्यक्षपद व राज्यमंत्री पदाचा दर्जा त्यांना बहाल करण्यात आला. सहकार परिषदेचा कार्यकाल पुर्ण होत असतानाच बँक ऑफ महाराष्ट्र या देशातील अग्रगण्य बँकेचे संचालक म्हणून 2001 ला त्यांची निवड झाली. सन 1995 व 1999 ला बोटावर मोजण्याइतपत मतांनी विधानसभा निवडणुकीला त्यांना पराभूत व्हावे लागले परंतु या पराभवाने खचून न जाता लोकनेत्यांनी भोगलेले तालुक्याचे आमदारपद मिळवायचेच या ध्येयाने त्यांनी अहोरात्र कष्ट घेऊन 2004 च्या विधानसभा निवडणुकीत राज्याच्या मंत्रीपदावर बसलेल्या विरोधकांस सुमारे 6000 मतांनी पराभूत करुन मंत्रीपदावरुन पायउतार होण्यास शंभूराज देसाईंनी भाग पाडून पाटण तालुक्यात नव्याने इतिहास रचला आणि जी अशी काय फिनीक्स पक्षाप्रमाणे भरारी घेतली. तेव्हापासून त्यांनी एकच ध्यास मनी बाळगला तो म्हणजे लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या स्वप्नातील आपला पाटण तालुका लोकनेत्यांच्या प्रमाणे उभा करण्याचा, त्यांच्या काळातील तालुक्याचे वैभव तालुक्याला पुन्हा मिळवून देत तालुका नव्याने घडविण्याचा.
सन 1992 ला पहिल्यांदा जिल्हा परिषद सदस्य होत राजकीय कारकिर्दीलाही सुरुवात करणारे शंभूराज देसाई यांनी राजकीय क्षेत्रात टप्प्या टप्प्याने झेप घेण्यास प्रारंभ केला.1992 झाले की, 1997 असे दोन वेळा जिल्हा परिषद सदस्य. त्यानंतर सन 1997 ला त्यांचा सहकारातील अभ्यास पाहून शिवसेना पक्षातील प्रवेशानंतर सहकार परिषदेचे अध्यक्षपद व राज्यमंत्री पदाचा दर्जा त्यांना बहाल करण्यात आला. सहकार परिषदेचा कार्यकाल पुर्ण होत असतानाच बँक ऑफ महाराष्ट्र या देशातील अग्रगण्य बँकेचे संचालक म्हणून 2001 ला त्यांची निवड झाली. सन 1995 व 1999 ला बोटावर मोजण्याइतपत मतांनी विधानसभा निवडणुकीला त्यांना पराभूत व्हावे लागले परंतु या पराभवाने खचून न जाता लोकनेत्यांनी भोगलेले तालुक्याचे आमदारपद मिळवायचेच या ध्येयाने त्यांनी अहोरात्र कष्ट घेऊन 2004 च्या विधानसभा निवडणुकीत राज्याच्या मंत्रीपदावर बसलेल्या विरोधकांस सुमारे 6000 मतांनी पराभूत करुन मंत्रीपदावरुन पायउतार होण्यास शंभूराज देसाईंनी भाग पाडून पाटण तालुक्यात नव्याने इतिहास रचला आणि जी अशी काय फिनीक्स पक्षाप्रमाणे भरारी घेतली. तेव्हापासून त्यांनी एकच ध्यास मनी बाळगला तो म्हणजे लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या स्वप्नातील आपला पाटण तालुका लोकनेत्यांच्या प्रमाणे उभा करण्याचा, त्यांच्या काळातील तालुक्याचे वैभव तालुक्याला पुन्हा मिळवून देत तालुका नव्याने घडविण्याचा.
आमदार शंभूराज
देसाईंनी सन 2004 ला तालुक्याचा आमदार म्हणून कामांस सुरुवात केली ती आपले आजोबा
महाराष्ट्राचे पोलादी पुरुष लोकनेते बाळासाहेब देसाईसाहेब यांचे आदर्श,त्यांचे
विचार आणि संस्कार डोळयासमोर ठेवूनच. पहिल्यांदाच आमदार झालेले आमदार शंभूराज
देसाई यांनी विरोधी पक्षाच्या बाकावर बसून सन 2004 ते 2009 या कार्यकालात विरोधी
पक्षाचा आमदार असताना देखील पहिल्याच टर्ममध्ये सुमारे 217 कोटी रुपयांचा भरघोस
असा निधी तालुक्याच्या प्रलंबित विकास कामांना खेचून आणला. विधानसभेतील प्रभावी
आणि अभ्यासपूर्ण भाषणांनी त्यांनी अवघ्या महाराष्ट्रातील राजकीय क्षेत्रातील
मातब्बरांचे लक्ष वेधून घेतले व विधानसभेच्या सभागृहात पहिल्यांदाच निवडून जावूनही
त्यांनी सत्ताधा-यांना विधानसभेच्या सर्व आयुधांचा वापर करुन आपल्या तालुक्यातील
जनतेला सभागृहातील बोलण्याने जादाचा निधी कसा खेचून आणता येईल याचा कसोशिने
प्रयत्न केला. त्यांचा विकासकामांचा पाठपुरावा, विधानसभेतील अभ्यासू भाषणे याची
दखल घेऊन पहिल्या पाचच वर्षात विधानसभेतील उत्कृष्ट संसदपटु आमदार म्हणून त्यांना
गौरविण्यात आले.
तालुक्याचा
प्रलंबित राहिलेला विकास या पाच वर्षात गतीने पुढे नेण्याकरीता 12 महिने 24 तास धडपड
करणारे आमदार शंभूराज देसाईंना 2009 च्या विधानसभा निवडणूकीत केवळ 580 मतांनी
पराभूत व्हावे लागले. आणि पुढील पाच वर्षात पुन्हा ये रे माझ्या मागल्याप्रमाणेच
तालुक्याचा विकास खुंटत गेला. 580 मतांनी पराभूत झाले त्यांनी हार मानली नाही.
हारेल तो शंभूराज कसला याचा प्रत्यय यावा तसे त्यांनी पराभवाच्या दुस-या
दिवसापासून पायाला भिंगरी बांधून संपुर्ण पाटण तालुक्यातील जनतेचे आभार मानले. सलग
पाच वर्षे न थकता दररोज त्यांनी तालुक्यातील जनतेशी एवढा संपर्क वाढविला की
शंभूराज देसाई हे त्या काळात आमदार नसतानादेखील आमदारांना लाजवेल अशी कामे करुन
त्यांनी जनतेला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला. सत्ताधारी आमदारांना जेवढे
प्रश्न आमदार म्हणून सोडविता आले नाहीत एवढे जनतेचे प्रश्न त्यांनी एक माजी आमदार
म्हणून मार्गी लावले. आपला खुंटलेला विकास पुर्ण करुन घ्यायचा असेल तर शंभूराज
देसाई हेच आपले आमदार पाहिजेत ही खुणगाठ तालुक्यातील जनतेने मनाशी बांधली आणि 2014
च्या विधानसभेच्या निवडणुकीत 18824 अशा भरघोस मतांनी त्यांना पुन्हा तालुक्यातील
जनतेने विधानसभेत पाठविले.
आमदार शंभूराज
देसाई यांच्या दुस-या टर्ममधील आमदारकीची अडीच वर्ष पुर्ण होत असताना त्यांनी
त्यांच्या आमदारकीच्या माध्यमातून विकासकामांचा धडाकाच पाटण मतदारसंघात लावला आहे.
तर शिवसेना पक्षाचे पक्षप्रतोद म्हणून पक्षाची बाजू भक्कमपणे विधानसभेच्या सभागृहात
व सभागृहाच्या बाहेर राज्य शासनासमोर मांडून या माध्यमातून राज्यातील विविध प्रश्न
शासनाकडून सोडवून घेण्याचे शिवधनुष्य ते लिलया पेलत आहेत. सातारा जिल्हयात
सर्वाधिक निधी पाटण तालुक्यात खेचून आणण्यात ते यशस्वी झाले असून विकास
कामांसदर्भातील प्रत्येक कामांचा त्यांचा पाठपुरावा यामुळेच एवढया मोठया
स्वरुपातील निधी पाटण तालुक्यात येत असून तालुक्यातील जनतेचे प्रलंबित असे अनेक
प्रश्न ते आमदार म्हणून मार्गी लावत आहेत आमदार शंभूराज देसाईं यांच्या या
कार्याचे कौतुक करावे एवढे थोडेच आहे. पाटण तालुक्यात आजच्या तारखेला जावू तिथे
आमदार शंभूराज देसाई यांच्या माध्यमातून विकासकामे सुरु आहेत. मतदारसंघातील
जनतेबरोबरच मतदारसंघाचया बाहेरुन येणा-या जनतेमधून त्यांच्या याच कार्याची
विकासाच्या माध्यमातून पोहोच मिळू लागली आहे. विकासाचा महामेरु, बहुत जनांशी आधारु
म्हणूनच आमदार शंभूराज देसाई यांची प्रतिमा पहावयास मिळत आहेत. कुणीही यावं आणि
त्यांच्याकडून काम करुन घेवून जावं असाच त्यांचा दिनक्रम सुरु असून गत अडीच वर्षात
त्यांनी सातत्याने प्रयत्न करुन तालुक्यातील विविध विकास कामांकरीता मंजूर करुन
आणलेल्या विविध कामांची माहिती पाहिल्यानंतर आमदार शंभूराज देसाई यांच्या कार्याचा
प्रत्यय आपणा सर्वांना येईल. मतदार संघातील प्रत्येक गावाला रस्ता, पाणी, वीज या
मुलभूत सुविधा देण्याचा त्यांचा प्रयत्न यातून दिसून येईल. आमदार म्हणून दुस-या
टर्ममधील त्यांचे पहिले काम आदरणीय लोकनेते बाळासाहेब देसाईसाहेब यांचे राज्य
शासनाच्या निधीतून जन्मशताब्दी स्मारकाचे 10 कोटी रुपयांचे काम व या कामांस निधी
मंजूर करुन आणला आज हे काम लोकनेतेसाहेबांच्या कर्मभूमित दिमाखाने सुरु आहे.
वाढीवचा 10 कोटी रुपयांचा निधी मिळावा याचा प्रस्ताव मान्यतेकरीता राज्य शासनाकडे
सादर केला आहे. तसेच लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे पुण्यतिथीनिमित्त प्रतिवर्षी
दौलतनगर,ता.पाटण येथे राज्य स्तरीय भव्य कृषी प्रदर्शनास मान्यता मिळविली व सन
2016 आणि 2017 चे राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन उत्साहात साजरे झाले, आदरणीय लोकनेते
बाळासाहेब देसाईसाहेब यांचे कोल्हापूर येथील पुर्णाकृती पुतळयाचे सुशोभिकरणाकरीता
20 लाख रुपयांचा निधी मंजूर, सर्वात महत्त्वाचे म्हणजे पाटण तालुक्यातील 55,213
भूकंपबाधित भूकंपग्रस्तांना सन 1995 पासून बंद झालेले भूकंपाचे दाखले पुर्ववत सुरु
केले दि. 22/12/2015 पासून तालुक्यातील अनेक भूकंपग्रस्तांनी याचा लाभ घेतला. दि.
01 मे कामगार दिनानिमित्त तालुक्याच्या आमदारांच्या हस्ते तहसिल कार्यालय येथे
ध्वजारोहण करण्याचा धोरणात्मक निर्णय करुन घेतला, कोयना भूकंप पुनर्वसन निधी
समितीच्या निधीमध्ये समितीचे कोषाध्यक्ष म्हणून प्रतिवर्षी मिळणा-या 5 कोटी
रुपयांच्या निधीमध्ये प्रतिवर्षी 5 कोटी रुपयांची वाढ करुन घेतल्याने प्रतिवर्षी आता 10 कोटी रुपयांचा
निधी तालुक्यातील भूकंबबाधित गावातील कामे करण्यास मिळणार आहे, आमदार आदर्श
ग्रामयोजनेअंतर्गत पाटण मतदार संघातील सोनवडे,वेखंडवाडी व आरेवाडी गावांच्या निवडी
करुन राज्यात ही तीन गावे आदर्श ग्राम करणेचेदृष्टीने त्यांनी कामांस प्रत्यक्षात
सुरुवात केली आहे, तारळी मध्यम धरण प्रकल्पातील पाणी या विभागातील शेतक-यांच्या 50 मीटरवरील उर्वरीत राहणा-या
शेतीला मिळवून देणेकरीता राज्य शासनाची तत्त्वत: मान्यता घेतली आहे याचेही काम
सुरु झाले आहे,जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत पाटण मतदारसंघातील डोंगरपठारावरील
गावांच्या निवडी करुन पावसाळयात वाहून जाणारे पाणी डोंगरपठारावर अडवून ठेवण्याचा
धोरणात्मक निर्णय करुन घेतला त्यापध्दतीने कामांसही सुरुवात झाली, केंद्रीय रस्ते
वाहतूक महामार्ग विकास मंत्रालयाकडून घाटमाथा हेळवाक पाटण ते कराड या रस्त्यांच्या
अद्यावतीकरणाकरीता 309.720 कोटी रुपयांचा निधी मंजूर तसेच केंद्रीय रस्ते वाहतूक
विकास कार्यक्रमांतर्गत निसरे फाटा ते पाटण रामापूर पर्यंतच्या रस्त्याचे
अद्यावतीकरण करणेकरीता 20 कोटी रुपयांचा निधी मंजूर, दौलतनगर,ता. पाटण येथील
लोकनेते बाळासाहेब देसाई शैक्षणिक संकुलात पाटण तालुका क्रिडा संकुल उभारणेबाबतचा
सविस्तर प्रस्ताव राज्य शासनाकडे सादर, मान्यता देणेकरीता क्रिडा विभागाची
कार्यवाहीही सुर, पाटणच्या बसस्थानकाकरीता राज्याच्या अर्थसंकल्पातून सुमारे 6
कोटी रुपयांचा निधी मंजूर पहिल्या टप्प्यात 1.50 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला, तसेच
पाटण येथील न्यायालयाच्या इमारतीकरीता 4 कोटी रुपयांचा निधी मंजुर प्रत्यक्षात
कामाला सुरुवात, पाटण येथे मागासवर्गीय मुला- मुलींकरीता सुमारे 100 क्षमतेची दोन
वेगवेगळी शासकीय वसतीगृह मंजुर, त्याचबरोबर पाटण येथील पोलीस स्टेशनच्या
कर्मचा-यांकरीता पोलिस वसाहतीच्या कामांकरीता निधी मंजुर या कामाचे नुकतेच
भूमिपुजन संपन्न, कोयना नदीकाठी वसलेल्या गावांना संरक्षण देणेकरीता मतदार संघातील
10 गावांना कोयना नदीकाठी संरक्षक भिंत बांधणेकरीता निधी उपलब्ध होणेचे दृष्टीने
प्रस्ताव सादर 10 पैकी 1 कोटी रुपयांच्या आतील 4 कामांना मंजूरी, उर्वरीत 1
कोटीच्या वरच्या कामाकरीता मंत्रालयात पाठपुरावा सुरु, मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल
योजनेअंतर्गत 2 कोटी 63 लाख 34 हजार एवढया रुपयांचा निधी मंजूर, मुख्यमंत्री
ग्रामसडक योजनेअंतर्गत 11 रस्त्यांच्या कामांसाठी 17 कोटी 92 लाख 87 हजार एवढया
रुपयांचा निधी मंजूर,पाटण या डोंगरी व दुर्गम तालुक्यातील ग्रामीण आणि डोंगरी
भागाच्या विद्युत विकासाकरीता सुमारे 11.22 कोटी रुपयांचा डोंगरी विद्युत विकास
आराखडा राज्य शासनाकडे मान्यतेकरीता सादर, महाराष्ट्र ऊर्जा विकास
कार्यक्रमांतर्गत पवनचक्की प्रकल्पाच्या अवजड वाहतूकीमुळे खराब झालेल्या
रस्त्यांच्या कामांकरीता 27 कोटी 82 लाख 72 हजार एवढया रुपयांचा निधी मंजूर, मोरणा
गुरेघर मध्यम धरण प्रकल्पाच्या माध्यमातून या विभागातील शेतक-यांना कॅनॉलऐवजी
इरिगेशनच्या माध्यमातून पाणी देणेबाबत फेरसर्व्हे करण्याच्या कामास मंजूरी
फेरसर्व्हे करण्याच्या कामांस प्रत्यक्षात सुरुवात, पाटण तालुक्यातील वनविभागातील
रस्ते तसेच पाणी पुरवठा योजना करणेकरीता विशेष बाब म्हणून मान्यता मिळणेकरीताचा
प्रस्ताव सादर करण्याच्या राज्य शासनाच्या सुचना त्यानुसार प्रस्ताव मान्यतेकरीता
सादर, पाटण तालुक्यातील सर्व प्रशासकीय कार्यालये एकाच छताखाली आणणेकरीता
प्रशासकीय इमारतीला निधी मिळणेचा प्रस्ताव दि. 04-05-2016 रोजी राज्य शासनाकडे
मंजूरीकरीता सादर, सहयाद्री व्याघ्र प्रकल्पातील बफर झोनमधील जाचक व अन्यायकारक
अटी कमी करणेकरीता स्थानिक सल्लागार समितीच्या माध्यमातून राज्य शासनाकडे आग्रही
मागणी हा अतिशय गंभीर प्रश्न सोडवून घेणेकरीता शासनाकडे सातत्याने पाठपुरावा,
कृष्णा खोरे विकास महामंडळांतर्गत ढेबेवाडी ते उमरकांचन ते जिंती या रिंगरोड करीता
5.19 कोटी एवढया रुपयांचा निधी मंजूर, मारुलहवेली व बेलवडे येथे महाराष्ट्र राज्य
वीज वितरण कंपनीची दोन सबस्टेशन कार्यान्वित, महिंद धरण प्रकल्पातील बोर्गेवाडी
येथील धरणग्रस्तांचे चौगुलेवाडी (सुर्यवंशीवाडी) येथे अद्यावत पुनर्वसन,नाबार्ड योजनेअंतर्गत
काढणे पुलाच्या कामांस 5 कोटी रुपयांचा निधी मंजूर होण्याचा प्रस्ताव सादर
जुलैच्या अधिवेशनात या कामांस निधी उपलब्ध होण्याचे संकेत, पाटण या तालुक्याच्या
गावास कार्यान्वीत असलेली नळ पाणी पुरवठा योजनेचे मजबुतीकरण करणेकरीता नगरोत्थान
विभागांतर्गत 46.57 एवढया लाखांचा निधी मंजूर, राज्य शासनाच्या 2515 योजनेअंतर्गत
29 रस्त्यांच्या कामांसाठी 3 कोटी रुपयांचा निधी मंजूर, राज्य शासनाच्या
अर्थसंकल्पातून रस्त्यांच्या कामांसाठी 18 कोटी 30 लाख 74 हजार रुपयांचा निधी
मंजूर तर नाबार्ड योजनेअंतर्गत रस्त्यांच्या कामांसाठी 1 कोटी 90 लाख रुपयांचा
निधी मंजूर, मतदार संघातील ग्रामीण मार्गावरील रस्त्यांवरील 53 साकव पुलांची
बांधकामे करण्याकरीता 10 कोटी 45 लाख 39 हजार रुपयांचा निधी मंजूर, मल्हारपेठ येथे तालुक्याच्या मध्यवर्ती ठिकाणी
पशुवैद्यकीय दवाखाना इमारत मंजूर 38 लाख 85 हजार निधी उपलब्ध तसेच उरुल याठिकाणी
प्राथमिक आरोग्य विभागाचे उपक्रेंद इमारत उभी करण्याकरीता 1 कोटी 17 लाख रुपयांचा
निधी मंजुर, तालुका डोंगराळ असल्याने तालुक्यात ग्रामीण रस्तेच जादा प्रमाणात असून
यातील प्रमुख गांवाना जोडणा-या रस्त्यांच्या कामांना दर्जोन्नती मिळावी
अशाप्रकारचे १५ रस्त्यांची कामे ही शासनाच्या मंजुरीकरीता पाठविली आहेत. भविष्यात
या दर्जोन्नतीच्या कामामुळे राज्याच्या अर्थसंकल्पातून या कामांना सातत्याने प्रतिवर्षी
निधी उपलब्ध होवून ग्रामीण भाग प्रमुख रस्त्यांच्या माध्यमातून एकमेकास जोडण्यास
मदत होणार आहे.यांसारख्या अनेक कामांकरीता कोटयावधी रुपयांचा निधी मंजूर करुन
आणला असून मतदारसंघातील सर्वसामान्य जनतेचे प्रश्न जागेवरच सोडविण्याकरीता जनता
दरबार ही संकल्पना सुरु करुन दोन वर्षामध्ये पाटणमध्ये तीन व सुपने मंडलमध्ये एक
जनता दरबार संपन्न. चार जनता दरबारात आलेल्या एकूण 799 निवेदनांपैकी 713 निवेदनांचा
निपटारा त्यांनी केला आहे. हा मागील दोन वर्षातील त्यांच्या कामांचा लेखाजोखा असून
उर्वरीत राहिलेल्या अडीच वर्षात मतदारसंघामध्ये कोणकोणत्या प्रलंबीत कामांना निधी
उपलब्ध करुन आणावयाचा आहे याचा मतदारसंघातील गणनिहाय प्रत्येक गावचा तसेच
वाडीवस्तीचा विकासकामांचा आराखडा त्यांनी तयार केला आहे. अशाप्रकारे धडाकेबाज
आमदार म्हणून आमदार शंभूराज देसाईंचे पाटण मतदार संघात काम सुरु असून त्यांच्या
पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्याकरीता त्यांनी गत अडीच वर्षात आपल्या सर्वांकरीता
केलेल्या विविध कामांचा तसेच जनहितार्थ विविध विकासकामांचा प्रसार व प्रचार करुन
त्यांना व त्यांच्या कार्याला आपण सर्वांनी बळ देऊया व त्यांची तालुक्यावर असणारी
राजकीय पकड मजबूत करुया एवढीच माफक अपेक्षा.
No comments:
Post a Comment