राज्य शासनाच्या अन्न नागरी पुरवठा योजनेतंर्गत
ग्रामीण आणि शहरी भागातील लाभार्थीसाठी राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम 2013 अंतर्गत
जिल्हानिहाय इष्टांकात सुधारणा करणेच्या कामांमध्ये कोणीही लाभार्थी वंचीत राहू नये
याकरीता या इष्टाकांची अंमलबजावणी ही गावांमध्ये व वाडीवस्तीमध्ये ग्रामसभा घेवूनच
पारदर्शक व्हावी याकरीता देण्यात आलेली 31 डिसेंबर,2017 पर्यंतची वेळ ही अपुरी असून
यामध्ये पारदर्शकता येणेकरीता पाटण तालुक्यापुरता याचा फेरसर्व्हे व्हावा व या फेरस्वर्हेकरीता
एक महिन्याची मुदत 31 जानेवारी,2018 पर्यंत
वाढवून दयावी अशी मागणी पाटण तालुक्याचे आमदार शंभूराज देसाई यांनी राज्याचे अन्न नागरी
पुरवठा मंत्री ना.गिरीश बापट यांची नागपुर याठिकाणी सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनामध्ये
प्रत्यक्ष भेटून केली यावेळी ना.गिरीश बापट यांनी आमदार शंभूराज देसाई यांच्या मागणीवरुन
या कामाचा फेरसर्व्हे करण्यात येवून दि.31 जानेवारी, 2018 पर्यंत याची अंमलबजावणी करावी
असे स्पष्ट आदेश शासनाच्या अन्न नागरी पुरवठा विभागास दिले.
शासनाच्या अन्न नागरी पुरवठा योजनेतंर्गत
लाभार्थीसाठी राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम अंतर्गत जिल्हानिहाय इष्टांकात सुधारणा
करणेच्या कामांमध्ये या इष्टांकाची अंमलबजावणी होत असताना सातारा जिल्हा पुरवठा अधिकारी
यांचेकडून कळविण्यात आलेल्या इष्टांकामध्ये पाटण तालुक्यातील 400 कार्डसंख्या कमी झाल्याचे
दाखविण्यात आल्याने सुमारे 50,195 इतके लाभार्थी वंचीत रहात असल्याची बाब पुढे आलेनंतर
आमदार शंभूराज देसाईंनी राज्याचे अन्न नागरी पुरवठा मंत्री ना.गिरीश बापट यांची नागपुर
याठिकाणी हिवाळी अधिवेशनामध्ये प्रत्यक्ष भेट घेवून यासदंर्भात लेखी पत्र देत ही बाब
मंत्रीमहोदय यांचे निदर्शनास आणून दिली.यावेळी मंत्री ना.बापट यांनी आमदार शंभूराज
देसाई यांच्या मागणीवरुन पाटण तालुक्यापुरता या कामांचा फेरस्वर्हे करुन याची अंमलबजावणी
दि.31 डिसेंबर,2017 पर्यंत नाहीतर दि.31 जानेवारी , 2018 पर्यंत करावी असे सक्त आदेश
शासनाच्या अन्न नागरी पुरवठा विभागास दिले.
या विषयासंदर्भात मंत्री ना.बापट यांना माहिती
देताना आमदार शंभूराज देसाई म्हणाले, राज्य शासनाच्या अन्न नागरी पुरवठा योजनेतंर्गत
ग्रामीण आणि शहरी भागातील लाभार्थीसाठी राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम 2013 अंतर्गत
जिल्हानिहाय इष्टांकात सुधारणा करणेबाबत सुचना
देण्यात आल्या आहेत. दरम्यान अन्न नागरी पुरवठा योजनेतंर्गत ग्रामीण आणि शहरी भागातील
लाभार्थीसाठी राबविण्यात येणा-या विविध योजनांमध्ये दारिद्र रेषेखालील लोकांसाठी बीपीएल,सामान्य
कुटुंबासाठी एपीएल,अंत्योदय आणि प्राधान्य अशा विविध योजनांचा समावेश असून त्या त्या
वर्गवारी नुसार लाभार्थ्यांना लाभ दिला जातो.
सदया अन्न सुरक्षा अधिनियमानुसार जिल्हानिहाय इंष्टाकात सुधारणा करणेबाबतचे
कामकाज सुरु आहे. सदर अधिनियमाची अंमलबजावणी प्रत्यक्षात सुरु झालेनंतर काही तालुक्यामध्ये
इंष्टाकांमध्ये जास्त लाभार्थी तर काही तालुक्यांमध्ये कमी लाभार्थी आढळून आल्याचे
निदर्शनास आले आहे. लाभार्थ्यांची यादी ही स्वस्त धान्य दुकानदार यांचेकडून मागविण्यात
आल्याने यामध्ये यातील काही लाभार्थी हे मयत तर काही लाभार्थी तालुक्याच्या बाहेरगांवी
वास्तव्यास असून त्यांचीही नांवे समाविष्ट असल्याचे दिसून येत असल्याने काही तालुक्यामध्ये
जास्त लाभार्थी दिसून येत आहेत यामुळे ज्यांना या योजनांचा लाभ प्रत्यक्षात मिळणे आवश्यक
आहे असे लाभार्थी या इष्टांकातील जास्त संख्या
दिसत असल्याने या योजनांपासून वंचीत रहात आहेत. यामध्ये पारदर्शकता येणेकरीता सदर अधिनियमाची
अंमलबजावणी प्रत्यक्षात करताना तालुक्यामधील प्रत्येक गांवामध्ये तसेच वाडीवस्तीमध्ये
ग्रामसभा घेवूनच लाभार्थ्यांची नांवे यादीत समाविष्ट करणे अत्यावश्यक आहे. सातारा जिल्हा
पुरवठा अधिकारी यांचेकडून कळविण्यात आलेल्या इष्टांकामध्ये माझे डोंगरी आणि दुर्गम
अशा पाटण तालुक्यात ग्रामीण आणि शहरी मधील सुमारे 400 कार्डसंख्या कमी झाल्याचे दिसून
येत असून यामध्ये सुमारे 50,195 इतके लाभार्थी कमी झाल्याचे दिसून येत आहेत. ही माहिती
पुर्णत: चुकीची झाली असल्याने या कामांचा फेरस्वर्हे करावा व हा फेरस्वर्हे हा पाटण
तालुक्याच्या प्रत्येक गांवामध्ये व वाडीवस्तीमध्ये ग्रामसभा घेवूनच करावा अशी माझी
आपणांकडे मागणी आहे असे सांगून आता याची अंमलबजावणी करणेकरीता दि.31 डिसेंबर,2017 पर्यंत
वेळ देण्यात आली आहे फेरसर्व्हेकरीता एक महिना वाढवून दयावा अशी आमदार शंभूराज देसाईंनी
मंत्री अन्न नागरी पुरवठा यांचेकडे केली.
आमदार शंभूराज देसाईच्या मागणीची ना.गिरीष
बापट मंत्री अन्न नागरी पुरवठा यांनी तात्काळ
दखल घेत राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम 2013 अंतर्गत जिल्हानिहाय इष्टांकात सुधारणा
करणेबाबतच्या कामांचा पाटण तालुक्यापुरता फेरसर्व्हे करावा ही अंमलबजावणी दि.31 जानेवारी,
2018 पर्यंत करावी असे सक्त आदेश शासनाच्या अन्न नागरी पुरवठा विभागास देवून या अंमलबजावणीमध्ये
एकही लाभार्थी कोणत्याही योजनेपासून वंचीत राहणार नाही त्याची खबरदारी शासनाचा अन्न
नागरी पुरवठा विभाग घेईल अशी ग्वाही ही आमदार
शंभूराज देसाई यांना दिली. याबद्दल आमदार शंभूराज देसाई यांनी मंत्री ना.गिरीष बापट
यांचे आभार व्यक्त केले.
No comments:
Post a Comment