पाटण
तालुक्यातील वांग मराठवाडी धरणप्रकल्पातील पुर्णत: बाधित मौजे उमरकांचन येथील ६१
धरण प्रकल्पबाधितांना पुनर्वसनासाठी सांगली जिल्हयातील तडसर ता.कडेगांव येथील ५८
हेक्टर ७६ आर एवढी आवश्यक असणारी गायरान जमिन उपलब्ध करुन दयावी अशी आमची शासनाकडे
सातत्याची मागणी होती.राज्याचे मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांचेकडे या कामासाठी
आमचा पाठपुरावा सुरु होता मुख्यमंत्री फडणवीस यांनी आमचे मागणीची आणि
पाठपुराव्याची गांभीर्याने दखल घेत उमरकांचन येथील ६१ धरण प्रकल्पबाधितांना पुनर्वसनासाठी
तडसर ता.कडेगांव जि.सांगली येथील ५८ हेक्टर ७६ आर एवढी आवश्यक असणारी गायरान जमिन
उपलब्ध करुन देण्याचा धोरणात्मक असा निर्णय घेतला असून शासनाच्या महसूल व वन
विभागाने ही गायरान जमिन उमरकांचन येथील ६१ प्रकल्पबाधितांना पुनर्वसनासाठी देण्याची
मान्यता दिली असल्याचा शासन निर्णय दि.२७ डिसेंबर,२०१७ रोजी पारित केला असल्याची
माहिती आमदार शंभूराज देसाई यांनी दिली असून या धोरणात्मक निर्णयामुळे मौजे उमरकांचन
येथील या ६१ प्रकल्पग्रस्तांचा अनेक वर्षाचा वनवास संपला असल्याची प्रतिक्रिया त्यांनी
प्रसिध्दी पत्रकाव्दारे दिली आहे.
आमदार शंभूराज
देसाईंनी दिलेल्या पत्रकात म्हंटले आहे की, दि.१८/०५/२०१७ रोजी राज्याचे मुख्यमंत्री
ना.देवेंद्र फडणवीस हे सातारा जिल्हयाच्या दौ-यावर आले असताना त्यांचे अध्यक्षतेखाली
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जिल्हा नियोजन सभागृहामध्ये झालेल्या आढावा बैठकीत मी पाटण
तालुक्यातील वांग मराठवाडी धरण प्रकल्पातील मौजे उमरकांचन येथील पुर्णत: बाधित ६१
धरण प्रकल्पबाधितांनी त्यांच्या पुनर्वसनासाठी सांगली जिल्हयातील तडसर ता.कडेगांव येथे
उपलब्ध असणारी गायरान जमिन पसंत केली आहे. या ६१ प्रकल्पग्रस्तांच्या
पुनर्वसनासाठी सुमारे ५८ हेक्टर ७६ आर एवढया गायरान जमिनीची आवश्यक आहे ही गायरान
जमिन उमरकांचन येथील पुर्णत: बाधित ६१ धरण प्रकल्पबाधितांना तात्काळ प्राधान्याने उपलब्ध
करुन दयावी अशी मागणी केली होती तर याचदिवशी मुख्यमंत्री ना.फडणवीस साहेब यांना
माझे निवासस्थानी चहापानास निमंत्रीत केले होते तेव्हा या प्रकल्पातील पुर्णत: बाधित
कुंटुबातील शिष्टमंडळास मुख्यमंत्री यांना भेटवूनही हा विषय मी त्यांचेकडे मांडला
होता. मुख्यमंत्री यांनी या विषयांची गांभीर्याने दखल घेवून मी उद्या सांगली
जिल्हयाच्या दौ-यावर असून या शिष्टमंडळातील काही ठराविक प्रकल्पग्रस्तांना मला
सांगली याठिकाणी भेटण्यास सांगा.सांगलीचे जिल्हाधिकारी यांना तात्काळ या जमिनीची
पहाणी करुन अहवाल सादर करण्याच्या सुचना दिल्या जातील असे आश्वासन दिले होते. त्यानुसार
या शिष्टमंडळातील काही ठराविक प्रकल्पग्रस्त यांनी मुख्यमंत्री यांची सांगली याठिकाणी
जावून भेट घेतल्यानंतर मुख्यमंत्री यांचे आदेशावरुन सांगलीचे जिल्हाधिकारी व
शासनाचे महसुल विभागाचे अधिकारी यांनी संयुक्त पहाणी करुन तडसर ता.कडेगांव
जि.सांगली येथील सदर गायरान जमिनींचा अहवाल सादर केल्यानंतर मुख्यमंत्री
ना.देवेंद्र फडणवीस यांनी पाटण तालुक्यातील वांग मराठवाडी धरण प्रकल्पातील मौजे
उमरकांचन येथील पुर्णत: बाधित ६१ प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी सांगली
जिल्हयातील तडसर ता.कडेगांव येथील ५८ हेक्टर ७६ आर एवढी आवश्यक असणारी गायरान जमिन
उपलब्ध करुन देण्याचा धोरणात्मक असा निर्णय घेतला असून शासनाच्या महसूल व वन
विभागाने दि.२७ डिसेंबर, २०१७ रोजी हा निर्णय पारितही केला आहे. शासनाने पारित
केलेल्या निर्णयामध्ये मौजे तडसर ता.कडेगांव जि.सांगली येथील गट नं.१००१,१०२७,११६०,११६२/१,११६३
व ११८३ हे पुर्णत: व गट नं.११६७,११६४ हे अंशत: असे आठ गट नंबरचे शेती वाटपाकरीता
५४ हेक्टर ९२ आर व गावठाणासाठी ३ हेक्टर ८४ आर असे एकूण ५८ हेक्टर ७६ आर गायरान
क्षेत्र जिल्हाधिकारी तथा उपसंचालक (पुनर्वसन) सांगली यांचेकडे महसूलमुक्त व भोगवठारहित
कब्जेहक्काने सातारा जिल्हयातील वांग मराठवाडी धरण प्रकल्पाचे एकूण बाधित ६१
प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी प्रदान करण्यास शासन मान्यता देत आहे असे
म्हंटले आहे.दरम्यान वांग मराठवाडी धरण प्रकल्पातील मौजे उमरकांचन येथील पुर्णत: बाधित
६१ प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी सांगली जिल्हयातील तडसर ता.कडेगांव येथील ५८
हेक्टर ७६ आर एवढी आवश्यक असणारी गायरान जमिन उपलब्ध करुन देण्याचा धोरणात्मक असा निर्णय
राज्याचे मुख्यमंत्री यांचे आदेशावरुन शासनाने घेवून उमरकांचन येथील ६१ प्रकल्पग्रस्तांचा
गेल्या अनेक वर्षापासूनचा वनवास मुख्यमंत्री यांनी संपविला असलेबद्दल तालुक्याचा
लोकप्रतिनिधी या नात्याने मी त्यांचे मनपुर्वक आभार व्यक्त करतो असेही आमदार
शंभूराज देसाईंनी पत्रकात म्हंटले आहे.
No comments:
Post a Comment