सातारा जिल्हयातील वाई
येथील स्वस्त धान्य दुकानदारांना देण्यात येणारा धान्यसाठा महाराष्ट्र औदौगिक
विकास महामंडळाच्या (एमआयडीसी) लगत खाजगी जागेतील पत्रयाच्या
शेडमधून शासनाची छापील पोती बदलून प्लास्टीक पोत्यात भरुन ती
अवैद्य विक्रीकरीता पाठविताना वाईच्या पोलिस यंत्रणेने छापा टाकून
जप्त केलेला वाईचा हा धान्यघोटाळा आमदार शंभूराज देसाई यांचे तारांकीत प्रश्नांने विधानसभेत
चांगलाच गाजला. जिल्हा पुरवठा विभागाच्या संगनमताने करण्यात आलेला हा घोटाळा पोलिस
यंत्रणेने उघडकीस आणला असून यामध्ये जिल्हा पुरवठा विभागाचे वरीष्ट अधिकारी हे दोषी
असल्याचा थेट आक्षेप आमदार शंभूराज देसाईंनी केला यावर राज्याचे अन्न व नागरी पुरवठा
मंत्री ना.गिरीश बापट यांनी वाईच्या या धान्यघोटाळा प्रकरणाची उच्चस्तरीय सर्व चौकशी
पोलीस उपायुक्तांमार्फत करुन चौकशीअंती जिल्हा पुरवठा विभागाचे वरीष्ट अधिकारी दोषी
सापडले तर त्यांच्यावर प्रथम प्राधान्याने कायदेशीर कडक कारवाई केली जाईल असे विधानसभेत
जाहीर केले.
आमदार शंभूराज देसाईंनी सातारा जिल्हयातील
वाई तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदारांना दिले जाणारे शासकीय धान्य हे वाई याठिकाणच्या महाराष्ट्र औदौगिक विकास महामंडळाच्या
(एमआयडीसी) लगत असणा-या खाजगी जागेतील पत्रयाच्या
शेडमधून शासकीय धान्यांकरीता असणारी शासकीय छापील पोती बदलून
9200 किलो शासकीय गहू व 1500 किलो
तांदूळ प्लास्टीक पोत्यात भरुन ते अवैद्य विक्रीकरीता
पाठविताना वाईच्या पोलिस यंत्रणेने रंगेहात पकडले असून यामध्ये जिल्हा पुरवठा
विभागाचे संगनमत असल्याने उघडपणे हा धान्यघोटाळा अनेक दिवसांपासून याठिकाणी सुरु असलेबाबतचा
तारांकीत प्रश्न विधानसभेत विचारला व हे प्रकरण चांगलेच विधानसभेत लावून धरले.
याविषयी माहिती देताना आमदार शंभूराज देसाई
म्हणाले, सातारा जिल्हयातील वाई तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदारांना
दिले जाणारे शासकीय धान्य हे वाई याठिकाणच्या महाराष्ट्र
औदौगिक विकास महामंडळाच्या (एमआयडीसी) लगत असणा-या खाजगी जागेतील
पत्रयाच्या शेडमधून शासकीय धान्यांकरीता असणारी शासकीय छापील पोती बदलून 9200 किलो शासकीय गहू व 1500 किलो तांदूळ प्लास्टीक पोत्यात भरुन ते अवैद्य
विक्रीकरीता पाठविताना वाईच्या पोलिस यंत्रणेने रंगेहात पकडले आहे. यामध्ये
जिल्हा पुरवठा विभागाचे संगनमत असल्यानेच उघडपणे हा धान्यघोटाळा अनेक दिवसांपासून याठिकाणी
सुरु असल्याचे महाराष्ट्र औदौगिक विकास महामंडळाच्या (एमआयडीसी) लगत
असणा-या खाजगी जागेतील पत्रयाच्या शेडशेजारी वास्तव्यास
असणा-या लोकांकडून सांगण्यात आले आहे. असे सांगत ही बाब किती गंभीर आहे हे राज्याचे
अन्न नागरी व पुरवठा मंत्री यांचे निदर्शनास आणूत देताना आमदार शंभूराज देसाईंनी धान्याचा
असा अपहार मोठया प्रमाणात सुरु असताना त्याकडे जिल्हा पुरवठा विभागाने जाणिवपुर्वक
केलेल्या दुर्लक्षामुळेच असे प्रकार उघडपणे घडत आहेत. जिल्हा पुरवठा विभागाचे संगनमत
असल्याशिवाय उघडपणे असा धान्य घोटाळा होणार नाही कारण उघडपणे असा धान्याचा अपहार होत
असताना त्याचेवर जिल्हा पुरवठा विभागाचा अंकुश असणे गरजेचे होते आणि हा अपहार पुरवठा
विभागाने नाही तर पोलिस यंत्रणेने पकडला असल्याने संशयाची सुई सहाजिकच पुरवठा विभागाकडे
जात आहे असा थेट आक्षेप जिल्हा पुरवठा विभागाच्या वरीष्ट अधिका-यांवर घेत या वाईच्या
धान्य घोटाळयामुळे जिल्हा पुरवठा विभागाचा भोंगळ कारभार चव्हाटयावर आला
असून वाईच्या धान्यघोटाळयाची एसआयटीमार्फत उच्चस्तरीय चौकशी करुन
दोषींवर कायदेशीर कडक कारवाई करावी अशी मागणी आमदार शंभूराज देसाई यांनी लावून धरली
यावर राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री ना.गिरीश बापट यांनी वाईच्या या धान्यघोटाळा
प्रकरणाची उच्चस्तरीय सर्व चौकशी पोलीस उपायुक्तांमार्फत करुन चौकशीअंती जिल्हा पुरवठा
विभागाचे वरीष्ट अधिकारी दोषी सापडले तर त्यांच्यावर प्रथम प्राधान्याने कायदेशीर कडक
कारवाई केली जाईल असे विधानसभेत जाहीर केले.
No comments:
Post a Comment