सन
1967 साली पाटण तालुक्यात कोयना विभागात प्रलयकारी झालेल्या भूकंपाला यंदाच्या
वर्षी 50 वर्षे पुर्ण होत आहेत.या भूकंपामुळे तालुक्यातील अनेक कुटुंबे उध्वस्त
झाली होती.भूकंपाला 50 वर्षे होत असली तरी 1967 च्या या प्रलयकारी भूकंपाच्या
आठवणींनी आजही अंगावर शहारे येतात.या सर्व भूकंपग्रस्तांची पुर्णत: विस्कटलेली घडी
बसविण्याचे अतुलनीय काम या तालुक्याचे भाग्यविधाते आदरणीय लोकनेते बाळासाहेब देसाई
यांनी मोठया हिकमतीने केले. लोकनेतेसाहेब यांचाच आदर्श घेवून या तालुक्याचा आमदार
म्हणून काम करताना मी पाटण तालुक्यातील कोयना भूकंपग्रस्त व प्रकल्पग्रस्तांकरीता
धोरणात्मक निर्णय करुन घेण्यात यशस्वी झालो असून 1967 च्या भूकंपात मृत झालेल्या
भूकंपग्रस्तांना मी आमदार म्हणून भावपुर्ण श्रध्दाजंली अर्पण करुन विनम्र अभिवादन
करतो अशी प्रतिक्रिया तालुक्याचे आमदार शंभूराज देसाईंनी दि.11 डिसेंबरच्या
भूकंपाला 50 वर्षे पुर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमिवर बोलताना व्यक्त केली आहे.
याप्रसंगी बोलताना आमदार शंभूराज देसाई
म्हणाले,1967 च्या प्रलयकारी भूकंपात कुंटुंबांची झालेली हानी आणि विस्कटलेली घडी
कधीही न विसरता येणारी आहे. या भूकंपात नुकसान झालेल्यांना लोकनेते बाळासाहेब
देसाईसाहेब यांनी आधार दिला भुकंपाची घटना घडल्यानंतर स्वत: लोकनेतेसाहेब यांनी
पाटण तालुक्यात जोपर्यंत भूकंपग्रस्तांची विस्कटलेली घडी पुर्णत: बसत नाही
तोपर्यंत तालुका सोडला नाही हे साहेबांचे कार्य अविस्मरणीय आहे. तोच वसा आणि वारसा
जोपासून तालुक्याचा आमदार म्हणून या भूकंपग्रस्तांच्या वारसांकरीता मी माझेपरीने
जेवढे सहकार्य करता येईल तेवढे सहकार्य करण्याचे कार्य करीत आहे. भूकंपग्रस्तांचा
सर्वांत जिव्हाळयाचा असणारा भूकंपाचे दाखले हे दाखले लोकनेतेसाहेबांनी देण्यास
सुरुवात केली होती ते दुर्दैवाने सन 1995 पासून बंद झाले होते हे दाखले पुर्ववत
सुरु व्हावेत याकरीता सन 2004 ला पहिल्यांदा आमदार झालेपासून प्रयत्न करीत होतो सातत्याच्या
पाठपुराव्यामुळे दि.18.12.2015 रोजी युतीच्या शासनाने माझे पाठपुराव्यामुळे केवळ
पाटण तालुक्यातच नव्हे तर राज्यातील भूकंपग्रस्त भागातील भूकंपग्रस्तांसाठी हे
दाखले सुरु केले. पाटण तालुक्यातील 54 हजार भूकंपग्रस्तांना याचा फायदा होणार
आहे.अनेक भूकंपग्रस्तांनी भूकंपाचे दाखले काढून ते आज चांगल्या नोकरीस लागले आहेत.
याचा आनंद होत आहे. त्याचबरोबर सन 1967 च्या भूकंपानंतर या परिसराचा विकास
करणेकरीता भूकंपाच्या वेळी बाहेरुन गोळा झालेल्या आर्थिक मदतीतील उर्वरीत राहिलेली
रक्कम भूकंपग्रस्तांचे भाग्यविधाते लोकनेतेसाहेब यांनी राष्ट्रीयकृत बँकेमध्ये
ठेवली होती.या रक्कमेच्या व्याजातून या विभागाच्या विकासाकरीता निधी देण्यात येत
होता. अत्यंत तोकडा निधी असल्याने सन 2004 ला आमदार झालेनंतर कोयना धरणाच्या
वीजनिर्मितीवर एक पैसा प्रति युनिट याप्रमाणे 2 हजार मेगॉवॅट वीजनिर्मितीवर शासनाने
कोयना भूकंप पुनर्वसन निधी समिती या न्यासास 20 कोटी रुपयांचा निधी प्रतिवर्षी
उपलब्ध करुन दयावा याकरीता सातत्याने शासनाकडे प्रयत्न करीत राहिलो त्यावेळचे
तत्कालीन मुख्यमंत्री स्व.विलासराव देशमुख यांनी माझे मागणीचा गांभीर्याने विचार
करुन 20 कोटी ही रक्कम जादा होत असल्याने प्रतिवर्षी 5 कोटी रुपये निधी या
भागाच्या विकासाकरीता देण्याची घोषणा विधानसभेत केली. आता परत 2014 ला आमदार
झालेनंतर हाच 5 कोटीचा निधी 10 कोटी करावा याकरीता पुन्हा एकदा युतीच्या राज्य
शासनाकडे पाठपुरावा सुरु केला आणि युतीच्या शासनाकडून 10 कोटी रुपयांचा निधीही
मंजुर करुन घेतला. यामुळे या विभागाच्या विकासाला आता चालना मिळू लागली आहे. भूकंप
पुर्नवसित गावठाणांमध्ये शासनाने 18 नागरी सुविधांच्या कामांना निधी उपलब्ध करुन
दयावा याकरीता प्रयत्नशील राहून बहूतांशी पुनर्वसित गावठाणांतील नागरी सुविधांच्या
कामांना चालना दिली. यामध्ये पुनर्वसित गावठांणामध्ये डांबरी रस्ते करण्यास
शासनाने परवानगी दिली नव्हती ती परवानगी आमदारकीच्या पहिल्या टर्ममध्ये 2008 ला शासनाकडून
मिळवून घेतली. आणि अनेक पुनर्वसित गांवामध्ये त्याकाळात डांबरी रस्तेही करुन
घेतले. आता या आमदारकीच्या दुस-या टर्ममध्ये पुनर्वसित गावठाणांमध्ये 4.10 कोटी
रुपयांचा निधी मंजुर करुन आणला तर येणा-या दोन वर्षात अजुन 01 कोटी 26 लाख ते 03
कोटी 29 लक्ष रुपयांचे कांमांना निधी मिळणेकरीता कामे प्रस्तावित केली असून हा
निधी आणणेकरीता मी कटीबध्द आहे. असे सांगून तालुक्याचा प्रथम नागरिक म्हणून मी
भूकंपग्रस्तांच्या करीता जेवढे करता येणे शक्य आहे ते ते करण्याचा प्रामाणिक
प्रयत्न करीत आहे असे स्पष्ट करीत त्यांनी दि.11 डिसेंबरच्या भूकंपाला 50 वर्षे
पुर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमिवर भूकंपात मृत झालेल्या भूकंपग्रस्तांना
भावपुर्ण श्रध्दाजंली अर्पण करुन विनम्र अभिवादन केले.
No comments:
Post a Comment