Saturday 3 March 2018

आमदार शंभूराज देसाई यांच्या काळातील विकासकामांच्या प्रगतीचा आलेख हा उंचावणारा- यशराज देसाई


      विरोधकांनी प्रदिर्घ काळ पाटण तालुक्याच्या नेतृत्वाची सत्ता उपभोगली. त्या कालावधीत त्यांनी जनतेला विकासाचे गाजर दाखवले. मिळालेल्या सत्तेचा वापर त्यांनी स्वताच्या व्यवसाय वाढीस प्राधान्य देवून केला. त्यामुळे पाटण तालुक्यातील अनेक गावे मुलभूत सोयी सुविधा पासून वंचित राहिली. विकासापासून वंचित राहिलेल्या गावांचा अनुशेष भरूण काढण्यासाठी 2004 सालापर्यत आपणास वाट पाहवी लागली. 2004 साली तालुक्यातील जनतेने परिवर्तन करीत शंभूराज देसाई यांना तालुक्याचे आमदार केले. आणि 2014 साली दुसर्यांदा पुन्हा आमदार केल्याने त्याकाळात  खर्या अर्थाने पाटण तालुक्याच्या विकासकामांना गतीने सुरूवात झाल्याचे आपण पाहत आहोत. त्यामुळे आमदार शंभूराज देसाई यांच्या काळातील विकासकामांच्या प्रगतीचा आलेख हा उंचावणार असल्याचे प्रतिपादन युवा नेते यशराज देसाई यांनी केले.
      सुतारवाडी मालदन ता. पाटण येथील साकव बंधार्याच्या भूमीपूजन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रविराज देसाई, शिवदौलत बॅकेचे चेअरमन अॅ़ड. मिलिंद पाटील, लोकनेते बाळासाहेब देसाई कारखान्याचे माजी चेअरमन डॉ. दिलीराव चव्हाण, नारायण कारंडे, संचालक विकास गिरीगोसावी, बबनराव भिसे, नाना साबळे, ज्योतीराज काळे, संजय भिलारे यांची प्रमुख उपस्थिती होती.
      याप्रसंगी बोलताना युवा नेते यशराज देसाई म्हणाले की, लोकनेते बाळासाहेब देसाई यांनी पाटण तालुक्याचा सर्वागीण विकास व्हावा म्हणून प्रयत्न केले. कोयना धरणा सारखा राज्याला दिशा देणार प्रकल्प त्यांनी तालुक्यात आणला. आमदार शंभूराज देसाई यांनी विधानभवनात धोरणात्मक निर्णय करूण घेतल्याने आपल्याला विकासकामासाठी जादा निधी उपल्बध होवू शकला. 2004 साली शंभूराज देसाई पहिल्यांदा आमदार झाले. त्यावेळी आघाडीचे सरकार सत्तेत होते. विरोधी पक्षाचे सरकार सत्तेत असताना आणि विरोधी बाकावर असताना आमदार शंभूराज देसाई यांनी 217 कोटीची विकासकामे पाटण विधानसभा मतदारसंघात केली. 2004 साली सुरू केलेल्या जनता दरबार सारखा जनतेला न्याय देणारा संकल्प त्यांनी पाटण तालुक्यात राबविला. 2014 साली पुन्हा दुसर्यादा आमदार झाल्यानंतर त्यांनी प्रशासन आपल्या दारी म्हणून शासकीय अधिकार्यांना बरोबर घेवून एकाच दिवशी पाटण मतदारसंघात विविध ठिकाणी कोट्यावधी रूपयांच्या कामांची भूमीपूजने केली. तारळे  विभागातून सुरू झालेल्या  विकासकामांची भूमीपूजन मल्हारपेठ विभागात रात्री अकरापर्यत सुरू होती. 2014 साली निवडणूकीला समोरे जाताना जनतेला दिलेल्या जाहिरनाम्यातील वचननाम्याची पुर्तात करण्यावर त्यांनी भर दिला.  ज्या लोकनेते बाळासाहेब देसाई यांनी पाटण तालुक्याला आणि राज्याला दिशा देण्याचे काम केले त्या लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या शताब्दी स्मारकाचे काम पूर्णात्वाच्या मार्गावर आहे. लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखाना डबघाईला कसा कसा येईल यादृ्ष्टीने विरोधकांनी प्रयत्न केले.  कोयना शुगर कारखान्याची वीट कधी उभी राहणार याबाबत तालुक्यातील जनतेने विरोधकांना जाब विचारणे काळाची गरज आहे. ढेबेवाडी विभागासह अन्य विभागात आमदार शंभूराज देसाई यांनी कोट्यावधी रूपयांची विकासकामे केली आहेत. गावागावामध्ये असणारे स्थानिक प्रश्न सोडवून ते प्रत्येक अडचणींना धावून गेले आहेत. जनतेची सुख आणि दुख वाटून घेणार एकमेव आमदार आपल्याला लाभेले हे आपले भाग्य आहे. पाटण तालुक्याच्या ग्रामीण भागात विकासकामे गतीने सुरू आहेत. जनतेचे प्रश्न मार्गा लागत आहेत. विरोधकांचे सत्ता असताना रखडलेला विकास आज आपल्याकडून होताना दिसत आहे. विरोधकांनी प्रदिर्घ काळ पाटण तालुक्याच्या नेतृत्वाची सत्ता उपभोगली. त्या कालावधीत त्यांनी जनतेला विकासाचे गाजर दाखवले. मिळालेल्या सत्तेचा वापर त्यांनी स्वताच्या व्यवसाय वाढीस प्राधान्य देवून केला. त्यामुळे पाटण तालुक्यातील अनेक गावे मुलभूत सोयी सुविधा पासून वंचित राहिली. विकासापासून वंचित राहिलेल्या गावांचा अनुशेष भरूण काढण्यासाठी 2004 सालापर्यत आपणास वाट पाहवी लागली. 2004 साली तालुक्यातील जनतेने परिवर्तन करीत शंभूराज देसाई यांना तालुक्याचे आमदार केले. आणि त्यानंतर 2014 साली पुन्हा दुसर्यादा आमदार केले आणि त्या काळात खर्या अर्थाने पाटण तालुक्याच्या विकासकामांना गतीने सुरूवात झाल्याचे आपण पाहत असल्याचे त्यांनी सांगितले. 
**********विरोधकांचे दुहीचे राजकारण********
        आमदार शंभूराज देसाई यांच्याकडे तालुक्याचे नेतृत्व आहे. राज्यात आणि केंद्रात युतीचे सरकार आहे. त्यामुळे मागेल त्यांना त्यांनी विकासकाम  दिले आहे. त्यामुळे  पाटण तालुक्यात आपले विकासाचे तर विरोधकांचे फक्त दुहीचे राजकारण सुरू आहे. विरोधकांच्या भूलथांपाना बळी न पडता   जनता 2019 च्या निवडणूकीत आमदार शंभूराज देसाई यांचे हात पुन्हा निश्चितच बळकट करतील असा ठाम विश्वास युवा नेते यशराज देसाई यांनी व्यक्त केला.



No comments:

Post a Comment