Thursday 12 July 2018

लोकनेते बाळासाहेब देसाईसाहेब यांचे शताब्दी स्मारकातील अभ्यासिका ग्रामीण भागातील मुलांना दिशा देणारी ठरेल. स्व. शिवाजीराव देसाई (आबासाहेब) यांचे पुण्यस्मरण व गुणवंत विद्यार्थी सत्कार कार्यक्रमाप्रसंगी जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांचे प्रतिपादन.

दौलतनगर दि.12:  मी सातारा जिल्हयाला लागून असणा-या सांगली जिल्हयातीलच आहे. महाराष्ट्राचे पोलादी पुरुष राज्याचे माजी गृहमंत्री लोकनेते बाळासाहेब देसाईसाहेब यांचे अतुलनीय कार्य संपुर्ण राज्याला माहिती आहे. त्यांच्या अनमोल कार्यामुळेच ग्रामीण भागातील मुले राज्याच्या विविध भागामध्ये चमकली असल्याचे आपण पहात आहोत त्यांचाच आदर्श त्यांचे चिरंजीव स्व.शिवाजीराव देसाई (आबासाहेब) यांनी घेतला आणि वाटचाल केली या दोन महान नेत्यांचा आदर्श पुढे चालविण्याचे काम या मतदारसंघाचे उत्कृष्ट संसदपटु आमदार शंभूराज देसाई करीत आहेत. त्यांच्या विशेष प्रयत्नातून याठिकाणी उभारण्यात आलेल्या लोकनेते बाळासाहेब देसाई शताब्दी स्मारकातील अभ्यासिका ही या ग्रामीण भागातील मुलांना नक्कीच दिशा देणारी ठरणार असल्याचे प्रतिपादन सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी केले.
               दौलतनगर,ता.पाटण येथे स्व.शिवाजीराव देसाई (आबासाहेब) यांच्या 3२ व्या पुण्यस्मरण तसेच पाटण मतदारसंघातील दहावी व बारावीतील गुणवंत विद्यार्थी-विद्यार्थ्यीनींचा गुणगौरव सत्कार समारंभ अशा संयुक्त कार्यक्रमात प्रमुख पाहूणे म्हणून पोलीस अधीक्षक संदीप पाटील बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार शंभूराज देसाई होते. प्रारंभी आमदार शंभूराज देसाई व पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी स्व.शिवाजीराव देसाई यांचे पुर्णाकृती पुतळयास 3२ व्या पुण्यस्मरण दिनानिमित्त पुष्पचक्र अर्पण करुन त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन केले. यावेळी मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रविराज देसाई, यशराज देसाई, जयराज देसाई, प्रांताधिकारी श्रीरंग तांबे, तहसिलदार रामहरी भोसले, कारखान्याचे चेअरमन अशोकराव पाटील,माजी चेअरमन डॉ. दिलीपराव चव्हाण,जयंवतराव शेलार, पंचायत समितीचे माजी उपसभापती डी.आर.पाटील,व्हा.चेअरमन राजाराम पाटील,उपअभियंता सुरेश अहिरे,वसंत खाडे,गटविकास अधिकारी संजीव गायकवाड,शिक्षणाधिकारी निकम यांच्यासह कारखान्याचे व शिवदौलत सहकारी बँकेचे सर्व संचालक मंडळ,जिल्हा परिषद,पंचायत समितीचे सर्व सदस्य,पाटण मतदार संघातील सर्व शासकीय अधिकारी यांची प्रमुख उपस्थिती होती.
  याप्रसंगी बोलताना पोलीस अधीक्षक संदीप पाटील म्हणाले,पाटण तालुका हा गुणवंताची खाण आहे. स्व.शिवाजीराव देसाई (आबासाहेब) यांचे पुण्यस्मरण दिनानिमित्ताने गत २५ वर्षापासून पाटण मतदारसंघातील गुणवंत विद्यार्थी- विद्यार्थींनीचा  गुणगौरव कार्यक्रम याठिकाणी होत आहे याचे सातत्य पहाता खरोखरच ही गौरवास्पद बाब आहे. या कार्यक्रमाला प्रतिवर्षी आय.पी.एस. तसेच आय..एस अधिकारी यांना निमत्रिंत करुन त्यांचे हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात येतो हे कौतुकास्पद आहे. आमचे वेळी आय.पी.एस. तसेच आय..एस अधिकारी यांचे हस्ते सन्मान केला जात नव्हता आपण या मतदारसंघातील गुणवंत खरोखरच भाग्यवान आहात. आय.पी.एस. तसेच आय..एस अधिकारी यांचे हस्ते आपला सन्मान होतोय आणि आम्ही कसे घडलो हे आपल्यासमोर व्यक्त करताना आपणांसही एकप्रकारे दिशा मिळणेस याची मदत होत आहे. आमदार शंभूराज देसाई यांचा हा उपक्रम खरोखरच स्तुत्य आहे. त्यांच्या विशेष प्रयत्नामुळे राज्य शासनाने आदरणीय लोकनेते बाळासाहेब देसाई शताब्दी स्मारक उभारण्यास निधी दिला आज हे स्मारक उभे राहिले. या स्मारकामध्ये ग्रामीण भागातील मुलांना एम.पी.एस.सी. व यु.पी.एस.सी.चा अभ्यास करता यावा याकरीता चांगली डिजीटल अभ्यासिका असावी हा आग्रह आमदार देसाई यांचा असल्याने एक चांगली डिजीटल अभ्यासिकाही त्यांनी निर्माण केली. ही अभ्यासिका खरोखरच या भागातील मुलांना उपयुक्त ठरेल. याचा लाभ चांगल्या प्रकारे घेण्याचे काम मुलामुंलीनी करावे. आपणा सर्व गुणवंताना प्रोत्साहन देण्याचे काम आमदार शंभूराज देसाई करीत आहेत. या प्रोत्साहानातून आपण चांगली दिशा निवडावी व आपले भविष्य उज्जवल करावे असे आवाहनही त्यांनी शेवठी बोलताना केले.
याप्रसंगी बोलताना आमदार शंभूराज देसाई म्हणाले, राज्याला दिशा देण्याचे खरे काम पाटण तालुक्याचे भाग्यविधाते लोकनेते बाळासाहेब देसाई यांनी केले. आपण ज्या भूमित जन्मलो त्या भूमितील जनतेकरीता त्यांनी अफाट कष्ट घेतले.आपल्या तालुक्यातील जनतेचे जीवनमान उंचावले पाहिजे याकरीता त्यांनी अनेक उपक्रम तालुक्यात राबविले.त्यातील महत्त्वकांक्षी प्रकल्प म्हणजे लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखाना.साखर कारखान्याच्या माध्यमातून तालुक्यातील शेतकरी बांधवांना आर्थिक वाहिनी मिळवून देण्याची जबाबदारी त्यांनी स्व.शिवाजीराव देसाई (आबासाहेब) यांच्यावर दिली. स्व.आबासाहेबांनीही कारखान्याची जबाबदारी लिलया पेलत अल्पावधीत कारखाना कर्जमुक्त करुन सभासदांच्या मालकीचा करुन दिला. हे सर्वांत मोठे कार्य तालुक्यातील जनता आजही विसरली नाही आणि विसरणार  देखील नाही. आज त्यांचे ३२ व्या पुण्यस्मरण दिनानिमित्ताने मतदारसंघातील तमाम जनतेच्या वतीने मी त्यांना विनम्र अभिवादन करतो. सर्वसामान्य जनतेच्या भल्यासाठी लोकनेते बाळासाहेब देसाई व स्व.शिवाजीराव देसाई या दोन महान विभूतींनी आपले सर्वस्व अर्पण केले आहे.लोकनेते व स्व.आबासाहेब यांच्या आदर्शातून व प्रेरणेतून आपण लोकनेते बाळासाहेब देसाई उद्योग व शिक्षण समुह चांगल्या प्रकारे चालविण्याचे काम करीत आहोत. दौलतनगर येथील शैक्षणिक संकुलातून आज हजारो विद्यार्थी-विद्यार्थीनी शिक्षण घेत आहेत त्यामागे स्व.आबासाहेब यांची तपश्चर्या फार मोठी आहे.आजच्या विद्यार्थी-विद्यार्थीनींनी आपल्या जीवनात लोकनेते साहेब व स्व.आबासाहेब यांच्या आदर्श गुणांचा उपयोग करुन आपली शैक्षणिक वाटचाल करावी राज्य शासनाच्या निधीतून याठिकाणी उभारण्यात आलेले लोकनेते बाळासाहेब देसाई शताब्दी स्मारक या स्मारकातील अभ्यासिकेचा उपयोग ग्रामीण भागातील विद्यार्थी- विद्यार्थींनी चांगल्या प्रकारे करुन घ्यावा असेही ते  शेवटी बोलताना म्हणाले, यावेळी पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांच्या हस्ते तालुक्यशतील मुकबधीर विद्यार्थ्यांना गणवेश वाटप व गुणवंत विद्यार्थी विद्यार्थीनींचा सत्कार करण्यात आला.कार्यक्रमास पाटण मतदारसंघातील 10 वी, 12 वी तील गुणवंत विद्यार्थी विद्यार्थींनी व त्यांचे पालक तसेच लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी उद्योग व शिक्षण समुहातील अधिकारी,कर्मचारी,विविध संस्थांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक डॉ.दिलीपराव चव्हाण यांनी केले.उपस्थितांचे आभार अशोकराव पाटील यांनी मानले.

No comments:

Post a Comment