Thursday 5 July 2018

वृक्षलागवडीचा उपक्रम दोन चार दिवसाचा नको, लोकचळवळीतून हा उपक्रम हाती घेणे गरजेचे. आमदार शंभूराज देसाई यांचे हस्ते नाडे व गलमेवाडी येथे वृक्षलागवडीचा प्रारंभ. पाटण तालुक्यातील सर्व शासकीय अधिका-यांची उपस्थिती.


दौलतनगर दि. ०४:  महाराष्ट्र शासनाच्या वन विभागाने गत दोन वर्षाप्रमाणे यंदाच्या वर्षी दि.०१ जुलै ते ३१ जुलै अखेर संपुर्ण राज्यामध्ये १३ कोटी वृक्षलागवड करण्याचा उपक्रम हाती घेतलेला आहे.राज्यातील ३३ टक्के भूभाग वृक्षाखाली आणणे आवश्यक आहे.त्याचाच एक भाग म्हणून मागील दोन वर्षामध्ये प्रत्येकी २ कोटी व ४ कोटी वृक्षलागवड करण्याचे उदिष्ट राज्य शासनाच्या वन विभागाने केले होते तर यंदाच्या वर्षी १३ कोटी वृक्षलागवडीचे उदिष्ट शासनाने ठरविले आहे. राज्य शासनाचा व शासनाच्या वन विभागाचा निर्धार पुर्णत्वाकडे नेणेकरीता वृक्षलागवडीचा उपक्रम केवळ दोन चार दिवसाचा नको तर हा उपक्रम लोकचळवळीतून हाती घेण्याची आणि या वृक्षांची चांगल्या प्रकारे जपणूक करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन आमदार शंभूराज देसाई यांनी केले आहे.
          राज्य शासनाच्या वन विभागामार्फत यंदाच्या वर्षी दि.०१ जुलै ते ३१ जुलै अखेर करण्यात येणा-या १३ कोटी वृक्षलागवडीचा तसेच गलमेवाडी ता.पाटण ग्रामस्थ व मुंबई मित्र मंडळ यांच्यावतीने करण्यात येणा-या वृक्षलागवडीचा शुभारंभ अनुक्रमे नाडे व गलमेवाडी ता.पाटण येथे पाटण तालुक्याचे आमदार शंभूराज देसाई यांचे हस्ते करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.कार्यक्रमास उपविभागीय अधिकारी श्रीरंग तांबे,तहसिलदार रामहरी भोसले,तालुका वन अधिकारी व्ही.आर.काळे,लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन डॉ.दिलीपराव चव्हाण, शिवदौलत बँकेचे चेअरमन ॲड.मिलींद पाटील,जिल्हा परिषद सदस्य विजयराव पवार,आशिष आचरे,पंचायत समिती सदस्य पंजाबराव देसाई,सुरेश पानस्कर,सौ.सिमा मोरे,माजी उपसभापती जितेंद्र केसेकर,माजी सदस्य बबनराव भिसे, रघूनाथ माटेकर नाडे सरपंच विष्णू पवार,सुभाष चोरगे,अधिक चोरगे,सुरेश चोरगे,अजय चोरगे,सुभाष घाडगे,राजू चोरगे,अगस्त चोरगे,धोडींराम चोरगे या प्रमुख पदाधिका-यांसह पाटण तालुक्यातील शासकीय विभागांचे सर्व शासकीय अधिकारी व जय दुर्गा माता मुंबई मित्र मंडळ, गलमेवाडी येथील कार्यकर्ते यांची मोठया संख्येने उपस्थिती होती.
            यावेळी दोन्ही ठिकाणच्या आयोजीत कार्यक्रमात बोलताना आमदार शंभूराज देसाई म्हणाले, आजवर राज्य शासनाने वृक्षारोपणाचा अनेकदा कार्यक्रम हाती घेतला परंतू युतीच्या शासनाने गत दोन वर्षात एकाच आठवडयात प्रतीवर्षी अनुक्रमे दोन कोटी आणि चार कोटी वृक्ष लागवड करण्याची मोहिम शासनाच्या वनविभागामार्फत हाती घेतली.वृक्षारोपणाची ही मोहिम म्हणजे केवळ कार्यक्रम न करता एक लोकचळवळ झाली पाहिजे.या चळवळीमध्ये मोठया प्रमाणात लोकांचा,विविध मंडळाचा,सामाजिक संस्थांचा,महाविद्यालये,शाळा,ग्रामपंचायतींचा,शासकीय कार्यालयांचा सहभाग असणे आवश्यक आहे.युतीच्या शासनाने व शासनाच्या वनविभागाने वरील सर्व यंत्रणांना वृक्षलागवडीचा नारा आणि हाक दिल्याने गतवर्षीप्रमाणे यंदाही मोठया प्रमाणात वृक्षांची लागवड होण्यास मदत होणार आहे.पाटण तालुक्यातील वन विभागाच्या वतीने यंदाच्या वर्षी ३ लाख ६५ हजार वृक्षांची लागवड करण्यात येणार आहे. महाराष्ट्रातील अनेक पर्वत रांगा या आज उजाड दिसत आहेत.त्या हिरव्यागार करण्याचे काम युतीच्या शासनाने हाती घेतले असून वनखात्यांच्या जागांवरच केवळ झाडे लावणे एवढया मर्यादेत न रहाता अन्य जागांवरही तसेच खाजगी जागेमध्ये वृक्षाची लागवड केल्यास लयाला गेलेली वनसंपदा पुनश्च: उभी राहण्यास मदत होणार आहे.पाटण तालुक्यातील वन विभागाच्या अधिकारी आणि कर्मचारी यांनी वृक्षलागवडीच्या जागा निश्चित करुन ३१ जुलैपर्यंत मोठया प्रमाणात वृक्षांची लागवड करावी अशा सुचना तालुका वन‍ अधिकारी यांना दिल्या आहेत त्यानुसार विविध सामाजिक संस्था यांच्या मदतीने त्यांनी मोठया प्रमाणात वृक्षलागवड करुन शासनाचे उदिष्ट पुर्णत्वाकडे नेण्याचे नियोजन केले आहे. गलमेवाडी येथील मुंबई मित्र मंडळातील कार्यकर्त्यांनी स्वखर्चाने गावाकडे येणा-या रस्त्याच्या दोन्ही बाजूना वृक्षलागवड करण्याचा हाती घेतलेला उपक्रम खरोखरच कौतुकास्पद आहे. राज्य शासनाने आणलेली ही महत्वकांक्षी मोहिम महाराष्ट्रामध्ये एक चळवळ निर्माण करुन भविष्यात राज्याच्या प्रगतीला एकप्रकारे सावली मिळवून देईल असा विश्वास आमदार शंभूराज देसाई यांनी व्यक्त करुन केवळ वृक्षलागवड करुन थांबू नका तर केलेली वृक्षलागवड जपण्याचे ते वाढविण्याचे कामही लोकांनी लोकसहभागातून तसेच शासकीय यंत्रणांनी आणि सामाजिक संस्थांनी जबाबदारीने करावे असे आवाहनही त्यांनी शेवठी बोलताना केले. तालुका वन अधिकारी व्ही.आर.काळे यांनी सर्वांचे आभार मानले.
चौकट :- दि.12 जुलैला दौलतनगरला होणार मोठया प्रमाणात वृक्षलागवड.
             महाराष्ट्राचे पोलादी पुरुष लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे चिरंजीव लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक चेअरमन स्व.शिवाजीराव देसाई यांचे ३२ व्या पुण्यतिथी निमित्ताने तालुक्याचे आमदार शंभूराज देसाई यांचे मार्गदर्शनाखाली दौलतनगर ता.पाटण येथे मोठया प्रमाणात वृक्ष लागवड करण्याचे नियोजन लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी उद्योग, शिक्षण समुह व शासनाच्या वनविभागच्या वतीने करण्यात आले आहे. 

1 comment:

  1. निसर्गाचा उद्धार करी मानवाचा उद्धार.

    ReplyDelete