Wednesday 18 July 2018

अधिवेशनाला जायचे पुढे ढकलून आमदार शंभूराज देसाईंनी केली पुरपरिस्थितीची पहाणी. तालुकयातील प्रमुख अधिका-यांची उपस्थिती. पाटण बसस्थानक,मुळगांव पुलाची केली पहाणी.


दौलतनगर दि. १८:  नागपुर याठिकाणी राज्याचे पावसाळी अधिवेशन सुरु असून गेल्या दोन दिवसात पाटण तालुक्यात मुसळधार कोसळणा-या पावसामुळे आणि कोयना धरणातून कोयना नदीत सोडण्यात येणा-या पाण्यामुळे निर्माण होणा-या पुरपरिस्थितीच्या पार्श्वभूमिवर सोमवारी आमदार शंभूराज देसाई यांनी अधिवेशनाला नागपुरला जायचे पुढे ढकलून तालुका प्रशासनाच्या तातडीच्या बैठकां घेण्याबरोबर तालुक्यातील प्रमुख अधिका-यांना बरोबर घेवून सोमवारी त्यांनी तालुक्यातील विविध ठिकाणी उभ्या पावसात जावून पुरपरिस्थितीची पहाणी केली.मुळगांव पुलास लागणा-या पाण्याबरोबर पाटण बसस्थानक परिसरात बसस्थानकाच्या डावे उजवे बाजुने वाहणारे ओढे तुंबल्यामुळे ओढयांचे पाणी बसस्थानकात शिरले होते त्याची पहाणी आमदार शंभूराज देसाई यांनी केली आणि तात्काळ उपस्थित अधिका-यांना तुंबलेले ओढे मोकळे करण्याच्या सुचना केल्या.
आमदार शंभूराज देसाई यांचेसोबत पहाणी दौ-यामध्ये पाटणचे उपविभागीय अधिकारी श्रीरंग तांबे,तहसिलदार रामहरी भोसले,उपविभागीय पोलीस अधिकारी अंगद जाधवर,पाटण पोलिस निरिक्षक भापकर,गट विकास अधिकारी संजिव गायकवाड,सार्वजनिक बांधकाम व जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे सर्व शाखा अभियंता तसेच पाटण आगारप्रमुख उथळे हे शासकीय अधिकारी उपस्थित होते.पहाणी दौरा झालेनंतर आमदार शंभूराज देसाई यांचे अध्यक्षतेखाली पाटण विश्रामगृह याठिकाणी तालुकास्तरीय अधिका-यांची बैठक झाली या बैठकीत निर्माण होणा-या पुरपरिस्थितीच्या संदर्भात करावयाच्या उपाययोजनांच्या अनुषंगाने आमदार शंभूराज देसाईंनी तालुकास्तरीय सर्व अधिका-यांना सतर्क राहण्याच्या सुचना दिल्या.
नागपुरला राज्याचे पावसाळी अधिवेशन सुरु आहे. मात्र पाटण तालुक्यात गेल्या चार दिवसापासून पावसाची सततधार असून चार दिवस मुसळधार पडणा-या पावसामुळे तालुक्यातील प्रमुख कोयना धरणाबरोबर तालुक्यातील तारळी,मोरणा गुरेघर, वांग मराठवाडी व उत्तरमांड ही धरणे पुर्ण क्षमतेने भरली आहेत. मोरणा गुरेघर, उत्तरमांड व वांगमराठवाडी धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु असून काल सकाळी ८.00 वा कोयना धरणात ७६.०७ टीएमसी पाणीसाठा झाल्याने कोयना धरणाच्या पायथा वीजगृहातून २००० कयुकेक्सनी पाणी सोडण्यास सुरुवात केली होती तर काल दुपारी धरणाचे सहा वक्र दरवाजे २ फुटांनी उघडून ५५०० क्युसेक्स पाणी सोडण्यास सुरुवात केली असल्यामुळे व सातत्याने धरणाच्या पाणीसाठयात वाढ होत असल्यामुळे सोडण्यात येणा-या पाण्यामुळे मुळातच कोयना नदीत पावसाच्या पाण्याबरोबर धरणातील ७५०० क्युसेक्स व त्याहुन अधिक पाण्याचा विसर्ग येणार असल्याने नागपुरच्या पावसाळी अधिवेशनास सोमवारी जाण्याचे पुढे ढकलून आमदार शंभूराज देसाईंनी पुरामुळे धोका निर्माण होणा-या कोयना नदीकाठच्या गांवाची माहिती घेत पुरपरिस्थितीत मुळगांव पुलास लागणा-या पाण्याची व पुलाच्या कठडयाची पाहणी करीत आमदार देसाई यांनी पाटण बसस्थानक परिसरात काल सकाळी बसस्थानकाच्या डावे उजवे बाजुने वाहणारे ओढे तुंबल्यामुळे ओढयांचे पाणी बसस्थानकात शिरले होते त्याची पहाणी केली व तात्काळ उपस्थित अधिका-यांना तुंबलेले ओढे मोकळे करण्यासंदर्भात सुचना देवून हस्तातंर करण्यात आलेल्या कराड चिपळूण रस्त्यांच्या अधिका-यांना आणि एल.ॲन्ड टी कपंनीच्या संबधित वरीष्ठ यंत्रणेला दुरध्वनीवरुन त्यांचेकडील यंत्रणा या कामांकरीता तात्काळ लावण्याच्या सुचना त्यांनी केल्या.तर उपस्थित असणारे उपविभागीय अधिकारी श्रीरंग तांबे,तहसिलदार रामहरी भोसले यांनाही आपण यासंदर्भात संबधित अधिकारी यांचेकडे पाठपुरावा करुन लवकरात लवकर या परिस्थितीमध्ये सुधारणा कराव्यात असे सांगितले.अधिवेशनातील एका दिवसाचे कामकाज आपण दुसरेदिवशी भरुन काढू परंतू तालुक्यात अतिवृष्टीची परिस्थिती असताना नागपुरला अधिवेशनाला जाणे योग्य नसल्याची भूमिका आमदार शंभूराज देसाईंनी घेत तालुक्यातील पुरपरिस्थितीची पहाणी त्यांनी केल्यामुळे तालुक्यातील सर्व प्रशासन अतिवृष्टीच्या परिस्थितीत वेगाने कामांला लागल्याचे चित्र सोमवारी पाटण शहरामध्ये पहावयास मिळाले.
चौकट:- पुरपरिस्थितीच्या पार्श्वभूमिवर नागपुर अधिवेशनातून सुट्टी घेत आमदार मतदारसंघात अलर्ट.
यंदाच्या वर्षी सातत्याने कोसळणा-या पावसामुळे एक महिना अगोदरच कोयना धरणात जादा प्रमाणात पाणीसाठा झाल्याने कोयना धरणातून पाणी सोडण्यात येणार असल्याचे समजताच पुरपरिस्थितीच्या पार्श्वभूमिवर आमदार शंभूराज देसाईंनी नागपुर अधिवेशनातून सुट्टी घेत काल ते सोमवारी वडील स्व.शिवाजीराव देसाई यांचे श्राध्दचे विधी उरकून दुपारनंतर उशीरापर्यंत पाटण येथेच स्वत: अलर्ट रहात तालुकास्तरीय सर्व अधिका-यांसह तळ ठोकून होते.


No comments:

Post a Comment