दौलतनगर दि. १९: पाटण तालुक्यात सर्वात मोठया असणा-या कोयना नदीकाठी सांगवड,बनपेठवाडी
व गुंजाळी ही गांवे वसली असून सध्या कोयना धरणातून सुमारे १७ हजार क्युसेक्स पाण्याचा
विसर्ग हा कोयना नदीपात्रात होत आहे.धरण पुर्ण क्षमतेने भरल्यानंतर याहून अधिक पाण्याचा
विसर्ग कोयना नदीत करण्यात येतो.सन २००५ साली तर १ लाखाहून अधिक क्युसेक्स पाण्याचा
विसर्ग कोयना नदीपात्रात करण्यात आला होता.एवढया मोठया प्रमाणात कोयना नदीला पाणी सोडण्यामुळे
पुरपरिस्थिती निर्माण होवून कोयना नदीकाठच्या सांगवड,बनपेठवाडी
व गुंजाळी या गांवाना पुराचा धोका पोहचत असल्याने या गांवाना पुरापासून संरक्षण होणेकरीता
संरक्षक भिंती व नदीवरील घाट बांधणेस मान्यता देवून निधी उपलब्ध करुन देण्याची माझी
अनेक वर्षाची शासनाकडे मागणी आहे. दि.०३.०८.२०१६ रोजी मी विधानसभेत
मांडलेल्या लक्षवेदी सुचनेवर एक वर्षाच्या आत
निधी मंजुर करण्याचे आश्वासन जलसंपदामंत्री यांनी दिले होते.जलसंपदामंत्री यांनी
दिलेल्या आश्वासनानुसार तात्काळ या तीन गांवाना पुरापासून संरक्षण होणेकरीता संरक्षक
भिंती व नदीवरील घाट बांधणेस मान्यता देवून पावसाळा संपण्यापुर्वी निधी मंजुर करीत
पावसाळयानंतर या कामांना सुरुवात करावी अशी आग्रही मागणी आज आमदार शंभूराज देसाई यांनी
औचित्याच्या मुद्दयाव्दारे पावसाळी अधिवेशनामध्ये केली.
कोयना धरणातून
सोडण्यात येणा-या पाण्यामुळे प्रतिवर्षी धोका पोहचणा-या पाटण तालुक्यातील कोयना नदीकाठच्या
सांगवड,बनपेठवाडी व गुंजाळी या तीन मुख्य गांवांना पुरसंरक्षक भिंती व कोयना नदीवर घाट बांधणे या कामांना शासनाने दिलेल्या
आश्वासनानुसार मान्यता व निधी देणेसंदर्भात औचित्याचा मुद्दा मांडताना आमदार शंभूराज
देसाई यांनी आज विधानसभा सभागृहात शासनाचे व राज्याचे जलंसपदा मंत्री यांचे लक्ष वेधले.
यावेळी आमदार
शंभूराज देसाई म्हणाले, माझे पाटण तालुक्यातील सर्वात मोठया असणा-या कोयना नदीकाठच्या कोयनेच्या पुरामुळे धोका निर्माण होणा-या १० गांवाना पुरसंरक्षक भिंती व कोयना नदीवर घाट बांधणेच्या कामांना आवश्यक
असणारा निधी मंजुर करावा अशी माझी सातत्याची शासनाकडे मागणी होती व आहे. दरम्यान या
विषयासंदर्भात मी दि.०३.०८.२०१६ रोजी लक्षवेदी सुचनेच्या माध्यमातून
विधानसभा सभागृहात राज्य शासनाचे लक्षही वेधले होते तेव्हा
पाटण मतदारसंघातील कोयना नदीस अतिवृष्टीच्या काळात येणा-या पुरामुळे
मोठया प्रमाणात धोका निर्माण होणा-या एकूण १० गांवाना पुरसंरक्षक भिंती व कोयना
नदीवर घाट बांधणेस एक वर्षाच्या आत निधी मंजुर करण्याचे आश्वासन शासनाच्यावतीने राज्याचे जलसंपदामंत्री यांचेकडून विधानसभा सभागृहात दिले
होते माझे सातत्याच्या पाठपुराव्यामुळे शासनाचे जलसंपदा विभागाने १० पैकी सात गांवाना
पुरसंरक्षक भिंती व कोयना नदीवर घाट बांधणेकरीता मान्यता देवून
निधी मंजुर केला आहे.परंतू सर्वात जास्त धोका निर्माण होणा-या सांगवड,बनपेठवाडी व गुंजाळी
तीन महत्वाच्या गावांतील कामांना शासनाने दोन वर्षापुर्वी आश्वासन देवून देखील अद्यापही
मंजुरी व निधी दिलेला नाही.
आजच दिवसभरात
मी तीनवेळा मतदारसंघातून माहिती घेतली सध्या तालुक्यात होणा-या मुसळधार पावसामुळे मुळातच
कोयना नदीपात्रात जादा प्रमाणात पाणी असून धरणातील १७ हजार क्युसेक्स पाण्याच्या विसर्गामुळे
नदीपात्रात पाण्याची वाढ होवून नदीपात्राबाहेर पाणी आले आहे.वाढत्या पाण्याचा धोका
सांगवड,बनपेठवाडी व गुंजाळी या तीन गांवाना प्रतिवर्षी होतो वाढत्या पाण्यामुळे या
गावाकडेच्या जमिनी मोठया प्रमाणात खचू लागल्या असल्यामुळे या तिन्ही
गांवांमध्ये मोठया प्रमाणात भितीचे वातावरण आहे.या तीन गांवाच्या या कामांना
लवकरात लवकर मान्यता देवून निधी उपलब्ध करुन
देणेसंदर्भात शासनाचे जलसंपदा विभागाकडे सविस्तर प्रस्ताव देखील सादर करण्यात आला
असून सदरचा प्रस्ताव जलसंपदा विभागाकडे प्रलंबीत असलेने या विभागाचा
लोकप्रतिनिधी म्हणून राज्याचे जलसंपदामंत्री यांचेकडे दि.०५.१२.२०१७ रोजी पत्रव्यवहार
देखील केला आहे. शासनाने या बाबीकडे गांभीर्याने पहावे व शासनाच्या वतीने राज्याचे
जलसंपदामंत्री यांनी दि.०३.०८.२०१६ रोजी मी मांडलेल्या लक्षवेदी सुचनेवर दिलेल्या आश्वासनानुसार तात्काळ सांगवड,बनपेठवाडी
व गुंजाळी या पुराचा धोका निर्माण झालेल्या तीन गांवाना पुरापासून संरक्षण होणेकरीता
संरक्षक भिंती व नदीवरील घाट बांधणेस मान्यता देवून पावसाळा संपण्यापुर्वी निधी मंजुर
करीत पावसाळयानंतर या कामांना सुरुवात करावी असा आग्रह आमदार शंभूराज देसाई यांनी विधानसभेत
धरला.
No comments:
Post a Comment