दौलतनगर
दि.17: लोकनेते बाळासाहेब
देसाई सहकारी साखर कारखान्यांस सन
2017-18 च्या गळीत हंगामात गाळप केलेल्या ऊसबिलापोटी लोकनेते बाळासाहेब देसाई सह.साखर
कारखान्याने ऊस उत्पादक शेतकरी सभासदांना एफआरपीची पूर्ण रक्कम अदा केली आहे. कारखान्याने
प्रतिटन 25६७ रुपयांप्रमाणे एफआरपीची संपूर्ण रक्कम ऊस उत्पादकांच्या बँक खात्यावर
वर्ग केली असल्याची माहिती कारखान्याचे चेअरमन अशोकराव पाटील यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे
दिली आहे.
पत्रकांत पुढे
म्हंटले आहे की, दौलतनगर ता.पाटण येथील लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याने
मागील सन 2017-18 च्या गळीत हंगामात गाळप होणा-या ऊसासाठी शेतकरी सभासदांना प्रतिटन
2750 रुपये दर जाहिर केला होता. एफआरपीनुसार प्रतिटन 2567 रुपये दर कारखान्याकडून देय
होता त्यानुसार लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याने गळीत हंगाम सुरु झाल्यानंतर
सुरुवातीच्या दि. 09 नोव्हेंबर ते दि.15 डिसेंबर या काळात गाळपास आलेल्या ऊसाला प्रतिटन
2750 रुपयांप्रमाणे बिल अदा केले आहे. तर दि.16 डिसेंबर ते दि.15 मार्च 2018 या काळात
गाळपास आलेल्या ऊसाला प्रतिटन 2500 रुपयांप्रमाणे बिल अदा केले आहे.
दरम्यान त्यानंतर
साखर दराच्या घसरणीमुळे व साखर उद्योगावर कोसळलेल्या संकटामुळे सर्वच साखर कारखान्यांसमोर
ऊसबिलाचे पैसे कसे अदा करायचे ? हा प्रश्न आवासून उभा होता. पण आमचे लोकनेते बाळासाहेब
देसाई सहकारी साखर कारखान्याने मात्र शेतक-यांचे हित डोळयांसमोर ठेऊन आलेल्या परिस्थितीचा
योग्य नियोजनातून सामना करत केंद्र व राज्यसरकारच्या निर्देशानुसार संपूर्ण एफआरपी
रक्कम अदा करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार दि.16 डिसेंबर 2017 ते दि.15 मार्च
2018 अखेर गाळप केलेल्या ऊसाला एफआरपी दर फरकाची प्रतिटन 67/- रुपये प्रमाणे होणारी
रक्कम रुपये 91 लाख 79 हजार व दि.16 मार्च 2018 ते हंगाम संपेपर्यंत गाळप झालेल्या
ऊसबिलापोटी एफआरपीनुसार प्रतिटन 2567 रुपयांप्रमाणे होणारी संपूर्ण रक्कम रुपये 2 कोटी
93 लाख 51 हजार अशी एकूण रुपये 3 कोटी 85 लाख 30 हजार इतकी रक्कम लोकनेते बाळासाहेब
देसाई सहकारी साखर कारखान्याने ऊस उत्पादक शेतक-यांच्या बँक खाती वर्ग केली आहे. ऊस
उत्पादक शेतक-यांना लवकरच त्यांच्या ऊसाची रक्कम बँकेतून देण्याची तरतूद कारखान्याने
केली असल्याचेही चेअरमन पाटील यांनी पत्रकात दिली आहे.
No comments:
Post a Comment