दौलतनगर दि. २६: संपुर्ण राज्यामध्ये मराठा क्रांती मोर्चाने मराठा आरक्षणासंदर्भात
केलेली आंदोलने आणि या आंदोलनाला लागलेले हिंसक वळण तातडीने थांबविणेकरीता व मराठा
आरक्षणाचा निर्णय लवकरात लवकर करुन घेणेकरीता राज्य शासनाने नेमलेल्या राज्य मागास
प्रवर्ग आयोगाचे माननीय अध्यक्ष यांनी महाराष्ट्र राज्यातील तमाम सर्वपक्षीय मराठा
आमदारांची यासंदर्भातील आग्रही मागणी जाणून घेणेकरीता राज्य मागास प्रवर्ग आयोगाचे
माननीय अध्यक्ष यांचेसमवेत लवकरात लवकर सर्वपक्षीय मराठा आमदारांची एकदिवसीय उच्चस्तरीय
बैठक आयोजीत करण्याची विशेष विनंती राज्याचे मुख्यमंत्री यांनी मागास प्रवर्ग आयोगाचे
माननीय अध्यक्ष यांना करावी अशी आग्रही मागणी शिवसेना आमदार शंभूराज देसाई यांनी महाराष्ट्र
राज्यातील तमाम मराठा आमदारांच्या वतीने राज्याचे मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांचेकडे
लेखी पत्राव्दारे केली आहे.
मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांना आमदार
शंभूराज देसाई यांनी दिलेल्या लेखी पत्रामध्ये केलेल्या आग्रही मागणीमध्ये म्हंटले
आहे की, मराठा आरक्षणासंदर्भात संपुर्ण राज्यामध्ये आजपर्यंत एकूण ५८ मराठा क्रांती
मोर्चा शांततेच्या मार्गाने पार पडले आहेत. मात्र सध्या मराठा आरक्षणासंदर्भात मराठा
समाजाच्या संयमाचा बांध फुटला असून शांततेच्या मार्गाने आतापर्यंत झालेल्या मराठा क्रांती
मोर्चाने संपुर्ण राज्यभर हिंसक वळण घेतले आहे. मराठा समाजाला आरक्षण दया यासंदर्भात
आम्ही सर्वपक्षीय मराठा विधानसभा सदस्य हे विधानसभा सभागृहात तसेच विधानसभेबाहेरही
आग्रही राहून आरक्षणासंदर्भातील आमची भूमिका वारंवार शासनापुढे मांडत आलो आहोत. उच्च
न्यायालयाने विचारणा केलेप्रमाणे राज्य शासनाने राज्य मागास प्रवर्ग आयोग स्थापन केला
असल्याचे म्हणणे उच्च न्यायालयाला दिले असून मराठा आरक्षणाचा मुद्दा राज्य मागास प्रवर्ग
आयोग यांचेकडे प्रलंबीत असून राज्यातील मराठा समाजाला त्यांचे मागणीप्रमाणे आरक्षण
मिळवून देणेसंदर्भात आपले महाराष्ट्र राज्यातील विधानसभेतील सर्वपक्षीय मराठा आमदारांची
उच्चस्तरीय एकदिवसीय बैठक राज्य मागास प्रवर्ग आयोगाचे माननीय अध्यक्ष यांचेसमवेत लवकरात
लवकर आयोजित करुन या बैठकीत मराठा आमदारांची मराठा आरक्षणासंदर्भातील आग्रही मागणी
जाणून घेऊन मराठा आरक्षणाबाबत लवकरात लवकर निर्णय घेण्यात यावा. याकरीता आपण राज्याचे
मुख्यमंत्री या नात्याने राज्य मागास प्रवर्ग आयोगाचे माननीय अध्यक्ष यांना विशेष विनंती
करुन, हिंसक वळण लागलेल्या मराठा क्रांती मोर्चाच्या पार्श्वभूमीवर लवकरात लवकर माननीय
अध्यक्षासमवेत एकदिवसीय उच्चस्तरीय बैठक आयोजीत करावी अशी महाराष्ट्र राज्यातील तमाम
मराठा आमदारांच्यावतीने आपणांकडे आग्रही विनंती करीत असल्याचे आमदार शंभूराज देसाई
यांनी लेखी पत्रामध्ये म्हंटले आहे.
No comments:
Post a Comment