Friday 13 July 2018

कुंभारगांव विभागातील गावागांवात विकास पोहचविण्याचा प्रयत्न. गलमेवाडी कार्यक्रमाप्रसंगी आमदार शंभूराज देसाईंचे प्रतिपादन.


दौलतनगर दि.11:  २०१४ च्या निवडणूकीत पाटण विधानसभा मतदारसंघातील मतदारांनी मला भरघोस मतांनी निवडून देत मतदारसंघाचा आमदार म्हणून काम करण्याची संधी दिली त्या संधीचे सोने करीत मतदारसंघात गेली अनेक वर्षे प्रलंबीत राहिलेला विकास पुर्णत्वाकडे नेणेकरीता गत साडेतीन वर्षात माझे कशोसीने प्रयत्न सुरु असून अनेक कामे पुर्णत्वासही नेली आहेत.याचा मला सार्थ अभिमान आहे.गत साडेतीन वर्षात कुंभारगांव विभागातील अनेक गांवामध्ये  विकास पोहचविण्याचे मी प्रामाणिक कार्य केले असून या विभागातील अनेक कामे या येत्या वर्षभरात करणेकरीता विविध योजनांमध्ये प्रस्तावित केली असल्याचे प्रतिपादन आमदार शंभूराज देसाई यांनी केले.
गलमेवाडी ता.पाटण येथे राज्य शासनाच्या २५१५ योजनेतंर्गत यंदाच्या वर्षी आमदार शंभूराज देसाई यांनी मंजुर करुन आणलेल्या गलमेवाडी मधली आळी अंतर्गत रस्त्याचे काँक्रीटीकरण करणे या कामांचा शुभारंभ आमदार देसाई यांच्या हस्ते करण्यात आला याप्रसंगी ते बोलत होते.या अंतर्गत कामाकरीता आमदार शंभूराज देसाई यांनी १० लाख रुपयांचा निधी मंजुर केला आहे.यावेळी कार्यक्रमास लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन डॉ.दिलीपराव चव्हाण,शिवदौलत बँकेचे चेअरमन ॲड.मिलींद पाटील,जिल्हा परिषद सदस्य आशिष आचरे, पंचायत समिती सदस्य पंजाबराव देसाई,सौ.सिमा मोरे,माजी उपसभापती जितेंद्र केसेकर,माजी सदस्य बबनराव भिसे, रघूनाथ माटेकर,सुभाष चोरगे,अधिक चोरगे,सुरेश चोरगे,अजय चोरगे,सुभाष घाडगे,राजू चोरगे,अगस्त चोरगे,धोडींराम चोरगे या प्रमुख पदाधिकारी यांच्यासह जय दुर्गा माता मुंबई मित्र मंडळ,गलमेवाडी येथील कार्यकर्ते व ग्रामस्थ यांची मोठया संख्येने उपस्थित होती.
याप्रसंगी बोलताना आमदार देसाई म्हणाले,गलमेवाडी मधली आळी येथील अंतर्गत रस्त्याचे काँक्रीटीकरण करणे या कामाची ब-याच वर्षाची मागणी होती.त्यानुसार यंदाच्या वर्षी राज्य शासनाच्या २५१५ योजनेतंर्गत या कामांस १० लाख रुपयांचा निधी मिळणेकरीता सदरचे काम प्रस्तावित केले होते त्यानुसार शासनाने या कामांस मंजुरी दिली. शासनाच्या २५१५ योजनेतंर्गत यंदाच्या वर्षी पाटण मतदारसंघात सुमारे २ कोटी रुपयांचा निधी मंजुर करुन आणला आहे. या कामांच्या शुभारंभाच्या कार्यक्रमातच या गावातील ग्रामस्थांनी आमच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर आहे तो सोडवावा अशी मागणी केली.ग्रामस्थांनी मागणी आता केली परंतू ज्या ज्या वेळी पाटण मतदारसंघातील गावे व वाडयावस्त्यांच्या पिण्याच्या पाण्याच्या योजनांच्या संदर्भात बैठका होतात तेव्हा तेव्हा गलमेवाडी येथील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न पुढे येतो हे ओळखून कार्यक्रमाला येण्यापुर्वी व ग्रामस्थांकडून मागणी येण्यापुर्वीच या गावच्या पिण्याच्या पाण्याच्या योजनेकरीता राष्ट्रीय पेयजल आराखडयात या गावाचा समावेश करण्यात यावा व आवश्यक असणारा निधी मंजुर करावा याकरीता मी याअगोदरच राज्याचे पाणी पुरवठा मंत्री ना.बबनराव लोणीकर यांचेकडे मागणी पत्र दिले असल्याचे आमदार शंभूराज देसाई यांनी स्पष्ट केले.मतदारसंघाचा आमदार म्हणून मतदारसंघातील प्रत्येक गांव आणि वाडयांच्या प्रलंबीत विकासकामांचा मी आराखडा तयार केला आहे त्यानुसार कोणत्या गांवातील प्रलंबीत काम शासनाच्या कोणत्या योजनेमध्ये प्रस्तावित करावयाचे आणि त्याकरीता आवश्यक असणारा निधी मंजुर करुन आणायचा याचा समावेश त्या आराखडयात आहे.प्रलंबीत विकासकामांच्या तयार केलेल्या आराखडयानुसार गत साडेतीन वर्षात मतदारसंघात काम करण्याचा माझा प्रयत्न असून प्रलंबीत राहिलेली विकासकामे पुर्णत्वाकडे नेणेकरीता माझा प्रयत्न तर आहेच परंतू अनेक वर्षापासून प्रलंबीत असणारी कामे गेल्या साडेतीन वर्षात पुर्णत्वाकडे गेली आहेत याचा मला सार्थ अभिमानदेखील आहे.मतदारसंघाच्या प्रत्येक विभागाला विकासाच्या बाबतीत झुकते माप देण्याचे कार्य मी केले आहे व करीत आहे.आज मतदारसंघात जाईल त्या भागात शासनाच्या विविध योजनेमधून विकासकामे सुरु असल्याचे आपणांस दिसून येत आहेत.विरोधकांना आपली कामे दिसत नाहीत ती त्यांना दिसावीत अशी अपेक्षाही करणे चुकीचे आहे. निवडणूका जवळ आल्या की मतदारांचा बुध्दीभेद करायचा एवढे एकच काम विरोधकांना येते त्यामुळे विरोधकांचे डावपेच ओळूखनच मतदारसंघातील सुज्ञ मतदारांनी आपआपल्या गांवामध्ये वाडीवस्तीमध्ये याअगोदरच्या लोकप्रतिनिधींनी एवढया वर्षे कोणती विकासकामे केली आणि आताच्या लोकप्रतिनिधींनी गेल्या साडेतीन वर्षात कोणकोणती विकासकामे केली आहेत आणि कुणाच्या माध्यमातून विकासकांमे सुरु आहेत याचा सारासार विचार करुन मतदारांनीच दोन लोकप्रतिनिधींच्या कामांतील तुलना करावी असे आवाहनही त्यांनी शेवठी बोलताना केले.प्रास्ताविक अजय चोरगे व आभार अधिक चोरगे यांनी मानले.

No comments:

Post a Comment