Wednesday 4 July 2018

पाटण तालुक्यातील कोयना पर्यटन विकास आराखडा तयार करण्याला वेग. पावसाळी अधिवेशनात पर्यटनमंत्री यांचेकडे निधीसाठी आराखडा सादर करण्याच्या हालचाली गतीमान. आमदार शंभूराज देसाईंनी घेतल्या संबधित विभागाच्या आढावा बैठका.



दौलतनगर दि. ०४:  पाटण तालुक्याचे आमदार शंभूराज देसाईंनी राज्याचे पर्यटनमंत्री ना.जयकुमार रावल यांचेकडे महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी कोयना धरण व येथील निसर्गसौंदर्य लाभलेल्या कोयनानगर येथील व कोयनानगरच्या १० किलोमीटर परिसरातील प्रमुख पर्यटन ठिकाणांचा पर्यटनाच्यादृष्टीने विकास करणेकरीता पर्यटन विकास आराखडा तयार करुन आराखडयातील कामांना आवश्यक निधी पर्यटन विभागाकडून उपलब्ध करुन द्यावा.अशी मागणी केली होती.तर  तालिका अध्यक्ष म्हणून त्यांनी पर्यटनमंत्री यांना अध्यक्ष खुर्चीवरुन सुचित केले होते.आमदार शंभूराज देसाईंच्या मागणीवरुन पर्यटनमंत्री ना.रावल यांनी कोयना पर्यटन विकास आराखडा तात्काळ तयार करुन शासनाला सादर करावा अशा लेखी सुचना जिल्हाधिकारी,सातारा यांना दिल्या होत्या त्यानुसार आमदार शंभूराज देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली कोयना पर्यटन विकास आराखडा तयार करण्याचे कामास वेग आला असून आराखडयाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे.मागील अधिवेशनात पर्यटनमंत्री यांनी आश्वासित केलेप्रमाणे पावसाळी अधिवेशनात या कामांना निधी मिळणेकरीताचा सविस्तर आराखडा पर्यटनमंत्री यांचेकडे सादर करण्याच्या हालचालीं आमदार शंभूराज देसाई यांनी अधिवेशनापुर्वी संबधित विभागांच्या आढावा बैठका घेवून गतीमान केल्या आहेत.
आमदार शंभूराज देसाई यांचे मागणीवरुन राज्याचे पर्यटनमंत्री ना.रावल यांनी जिल्हाधिकारी,सातारा यांना दिलेल्या सुचनावरुन पाटण तालुक्यातील कोयना पर्यटन विकास आराखडयास लवकरात लवकर निधी उपलब्ध होणेकरीता हा आराखडा पावसाळी अधिवेशनातच पर्यटनमंत्री यांचेकडे सादर करणेकरीता आमदार शंभूराज देसाई यांच्या अध्यक्षतेखाली पाटण विश्रामगृह याठिकाणी महसूल व कोयना धरण व्यवस्थापन,सार्वजनीक व जिल्हा परिषद बांधकाम विभागांचा तर कराड विश्रामगृह याठिकाणी या विभागातील वन्यजीव विभागांच्या अधिका-यांची आढावा बैठक आयोजीत करण्यात आली होती. या दोन्ही बैठकामंधून आमदार शंभूराज देसाई यांनी कोयना पर्यटन विकास आराखडयास निधी मिळवणेकरीताच्या हालचांलींना चांगलाच वेग देत पावसाळी अधिवेशन संपण्यापुर्वी यासंदर्भातील सविस्तर आराखडयातील कामांसंदर्भातील बैठक पर्यटनमंत्री यांचेकडे आयोजीत करण्याचा मनोदय व्यक्त केला आहे.
आमदार शंभूराज देसाईंनी कोयना पर्यटन विकास आराखडयात केलेल्या मागण्यांमध्ये राज्य शासनाच्यावतीने सन २०१७-१८ हे आर्थिक वर्ष पर्यटन वर्ष म्हणून साजरे करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतलेनंतर प्रथम प्राधान्यांने महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असणारे कोयना धरण व येथील निसर्ग सौंदर्य लाभलेल्या कोयनानगर,ता.पाटण या परिसराला प्रादेशिक पर्यटन स्थळांचा दर्जा दयावा व महाराष्ट्राला प्रकाशमान करणारे कोयना धरण व या धरणाच्या आसपासच्या १० किमीच्या परिसरातील पर्यटन स्थळे पर्यटनांच्यादृष्टीने विकसीत करणेकरीता आवश्यक निधी देणे अत्यंत गरजेचे असल्याचे म्हंटले आहे. त्यानुसार त्यांनी हा आराखडा निधी मिळणेकरीता लवकरात लवकर पर्यटन मंत्री यांचेकडे सादर व्हावा याकरीता बैठका घेवून या बाबींना चालना देत सुचविलेल्या कामांचा सविस्तर आढावा घेतला.यामध्ये कोयनानगरच्या नेहरु उद्यानाचे तसेच धरण परिसराकडे जाणा-या रस्त्यांवर जुन्या झालेल्या कारंजांचे सुशोभिकरण व नुतनीकरण करणे,कोयना धरण परिसराकडे जाणा-या रस्त्यावरील धरणाच्या मेनगेटच्या चौकामध्ये महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारुढ पुतळा बसविणे,कोयना धरण व्यवस्थापनाच्या विश्रामगृहांचे नुतनीकरण,धरणाकडे जाणा-या रस्त्यावर स्ट्रीट लाईट व विद्यूतीकरण विकास करणे,पर्यटकांना बसणेकरीता ठिकठिकाणी बसण्याची व्यवस्था करणे,रमणीय ठिकाण म्हणून लहान मुलांच्याकरीता वॉटर पार्क उभारणे, मानाईनगर येथे धरणाच्या शिवसागर जलाशयामध्ये बोटींग करणेकरीता बोटींग स्पॉट विकसित करणे,हुंबरळी रस्त्यावर शिवसागर जलाशयाचे निसर्गरम्य दर्शन होणेकरीता टेकडीच्या ठिकाणी पर्यटक स्पॉट उभारणे,बोपोली येथील पांडवकालीन मंदीराचे तसेच रासाठी येथील स्वयंभू महादेव मंदीराचे सुशोभिकरण करणे,ओझर्डे येथील निसर्गरम्य ओझडे तीन धारी धबधबा परिसर सुशोभिकरण व नुतनीकरण,जंगली जयगड व भैरवगड किल्लावरुन कोकण परिसराचे दर्शन होणेकरीता गडाचे ठिकाणी पर्यटक स्पॉट उभारणे,तसेच किल्ल्यांकडे जाणेकरीता ट्रेकिंग ट्रक बांधणे,घाटमाथा हे कोकण आणि कोयना विभागाचे कराड चिपळूण महामार्गावरील मध्यवर्ती ठिकाण असून घाटमाथा या ठिकाणी संपुर्ण कोकण दर्शन घडते या ठिकाणी पर्यटक स्पॉट उभारणे,या बाबींचा समावेश केला असून ही सर्व ठिकाणे विकसीत करणेकरीता आवश्यक निधीचे अंदाजपत्रके तयार करण्याचे काम सुरु आहे.लवकरच हा सविस्तर आराखडा तयार होवून तो जिल्हाधिकारी,सातारा यांचेमार्फत शासनाकडे सादर होईल. यावेळी बैठकांना सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या उपसंचालक श्रीमती विनिता व्यास,उपविभागीय अधिकारी श्रीरंग तांबे, तहसिलदार रामहरी भोसले,कोयना धरण व्यवस्थापनाचे कार्यकारी अभियंता कुमार पाटील,सहाययक वनसरंक्षक कोयना सुरेश साळुंखे यांच्यासह महसूल,ग्रामविकास, सार्वजनीक व जिल्हा परिषद बांधकाम विभाग, पाणी पुरवठा व वन्यजीव विभागांचे संबधित सर्व अधिकारी उपस्थित होते.
चौकट:- कोयना पर्यटन आराखडयासंदर्भात आमदार शंभूराज देसाई यांच्याबरोबर अधिका-यांचाही पुढाकार.
कोयना पर्यटन आराखडयामध्ये आमदार शंभूराज देसाई यांनी कोयना पर्यटन विकासाच्या दृष्टीने १६ ते १७ ठिकाणांचा समावेश केला आहे.ही ठिकाणे विकसीत करणेकरीता आराखडयातील आवश्यक अंदाजपत्रके तयार करणे,विविध गोष्टींच्या मान्यता घेणे,कागदपत्रांची जुळणी करणे याकरीता आमदार शंभूराज देसाई यांच्याबरोबर आराखडयाशी संबधित सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या उपसंचालक श्रीमती विनिता व्यास,उपविभागीय अधिकारी श्रीरंग तांबे,कोयना धरण व्यवस्थापनाचे कार्यकारी अभियंता कुमार पाटील या प्रमुख अधिका-यांसह सर्वच अधिकारी,कर्मचारी यांनी पुढाकार घेतला असल्याची चुणुक पाटण आणि कराड येथील बैठकामधून दिसून आली.


No comments:

Post a Comment