Thursday 1 November 2018

राष्ट्रीय महामार्गाच्या कामाला गती दया.आमदार शंभूराज देसाईंच्या अधिका-यांना बैठकीत सुचना. रस्त्यावर उतरुन अधिका-यांना बरोबर घेवून केली रस्त्याची प्रत्यक्ष पहाणी.




        कराड ते चिपळूण या राष्ट्रीय महामार्गावरील कराड ते पाटणच्या पुढील भागात राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरु करण्यात आले आहे.सदरचे काम खुप संथ गतीने सुरु असल्याने पाटण विधानसभा मतदारसंघातील पाडळी,सुपने पासून पाटणच्या पुढील हेळवाक पर्यंतच्या कामांस एल.ॲन्ड टी कंपनीने आणि काम करुन घेणा-या राष्ट्रीय महामार्गाच्या अधिका-यांनी गती दया व लवकरात लवकर या रस्त्याचे काम कसे पुर्ण करता येईल या उदीष्टाने काम करा अशा सक्त सुचना आमदार शंभूराज देसाईंनी राष्ट्रीय महामार्गाच्या व एल.ॲन्ड टी कंपनीच्या अधिका-यांना बैठकीत दिल्या.या कामांसंदर्भात बैठक घेण्यापुर्वी आमदार शंभूराज देसाईंनी स्वत: रस्त्यावर उतरुन रस्त्याच्या कामांमध्ये कुठे कुठे अडचणी आहेत यामध्ये कशा उपाययोजना करण्यात येतील याकरीता रस्त्याची प्रत्यक्ष पहाणी केली यावेळी कंपनीचे व शासकीय सर्व अधिकारी हे आमदार शंभूराज देसाई यांच्यासमवेत पहाणी दौ-यात उपस्थित होते.
        पाटण विश्रामगृह याठिकाणी हेळवाक कराड ते पाटण अशा ४८.४२ किमी लांबीच्या राष्ट्रीय महामार्ग रस्त्याचे कामाला गती देणेसंदर्भात आमदार शंभूराज देसाई यांचे अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय बैठक आयोजीत करण्यात आली होती.या बैठकीत व पहाणी दौ-यात वरीलप्रमाणे आमदार शंभूराज देसाईंनी सुचना दिल्या. यावेळी राष्ट्रीय महामार्गाचे कार्यकारी अभियंता व्ही.आर.कांडगावे,प्रातांधिकारी श्रीरंग तांबे,तहसिलदार रामहरी भोसले, गटविकास अधिकारी संजीव गायकवाड,वनसंरक्षक विलास काळे, पाटणचे पोलीस निरीक्षक यु.एस.भापकर, राष्ट्रीय महामार्गाचे उपअभियंता पन्हाळकर,एल.ॲन्ड टी कंपनीचे मुंबई कार्यालयाचे प्रमुख के.हरीकृष्णा,प्रोजेक्ट मॅनेजर बीपलाब घोष,विठ्ठल सावंत,पोरे,शामल शिंदे यांच्यासह एल.ॲन्ड टी कंपनीचे सर्व प्रमुख अधिकारी यांची प्रमुख उपस्थिती होती.
        आमदार शंभूराज देसाईंनी प्रारंभी आबदारवाडी येथून गिरेवाडी,मल्हारपेठ,नवसरवाडी,नाडे,पाटण येथील ठिकाणांची प्रत्यक्ष पहाणी केली व बैठकीमध्ये त्यांनी या रस्त्याच्या दोन्ही बाजुस जिथे जिथे गांवे आहेत त्याठिकाणी मोठमोठे गटर बांधकाम केले आहे तेथील ग्रामस्थांनी गावातून रस्त्यावर कसे यायचे हीच परिस्थिती रस्त्याला जोडून असणा-या शेतांची आहे.शेतक-यांनी शेतातील तसेच शिवारातील त्यांची वाहने,बैलगाडया कश्या बाहेर काढायच्या असा सवाल उपस्थित केला यावर कार्यकारी अभियंता यांनी रस्त्याच्या दोन्ही बाजुस जिथे जिथे गांवे आहेत, तिथे १०० ते २०० मीटर रस्ता करुन देण्याचे या कामांमध्ये समाविष्ठ करण्यात आले आहे. शेतकऱ्यांना ज्याठिकाणी शिवारातून रस्त्यांवर येण्याकरीता रस्ता हवा आहे तसा सर्व्हे आम्ही विभागामार्फत करु आणि मागणीप्रमाणे रस्ता करुन देवू असेही त्यांनी सांगितले त्यानंतर आमदार शंभूराज देसाईंनी कोयना तीरावरील ३२ उपसा जलसिंचन योजना तसेच अनेक गांवाच्या पिण्याच्या पाण्याच्या योजना या दक्षिणेकडून उत्तरेकडील गांवामध्ये येत आहेत त्या योजनांच्या पाईपलाईन रस्त्याच्या कामांतून पलीकडेच्या बाजूस काढून देणे व दुरुस्ती करुन देणेसंदर्भात मी पत्राव्दारे सुरवातीसच मागणी केली होती यावर राष्ट्रीय महामार्गाने आपले पत्रातील मागणीवरुनच या मार्गावरील उपसा जलसिंचन व पिण्याच्या पाण्याच्या योजना या पुरर्वत रस्त्याच्या पलीकडे काढून देण्यास मान्यता दिली आहे. अशी मान्यता यापुर्वी कधीही आणि कुठेही देण्यात आली नाही असे सांगून अधिका-यांनी त्यानुसार आम्ही कामेही सुरु केली आहेत तर काही ठिकाणी सुरु करीत असल्याचे सांगितले. तसेच गांवाच्या ठिकाणी २२ मीटरने तर गांवाबाहेर २४ मीटरने रस्ता करण्यात येणार असून रुंदीकरणासाठी शेतक-यांच्या संमती घेण्याची प्रक्रिया सुरु आहेत असे अधिका-यांनी सांगितल्यानंतर रस्त्याच्या रुंदीकरणामध्ये ३२ गांवामध्ये ३६ किमी अंतरात १३ हेक्टर जमिनक्षेत्र भुसंपादन करावे लागत असून भूसंपादन कराव्या लागणा-या शेतक-यांना रेडीरेकनरच्या चारपट दराने या जमिनींचा भाव देण्यात यावा,भूमिसंपादनाची प्रक्रिया लवकरात लवकर महसूल विभागांनी पुर्ण करावी असे आमदार शंभूराज देसाईंनी यावेळी अधिका-यांना सुचित केले.सन २०१९ संपण्याच्या अगोदर हेळवाक- पाटण ते कराड या रस्त्याचे काम पुर्ण करण्याचे शासनाचे उदीष्ठ असून शासनाच्या उदीष्ठाप्रमाणे एल.ॲन्ड टी कंपनीने या कामांस गती दयावी जिथे यंत्रणा कमी पडत आहे त्याठिकाणी यंत्रणा वाढविण्यात यावी. रस्त्याच्या कडेला शेतकऱ्यांनी खाजगी पाईपलाईन केल्या आहेत अशा पाईपलाईनची नासधुस न करता त्यांच्या पाईपलाईन योग्यरित्या कंपनीने शिफटींग करुन दयाव्यात अशी अनेक शेतक-यांनी मागणी केली आहे त्याप्रमाणे याची प्रत्यक्ष पहाणी कंपनीने व महामार्गाच्या अधिकाऱ्यांनी करावी व शेतकऱ्यांना नुकसान होणार नाही याची काळजी घेत त्यांच्या पाईपलाईन शिफटींग करुन दयाव्यात असेही आमदार शंभूराज देसाईंनी यावेळी अधिकाऱ्यांना सांगितले.
चौकट:- आता कामाला चांगली गती येईल ग्रामस्थ शेतक-यांच्या प्रतिक्रिया.
        आमदार शंभूराज देसाई हे कराड चिपळुण महामार्गावरील रस्त्यांच्या कामांची प्रत्यक्ष रस्त्यावर उतरुन सर्व शासकीय व कंपनीच्या अधिकाऱ्यांना घेवून पहाणी करीत असल्याचे आणि रस्त्याच्या कामांमध्ये कुठे कुठे अडीअडचणी आहेत हे अधिका-यांना दाखवित असल्याचे पाहून आता कामाला चांगली गती येईल अशा प्रतिक्रिया रस्त्यावरील अनेक गांवातील ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांनी बैठकीपुर्वी व्यक्त केल्याचे एैकावयास मिळाले.

No comments:

Post a Comment