Wednesday 31 July 2019

आपत्ती काळात अलर्ट रहा, अलर्ट आमदार शंभूराज देसाईंच्या अधिकाऱ्यांना सुचना. संभाव्य पुरपरिस्थितीची अधिकाऱ्यांसमवेत केली पहाणी.






           दौलतनगर दि. 31: गेले दोन तीन दिवस पाटण तालुक्यात मुसळधार कोसळणाऱ्या पावसामुळे तालुक्यातील कोयना धरणात पाण्याची आवक मोठया प्रमाणात होत आहे.आज सकाळपर्यंत कोयना धरणात ७४.८९ टीमसी एवढा पाणीसाठा झाला आहे तर तालुक्यातील इतर सर्व धरणे ही पुर्ण क्षमतेने भरुन ओंसडून वाहत असल्याने अनेक ठिकाणी नदीच्या पाण्यामुळे पुल पाण्याखाली जाण्याचे प्रकार घडत असल्याने वाहतूक बंद होत आहेत तर घाटामध्ये डोंगरामधून मोठया प्रमाणात माती रस्त्यावर येत असल्याने वाहतूकीस खोंळबा होत आहे.त्यामुळे या आपत्ती काळात तालुकास्तरीय सर्व अधिकाऱ्यांनी अलर्ट रहावे व कुठे अशा प्रकारच्या समस्या निर्माण झाल्या तर त्या समस्या तात्काळ दुर कराव्यात अशा सक्त सुचना अलर्ट आमदार शंभूराज देसाईंनी तालुकास्तरीय सर्व अधिकाऱ्यांना दिल्या.
              आज तहसिल कार्यालयात आमदार शंभूराज देसाई यांचे अध्यक्षतेखाली आपत्ती व्यवस्थापनाची बैठक आयोजीत करण्यात आली होती.बैठकीपुर्वीच आमदार शंभूराज देसाईंनी कोयना धरणातून पाणी सोडल्यास निर्माण होणाऱ्या संभाव्य पुरपरिस्थितीची पहाणी मुळगांव पुलापासून केली यावेळी त्यांच्यासोबत पाटणचे उपविभागीय अधिकारी श्रीरंग तांबे,तहसिलदार रामहरी भोसले,उपविभागीय पोलीस अधिकारी अंगद जाधवर,पाटण पोलिस निरिक्षक श्रीमती तृप्ती सोनवणे,गट विकास अधिकारी मीना साळुंखे,सार्वजनिक बांधकाम व जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे सर्व शाखा अभियंता हे शासकीय अधिकारी उपस्थित होते.पहाणी दौरा झालेनंतर आमदार शंभूराज देसाई यांचे अध्यक्षतेखाली तहसिल कार्यालयात तालुकास्तरीय सर्व अधिकाऱ्यांची बैठक झाली या बैठकीत आपत्ती काळात करावयाच्या उपाय योजनांच्या अनुषंगाने आमदार शंभूराज देसाईंनी तालुकास्तरीय सर्व अधिकाऱ्यांना सतर्क राहण्याच्या सुचना दिल्या. या बैठकीमध्ये महसूल,पोलीस यंत्रणा यांच्यासह पाटबंधारे,बांधकाम विभाग,कृषी,पाणी पुरवठा,सार्वजनीक आरोग्य, शिक्षण, वीज वितरण, वन्यजीव विभागाचे सर्व अधिकारी उपस्थित होते.
               सुरवातीस आमदार शंभूराज देसाईंनी त्यांच्याकडे आलेल्या तालुक्यातील विविध भागातील तक्रारी उपस्थित अधिकाऱ्यांच्या निर्दशनास आणून दिल्या.यामध्ये महिंद धरण पुर्ण भरल्यामुळे तसेच वांग मराठवाडी धरणामध्ये चांगला पाणीसाठा झाल्यामुळे वांग नदीपात्रात पाणी वाढले असून खळे व काढणे येथील देान्ही पुल पाण्याखाली गेले आहेत त्यामुळे येथील वाहतूक बंद झाली आहे. मी दुपारी त्याठिकाणी प्रत्यक्ष भेट देणार आहे तसेच कालच सडावाघापूर घाटात डोंगरातील माती कोसळून रस्ता बंद झाला होता.ढेबेवाडी घाटातही रस्त्यावर माती आल्याने वाहतूकीस अडथळा निर्माण झाला होता.नाव येथील रस्त्यावर माती आली आहे.वाहतूकीच्या दृष्टीने अशा समस्या निर्माण झाल्याने तात्काळ यावर बांधकाम विभागाने कार्यवाही करावी असे सांगत त्यांनी पाटण येथील एसटी स्टॅन्ड परीसराचा आढावा घेतला यामध्ये स्टॅन्ड परीसरातील कामाचीही माहिती घेतली यावेळी उपस्थिती अधिकाऱ्यांनी ओढयाचे पाणी स्टॅन्ड परीसरात येत असल्याचे निदर्शनास आणून दिल्यानंतर येथील अतिक्रमणामुळे ही परिस्थिती निर्माण होत असल्याने सदरची अतिक्रमणे तात्काळ हटविण्याच्या सुचना प्रांताधिकारी,पोलीस यंत्रणा व राष्ट्रीय महामार्गाचे उपअभियंतांना दिल्या.तालुक्यातील निर्लखित झालेल्या शाळांमध्ये अतिवृष्टीच्या काळात विद्यार्थी बसत नाहीत ना याची खात्री गटविकास अधिकारी व शिक्षणाधिकारी यांनी करावी.आरोग्य विभागाच्या आढाव्याप्रसंगी अधिकाऱ्यांनी तालुक्यामध्ये वैद्यकीय अधिकाऱ्यांची रिक्त पदे आहेत ती भरणे गरजेचे आहेत असे सांगितल्यानंतर तालुक्यातील रिक्त ठिकाणी वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या तात्काळ करण्याकरीता जिल्हाधिकारी यांची उद्याच भेट घेणार असल्याचे सांगितले.तर वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना थोडा पाऊस झाला की वीज जाण्याचे प्रकार वारंवार घडत आहेत त्यावर आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात कराड चिपळूण रस्त्याचे काम धिम्यागतीने सुरु असून या कामांस गती देवून प्रवाशांची गैरसोय दुर करावी अशा सुचना राष्ट्रीय महामार्गाचे उपअभियंता पन्हाळकर यांना दिल्या.तसेच संगमनगर धक्का ते घाटमाथा येथील रस्त्याची मोठया प्रमाणात दुरावस्था झाली आहे दुरुस्तीच्या कामांतून सदर रस्त्याचे काम तात्काळ सुरु करावे तर खळे याठिकाणी मोठा पुल उभारणे गरजेचे आहे याकरीता नाबार्ड योजनेतून हा पुल प्रस्तावित करावा अशा सुचना त्यांनी दुरध्वनीवरुन बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता यांना दिल्या. यासंदर्भात सार्वजनीक बांधकाममंत्री ना.चंद्रकांतदादा पाटील यांचेशी मी स्वत: बोलेन असेही त्यांनी यावेळी सांगितले.सध्या कोयना धरणात ७४.८९ टीमसी एवढा पाणीसाठा असून सरासरी प्रतिरोज ५० हजार क्युसेक्स पाण्याची आवक होत असल्याने एकदम पाणी सोडण्याएैवजी २ हजार क्युसेक्स पॉवर हाऊसच्या माध्यमातून पाणी सोडण्याचे नियोजन करावे अशा सुचनाही आमदार शंभूराज देसाईंनी कोयना धरण व्यवस्थापनचे कार्यकारी अभियंता कुमार पाटील यांना केल्या व आपत्ती काळात तालुकास्तरीय अधिकाऱ्यांकडून कोणतीही हयगय होवू नये याकरीता सतर्क राहण्याच्या सुचनाही त्यांनी शेवठी बैठकीत केल्या.तसेच सांगवड येथील मंदीराच्या मागील बाजूचा भाग कोयना नदीतील पाण्यामुळे खचला असून येथील पुरसंरक्षक भिंतीच्या कामांस लवकर निधी उपलब्ध करुन दयावा याकरीता त्यांनी तात्काळ जलसंपदा मंत्री यांच्याशी संपर्क साधून येथील परिस्थिती यावेळी त्यांचे निदर्शनास आणून दिली.
चौकट:- आजारातून बाहेर येताच प्रत्यक्षात कामाला सुरुवात.
              गेली आठ दिवस आजारी असणारे आमदार शंभूराज देसाई आजारातून बाहेर येताच त्यांनी तात्काळ तालुकास्तरीय सर्व अधिकाऱ्यांची आपत्ती व्यवस्थापनाची बैठक घेवून तसेच संभाव्य पुरपरिस्थितीची पहाणी दौरा करुन त्यांनी कामांला प्रत्यक्षात सुरुवात देखील केली असल्याचे आज त्यांच्या कामकाजावरुन दिसून आले.


Sunday 28 July 2019

लोकनेते बाळासाहेब देसाई सह. साखर कारखान्यात युवा नेते यशराज देसाई यांचे हस्ते रोलरचे पुजन. शेतकरी बंधूनी कार्यक्षेत्रातील जास्तीत जास्त ऊस गाळपास देण्याचे आवाहन.




दौलतनगर दि. 28 :- गतवर्षीच्या गळीत हंगामापेक्षा महाराष्ट्रामध्ये सध्या ऊसाचे प्रमाण जास्त असून साखरेचे भाव यंदाच्या वर्षीही अनिश्चित असल्याने अनेक कारखान्यांकडे मोठया प्रमाणांत साखरेचे साठे पडून आहेत.आपला लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखाना हा महाराष्ट्रातील असा कारखाना आहे जो अडचणीच्या काळातही कारखान्याचे मार्गदर्शक उत्कृष्ट संसदपटु आमदार शंभूराज देसाईसाहेब यांचे मार्गदर्शनाखाली साखर उद्योगात तग धरुन आहे.कारखान्यांने गतवर्षीचा गळीत हंगाम या पुर्वीच्या सर्वच गळीत हंगामाप्रमाणे चांगल्या प्रकारे पुर्ण केला आहे.चालू गळीत हंगामातही कार्यक्षेत्रातील जास्तीत जास्त ऊसाचे गाळप करण्याचे उद्दीष्ट कारखान्याने ठेवले असून शेतकरी बंधूनी कार्यक्षेत्रातील जास्तीत जास्त ऊस आपले कारखान्यांस गाळपास दयावा व कारखाना व्यवस्थापनानेही नियोजनबध्द काम करुन सन 2019-20 चा गळीत हंगाम प्रतिवर्षाप्रमाणे यशस्वी करावा असे आवाहन युवा नेते यशराज देसाई यांनी केले.
            दौलतनगर ता.पाटण येथील लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्यात सन 2019-20 चे गळीत हंगामाकरीता रोलरचे पूजन युवा नेते यशराज देसाई यांचे शुभहस्ते करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते.प्रारंभी रोलरचे पुजन झालेनंतर यशराज देसाई यांनी कारखान्यातील सर्व कामकाजांची पदाधिकारी यांचेसोबत बारकाईने पहाणी केली.यावेळी कारखान्याचे चेअरमन अशोकराव पाटील,संचालक अशोकराव डिगे,आनंदराव चव्हाण,संपतराव सत्रे, बबनराव भिसे,विकास गिरीगोसावी, सेामनाथ खामकर,पांडूरंग नलवडे,गजानन जाधव, व्यकंटराव पाटील,राजेंद्र गुरव, बाळासाहेब शेजवळ, सौ.विश्रांती देशमुख,सौ.दिपाली पाटील या संचालक मंडळासह प्रकाशराव जाधव,शिवदौलत बँकेचे व्हाईस चेअरमन संजय देशमुख, विजयराव देशमुख, तुकाराम जाधव,एकनाथ जाधव हे प्रमुख पदाधिकारी तसेच कारखान्याचे कार्यकारी संचालक सुहास देसाई यांची उपस्थिती होती.
         याप्रसंगी बोलताना यशराज देसाई पुढे म्हणाले, लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे मार्गदर्शक उत्कृष्ट संसदपटु आमदार शंभूराज देसाईसाहेब यांचे मार्गदर्शनाखाली आपला लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखाना साखर उद्योग अडचणीत असताना देखील चांगल्या प्रकारे सुरु आहे. कारखान्याची क्षमता कमी असूनही तालुक्याच्या कार्यक्षेत्रातील जास्तीत जास्त ऊस गाळप करण्याचे आणि गाळप केलेल्या ऊसाला इतर मोठया क्षमतेच्या कारखान्यांच्या बरोबरीने ऊसदर देण्याचा आपण नेहमीच प्रयत्न करीत आहोत.यावर्षी कारखान्याच्या कार्यक्षेत्रामध्ये ऊसाची उपलब्धता चांगली राहणार असून शेतकऱ्यांचा आर्थिक विकासाचा कणा असलेल्या साखर कारखानदारीपुढे आज सातत्याने कोसळणाऱ्या साखर दरामुळे आव्हानात्मक परिस्थिती निर्माण झालेली असतानादेखील यावर मात करुन यंदाचा गळीत हंगाम यशस्वी करणेकरीता सर्वांच्या सहकार्याची गरज आहे.उत्कृष्ट संसदपटु आमदार शंभूराज देसाईसाहेब यांचे मार्गदर्शनाखाली प्रतिवर्षाप्रमाणे सन 2019-20 च्या ऊस गाळप हंगामाकरीता जादा ऊस गाळपाच्यादृष्टीने कार्यक्षेत्रातील जास्तीत जास्त ऊसाचे गाळप करण्याचे उद्दीष्ट व नियोजन कारखाना व्यवस्थापनाने केले आहे.त्या नियोजनाप्रमाणे कारखान्यातील सर्व अधिकारी व कामगार यांनी नियोजनबध्द काम करावे.तर कारखाना कार्यक्षेत्रातील ऊस पिकवणाऱ्या सभासद तसेच बिगर सभासद शेतकऱ्यांनी आपला पिकवलेला संपुर्ण ऊस आपले देसाई कारखान्याला देऊन सहकार्य करावे व येणारा गळीत हंगाम यशस्वी करावा,असे आवाहनही त्यांनी शेवटी बोलताना केले. यावेळी कारखान्याचे सर्व खातेप्रमुख, अधिकारी, कर्मचारी व कामगार वर्ग बहुसंख्येने उपस्थित होते.



Monday 15 July 2019

लोकनेते बाळासाहेब देसाई उद्योग व शिक्षण समुहाचेवतीने अरुणराव दौलतराव देसाई यांना भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण.





दौलतनगर दि.१5: महाराष्ट्राचे पोलादी पुरुष लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे सुपूत्र व पाटणचे शिवसेनेचे आमदार शंभूराज देसाई यांचे चुलते अरुणराव दौलतराव देसाई यांचे शुक्रवार दि.१२ जुलै,२०१९ रोजी पहाटे कोल्हापुर याठिकाणी वयाच्या ७३ व्या वर्षी अल्पशा आजाराने दुख:द निधन झाले. कै.अरुणराव दौलतराव देसाई यांना लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी उद्योग व शिक्षण समुहाचेवतीने कारखाना कार्यस्थळ,दौलतनगर(मरळी),ता.पाटण या ठिकाणी शोकसभा घेण्यात येवून भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.
             महाराष्ट्राचे पोलादी पुरुष लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे सुपूत्र अरुणराव दौलतराव देसाई हे उच्चशिक्षित होते.परदेशात आपले शिक्षण पुर्ण करुन त्यांनी कोल्हापूर या ठिकाणी आपला स्वत:चा व्यवसाय सुरु केला होता.सध्या त्यांची दोन मुले कृष्णराज व पृथ्वीराज हा व्यवसाय सांभाळत आहेत.ते सुरवातीपासून कोल्हापुर याठिकाणीच स्थायिक होते.गतवर्षी आपल्या मातोश्री कै.सौ.वत्सलादेवी देसाई यांचे नावाने मरळी ता.पाटण येथे सुरु असलेल्या मरळी हायस्कुलच्या कार्यक्रमानिमित्त कै.अरुणराव देसाई हे दौलतनगर (मरळी) याठिकाणी आल्यानंतर त्यांनी आपले पुतणे आमदार शंभूराज देसाई यांचे राजकीय,सामाजीक,शैक्षणिक कामाचे विशेष कौतुक करत आमदार शंभूराज देसाई यांच्या प्रयत्नामुळे महाराष्ट्राचे पोलादी नेतृत्व आदरणीय लोकनेते बाळासाहेब देसाईसाहेब यांचा युतीच्या राज्य शासनाने महाराष्ट्राचे सर्वोच्च सभागह असणाऱ्या विधिमंडळात दि.१० व ११ ऑगस्ट रोजी विशेष गौरवाचा प्रस्ताव मांडून लोकनेते साहेबांचा यथोचित असा विशेष गुणगौरव केला होता तसेच आदरणीय साहेबांच्या उल्लेखनीय आणि अतुलनीय कार्याला उजाळाही दिला होता ही बाब आमच्याकरीता अभिमानास्पद आणि कौतुकास्पद असल्याचे सांगून लोकनेते साहेबांच्या आचार विचारांची जपणूक त्यांचा नातू आणि माझे पुतणे चिरंजीव शंभूराज हे मोठया जबाबदारीने आदरणीय साहेबांच्या कर्म आणि जन्मभूमित करीत आहेत ही बाब कौतुकास्पद असल्याचे सांगून लोकनेते साहेबांच्या कार्याला संपुर्ण महाराष्ट्रामध्ये विधानसभेतील विशेष गौरव प्रस्तावामुळे उजाळा देण्याचे काम युतीच्या शासनाने आणि आमदार शंभूराज यांनी केले याचा मला सर्वात जास्त आनंद असल्याचे गौरवोद्गारही त्यांनी या कार्यक्रमात काढले होते. मनमिळावू स्वभावाचे कै.अरुणराव देसाई यांच्या जाण्याने देसाई कुटुंबियांचा आधारवड हरपला असून त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी उद्योग व  शिक्षण समुहाचेवतीने दौलतनगर ता.पाटण येथे दि.13 रोजी शोकसभा आयोजीत करण्यात आली होती या शोकसभेमध्ये कारखान्याचे चेअरमन अशोकराव पाटील यांच्यासह कै.अरुणराव देसाई यांना जवळून पाहिलेल्या विविध संस्थाच्या पदाधिकाऱ्यांनी भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण केली. याप्रसंगी लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी उद्योग व‍ शिक्षण समुहातील विविध संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, अधिकारी,कर्मचारी,विद्यार्थी-विद्यार्थीनी यांची मोठया संख्येने उपस्थिती होती.




Friday 12 July 2019

स्व.शिवाजीराव देसाई (आबासाहेब) यांचे पुण्यतिथीनिमित्त गृहराज्यमंत्री ना.दिपक केसरकर,आमदार शंभूराज देसाईंनी केले विनम्र अभिवादन.



                            

          दौलतनगर दि. १2: लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक चेअरमन स्व.शिवाजीराव देसाई (आबासाहेब) यांचे ३3 व्या पुण्यतिथीनिमित्त महाराष्ट्र राज्याचे गृह (ग्रामीण),वित्त व नियोजन राज्यमंत्री ना.दिपक केसरकर व लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी उद्योग व शिक्षण समुहाचे मार्गदर्शक उत्कृष्ट संसदपटु आमदार शंभूराज देसाई यांनी स्व.शिवाजीराव देसाई (आबासाहेब) यांचे पुर्णाकृती पुतळयास व समाधीस्थळास पुष्पचक्र अर्पण करुन विनम्र अभिवादन केले.
           लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक चेअरमन स्व.शिवाजीराव देसाई (आबासाहेब) यांचा पुण्यतिथी कार्यक्रम प्रतिवर्षी दि.१२ जुलै रोजी लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी उद्योग व शिक्षण समुहाच्या वतीने दौलतनगर ता.पाटण येथे आयोजीत करण्यात येतो.यंदाच्या पुण्यतिथी कार्यक्रमास महाराष्ट्र राज्याचे गृह (ग्रामीण),वित्त व नियोजन राज्यमंत्री ना.दिपक केसरकर यांची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी प्रथमत: गृहराज्यमंत्री ना.दिपक केसरकर यांनी लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे पुर्णाकृती पुतळयास पुष्पचक्र अर्पण करुन विनम्र अभिवादन केले. त्यानंतर स्व.शिवाजीराव देसाई (आबासाहेब) यांचे पुण्यतिथीनिमित्त पुर्णाकृती पुतळयास व समाधीस्थळास पुष्पचक्र अर्पण करुन विनम्र अभिवादन केले.यावेळी आमदार शंभूराज देसाई,जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, प्रातांधिकारी श्रीरंग तांबे,तहसिलदार रामहरी भोसले,गटविकास अधिकारी मीना साळुंखे,उपविभागीय पोलीस अधिकारी नवनाथ ढवळे,लोकनेते बाळासाहेब देसाई कारखान्याचे चेअरमन अशोकराव पाटील,माजी चेअरमन डॉ.दिलीपराव चव्हाण,व्हाईस चेअरमन राजाराम पाटील,पंचायत समिती माजी विरोधी पक्षनेते ॲड.दिपक जाधव यांच्यासह लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी उद्योग व शिक्षण समुहातील प्रमुख पदाधिकारी,कार्यकर्ते यांची उपस्थिती होती.पुण्यतिथी निमित्त प्रतिवर्षाप्रमाणे पाटण विधानसभा मतदारसंघातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेतील प्रत्येक केंद्रात प्रथम,व्दितीय व तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांना बक्षीस,प्रशस्तीपत्रक व गौरवचिन्ह देण्यात येवून पाटण मतदारसंघातील मुकबधीर विद्यार्थ्यांना शालेय गणवेश वाटप करण्यात आले.
चौकट:- लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे सुपूत्र कै.अरुणराव देसाई यांचे दु:खद निधनाने पुण्यतिथीचा   

  कार्यक्रम रद्द.
              महाराष्ट्राचे पोलादी पुरुष लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे सुपूत्र व पाटणचे आमदार शंभूराज देसाई यांचे सख्ये चुलते अरुणराव दौलतराव उर्फ बाळासाहेब देसाई यांचे कोल्हापुर याठिकाणी आज अल्पशा आजाराने दु:खद निधन झालेने स्व.शिवाजीराव देसाई (आबासाहेब) यांचा आयोजीत पुण्यतिथी कार्यक्रम त्यांचे पुर्णाकृती पुतळयास व समाधीस विनम्र अभिवादन व कै.अरुणराव देसाई यांना गृहराज्यमंत्री ना.दिपक केसरकर यांनी श्रध्दाजंली वाहून रद्द करण्यात आला.

Wednesday 10 July 2019

तारळी धरणाच्या गळतीची आमदार शंभूराज देसाईंकडून पहाणी. धरण सुरक्षित परंतू गळतीचे काम पावसाळा संपताच पुर्ण करा. धरणस्थळावरुन मुख्य अभियंता व अधीक्षक अभियंता यांना दुरध्वनीवरुन दिल्या सुचना.




                            

            दौलतनगर दि.१०: पाटण तालुक्यातील तारळी मध्यम धरण प्रकल्पाच्या मुख्य भिंतीतून पाण्याचा पाझर होत आहे आणि तो पाझर मर्यादीत असताना गतवर्षीचे फोटो सोशल मिडीयावर टाकून धरणाला मोठया प्रमाणात गळती लागली आहे असे सोशल मिडीयावर तसेच वृत्तपत्रातून येत असल्याने मतदारसंघाचे आमदार शंभूराज देसाईंनी काल धरणाच्या अधिकाऱ्यांसमवेत तारळी धरणाच्या भिंतीची प्रत्यक्ष पहाणी केली.मागील वर्षीच या गळतीसंदर्भात धरणाचे अधिक्षक अभियंता यांचेसमवेत धरणाच्या मुख्य भिंतीची त्यांनी पहाणी केली होती.त्याचवेळी गळतीचे काम पुर्ण करुन घ्या अशा सक्त सुचना त्यांनी केल्या होत्या त्यानुसार धरण माथापासून निरीक्षण गॅलरी व निरीक्षण गॅलरीपासून पाया गॅलरीपर्यंतचे काम विभागाकडून करण्यात आले असल्याने गळती कमी झाली असून गळतीचे पुर्ण काम हे पावसाळा संपताच पुर्ण करुन घ्यावे अशा सक्त सुचना आमदार शंभूराज देसाईंनी धरणस्थळावरुन मुख्य अभियंता व अधिक्षक अभियंता तसेच याठिकाणी उपस्थित असणाऱ्या कार्यकारी अभियंता यांना दिल्या.
              तारळी मध्यम धरण प्रकल्पाच्या मुख्य भिंतीला मोठया प्रमाणात गळती असल्याच्या बातम्या सोशल मिडीया व वृत्तपत्रातून आल्यानंतर आमदार शंभूराज देसाईंनी तात्काळ या धरणाचे कार्यकारी अभियंता यांना धरणस्थळावर बोलवून धरणाच्या भिंतीची तसेच पाण्याची गळतीची प्रत्यक्ष पहाणी केली.यावेळी तारळी धरण प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता गायकवाड व त्यांच्या विभागांच्या अधिकारी,कर्मचारी तसेच तारळे विभागातील पदाधिकारी यांचीही यावेळी उपस्थिती होती.
                 यावेळी आमदार शंभूराज देसाईंनी मागील वर्षीच या गळतीसंदर्भात धरणाचे अधिक्षक अभियंता यांचेसमवेत धरणाच्या मुख्य भिंतीची त्यांनी पहाणी केली होती यावेळी हे गळतीचे काम पुर्ण करुन घेण्याच्या सुचना अधीक्षक अभियंता यांना दिल्या होत्या त्या कामांसंदर्भात आमदार देसाईंनी उपस्थित कार्यकारी अभियंता यांना विचारणा केली असता गतवर्षी धरण माथापासून निरीक्षण गॅलरी व निरीक्षण गॅलरीपासून पाया गॅलरीपर्यंतचे काम विभागाकडून करण्यात आले असल्याने गळती कमी झाली आहे धरणात सध्या ४३ टक्के पाणी साठा आहे. यंदाच्या पावसाळयानंतर उर्वरीत राहिलेल्या गळतीचे काम पुर्ण करण्याचे विभागाने नियोजन केले आहे त्यानुसार विभागामार्फत हे काम पुर्ण करुन घेण्यात येईल. असे सांगितल्यानंतर आमदार शंभूराज देसाईंनी धरणस्थळावरुनच धरणाचे मुख्य अभियंता व अधिक्षक अभियंता विजय घोगरे यांना दुरध्वनीवरुन तारळी धरणाच्या गळतीचे उर्वरीत राहिलेले काम यंदाचा पावसाळा संपताच पुर्ण करुन घ्यावे अशा सुचना दिल्या.

स्व.शिवाजीराव देसाई (आबासाहेब) यांचे ३३ व्या पुण्यतिथीनिमित्त दौलतनगर येथे १२ जुलै रोजी विविध कार्यक्रम. गृह (ग्रामीण) व वित्त व नियोजन राज्यमंत्री ना.दिपक केसरकर यांचे हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार.


                            

            दौलतनगर दि. १०:  लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक चेअरमन स्व.शिवाजीराव देसाई (आबासाहेब) यांचा ३3 वा पुण्यतिथी कार्यक्रम प्रतिवर्षाप्रमाणे शुक्रवार दि.१२ जुलै,२०१9 रोजी सकाळी १०.०० वा. लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी उद्योग व शिक्षण समुहाच्या वतीने दौलतनगर ता.पाटण येथे महाराष्ट्र दौलत लोकनेते बाळासाहेब देसाई शताब्दी स्मारकामध्ये विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात येणार असून स्व.शिवाजीराव देसाई यांचे पुण्यतिथीनिमित्ताने प्रतिवर्षाप्रमाणे पाटण मतदारसंघातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार महाराष्ट्र राज्याचे गृह (ग्रामीण), वित्त व नियोजन राज्यमंत्री ना.दिपक केसरकर यांचे हस्ते व लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी उद्योग व शिक्षण समुहाचे मार्गदर्शक उत्कृष्ट संसदपटु आमदार शंभूराज देसाई यांचे अध्यक्षतेखाली आणि मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रविराज देसाई यांचे प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार असल्याची माहिती कारखान्याचे चेअरमन अशोकराव पाटील यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे दिली आहे.
            दौलतनगर ता.पाटण येथील लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी उद्योग व शिक्षण समुहाच्या वतीने कारखान्याचे संस्थापक चेअरमन स्व.शिवाजीराव देसाई (आबासाहेब) यांचा पुण्यतिथी कार्यक्रम प्रतिवर्षी कारखाना कार्यस्थळावर साजरा करण्यात येतो.प्रतिवर्षाप्रमाणे यंदाच्या वर्षी स्व.शिवाजीराव देसाई (आबासाहेब) यांचा ३3 वा पुण्यतिथी कार्यक्रम शुक्रवार दि.१२ जुलै, २०१9 रोजी सकाळी १०.०० वा.दौलतनगर ता.पाटण येथील महाराष्ट्र दौलत लोकनेते बाळासाहेब देसाई शताब्दी स्मारकामध्ये आयोजीत केला आहे. स्व.शिवाजीराव देसाई यांचे पुण्यतिथीनिमित्ताने स्व.(आबासाहेब) यांचे पुर्णाकृती पुतळयासमोर भजनाचा कार्यक्रम होणार असून या कार्यक्रमानंतर सकाळी १०.०० वा महाराष्ट्र राज्याचे गृह (ग्रामीण), वित्त व नियोजन राज्यमंत्री ना.दिपक केसरकर,उत्कृष्ट संसदपटु आमदार शंभूराज देसाई व रविराज देसाई यांचे प्रमुख उपस्थितीत लोकनेते बाळासाहेब देसाई व स्व.शिवाजीराव देसाई (आबासाहेब) यांचे पुर्णाकृती पुतळयास आणि समाधी स्थळास पुष्पाजंली अर्पण करुन विनम्र अभिवादन करण्यात येणार आहे.प्रतिवर्षाप्रमाणे पाटण विधानसभा मतदारसंघातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेतील प्रत्येक केंद्रात प्रथम, व्दितीय व तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांना बक्षीस, प्रशस्तीपत्रक व गौरवचिन्ह देवून या विद्यार्थ्यांचा सत्कार आणि पाटण मतदारसंघातील मुकबधीर विद्यार्थ्यांना शालेय गणवेश वाटप कार्यक्रम गृह (ग्रामीण), वित्त व नियोजन राज्यमंत्री ना.दिपक केसरकर यांचे हस्ते व उत्कृष्ट संसदपटु आमदार शंभूराज देसाई यांचे अध्यक्षतेखाली होणार आहे.या कार्यक्रमास कारखान्याचे सभासद,हितचिंतक,पालकवर्ग,विद्यार्थी व कार्यकर्ते या सर्वांनी सकाळी १०.०० वा दौलतनगर ता.पाटण येथील महाराष्ट्र दौलत लोकनेते बाळासाहेब देसाई शताब्दी स्मारक येथे मोठया संख्येने उपस्थित रहावे असे आवाहनही कारखान्याचे चेअरमन अशोकराव पाटील यांनी पत्रकात केले आहे.
चौकट:- पुण्यतिथीनिमित्त 12 जुलैला पाटण तालुका कराड मित्रमंडळाचा कराडला सातवा वर्धापन दिन कार्यक्रम.
स्व.शिवाजीराव देसाई (आबासाहेब) यांचे 33 व्या पुण्यतिथी कार्यक्रमाच्या निमित्ताने प्रतिवर्षाप्रमाणे पुण्यतिथी कार्यक्रम व कराड येथे पाटण तालुक्यातील रहिवाशी नागरीकांकरीता स्थापन केलेल्या पाटण तालुका मित्रमंडळाचा सातवा वर्धापन दिन व गुणवंत पाल्य पुरस्कार सोहळा असा संयुक्त कार्यक्रम उत्कृष्ट संसदपटु आमदार शंभूराज देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत गुरुवार दि.12 जुलै,2019 रोजी प्रतिवर्षाप्रमाणे सायं.06 वा.अक्षता मंगल कार्यालय, मलकापुर,कराड या ठिकाणी आयोजित करण्यात आला आहे.

Thursday 4 July 2019

आमदार शंभूराज देसाईंच्या माध्यमातून तालुक्यातील ११४ गांवात ५०९ गंजलेले विद्यूत पोल बदलण्याच्या कामांस सुरुवात. जिल्हा‍ नियोजनच्या आराखडयातून विद्यूत विकास योजनेतंर्गत आणला ५५ लाखांचा निधी.



              पाटण तालुक्यातील डोंगरी व दुर्गम भागातील विद्यूत वाहक करणारे वीजेचे पोल मोठया प्रमाणात गंजलेले असल्याने सदरचे पोल तातडीने बदलणेकरीता आमदार शंभूराज देसाईंनी जिल्हा नियोजन समितीच्या आराखडयातून विद्यूत विकास योजनेतंर्गत एकूण ५५ लाख १ हजार २६८ रुपयांचा निधी मंजुर करुन आणला असून आमदार शंभूराज देसाईंच्या माध्यमातून पाटण तालुक्यातील ११४ गांवात ५०९ ठिकाणचे गंजलेले विद्यूत पोल बदलण्याच्या कामांस कार्यकारी अभियंता,महाराष्ट्र राज्य विद्यूत वितरण कंपनी मर्या. विभाग कराड या कार्यालयामार्फत गतीने सुरुवात करण्यात आली आहे. लवकरात लवकर या ११४ गावातील सुचविण्यात आलेल्या ५०९ विजेचे पोल बदलण्याचे काम पुर्ण करावे अशा सक्त सुचना आमदार शंभूराज देसाईंनी अभिमन्यू राख,कार्यकारी अभियंता, महाराष्ट्र राज्य विद्यूत वितरण कंपनी मर्या विभाग कराड तसेच पाटण,मल्हारपेठ व उंब्रज उपविभाग कार्यालयाचे उप कार्यकारी अभियंता यांना दिल्या आहेत.

              आमदार शंभूराज देसाईंनी जिल्हा नियोजनच्या आराखडयातून विद्यूत विकास योजनेतंर्गत गंजलेले पोल बदलणे याकरीता मंजुर करुन आणलेल्या ५५ लाख १ हजार २६८ रुपयांच्या निधीमध्ये पाटण तालुक्यातील खालील ११४ गांवातील ५०९ गंजलेल्या वीजेच्या पोलचा समावेश असून अत्यंत गरजेच्या ठिकाणचे पोल बदलण्याची प्रक्रिया विभागामार्फत सुरु करण्यात आली असून उर्वरीतही मंजुर करण्यात आलेले विजेचे पोल बदलण्याची प्रक्रिया गतीने करुन सदरचे पोल मुदतीत तात्काळ बदलण्यात यावेत अशा सुचनाही कार्यकारी अभियंता यांना आमदार शंभूराज देसाईंकडून देण्यात आल्या आहेत. गंजलेले वीजेचे पोल बदलणेच्या कामांत पाटण तालुक्यातील खालील गांवाचा व तेथील बदलावयाच्या पोलची संख्यांचा समावेश आहे.नवजा कामरगांव-१५,ढोकावळे-५,खुडूपलेवाडी (धनगरवाडा)-५,घाणबी मोहिते आव्हाड-५, घेरादातेगड-४, जाईचीवाडी-३, बोंद्री- ५, म्हारवंड-५,मरड-४, मरड धनगरवाडी-५,मिसाळवाडी मरड-४, डफळवाडी-७, बागलेवाडी सावरघर-३, भोकरवाडी सावरघर-४, बनपेठवाडी-४,जोतिबाचीवाडी-४, येराड-९, गणेवाडी तांबेवाडी-५, आटोली-६, कदमवाडी(नाटोशी)-२, पेठशिवापूर- ५, किल्ले मोरगिरी-४, कुसरुंड-५, कोकिसरे-४, झाकडे-३, तळीये-२, दिक्षी-३, धावडे-५, नाटोशी-६ ,पाचगणी-६, बाहे-३, मणेरी- ५, शिद्रुकवाडी  धावडे-५, कळकेवाडी-३, तामीणे-५, आचरेवाडी-२, कसणी-१०, काळगांव-१०, चोरगेवाडी काळगांव-२, मस्करवाडी नं.२-३, रामिष्टेवाडी-५ ,लोहारवाडी काळगांव-४, कुंभारगांव-१०, खळे-४, गलमेवाडी-४, गुढे-५, चाळकेवाडी-३, चिखलेवाडी-३, शिद्रुकवाडी काजारवाडी-५, शेंडेवाडी-३ मारुल तर्फ पाटण २-२, वाजेगांव-२, काठी अवसरी-५, कातवडी-२, खिवशी-४, पळासरी-६, भिकाडी-५, रामेल-५, घोट-३, तारळे-५, वाघळवाडी(ढोरोशी)-३, कवठेकरवाडी-२, कोचरेवाडी- ९, खोणोली-२, गमेवाडी-२, चाफळ-५ ,चाफेर-३, जंगलवाडी चाफळ-३, जाळगेवाडी-५, डेरवण-५, दाढोली-२, पाडळोशी-४, बोर्गेवाडी ( डेरवण)- ५, भैरेवाडी ( डेरवण ) -५, माजगांव-४, शिंगणवाडी-२, सडादाढोली-६, उरुल-७, गिरेवाडी-५, नारळवाडी-५, नावडी-६, मंद्रुळहवेली-५, येराडवाडी-५, विहे-५, वेताळवाडी-५, सोनाईचीवाडी-५, डिगेवाडी काळेवाडी-४, गव्हाणवाडी-६, गारवडे-५, चोपदारवाडी-५, डावरी-४, पापर्डे-४, मरळी-४, शिंदेवाडी-३, सांगवड-५, सुर्यवंशीवाडी-३, सुळेवाडी-३, सोनवडे-४, हुंबरवाडी-४, आंब्रग-६, तळीये पश्चिम-३, हुंबरणे-४ ,आंबेघर तर्फ मरळी-३, कोळेकरवाडी-५, जिंती- ५, मोडकवाडी-५, सातर-५, हौदाचीवाडी-४, टेटमेवाडी -४, मस्करवाडी नं.१-२, मुट्टलवाडी-३ ,येळेवाडी-४, लोटलेवाडी-३, करपेवाडी-४ असे एकूण पाटण तालुक्यातील ११४ गांवातील ५०९ वीजेच्या पोलचा यामध्ये समावेश आहे.

Wednesday 3 July 2019

अधिवेशन संपताच आमदार शंभूराज देसाईंची कामाला सुरुवात. अधिवेशन संपल्याच्या दुसऱ्या दिवशी बैठका,भेटी व विविध कार्यक्रमांतून साधला जनतेशी संपर्क.






दौलतनगर दि.०3:- महाराष्ट्र विधानसभेचे पावसाळी अधिवेशन कालच संपले असून अधिवेशन संपताच मुंबईतून रात्री उशीरा मतदारसंघात येवून अधिवेशन संपल्याच्या दुसऱ्या दिवशीच पाटणचे आमदार शंभूराज देसाईंनी मतदार संघातील जनतेच्या कामांना सुरुवात केली. राज्य शासनाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या ३३ कोटी वृक्ष लागवडीचा पाटण मतदारसंघातील प्रारंभ उरुल ता.पाटण येथे त्यांच्या हस्ते करण्यात आला तर तातडीने त्यांचे अध्यक्षतेखाली पाटण  तहसिल कार्यालयात आपत्ती व्यवस्थापनाची बैठक घेण्यात आली.बैठकीपुर्वी पाटण याठिकाणी त्यांनी पंढरपुरकडे मौजे त्रिपुडी येथून प्रस्थान करणाऱ्या पायी दिंडीमध्ये दर्शन घेवून वारकऱ्यांसह पायी दिंडीमध्ये सहभाग घेतला व बैठकीनंतर आपल्या समस्या घेवून आलेल्या जनतेचे अनेक प्रश्न त्यांनी तहसिल कार्यालयात तातडीने सोडविले.
  सतर्क आमदार म्हणून आमदार शंभूराज देसाईंच्या कार्यपध्दतीचे नेहमीच कौतुक केले जाते.महाराष्ट्र विधानसभेचे पावसाळी अधिवेशनाच्या शनिवार व रविवारच्या सुट्टीच्या कालावधीतही ते मुंबईहून मतदारसंघात येवून जनतेच्या असणाऱ्या समस्या सोडवित होते.कालच विधानसभेचे पावसाळी अधिवेशन संपताच मुंबईहून ते रात्री उशीरा मतदारसंघात आले व दुसऱ्या दिवशी मतदारसंघातील कामांना त्यांनी सुरुवात देखील केल्याचा प्रत्यय आज  तहसिल कार्यालयात पहावयास मिळाला.पाटण तालुक्यात दोन ते तीन दिवसापुर्वी पावसाने दमदार हजेरी लावली असून पाटण तालुका अतिवृष्टीचा तालुका म्हणून ओळखला जातो.अतिवृष्टीच्या काळात करावयाच्या उपाययोजना या तातडीने होणेकरीता आमदार देसाई हे नेहमीच सतर्क असतात हे गत चार वर्षात पाटण मतदारसंघातील जनतेने पाहिले आहे. अतिवृष्टीच्या काळात वेळप्रसंगी  कोणत्याही ठिकाणी अडचणी निर्माण झाल्या तर त्याठिकाणी आमदार शंभूराज देसाई हे जातीने स्वत: जातात व त्या संकटावर उपाययोजना करतात हेही पाटण मतदारसंघातील जनतेला ज्ञात आहे.
पावसाळयात निर्माण होणाऱ्या अडीअडचणी सोडविण्याकरीता तालुका प्रशासन सतर्क राहणेकरीता सुरुवातीसच उपाययोजना करणेसाठी त्यांनी आज सकाळी स्वत: तालुका प्रशासनाचे प्रमुख व महसूल विभागाचे प्रांताधिकारी, तहसिलदार यांना दुरध्वनी करुन तातडीने आज आपत्ती व्यवस्थानाची तातडीची बैठक आयोजीत करण्याच्या सुचना दिल्या त्यानुसार त्यांच्या अध्यक्षतेखाली पाटण तहसिल कार्यालयाच्या प्रतिक्षालय इमारतीमध्ये आपत्ती व्यवस्थापनाची बैठक घेण्यात आली.पाटण मतदारसंघात पावसाळयात यापुर्वी ज्या ज्या ठिकाणी अडीअडचणी निर्माण होवून जनतेला नाहक त्रास होतो त्याचा आढावा त्यांनी यावेळी प्रथमत: घेतला व यासंदर्भात संबधित विभागाने तातडीने उपाययोजना करण्याच्या सुचना दिल्या.आपत्ती काळात तालुका प्रशासनातील कोणत्याही अधिकाऱ्यांनी हलगर्जीपणा करु नये अशा सक्त सुचना आमदार शंभूराज देसाईंनी तालुका प्रशासनातील अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.डोंगर खचण्याचे प्रकार ज्या ज्या गांवात होत आहेत तेथे आत्ताच उपाययोजना कराव्यात. महसूल आणि बांधकाम तसेच आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी सतर्क राहून येणाऱ्या अडीअडचणीवर तात्काळ मात करावी याकरीता लागणारा निधी मंजुर करणेकरीता मी कुठेही कमी पडणार नाही.पावसाचा जोर बऱ्यापैकी असून अजुन पंधरा दिवसांनी यासंदर्भात मा.जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत आपण पुन्हा बैठक घेवून येणाऱ्या अडचणी सोडवू असे आश्वासनही त्यांनी यावेळी अधिकाऱ्यांना दिले.यावेळी बैठकीस प्रातांधिकारी श्रीरंग तांबे, तहसिलदार रामहरी भोसले यांच्यासह पाटण तालुक्यातील तालुका प्रशासनातील सर्व खात्यांचे खातेप्रमुख यांची उपस्थिती होती.
दरम्यान आपत्ती व्यवस्थापन बैठकीपुर्वी आमदार शंभूराज देसाई यांच्या हस्ते राज्य शासनाने राबविलेला ३३ कोटी वृक्ष लागवडीचा पाटण मतदारसंघातील शुभारंभ उरुल याठिकाणी आयोजीत करण्यात आला होता. आमदार देसाई यांच्या हस्ते उरुल येथील वनविभागाच्या हद्दीत तसेच जंगबदा हायस्कुलच्या प्रांगणात तसेच उरुल ग्रामपंचायतीच्या हद्दीत वृक्षारोपण करुन वृक्ष लागवडीस प्रारंभ करण्यात आला. त्यानंतर आमदार देसाईंनी पाटण येथे पंढरपुरला निघालेल्या पायी दिंडीमध्ये वारकऱ्यासह सहभाग घेतला. व बैठकीनंतर तहसिल कार्यालयामध्ये त्यांनी जनतेच्या विविध प्रश्नांची सोडवणूक केली. आमदार शंभूराज देसाई पाटण मतहसिल कार्यालयात आल्यानंतर तिथेच सुमारे दीड तास त्यांचा जनता दरबार पहावयास मिळाला.यावरुनच आमदार शंभूराज देसाई हे किती सतर्क आणि जनतेच्या प्रश्नाविषयी तळमळ असणारे आमदार आहेत याचा प्रत्यय मतदारसंघातील जनतेला यादिवशी आला.  

कोयना प्रकल्पग्रस्तांच्या संकलन दुरुस्ती तसेच शिल्लक जमिन वाटपाच्या कामांत स्थानिक लोकप्रतिनिधी व स्थानिक प्रकल्पग्रस्तांना विश्वासात घेवूनच कामे करा. मदत व पुनर्वसन,भूकंप पुनर्वसन राज्यमंत्री ना.संजय (बाळा) भेगडे यांचा आदेश.


                                            




दौलतनगर दि.०3:-  पाटण विधानसभा मतदारसंघातील कोयना धरणातून विस्थापित झालेल्या ५४ गांवातील प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाचे,संकलन रजिस्टर दुरुस्तीचे,शिल्लक जमिन वाटपाचे तसेच बरेच अंशी प्रलंबीत राहिलेले विविध प्रश्न सोडविणेसंदर्भात स्थानिक लोकप्रतिनिधी व स्थानिक प्रकल्पग्रस्तांना विश्वासात घेवूनच सर्वसमावेशक असे काम शासकीय अधिकाऱ्यांनी  करावे. राज्याचे मुख्यमंत्री ना.देवेंद्रजी फडणवीस यांचे सुचनेवरुन कोयना प्रकल्पग्रस्तांच्या विविध प्रश्नाची सोडवणूक करणेकरीता  विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली टास्क फोर्सची निर्मिती करण्यात आली आहे. त्या विभागाचे आमदार शंभूराज देसाईंनी या विषयासंदर्भात जो औचित्याचा मुद्दा विधानसभेत मांडला त्यावर अधिकाऱ्यांनी प्राधान्याने कार्यवाही करावी असे आदेश मदत व पुनर्वसन, भूकंप पुनर्वसन राज्यमंत्री ना.संजय (बाळा) भेगडे यांनी बैठकीत उपस्थित अधिकाऱ्यांना दिले.
  आमदार शंभूराज देसाईंनी कोयना धरणातून विस्थापित झालेल्या ५४  गांवातील प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाचे, संकलन रजिस्टर दुरुस्तीचे,शिल्लक जमिन वाटपाचे तसेच बरेच अंशी प्रलंबीत राहिलेले विविध प्रश्न सोडविणेसंदर्भात विधानसभेत औचित्याचा मुद्दा उपस्थित केला होता या औचित्याच्या मुद्दयाच्या अनुषंगाने मदत व पुनर्वसन,भूकंप पुनर्वसन राज्यमंत्री ना.संजय (बाळा) भेगडे यांनी तात्काळ बैठक घेण्याचे आश्वासन दिलेप्रमाणे त्यांचे अध्यक्षतेखाली विधानभवन,मुंबई येथे बैठक घेण्यात आली यावेळी राज्यमंत्री ना.भेगडे यांनी वरीलप्रमाणे आदेश दिले.बैठकीस आमदार शंभूराज देसाई, उपायुक्त पुर्नवसन दिपक नलवडे,अतिरिक्त जिल्हाधिकारी साहेबराव गायकवाड,जिल्हा पुनर्वसन अधिकारी श्रीमती रुपाली आवळे,कोयना पुनर्वसन विभागाचे कार्यकारी अभियंता गायकवाड, पुनर्वसन विभागाचे उपसचिव,माजी पंचायत समिती सदस्य हरीष भोमकर,कोयना विभागातील पुनर्वसित गावठाणांतील स्थानिक दत्तात्रय देशमुख,संजय लाड, बाजीराव कदम,दगडू कदम,नरसिंग देशमुख,शैलेश सपकाळ यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी बैठकीत आमदार शंभूराज देसाईंनी विधानसभेत मांडलेल्या औचित्याच्या मुद्दयातील माहिती राज्यमंत्री ना.संजय (बाळा) भेगडे यांच्या निदर्शनास आणून दिली यामध्ये कोयना धरणातून विस्थापित झालेल्या ५४  गांवातील प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाचे,संकलन रजिस्टर दुरुस्तीचे,शिल्लक जमिन वाटपाचे तसेच बरेच अंशी प्रलंबीत राहिलेले विविध प्रश्न सोडविणेसंदर्भात राज्याचे मुख्यमंत्री ना.देवेंद्रजी फडणवीस यांना मी सन २०१८ च्या अधिवेशन काळात उच्चस्तरीय बैठक घेण्याची मागणी केली होती तेव्हा दि.२०.०३.२०१८ रोजी मुख्यमंत्री ना.देवेंद्रजी फडणवीस यांचे अध्यक्षतेखाली मुख्यमंत्र्याचे समिती कक्ष विधानभवन याठिकाणी झालेल्या उच्चस्तरीय बैठकीमध्ये कोयना प्रकल्पग्रस्तांच्या विविध प्रश्नाची सोडवणूक करणेकरीता  विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली व सातारा जिल्हयाच्या जिल्हाधिकारी यांचे देखरेखीखाली टास्क फोर्सची निर्मिती करुन जिल्हाधिकारी,सातारा यांना कोयना धरण प्रकल्पग्रस्तांच्या विविध प्रश्नाची माहिती संकलित करुन या प्रश्नासंदर्भात कार्यवाही करण्याच्या सुचना मुख्यमंत्री यांचेकडून देण्यात आल्या होत्या. त्यावेळी या मतदारसंघाचा लोकप्रतिनिधी म्हणुन मीही बैठकीस उपस्थित होतो.टास्क फोर्सच्या माध्यमातून प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाचे,संकलन रजिस्टर दुरुस्तीचे,शिल्लक जमिन वाटपाचे कामांचा निपटारा करीत असताना  ९० टक्के गावांतील प्रकल्पग्रस्तांना तसेच या मतदारसंघाच्या लोकप्रतिनिधींना विश्वासात न घेता काम करण्यात येत असून यामुळे ९० टक्के गांवातील प्रकल्पग्रस्तांचा या कार्यपध्दतीवर सातत्याने आक्षेप असून टास्क फोर्सच्या माध्यमातून आमचे प्रश्न मार्गी लावताना आम्हाला तसेच येथील लोकप्रतिनिधींना विश्वासात घेवून सर्वसमावेशक असे प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाचे,संकलन रजिस्टर दुरुस्तीचे,शिल्लक जमिन वाटपाचे काम करण्यात यावे व हे प्रश्न सोडविण्यासाठी स्थानिक प्रकल्पग्रस्तांची एखादी पुर्नवसन समिती स्थापन करावी अशी या प्रकल्पग्रस्तांची आग्रही भूमिका असल्याचे आमदार देसाईंनी यावेळी बैठकीत सांगितले.
यावेळी मदत व पुनर्वसन, भूकंप पुनर्वसन राज्यमंत्री ना.संजय (बाळा) भेगडे यांनी कोयना धरणातून विस्थापित झालेल्या मुळ ५४ गांवातील प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाचे,संकलन रजिस्टर दुरुस्तीचे तसेच शिल्लक जमिन वाटप करताना या विभागाचे आमदार शंभूराज देसाईंनी मांडलेल्या औचित्याच्या मुद्दयातील बाबींचा प्राधान्याने विचार करुन त्यांच्या मुद्दयांवर प्राधान्याने कार्यवाही करावी तसेच या सर्व प्रक्रियेमध्ये स्थानिक आमदार शंभूराज देसाई तसेच ५४ पुनर्वसित गांवातील स्थानिक मुळ प्रकल्पग्रस्त यांना सदरचे काम करणाऱ्या अधिकाऱ्यांनी प्रथम प्राधान्याने विश्वासात घ्यावे व कोयना प्रकल्पग्रस्तांच्या विविध प्रश्नांची सर्वसमावेशक अशी सोडवणूक करावी असे आदेश या बैठकीत उपस्थित सर्व अधिकाऱ्यांना त्यांनी दिले. बैठकीत धोरणात्मक निर्णय घेतलेबद्दल आमदार शंभूराज देसाईंनी राज्यमंत्री ना.संजय (बाळा) भेगडे यांचे जाहीर आभार मानले.

Tuesday 2 July 2019

तालिका अध्यक्ष म्हणून आमदार शंभूराज देसाईंची उत्तम कामगिरी. मुख्यमंत्री व विधानसभा अध्यक्ष व मान्यवरांकडून आमदार शंभूराज देसाईंचे विशेष अभिनंदन.






            दौलतनगर दि.०२:-  सन २०१४ ते २०१९ या पंचवार्षिकमध्ये महाराष्ट्र विधानसभेच्या अधिवेशनात तालिका अध्यक्षपदी चौथ्यांदा निवड झालेले व आमदारकीच्या पहिल्याच टर्ममध्ये उत्कृष्ट संसदपटु आमदार म्हणून देशाच्या राष्ट्रपती यांच्या हस्ते सन्मानित झालेले पाटणचे उत्कृष्ट संसदपटु आमदार शंभूराज देसाईंनी विधानसभेच्या आत्ताच्या पावसाळी अधिवेशनात तालिका अध्यक्ष म्हणून विधानसभा सभागृहात बजावलेल्या उत्तम कामगिरीबद्दल तसेच सभागृहाचे कामकाज कोणताही गोधंळ सभागृहात न होता उत्कृष्ठरित्या चालविल्याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस, विधानसभा अध्यक्ष ना.हरीभाऊ बागडे यांच्यासह विधानसभेचे उपाध्यक्ष ना.विजयराव औटी,शिवसेना गटनेते व सार्वजनीक बांधकाम मंत्री ना.एकनाथ शिंदे,विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्याबरोबर विधानसभेतील विविध पक्षाचे सत्ताधारी व विरोधी बाकावरील विधानसभा सदस्यांनी त्यांचे विशेष अभिनंदन केले आहे.
             विधानसभेतील अभ्यासू आमदार म्हणून पाटणचे लोकप्रिय तरुण आमदार शंभूराज देसाईंची विधानसभेत व संपुर्ण महाराष्ट्रात ओळख आहे.२००४ साली महाराष्ट्र विधानसभेत पहिल्यांदा निवडून गेल्यानंतर पहिल्याच टर्ममध्ये त्यांच्या अभ्यासू आणि मुद्देसुद अशा व राज्यातील सर्व घटकांना स्पर्श करणाऱ्या भाषणांनी उत्कृष्ट संसदपटु आमदार म्हणून त्यांना देशाच्या राष्ट्रपती यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले आहे.शिवसेना पक्षाने त्यांचेवर विधिमंडळ पक्षप्रतोद म्हणून जबाबदारी दिली असून शिवसेनेचा विधानसभेतील बुलंद आवाज व बलस्थान चेहरा म्हणून त्यांनी ही जबाबदारी लिलया पेलली आहे.आमदार शंभूराज देसाई हे पाटणसारख्या डोंगरी आणि दुर्गम तालुक्यातून आमदार म्हणून निवडून आले असून आमदारकीचा कोणताही पुर्वानुभव नसताना सन २००४ ला आमदार म्हणून विधानसभेची पायरी चढल्यानंतर संसदीय कामकाजाचा खडान्‌खडा अभ्यास करुन त्यांनी आपल्या हुशारीचे कर्तृत्व सिध्द करुन दाखविले आहे.त्यांच्या हुशारीचे मुल्यमापन महाराष्ट्र विधीमंडळाने नेहमीच केले आहे.
              महाराष्ट्र विधानसभा हे राज्यातील लोकशाहीचे सर्वोच्च असे सभागृह असून या सभागृहात अधिवेशन काळात विधानसभेचे अध्यक्ष व उपाध्यक्ष यांच्या अनुपस्थितीत सभागृहाचे कामकाज चालविण्यासाठी विधानसभा अध्यक्ष हे महाराष्ट्र विधानसभा नियम ८ अन्वये विधानसभेच्या सदस्यांमधून सभाध्यक्ष तालिकेवर विविध पक्षाच्या विधानसभा सदस्यांची नियुक्ती करण्यात येते. महाराष्ट्र विधानमंडळाने शिवसेना पक्षाचे आमदार शंभूराज देसाईंचे विधानसभेतील कामकाज पाहून त्यांची सन २०१४ ते २०१९ या पंचवार्षिक मध्ये महाराष्ट्र विधानसभेच्या तालिकाध्यक्षपदी चौथ्यांदा नियुक्ती केली.सन २०१६ चे पावसाळी अधिवेशन,२०१८ चे अर्थसंकल्पीय अधिवेशन, २०१९ चे अर्थसंकल्पीय अधिवेशन व सध्याचे पार पडलेले पावसाळी अधिवेशन अशा चार अधिवेशनात आमदार शंभूराज देसाईंना तालिकाध्यक्ष म्हणून बसण्याचा बहूमान मिळाला.
               विधानसभेचे तालिका अध्यक्ष म्हणून संपुर्ण पावसाळी अधिवेशनात विधानसभेचे कामकाज पाहताना दररोज त्यांनी निपक्ष:पातीपणे सभागृहाचे कामकाज चालविले. अनेकवेळा विधानसभा सभागृहात विरोधी बाकावरुन गोंधळाचे प्रसंग निर्माण झाले तरी आमदार शंभूराज देसाईंनी ते शिताफीने हाताळत सभागृहात गोंधंळाची वेळ कधीच येवू दिली नाही. तालिका अध्यक्ष म्हणून जेव्हा जेव्हा सभागृहाचे कामकाज त्यांनी पाहिले तेव्हा तेव्हा सभागृहातील सत्ताधारी व विरोधी बाकावरील सदस्यांना त्यांचे प्रश्न मांडण्याची, बोलण्याची खुप संधी मिळवून दिली. विशेष म्हणजे  शुक्रवार दि.२८ जुन रोजी विधानसभा कामकाजाच्या दिनक्रमामध्ये  सकाळी ०९ ते १०.४५ वाजेपर्यंत सभागृहाचे स्पेशल सेटिंग ठेवण्यात आले होते या पावणेदोन तासाच्या काळात एकूण १० लक्षवेदी सुचना दिनक्रमामध्ये घेण्यात आल्या होत्या. १० पैकी ०८ लक्षवेदी सुचनांच्या संदर्भात सभागृहात चर्चा व यावर संबधित मंत्री यांचे उत्तराचे कामकाज तालिका अध्यक्ष आमदार शंभूराज देसाईंच्या नेतृत्वाखाली पार पडले.आमदार शंभूराज देसाईंना तालिकाध्यक्ष म्हणून सर्वच पक्षाच्या वतीने नेहमीच चांगला प्रतिसाद मिळाला. अनेक मान्यवरांनी त्यांच्या या कामकाजाचे तोंडभरुन कौतुक करुन तुम्हाला विधानसभा अध्यक्षांच्या खुर्चीवरुन कामकाज चालविताना पहाताना आम्हाला नेहमीच लोकनेते बाळासाहेब देसाई यांची आठवण येते अशा स्पष्ट प्रतिक्रिया सत्ताधारी मंत्री, सदस्य तसेच विरोधी पक्षातील सदस्यांनी आमदार शंभूराज देसाईंना दिल्या. विधानसभा सभागृहात बजावलेल्या उत्तम कामगिरी तसेच विधानसभेचे कामकाज सुरळीत चालविलेबद्दल मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस, विधानसभा अध्यक्ष ना.हरीभाऊ बागडे यांच्यासह अनेक मान्यवरांनी आमदार शंभूराज देसाईंचे विशेष अभिनंदन केल्यानंतर त्यांनी सर्वांचे विशेष आभार मानले.

तालिका अध्यक्ष म्हणून आमदार शंभूराज देसाईंची उत्तम कामगिरी. मुख्यमंत्री व विधानसभा अध्यक्ष व मान्यवरांकडून आमदार शंभूराज देसाईंचे विशेष अभिनंदन.







            दौलतनगर दि.०२:-  सन २०१४ ते २०१९ या पंचवार्षिकमध्ये महाराष्ट्र विधानसभेच्या अधिवेशनात तालिका अध्यक्षपदी चौथ्यांदा निवड झालेले व आमदारकीच्या पहिल्याच टर्ममध्ये उत्कृष्ट संसदपटु आमदार म्हणून देशाच्या राष्ट्रपती यांच्या हस्ते सन्मानित झालेले पाटणचे उत्कृष्ट संसदपटु आमदार शंभूराज देसाईंनी विधानसभेच्या आत्ताच्या पावसाळी अधिवेशनात तालिका अध्यक्ष म्हणून विधानसभा सभागृहात बजावलेल्या उत्तम कामगिरीबद्दल तसेच सभागृहाचे कामकाज कोणताही गोधंळ सभागृहात न होता उत्कृष्ठरित्या चालविल्याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस, विधानसभा अध्यक्ष ना.हरीभाऊ बागडे यांच्यासह विधानसभेचे उपाध्यक्ष ना.विजयराव औटी,शिवसेना गटनेते व सार्वजनीक बांधकाम मंत्री ना.एकनाथ शिंदे,विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्याबरोबर विधानसभेतील विविध पक्षाचे सत्ताधारी व विरोधी बाकावरील विधानसभा सदस्यांनी त्यांचे विशेष अभिनंदन केले आहे.
             विधानसभेतील अभ्यासू आमदार म्हणून पाटणचे लोकप्रिय तरुण आमदार शंभूराज देसाईंची विधानसभेत व संपुर्ण महाराष्ट्रात ओळख आहे.२००४ साली महाराष्ट्र विधानसभेत पहिल्यांदा निवडून गेल्यानंतर पहिल्याच टर्ममध्ये त्यांच्या अभ्यासू आणि मुद्देसुद अशा व राज्यातील सर्व घटकांना स्पर्श करणाऱ्या भाषणांनी उत्कृष्ट संसदपटु आमदार म्हणून त्यांना देशाच्या राष्ट्रपती यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले आहे.शिवसेना पक्षाने त्यांचेवर विधिमंडळ पक्षप्रतोद म्हणून जबाबदारी दिली असून शिवसेनेचा विधानसभेतील बुलंद आवाज व बलस्थान चेहरा म्हणून त्यांनी ही जबाबदारी लिलया पेलली आहे.आमदार शंभूराज देसाई हे पाटणसारख्या डोंगरी आणि दुर्गम तालुक्यातून आमदार म्हणून निवडून आले असून आमदारकीचा कोणताही पुर्वानुभव नसताना सन २००४ ला आमदार म्हणून विधानसभेची पायरी चढल्यानंतर संसदीय कामकाजाचा खडान्‌खडा अभ्यास करुन त्यांनी आपल्या हुशारीचे कर्तृत्व सिध्द करुन दाखविले आहे.त्यांच्या हुशारीचे मुल्यमापन महाराष्ट्र विधीमंडळाने नेहमीच केले आहे.
              महाराष्ट्र विधानसभा हे राज्यातील लोकशाहीचे सर्वोच्च असे सभागृह असून या सभागृहात अधिवेशन काळात विधानसभेचे अध्यक्ष व उपाध्यक्ष यांच्या अनुपस्थितीत सभागृहाचे कामकाज चालविण्यासाठी विधानसभा अध्यक्ष हे महाराष्ट्र विधानसभा नियम ८ अन्वये विधानसभेच्या सदस्यांमधून सभाध्यक्ष तालिकेवर विविध पक्षाच्या विधानसभा सदस्यांची नियुक्ती करण्यात येते. महाराष्ट्र विधानमंडळाने शिवसेना पक्षाचे आमदार शंभूराज देसाईंचे विधानसभेतील कामकाज पाहून त्यांची सन २०१४ ते २०१९ या पंचवार्षिक मध्ये महाराष्ट्र विधानसभेच्या तालिकाध्यक्षपदी चौथ्यांदा नियुक्ती केली.सन २०१६ चे पावसाळी अधिवेशन,२०१८ चे अर्थसंकल्पीय अधिवेशन, २०१९ चे अर्थसंकल्पीय अधिवेशन व सध्याचे पार पडलेले पावसाळी अधिवेशन अशा चार अधिवेशनात आमदार शंभूराज देसाईंना तालिकाध्यक्ष म्हणून बसण्याचा बहूमान मिळाला.
               विधानसभेचे तालिका अध्यक्ष म्हणून संपुर्ण पावसाळी अधिवेशनात विधानसभेचे कामकाज पाहताना दररोज त्यांनी निपक्ष:पातीपणे सभागृहाचे कामकाज चालविले. अनेकवेळा विधानसभा सभागृहात विरोधी बाकावरुन गोंधळाचे प्रसंग निर्माण झाले तरी आमदार शंभूराज देसाईंनी ते शिताफीने हाताळत सभागृहात गोंधंळाची वेळ कधीच येवू दिली नाही. तालिका अध्यक्ष म्हणून जेव्हा जेव्हा सभागृहाचे कामकाज त्यांनी पाहिले तेव्हा तेव्हा सभागृहातील सत्ताधारी व विरोधी बाकावरील सदस्यांना त्यांचे प्रश्न मांडण्याची, बोलण्याची खुप संधी मिळवून दिली. विशेष म्हणजे  शुक्रवार दि.२८ जुन रोजी विधानसभा कामकाजाच्या दिनक्रमामध्ये  सकाळी ०९ ते १०.४५ वाजेपर्यंत सभागृहाचे स्पेशल सेटिंग ठेवण्यात आले होते या पावणेदोन तासाच्या काळात एकूण १० लक्षवेदी सुचना दिनक्रमामध्ये घेण्यात आल्या होत्या. १० पैकी ०८ लक्षवेदी सुचनांच्या संदर्भात सभागृहात चर्चा व यावर संबधित मंत्री यांचे उत्तराचे कामकाज तालिका अध्यक्ष आमदार शंभूराज देसाईंच्या नेतृत्वाखाली पार पडले.आमदार शंभूराज देसाईंना तालिकाध्यक्ष म्हणून सर्वच पक्षाच्या वतीने नेहमीच चांगला प्रतिसाद मिळाला. अनेक मान्यवरांनी त्यांच्या या कामकाजाचे तोंडभरुन कौतुक करुन तुम्हाला विधानसभा अध्यक्षांच्या खुर्चीवरुन कामकाज चालविताना पहाताना आम्हाला नेहमीच लोकनेते बाळासाहेब देसाई यांची आठवण येते अशा स्पष्ट प्रतिक्रिया सत्ताधारी मंत्री, सदस्य तसेच विरोधी पक्षातील सदस्यांनी आमदार शंभूराज देसाईंना दिल्या. विधानसभा सभागृहात बजावलेल्या उत्तम कामगिरी तसेच विधानसभेचे कामकाज सुरळीत चालविलेबद्दल मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस, विधानसभा अध्यक्ष ना.हरीभाऊ बागडे यांच्यासह अनेक मान्यवरांनी आमदार शंभूराज देसाईंचे विशेष अभिनंदन केल्यानंतर त्यांनी सर्वांचे विशेष आभार मानले.

कोयना भूकंप पुनर्वसन निधीच्या २० कोटीपैकी पाटण तालुक्यातील विकासकामांना ०७ कोटी रुपये मंजुर. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत निधी मंजुर- आमदार शंभूराज देसाईंची माहिती.


                                       





दौलतनगर दि.०२:-  कोयना भूकंप पुनर्वसन निधी समिती या सार्वजनीक न्यासामार्फत प्रतिवर्षी भूकंपप्रवण तालुक्याकरीता देण्यात येणाऱ्या निधीमधून यंदाच्या वर्षी महाजेनकोकडून प्राप्त रु १५ कोटी व बचत खात्यावरील जमा व्याज रक्कम रु ०५ कोटी असे एकूण २० कोटी रुपये कोयना भूकंप पुनर्वसन निधी समितीकडे जमा झाले असून या २० कोटी रुपयांचा निधी या समितीतंर्गत येणाऱ्या तालुक्यांना अनुज्ञेय टक्केवारीच्या मर्यादेत मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांचे आदेशाने मंजुर करुन वितरीत करण्यात आला. एकूण २० कोटी निधीमध्ये पाटण तालुक्याला ३५ टक्के प्रमाणे देय असणाऱ्या ०७ कोटी रुपयांच्या विविध विकासकामांना समितीमार्फत मंजुरी देण्यात आली असल्याची माहिती कोयना भूकंप पुनर्वसन निधी समितीचे कोषाध्यक्ष, पाटणचे आमदार शंभूराज देसाईंनी प्रसिध्दीस दिली आहे.
कोयना भूकंप पुनर्वसन निधी समिती या सार्वजनीक न्यासाचे अध्यक्ष राज्याचे मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांचे अध्यक्षतेखाली कोयना भूकंप पुनर्वसन निधी समितीची बैठक सोमवार दि.०१ जुलै, २०१९ रोजी मुख्यमंत्र्याचे समिती कक्ष विधानभवन याठिकाणी पार पडली या बैठकीत वरीलप्रमाणे निधी मंजुर करण्यात येवून भूकंपप्रवण तालुक्यांना अनुज्ञेय टक्केवारीच्या मर्यादेत निधी वितरीत करण्याचे आदेश मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांनी न्यासाचे सचिव सुरेश खाडे यांना दिले. यावेळी सातारा जिल्हयातील सर्व विधानसभा सदस्य या बैठकीला उपस्थित होते.
कोयना भूकंप पुनर्वसन निधी समिती या सार्वजनीक न्यासामार्फत प्रतिवर्षी भूकंपप्रवण तालुक्याकरीता महाजेनकोकडून प्राप्त होणाऱ्या निधीतून अनुज्ञेय टक्केवारीच्या मर्यादेत निधी वितरीत करण्यात येतो.राज्याचे मुख्यमंत्री हे या न्यासाचे पदसिध्द अध्यक्ष असून प्रतिवर्षी त्यांच्या अध्यक्षतेखाली या सार्वजनीक न्यासाची बैठक पार पडल्यानंतरच हा निधी भूकंपप्रवण तालुक्याला वितरीत करण्यात येतो.पाटण तालुक्याला कोयना भूकंप पुनर्वसन निधी समिती या सार्वजनीक न्यासामार्फत ३५ टक्के रक्कम देणे अनुज्ञेय आहे. त्यामुळे प्रतिवर्षी समितीकडे येणाऱ्या निधीमधून ३५ टक्के प्रमाणे निधी वितरीत करण्यात येतो.यंदाच्या वर्षी कोयना भूकंप पुनर्वसन निधी समितीकडे महाजेनकोकडून १५ कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला असून बचत खात्यावरील जमा व्याज रक्कम रु ०५ कोटी झाली असून समितीकडे प्राप्त एकूण २० कोटीपैकी पाटण तालुक्याच्या वाटयाला येणाऱ्या ०७ कोटी रुपयांचा निधी मंजुर करण्यात आला आहे. या ०७ कोटी रुपयांच्या निधीमध्ये पाटण तालुक्यातील भूकंपप्रवण ग्रामीण आणि डोंगरी भागातील ग्रामीण रस्ते, शाळांच्या इमारती, पिण्याच्या पाण्याच्या योजना, सार्वजनीक सभागृह या कामांचा समावेश असून मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांनी बैठकीमध्ये भूकंपप्रवण तालुक्यातील विधानसभा सदस्याकडून त्यांना देय असणाऱ्या रक्कमेच्या विकासकामांच्या यादया घेतल्या असून या विविध विकासकामांना तात्काळ प्रशासकीय मान्यता देवून सदरची कामे लवकरात लवकर सुरु करण्याचे आदेश न्यासाच्या सचिवांना दिले असून पाटण तालुक्यातील विविध विकासकामांच्या यादया मुख्यमंत्री यांच्याबरोबर न्यासाचे सचिव यांच्याकडे देण्यात येवून सदरची कामे करणारी यंत्रणांना या कामांचे अंदाजपत्रक लवकरात लवकर समितीकडे सादर करुन समितीची मान्यता घेण्याचे आदेश देण्यात आल्याने लवकरच या विविध विकासकामांना सुरुवात होईल अशी अपेक्षा आमदार शंभूराज देसाईंनी व्यक्त केली आहे.
चौकट:- सातत्याच्या पाठपुराव्यामुळे समितीला प्रतिवर्षी ५ कोटी एैवजी १० कोटींचा निधी मंजुर.
              सन २०१४ ला विधानसभा सदस्य झालेनंतर राज्याचे मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांनी माझी कोयना भूकंप पुनर्वसन निधी समितीच्या कोषाध्यक्ष पदी निवड केल्यानंतर मुख्यमंत्री यांचेकडे मी सातत्याने पाठपुरावा करुन ०५ कोटी रुपये ही रक्कम अल्प असून यामध्ये ०५ कोटी रुपयांची वाढ करुन एकूण १० कोटींचा निधी या समितीमार्फत भूकंपप्रवण तालुक्यांना देण्यात यावा अशी मागणी केल्यानंतर मुख्यमंत्री ना.फडणवीस यांनी माझी मागणी तात्काळ मान्य केल्याने समितीमार्फत आता प्रतिवर्षी १० कोटी रुपयांचा निधी देण्यात येत असल्याचे आमदार शंभूराज देसाईंनी सांगितले.


Monday 1 July 2019

कराड विमानतळाच्या विस्तारवाढीत जमिनी जाणाऱ्या शेतकऱ्यांना रेडीरेकनरच्या साडेचार पट रक्कम दयावी. आमदार शंभूराज देसाईंची विधानसभेत मागणी.


                                                

दौलतनगर दि.०१:-  कराड विमानतळाच्या रुंदीकरणाकरीता तसेच विस्तारवाढीकरीता येथील शेतकऱ्यांच्या सुपिक तसेच चांगल्या जमिनी व मोठया असलेल्या उपसा जलसिंचन योजना जात असल्यामुळे विस्तारवाढीच्या हद्दीत येणाऱ्या शेतकऱ्यांचा या विस्तारवाढीला तीव्र विरोध होता.परंतू या शेतकऱ्यांचा विरोध बऱ्यापैकी मावळला असून कराड विमानतळाच्या विस्तारवाढीत आमच्या जमिनी जाणे आता अनिवार्हच झाले असल्याने आमच्या जमिनींना शासनाने तुटपुंजी मदत देणेपेक्षा ज्याप्रमाणे जलसंपदा विभागाने धरणाच्या कामात जमिनी गेलेल्या बाधितांना रेडीरेकनरच्या साडेचार पट रक्कम देण्याचा धोरणात्मक निर्णय घेतला तोच निर्णय कराड विमानतळाच्या विस्तारवाढीत जमिनी जाणाऱ्या शेतकऱ्यांच्या संदर्भात घेवून या शेतकऱ्यांना चांगला मोबदला मिळवून दयावा अशी आग्रही मागणी आमदार शंभूराज देसाईंनी आज विधानसभा सभागृहात केली. राज्याचे उद्योग मंत्री ना.सुभाष देसाई यांचेकडे ही मागणी प्रत्यक्ष भेटून मी सुरवातीसच केली असून यासंदर्भात अधिवेशन संपलेनंतर शेतकरी प्रतिनिधींची बैठक घेवून शेतकऱ्यांना योग्य न्याय मिळवून देवू असे आश्वासन देखील  त्यांनी मला दिले असल्याचे आमदार शंभूराज देसाईंनी सांगितले.
             सन २०१९-२० च्या सार्वजनीक बांधकाम, सार्वजनीक आरोग्य, उद्योग व ऊर्जा या विभागाच्या पुरवणी मागण्यावर आमदार शंभूराज देसाई विधानसभा सभागृहात बोलत होते.यावेळी त्यांनी वरीलप्रमाणे आग्रही भूमिका मांडत कराड विमानतळाच्या विस्तारवाढीतील बाधित शेतकऱ्यांना शासनाने योग्य तो न्याय मिळवून देणेकरीता वरीलप्रमाणे धोरणात्मक निर्णय घ्यावा व नंतरच कराड विमानतळाच्या रुंदीकरण व विस्तारवाढीच्या कामांस सुरुवात करावी. अधिवेशन संपताच येथील शेतकरी प्रतिनिधींची जी बैठक उद्योग मंत्री ना.सुभाष देसाई यांनी घेण्याचे मान्य केले आहे त्या बैठकीत या बाधित शेतकऱ्यांच्या चांगल्या मोबदल्यासंदर्भात योग्य निर्णय होईल अशी मला खात्री आहे. असे सांगून त्यांनी बांधकाम मंत्री यांचे लक्ष वेधत ग्रामीण आणि डोंगरी तालुक्यांमध्ये डोंगरी वाडयावस्त्यांना जोडण्याकरीता ओढया नाल्यांवरील छोटया पुलांची बांधकामे करण्याची नितांत आवश्यकता असून या कामांना ४० ते ५० लाख रुपयांच्या निधीची गरज असल्याची बाब लक्षात आणून देत या छोटया पुलांना शासनाच्या बांधकाम विभागाने विशेष बाब म्हणून बांधकाम विभागाच्या कोणत्याही योजनेतून आवश्यक असणारा निधी मंजुर करुन दयावा अशी मागणी केली. सार्वजनीक आरोग्य विभागाचे मंत्री ना.एकनाथ शिंदे  यांचे लक्ष वेधत आमदार शंभूराज देसाईंनी ग्रामीण आणि डोंगरी भागातील प्राथमिक आरोग्य केंद्राना तसेच ग्रामीण रुग्णालयांना राज्यात बहूतांशी ठिकाणी आवश्यक असणाऱ्या आरोग्यविषयक यंत्रसामुग्री देणे गरजेचे आहे तर ग्रामीण भागात प्राथमिक आरोग्य केंद्रांना दोन- दोन आरोग्य अधिकारी पदे मंजुर असताना ७० टक्के प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये एकच आरोग्य अधिकारी पहावयास मिळतो तो अधिकारी सकाळी येतो, दुपारी जातो त्यामुळे रात्रीच्या वेळेस याठिकाणी कुणी अधिकारी नसल्याने जनतेला अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. तत्कालीन आरोग्य मंत्री दिपक सावंत आरोग्य मंत्री असताना त्यांनी राज्यातील नवीन भरती होणारे एमबीबीएस वैद्यकीय अधिकारी यांना ग्रामीण भागात सक्तीने सहा महिन्यांची नियुक्ती देण्यात येवून या अधिकाऱ्यांना ग्रामीण भागात जाणे अनिर्वाह करण्याचे धोरण राबविले होते मात्र वस्तूस्थितीत ग्रामीण भागामध्ये एमबीबीएस झालेले वैद्यकीय अधिकारी येण्यास तयार नसल्याने प्राथमिक आरोग्य केंद्रातील अनेक वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे रिक्त आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्यांना त्यांचे नियुक्तीच्या जागी रात्री थांबणे शासनाने सक्तीचे करावे. राज्याचे आरोग्य मंत्री हे ग्रामीण भागातीलच आहेत त्यामुळे त्यांनी स्वत: लक्ष घालून याप्रश्नी योग्य तो मार्ग काढावा. तसेच तत्कालीन आरोग्य मंत्री दिपक सावंत यांच्या काळात आमचे पाटण मतदारसंघातील कोयनानगर या पर्यटनस्थळ असणाऱ्या गांवामध्ये कोयना धरण प्रकल्पाकडे असणारा दवाखाना हा शासनाच्या आरोग्य विभागाकडे घेवून त्याठिकाणी शासनामार्फत आवश्यक त्या आरोग्याच्या यंत्रसामुग्री व आरोग्य अधिकारी आणि कर्मचारी देण्याचा नव्याने शासननिर्णय पारित केला आहे.शासन निर्णयानुसार याठिकाणी आवश्यक ती यंत्रसामुग्री तसेच अधिकारी व कर्मचारी देण्यात आले नाहीत ते शासनाने तात्काळ दयावेत. ढेबेवाडी ग्रामीण रुग्णालयाचे उदघाटन आरोग्य मंत्री तसेच आमचे पालकमंत्री यांचे हस्ते करण्यात आले असून सुसज्ज अशी इमारत याठिकाणी उभी राहिली आहे.तसेच अधिकारी, कर्मचारी निवासस्थानांचेही काम प्रगतीपथावर सुरु असून या रुग्णालयात आवश्यक असणाऱ्या यंत्रसामुग्री मिळणेकरीताचा प्रस्ताव शासनाकडे सादर केला आहे यास मान्यता दयावी असे सांगून त्यांनी ऊर्जामंत्री यांचेकडे अनेक दिवसापासून प्रलंबीत असणारा महानिर्मिती कंपनीकडून आयटीआय अर्हताधारक प्रगत कुशल प्रशिक्षणार्थी यांचा नोकरभरतीचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावावा अशीही मागणी आमदार शंभूराज देसाईंनी या चर्चेदरम्यान केली.
चौकट:- राज्याच्या ऊर्जामंत्र्याचे काम राजधानी एक्सप्रेससारखे एकदम फास्ट.- आमदार देसाई.
             ऊर्जामंत्री ना.चंद्रशेखर बावनकुळे यांनी ऊर्जा खात्याचा पदभार हाती घेतला तेव्हा मी याच सभागृहात ऊर्जा मंत्र्याच्या कामांचे कौतुक केले होते. त्यांच्या काळात ऊर्जा खाते केवळ पळत नाही तर धावत असून याचा अनुभव मी स्वत: घेतला आहे  पाटणच्या ज्या डोंगरी विद्यूत विकास आराखडयाकरीता माझा त्यांचेकडे प्रयत्न चालला होता तो ११ कोटी २२ लाख रुपयांच्या डोंगरी आराखडयास मान्यता देवून त्याचा आदेश त्यांनी या अधिवेशनात माझे हातात दिला त्यामुळे त्यांचे काम हे राजधानी एक्सपे्रससारखेच फास्ट असून ज्याने केले त्याला केले म्हणायलाच पाहिजे.असे सांगून ऊर्जामंत्र्यांचे आमदार देसाईंनी सभागृहात जाहीर आभार व्यक्त केले.